"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकडे इन्कम टॅक्स वाले येतात कि काय फक्त ?
समाजात वावरणा-यांकडे सर्व थरातले लोक येत असतात. आमचे एक नातेवाईक त्या भागात आहेत. त्यांच्यासोबत गावातली मंडळी होती. मुंबईला जाताना माझ्याकडे दोन तास थांबले होते. जगात फक्त काँग्रेसवाले आणि भाजपवाले इतकेच लोक नाहीत. त्याबाहेरही दुनिया आहे हो अनिलजी. आणि लोक भेटले की हा विषय निघतोच . त्याला तुमच्याकडे कन्फेशन म्हणायचा आदेश निघालेला असेल तर तुम्ही तरी काय करणार म्हणा ?

मी समजू शकते तुमची अडचण.

आज खरोखर "गंगा मैली" झाली. Wink

काय फिल्मी डायलॉग मारलेला रविशंकरने मला वाटले पुढचे वाक्य राहूल जी "भगवान के लिये मोदी को छोड दो" असे तर नाही बोलत Biggrin

मितरों,
गेली 2 पाने आपण गैरसोय विषयापासून बरेच दूर गेलो आहोत,
थोड्याच मेसेजस नंतर इकडे धुळवड सुरु होईल असे दिसते,
त्या धुळवडी चे पर्यवसन धागा वाहता होण्यात होऊ देऊ नका,
बरेच माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत , जे वाहून जातील.

तसेही धाग्याने 2000 चा टप्पापा ओलांडला आहे, अजून पेशन्स असेल तर मी भाग 2 काढतो पुढची "चर्चा " (?) तिकडे करू.

लोकांना कदाचित माझे प्रश्न खोचक किंवा उपरोधिक वाटत असावेत पण मी>>>>>>> अजिबात नाही. २० तारखेला आईची मेडीक्लेमची पॉलिसी रिन्यू करायची होती.शेवटचा दिवस होता. ऑनलाईनने पैसे भरल्यास ५५०/- डिस्काऊंट मिळत होता.त्यामुळे सकाळी डेबिटकार्डाने पैसे भरले.अकाऊंटमधून पैसे खर्च झाल्याचा मेसेज आला.पण पोर्टलमधे बिघाड असल्याने पॉलिसी रिन्यू झाली नाही.थोड्यावेळाने परत डेबिटकार्ड वापरले तर मेसेज येत होता की पॉलिसी आलरेडी रिन्यूड. शेवटी त्यांच्या ऑफिसमधे जाऊन चेक दिला.त्यावेळी त्यांनी सांगितले की बरेचदा असा पोर्टलचा प्रॉब्लेम येतो.आता कट झालेले पैसे कधी मिळतात ते पाहू.

कॅश आता कधीही मिळू शकणार नाही अश्या थाटात प्रतिसाद यायला हवेत अशी अट पण टाका नवीन धाग्यात!

Wink

=======

आजचे व्यवहारः

प्रवासात असताना उपाहारगृहामधील जेवण - रुपये १०८१ - डेबिट कार्ड

एक चहा - रुपये आठ - पे टी एम

आय सी आय सी आय - सकाळी लिहिले - ७००० काढले

बीपीची गोळी - रुपये १५६ - कार्ड

एक कटिंग - ७ रुपये - उधार

'फारच तुरळक दाद' - ४६ मने - चार गझला Wink

पुन्हा ईमेल ...

न दिसणा-या, न भेटणा-या, स्वतःचा फोटो नसणा-या झाडू काकांना अपमान करून घ्यायचा आहे कि सदस्यत्व रद्द करून घ्यायचे आहे ? त्यांच्यासाठी त्या ताई धावून येतात वारंवार म्हणून विचारलं. आता आणखी कुणाकुणाशी माझे नाव जोडत बसणार ? दहा ऑलरेडी झालेत ना ? पुढच्या पार्ट मधेही हेच चालू ठेवायचे आहे का ?
सिंबा तुम्ही तिकडेच का नाहीत विणत हे धागे ?

त्या भागात खालील अटी टाका.

१. हा धागा काँग्रेस पक्षाच्या समर्थकांचा आहे. विरोधी मते मांडल्यास आमच्या ड्युआयना राग येईल. खोट्यानाट्या माहितीसह ते अंगावर धावून येतील किंवा गुप्त जागेत बदनामी सुरू करतील.

२. आमच्या मर्जीतील सदस्यांचे सर्व अनुभव खरे व इतरांचे खोटे. हा नियम न पाळल्यास फाऊल धरण्यात येईल.

३. आमचे डॉक्टर्स सर्व क्षेत्रात हुषार असल्याने वादाचा मुद्दा आल्यास ते स्वयंघोषित जज्ज म्हणून निर्णय देतील. तो निर्णय बंधनकारक असल्याचे आम्ही एकतर्फी जाहीर करून टाकत आहोत.

४. तथ्यावर आधारीत मुद्दे आल्यास वैयक्तिक मुद्दे उकरून काढले जातील.

५. आमच्या डॉक्टरांकडे जे पेशंट्स येतात त्यांना त्यांच्या धंद्याची तपशीलवार माहिती देणे बंधनकारक असते. एकेक पेशंट त्या त्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान डॉक्टरांना देतात. त्या बदल्यात ते फीज घेत नाहीत. मायबोलीवर पोस्टी टाकण्यासाठी एव्हढी पूर्वतयारी असल्याने त्यांचे मत हेच प्रमाण राहील. स्वतः शेतक-यांचेही मत त्याविरोधात खपवून घेतले जाणार नाही.

आज उर्जित पटेल अर्थविषयक संसदीय समितीला सामोरे जाणार होते. त्याऐवजी आता अर्थमंत्रालयातले अधिकारी त्या समितीला नोटाबंदीबद्दल माहिती देतील, इति आकाशवाणी बातम्या.

कोथरूड हाच जगाचा केन्द्र बिन्दू आहे. तिथले एटी एम चालू असले की झाले ! जगात चिन्ता नाही. पूर्वी सपे हे जगाचे केन्द्र होते...

आज उर्जित पटेल अर्थविषयक संसदीय समितीला सामोरे जाणार होते. त्याऐवजी आता अर्थमंत्रालयातले अधिकारी त्या समितीला नोटाबंदीबद्दल माहिती देतील, इति आकाशवाणी बातम्या.
<<
We are answerable to no one!
मस्त ना!

रिझर्व्ह बँकेने निर्बंध मागे घेतले. त्यामुळे होऊ शकणारी गैरसोय टळली. रिझर्व्ह बँक फक्त कोथरुडमध्ये नसती तर बरे झाले असते. सगळ्या देशातील नागरिकांना अजूनही जुन्या नोटा जमा करता आल्या असत्या. आता निदान कोथरुडकरांना पाच हजार विथ एक्स्प्लनेशनचे टेन्शन नाही.

सिंबा
या धाग्यावर असा अनुभव आहे कि जेव्हां तटस्थपणे आणि प्रामाणिकपणे कुणी मुद्दे मांडलेत तेव्हां एकतर दुर्लक्ष केले गेले किंवा टर उडवण्यात धन्यता मानली गेली आहे. हेच करायचे होते तर कशाला धागे विणता ? सरळ कुस्तीचा आखाडा असेच शीर्षक द्या. किंवा सामान्य लोकांनी दूर रहावे अशी टीप टाका.

http://www.maayboli.com/node/60794?page=43#comment-3978456

हरिनामे बाई,
हे माझी fb वॉल नाही, इकडे कुणी काय लिहायचे हे मी मॉडेरेट करू शकत नाही,
मात्र जेव्हा चर्चा विषय सोडून दूर जाऊ लागल्या तेव्हा मी विषयाला धरून चर्चा करा असे आवाहन केल.
तुम्ही म्हणताय तसा दृष्टिकोनातील फरकामुळे काही वेळा अरगुमेंट्स झाली हे खरे आहे, पण या बद्दल पण मी लिहिले आहे.

तुमचा id कमी वयाचा आहे, त्यामुळे माबो वर पूर्वी झालेल्या " चालू धागा वाहता करणे" उपक्रमाबद्दल माहित नाही असे मी समजतो.
तो उपक्रम डोक्यात ठेवूनच मी भाग 2 काढतो तिकडे हवा तेव्हढा दंगा करा, पण भाग 1 वरचे प्रतिसाद वाहून जातील असे करू नका असा विचार मांडलाय.

बाकी मी धागे कुठे विणावेत आणि त्यांना काय नाव ठेवावे ते ठरवायला मी समर्थ आहे,
धन्यवाद.

1.पालिका निवडणुका ह्या व्यक्ती सापेक्ष असतात खुपदा येथे पक्षाचे काही घेणे देणे नसते उभा राहिलेला व्यक्ती हा चांगला की वाईट यावर अवलंबून असते
2. छोटे छोटे वार्ड असल्याने मत विभागले जाते त्यामुळे पक्षाच्या आझंडाचे मते बदलण्या वर काही फरक पडत नाही
नोटबंदीचा निर्णय लोकांनी स्वीकारला की नाही हे उ. प्र निवडणूकातच कळेल .....त्यामुळे भक्तांनी आत्ताच उदो उदो करू नये. ..

हरिनामे बाई,
इकडे कुणी काय लिहायचे हे मी मॉडेरेट करू शकत नाही, >> अहो तुमच्या मैत्रिणीला सांगा म्हणजे लगेच मॉडरेट करा असा अर्थ होतो का त्याचा ? शिवाय तुम्ही अधून मधून कसे प्रतिसाद हवेत हे नोंदवताय. पण जेव्हां विषयाला धरून प्रतिसाद दिले गेलेत तेव्हां काय झालंय यासाठी लिंक दिलेली आहे. तेव्हां आवाहन करायला हवे होते. कदाचित फरक पडला असता.

त्या कुठल्याशा जागेत सतत महिनाभर माझ्या नावाचा जप चालू असतो त्याचे स्क्रीनस्शॉट्स येतात तेव्हां खाली तुमचाही एखादा ( सामान्य विषयावरचा ) प्रतिसाद दिसतोच. त्यामुळे तुम्हाला विनंती केली हो. एकत्र असूनही तुम्ही वेगळे असाल याची कल्पना नव्हती.

तुमचा id कमी वयाचा आहे >> एव्हढ्याशा कालावधीत भरपूर माहिती मिळाली आहे. हवं तर ईमेल्स डकवते..

तिकडे हवा तेव्हढा दंगा करा >>> मला हौस आलीये का दंगा करायची ? महिनाभर काय चाललंय दिसत नाहीये का ? नाईलाज म्हणून हे पाऊल उचलले आहे, ते ही महीन्याने तर आता धागा वाहता होईल म्हणून कांगावा चालू झालेला आहे. झाडू मॅडमना सांगता नाही आलं का इतक्या दिवसात कि भाषा थोडी सौम्य वापरा म्हणून ? ऐकतील कि नाही हा भाग वेगळा..

बाकी मी धागे कुठे विणावेत आणि त्यांना काय नाव ठेवावे ते ठरवायला मी समर्थ आहे >> कमाल आहे ! याबद्दल कुठे शंका घेतलीय ? सूचना सुद्धा नाहीत करायच्या का ? त्या का आल्यात याचे आकलन होईल असे वाटले होते. तर ते असो. आता नाही अपेक्षा ठेवणार. मी एक गोष्टच लिहीन ना वेगळी Wink तेव्हढीच करमणूक !!!

झाडाक्का रागावल्या का ? Lol
नै त्या रागावलेल्याच असतात म्हणून तर एव्हढं झालंय ना !
बरं आता काय सांगतात प्रतिसादात ? खरे नाव काय, गाव काय, प्रोफाईलचा फोटो, हॉस्पिटल्सची नावे काय , कुठल्या पेट्रोलपंपात भागीदारी आहे आणि काय काय... शोधून घ्या हो प्रश्न झाडाक्का ! Lol

गोष्ट सांगणार आता !!! Proud

हॅपी demon डे मित्रो .

लोकांच्या पुनरावलोकना साठी,
2 वर्षांपूर्वी" नोटबंदी ने काय साध्य होईल" या बद्दल स्वतः:ची काय मते होती, ती आजच्या रिऍलिटी बरोबर ताडून पाहण्यासाठी धागा वर काढत आहे.

पण ते नोटबंदी चे काय झाले? आता पुरेशा नोटा आहेत का बँकेत रोजचे व्यवहार करायला?
कुठल्या नोटा असतात आजकाल?

आजकाल नोटांचे आकार, रंग दर लॉटला बदलत राहतात. त्यामुळे एटीएम मशीन्सना सारखं ऑइलिंग करायला लागतं. ही एक इकॉनॉमिक activity असल्याने जीडीपीही वाढतं.

Pages