"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एन ई एफ टी >> एन ई एफ टी ची पेमेंटस दिवसातल्या काही ठरावीक काळातच (e.g. ८ ते ४) करता येतात. ऑफ अवर्समधे एन ई एफ टी चालत नाही.. माझ्या अनुभवाप्रमाणे एसबीआयचे तर आयएमपीएस सुध्दा ८ ते ८ मधेच चालते (आयसीआयसीआय मधे २४ X ७ चालते).. शिवाय त्याच्यावर कमीतकमी पाच रूपये चार्ज आहे..

विरोधी पक्ष पूर्वी काय म्हणत होते आणि आज काय म्हणत आहेत, हे पाहिले तर त्यांच्या पाठिराख्यांचे डोळे पांढरे होतील...

ह्याचे पुरावे आहेत,

https://www.youtube.com/watch?v=ropDUc0xt8Q&feature=youtu.be

मोदी जी किती विचार करत आहेत ह्याची एक झलक !!

कोण शितोळे? कुठला लेख त्यांचा?
मूळ लेख निरंजन टकलेंचा आहे, आनंद शितोळे यांनी फक्त भाषांतर केलेले आहे. सई केसकर च्या धाग्यावर ४ दिव्सांपूर्वी त्या लेखाच्या हवाल्यानe सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. न वाचताच किंवा वाचूनही भक्त ठरविणारी गँग टकलेंचं श्रेय शितोळेंना देते यात नवले ते काय?

अय्यो,
जा पाहू टकलेंकडे नाहीतर शितोळेंकडे जाऊन तक्रार करा.
त्या दोघांनाही एकमेकांना श्रेय दिलेलं चालणार आहे.

ज्या वेळी निर्णय घेतला गेला तेव्हां मनापासून स्वागत केलं होतं. त्याची कारणे वेळोवेळी दिलेली आहेत. आता जी स्थिती आहे ती जाणीवपूर्वक केली आहे कि गोंधळ आहे याबद्दलच गोंधळ होऊ लागलेला आहे. वेगवेगळी माहिती पुढे येतेय. निरंजन टकलेंच्या एका लेखाचं आनंद शितोळेंनी भाषांतर केलं आहे. तो लेख मिळवून वाचावा. कॅशलेस ची बाजारपेठ आहे. कॅशलेस ट्रॅन्झॅक्शन्सच्या चार्जेस मधे पेटीएम (टाटा + अलिएक्सप्रेस) आणि जिओमनी हे खेळाडू उतरले आहेत. पेटीएम ने ऑनलाईन स्टोअर साठी अलिबाबा शी टाय अप केला आहे. अलीबाबा आता पोर्टल ऐवजी पेटीएमच्या माध्यमातून वस्तू विकेल. अलीबाबाची पेटीएम मधे ही गुंतवणूक आहे. बाकिचे गुंतवणूकदार भारतीयच आहेत. पेटीएमचा दुसरा कारभार म्हणजे कॅशलेस बाजारपेठ. या दोन्ही कंपन्यांनी मोदीजींचे चित्र जाहीरातीसाठी वापरले आहे. जिओ ला पाचशे रुपये दंडही झाला आहे.

याचसाठी कॅशलेसचा घाट घातला होता असे म्हणणे खूप घाईचे ठरेल. बघूयात, मार्चपर्यंत सरकारने रोकड उपलब्ध केली तर हा आरोप आपोआप निरस्त होईल. पण जर त्या दृष्टीने पावले पडली नाहीत तर मग कॅशलेस साठी सरकारने ही चाल खेळली असे म्हणावे लागेल. सप्टेंबर मधे रिझर्व्ह बँकेने नोटीफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार ऑनलाईन पेमेंटची सुविधा देणा-या इतर सर्व कंपन्यांचे अर्ज मार्चपर्यंत पेंडींग ठेवले आहेत. याच काळात जिओ फ्री दिले आहे. पाच कोटॉ ग्राहक आता आहेत. अजून पाच कोटींचे उद्दीष्ट आहे. या दहा कोटी ग्राहकांना सुरुवातीला फ्री ची सवय लागली म्हणजे ते नंतरही याच नेटवर्कवरून व्यवहार करत राहतील. त्यांचा डेटा जिओमनी कडे तयार होईल. एकदा जिओमनीचे सार्वत्रीकरण झाले कि मग नव्या कंपनीला जम बसवणे कठीण होईल. रिलायन्सने फ्री सेवा देण्यामागे हा विचार असू शकतो.

याची तुलना काँग्रेस सरकारने आयोडिनयुक्त मीठ वापरायची सक्ती करणारा कायदा बनवला त्याच्याशी केली पाहीजे. आयोडीनयुक्त मिठाचे प्रपोजल टाटाने सरकारला दिले. त्यांना त्याचे लायसेन्स मिळाले. त्याआधी टाटांनी मिठागारे खरेदी केली. भारतीय जेवणात मीठ लागतेच. खडे मीठ या नावाने मिठागारातून पन्नास पैसे ते एक रूपये किलो या भावाने मीठ मिळायचे. ते एकदम चार रूपये किलो झाले. बाजारात फक्त टाटांचेच मीठ होते. कायद्यामुळे खड्या मिठाचा व्यापार करणारे उद्ध्वस्त झाले आणि या सर्व गोरगरिबांचा व्यवसाय टाटांनी हिसकावून घेतला. हे एकच उदाहरण आहे. काँग्रेसचा कारभार प्रत्यक्षात उद्य्प्गपतीच हाकत असत हे गुपीत राहीलेले नाही.

त्यामुळे काँग्रेसशी जुळवून घेणारे उद्योगपती आडमार्गाने व सरळमार्गानेही गब्बर होत गेले. पण सरकारचा वरदहस्त त्यांना होता. हा भ्रष्टाचारच. ज्यांची नाळ काँग्रेसशी जुळली नाही त्यांनी इतर पक्षांच्या मर्यादीत शक्तीचा क्तीचाकरत टिकून राहण्यात धन्यता मानली. म्हणूनच आज जेव्हां या खेळाडूंना संधी मिळतेय तेव्हां ते सरकारला आपल्या तालावर नाचायला भाग पाडतील ही शक्यता पडताळून पहावी लागेल. अर्थात या सरकारच्या मागे रास्वसंघ आहे. जर त्यांना दीर्घकाळ सत्तेत रहायचे असेल तर लोकांना त्रास देऊन उद्योगपतींचे भले करणारे घेतलेले निर्णय किती दिवस लोकांणा देशभक्तीचे डोस पाजत घेता येतील याचे भान असणार. जर हे भान सुटले असेल किंवा लोकांना देशभक्तीच्या नावाखाली मूर्ख बनवता येईल याबद्दल त्यांचेच काही आडाखे असतील तर मग हा बनाव पूर्वनियोजित होता असे म्हणावे लागेल. ही शक्यता सुद्धा आज घाईचीच आहे. पण तथ्यं समोर येताहेत. त्यांचे एक विश्लेषण या दिशेने जाणारे आहे ज्याकडे डोळेझाक करता येत नाही.

दुसरी शक्यता म्हणजे किमान रोकड सरकार उपलब्ध करून या सर्व गावगप्पांना पूर्णविराम देईल आणि किती काळा पैसा बाहेर आला हे जनतेसमोर ठेवील. हे केल्यास सर्वच गप्पा थंड पडतील. अशा परिस्थितीत निव्वळ नकारात्मक भूमिका मांडणा-यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.

माझ्यासारख्या सर्व्हिस सेक्टरमधल्यांना काहीच फरक पडत नाही. इथल्या काहिंप्रमाणे मी कुठल्याही एका बाजूला नाही. जेव्हां चित्र स्पष्ट होऊ लागतं तेव्हां तथ्यांवर आधारीत मत मांडणं श्रेयस्कर ठरतं. भविष्यवेत्त्याप्रमाणे अंदाज वर्तवणे प्रगल्भपणाचे लक्षण नक्कीच नाही. कुणालाही संधी देणे हे बेसिक कर्तव्य आहे. पुरेशी संधी दिल्यानंतर पुरेशी टीका करायला कुणाचीच ना नसेल. इतकंच.

सपना तै,

कृपया हा व्हिडीयो बघा ? मग आपल मत बनवा !!

https://www.youtube.com/watch?v=ropDUc0xt8Q&feature=youtu.be

Happy

ह्या व्हिडीयोत नोटबंदीची पार्श्वभुमी सांगीतलेली आहे. हे प्रकरण तस जुनच आहे. ही शेवटची संधी होती.
Y.B. Chawan पासुनचा ईतिहास आहे ह्यात.

अय्यो, >>>> आवरा

जा पाहू टकलेंकडे नाहीतर शितोळेंकडे जाऊन तक्रार करा.>>>> का? तुमची केली होती का? झाडू या नावाने काहीही करताना?

त्या दोघांनाही एकमेकांना श्रेय दिलेलं चालणार आहे. >> बरं मग? तुम्हाला कानात साम्गितले का? तसे असेल तरी त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, एकमेकांचे ड्यू आय नाहीत. आपण आपले डोके वापरू शकतो की नाही?

तुमचe काका ४ दिवसांनी जागे झाले, आणि तीर मारल्यासारखा प्रकार चालला होता त्याला धक्का बसल्याने तुमचा सात्विक संताप उफाळून आलेला दिसला. चालू द्या.

तेच तेच लिहून काहींना कंटाळा कसा येत नाही >> जसा तुम्हाला येत नाही तसाच .
तुम्हीच काही जणांनी ठेका घेतलाय का ? तेच तेच तेच तेच तेच तेच लिहिण्याचा
तळतळाट काय /बिनडोक्याची काय आणि नीच काय . धन्य आहे Angry

मि जा नक्की!
आता आवरा आवार करून मग बघते व्हिडिओ. शितोळे पक्के पेड काँग्रेसी आहेत. टकले नसावेत. पण तथ्य नाहीत बदलत.

तुम्ही कशाल इतका थयथयाट करत आहे. ? मी फक्त मोदी भक्तीला जे देशभक्ती समजतात त्यांनाच बिनडोक संबोधतोय. Lol

ऍडमिन बंद करा हे सगळे एकतर्फी धागे प्लिजज
काही निष्पन्न नाहीये नुसत्या तळतळाटा शिवाय
नुसतं कुजकट हसायचं /बोलायचं
आणि स्वतःला महान डोक्याचं समजायचं Angry

एकून इंटरनेट वापरणार्‍यांपैकी ८% लोकांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेतले होते त्यात ५% लोकांनी भाग घेतला.

आता टक्केवारी तुम्हीच बघा..

आता कळले ना मी मोदीभक्तांना ते का म्हणतो Biggrin

विचार करायला डोक लागते .. इतकी बेसिक माहीती भक्ताला नाही का?>>>>>>प्रसादक, प्रत्येक वेळेस तुमचा आय डी उडत गेलाय, कारण तुम्ही जाणिवपूर्वक दुसर्‍याला तुच्छतेने हिणवता. वरतुन म्हणता की जो जशी भाषा वापरेल तसे मी त्याला बोलेल. मग मोदीना आणी त्यांच्या भक्तांना हूकुमशहा म्हणून ( भक्त ही तुमची भाषा ) हिणवतांना तुमची भाषा हुकूमशाही पद्धतीची बनत नाही का?

मला आश्चर्य वाटतय की जो आपले वै. चांगले अनूभव मांडेल तो मोदींचा भक्त आणी जो गैरसोयी सांगेल तो हुशार. तसेच मोदींच्या बाजूने बोलेल तो देशभक्त आणी विरोधात बोलेल तो देशद्रोही ठरतोय हे काय चाललय? दोन्ही बाजूने एकमेकाला कशाला शाब्दिक लाथा बुक्क्या हाणताय? जरा भानावर या की.

ओ अ‍ॅडमीन , जरा इकडे लक्ष द्या, हे लोक एकमेकांच्या फारच प्रेमात पडलेत. किती ती म्यांव म्यांव आणी गुर्र गुर्र!

जसे पेराल तसेच उगवते. रश्मीताई.

जसे तुम्ही विरोधकांना देशद्रोही म्हणून हिणवतात तसे आम्ही बिनडोक म्हणून हिणवले तर झोंबले कशाला?

सपनातै, मूळात मी शितोळेंचा रेफरंस ही पोस्ट फॉरवर्ड करायला काकांची परवानगी घेण्याची गरज नाही याकरता केला.
त्यानंतर तुम्ही किती खोटे नाटे फाटे फोडताय.
जरा कामाच्या काही गोष्टी लिहा पाहू.
तुमच्या बाळबोध आक्षेपांचा प्रतिवाद करतानाच आमची ब्यांडविड्थ संपत चाललीय.

मेंढयाचा मालक मेंढयांना म्हणाला", काही दिवसात खुप थंडी पड़नार आहे तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक ब्लँकेट देणार आहे."
मिंत्रों$$$$$
ब्लँकेट चाहीयें की नंही चाहीयें ??
एकसुरात सगळया मेंढया " चाहीये"
टाळंयाचा गड़गडाट !!
मग काय मेंढयाच्या मालकाने मेंढयांचे सगळे केस कापले आनी छोटे छोटे '"ब्लँकेट" बनवुन दिले !!

अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे.

मीठाचा तो विषय, तसाच अनेक क्षेत्रात अनेक बाबतीत झाला आहे.
पोस्टाची आधीची मेकॅनिकल फ्रँकिंग मशिन काढून इलेक्ट्रिक मशिन बसवण्याची सक्ति करणारा सुखराम फतवा याच धर्तीचा.
वैद्यकीय क्षेत्रात, ब्लडप्रेशर मोजायचे पारंपारीक पार्‍याचे यंत्र मोडीत काढून "इलेक्ट्रॉनिक" यंत्र घेण्याची सक्ति याच धर्तीची.
इतकेच कशाला, पल्युशन नियंत्रणाच्या नावाखाली "पल्युशन सर्टिफिकीटे" घेण्याची सक्ती देखिल याच धर्तीची आहे.
या व्यतिरिक्तचे पर्यावरणाच्या नावाखाली घातले गेलेले धुमा़कुळ व अडवाअडवी/मोडते हे स्वतंत्र विषय आहेत.

Pages