क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का रे ? आजचे पांड्याने तोडलेले तारे काय कमी आहेत का ? "we gave what we could" really ? अश्विन कुलदीप्नंतर बॉल जुना झाल्यावर बॉलिंग ला आला. कुकला मागच्या दोन ओनिंग्स मधे तीन फास्ट बॉलर्स असताना कोणी काढला होता ?

आपल्या फलंदाजीत सुधारणा होईल, याबद्दल मीही आशावादी आहे कारण - 1) याहीपेक्षा वाईट फलंदाजी व्हायला वाव नाहीय 2) सुरवातीला इंग्लंडमध्ये नेहमीच आपली अशी हालत असते व 3) हया सामन्यात पाऊस व टाॅस दोन्ही आपल्यावर खुन्नस असल्यागत वागले. पण पावसाच्या मदती शिवाय आपण हा सामना जर अनिर्णित ठेवला , तर आपण मालिका जिंकलो असंच होईल. असो.
दुसर्या डावात आपल्या फलंदाजानी सामन्याच्या निकालाचा विचार डोकयातून साफ काढून टाकावा व फक्त खेळपट्टीवर टीकून रहायचया सरावाची संधीच म्हणून त्याकडे पहावं.
मन:पूर्वक शुभेच्छा.

९६ची मॅच तर ड्रॉही केली होती. त्यामुळे ही मॅचही ड्रॉ होईल असे अगदी नक्की खात्रीपूर्वक छातीठोकपणे वाटते. विजय आणि राहुलसारखे खंदे ओपनर गडी आपल्याला नक्कीच आश्वासक सुरवात करून देतील असा विश्वास वाटतो आहे.>>>>

आपला विश्वास सार्थ ठरो!! Happy

डावाचा पराभव टाळायला २९० धावांची गरज!

१ बाद शून्य पुन्हा विजय दोन्ही डाव शून्य!!

२ बाद १५ किती वेळ ढकलतायेत कोण जाणे! वरूणराजाची कृपा हवी!

वरूणराजाची कृपा झालीय !
ढकलतायेत ? 2 बाद 15 स्कोअर वर दीड दिवस काढला तरीही ती ऐतिहासिक कामगिरी म्हणता येईल !

आपल्या फलंदाजीत सुधारणा होईल, याबद्दल मीही आशावादी आहे कारण - 1) याहीपेक्षा वाईट फलंदाजी व्हायला वाव नाहीय > >अजूनही हेच मत आहे का भाउ ? Happy

3) हया सामन्यात पाऊस व टाॅस दोन्ही आपल्यावर खुन्नस असल्यागत वागले. >> दुसर्‍या डावातल्या पहिल्या दोन विकेट्स पाहून शंका निर्माण होते आहे कि पहिला डाव अपवाद नसावा.

३-४३

अजून बुडत्याचा पाय खोलात!!

४-५०

६-६१
एकूण सामना 2 दिवस पण नाही चालणार असे दिसतेय. पहिला डाव ३५ षटके चालला हा देखील तितकाच चालेल असे दिसतंय!

मी, भाऊ नमसकर , आज अशी शपथ घेतो कीं यापुढे कधीही आपल्याकडे आलेल्या पाहुण्या संघाना अर्ध्या -कच्या बनवलेल्या खेळपटटयांवर आपण फिरकीच्या जोरावर अडीच- तीन दिवसांत हरवलं, तर जल्लोष न करतां मी दिवसभर आजच्या सामन्याचं व्हिडिओ रेकाॅरडींग बघत बसेन !

हा सामना पुरता २ दिवस पण चालला नाही १८० षटके नाही!!

दोन्ही डावात अश्विन सर्वोच्च धावा!

१ डाव १५९ धावांनी पराभव!!

दोन्ही डावात मिळून ८२ षटकात २३७ धावा!
इंग्रजांच्या ८८ षटकात ७ बाद ३९६ धावा.

भाऊ, सहमत!

दाढी मिशा असल्याखेरीज भारतीय क्रिकेट संघात घेत नाहीत का? तसे नसल्यास माझ्या मते एक उपाय आहे - सर्व खेळाडूंनी दाढीमिशा काढून टाकाव्यात! इंग्लंडचे खेळाडू पहा - कित्येकांना दाढी मिशा नव्हत्या. तेंडूलकर, द्रविड, लक्ष्मण यांना तरी होत्या का? माहित नाही, पण नसाव्यात.

काय आहे - बर्‍याच सूचना करून झाल्यात. काहीच जमत नाही. आता मला एव्हढेच सुचते.

ह्या मॅच मधे लॉर्ड्स वरची माती खाल्ली..
>>

ओव्हल वरची पण खा...

२०१३ मधे इंग्लिश खेळाडूंनी खास यूरिआ घातलाय त्या पिचवर...

माती , तीही युरिआ मिश्रित, नसावी चालत खायला श्रावणात ; निदान, आपल्या टीमला तसं ठासून सांगायला हवं टीमच्या शास्त्रीबुवानी ! Wink

काल निदान हारता हारता पुजारा, रहाणे ने फायटींग हाफ सेंच्युरीज मारल्या असत्या, तरी भारतीय संघाला दिलासा मिळाला असता. सद्ध्या अगदीच शोरूम आणी गोडाऊन, दोन्ही रिकामं पडल्यासारखी अवस्था आहे. पुढच्या मॅच ला नायर आणी पंत ला खेळवून पहायला हरकत नाही. आहे, त्यापेक्षा वाईट काही होणार नाही.

मला एक सांगा....शास्त्रीला कोचपदी निवडून देण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मण ह्यांना धारेवर धरता येईल का?
वर्ल्डकप च्या आधी शास्त्रीला घालवून ज्यावर कोहली आणि सचिन, गांगुली आणि लक्ष्मण आणि जनता विश्वास दाखवू शकेल अश्या कोणाची नेमणूक शक्य आहे का?

शास्त्री किंवा अजून कुठले मोठे बदल करून फार काही फरक पडणार नाही. आपण पुरेशा तयारीविना खेळातोय हा मुख्य problem आह. तसेही ODI नि T20 मधे आहे तो संघ चांगलाच खेळतोय. issues test preparation चे आहेत. कोहलीची press conf ऐकलीस तर metal preparation वर भर दिलाय. हेच आफ्रिकेच्या दौर्‍यानंतर आळवले होते. कोहलीपुरते खरेही असेल पन बाकीच्यांना technical problems आहेत हेच मूळात मान्य केले जात नसेल तर त्यात सुधारण्याची संधी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

इंग्लंडने पहिल्या टेस्ट मधे कॅच्स टाकले नसवे तर आपण तिथेही उघडे पडलो असतो असे मी म्हटले होते. किमान पक्षी इंग्लंडमधे तरी चार दर्जेदार बॉलर्स समोर कमकुवत किंवा अपुर्‍या तंत्राने, अपुर्‍या तयारी ने खेळताना काही तरी वेगळे अनपेक्षीत करण्याची गरज आहे असे मला वाटते. पंत नि नायर ह्यांना खेळवणे हा एक भाग झाला. पुजारा नि विजय ह्यांना एकत्र खेळ्ण्याची फरज आहे, त्या दोघांचा ही पेशन्स चांगला आहे and they feed off each other. समोरचा बॉल मागे बॉल तटवून काढल्याने non striker अस्वस्थ न होणे ह्यांच्या बाबत होउ शकतो. त्यासाठी हवे तर विजय ला खाली खेचून ४-५ वर खेळवणे हा एक पर्याय असू शकतो. ओपनर तसेही फार काही करत नसल्यामूळे धवन नि कार्थिक ह्यांना ओपन करायला लावून पांड्याच्या जागी नायर येउ शकतो. असे केल्याने विजय वर परीणाम होइल असे वाटत असले तर सरळ सरळ कार्थिक ऐवजी पंत येउ दे नि राहुल ऐवकी धवन (नगाला नस असला तरी कमीत कमी डावखुरा असल्यामूळे थोडा तरी बॉलिंग मधे बदल करावा लागेल)

राहुल हा नवा रोहित आहे. लिमिटेड overs मधल्या dazzling inning नि साठी ष्ण्मासी येणार्‍या एखा दुसर्‍या टेस्ट मधल्या शतकाच्या जोरावर आत येतो नि त्याला आत ठेवण्यासाठी विजय, पुजारा, कोहली , राहणे ह्या टेस्ट च्या कोअर टीम मधे बदल करून आहे त्या प्रकाराची वाट लावली जाते.

शास्त्री किंवा अजून कुठले मोठे बदल करून फार काही फरक पडणार नाही. आपण पुरेशा तयारीविना खेळातोय हा मुख्य problem आह. >> असहमत... कुंबळेने बुडावर हंटर मारून प्रॅक्टिस गेम खेळायला पिटाळलं असतं.... तयारी त्यातूनच होते ना?

मूळ पगार खूप कमी करून, नंतर सामन्यातल्या चांगल्या कामगिरीबद्दल जास्त पैसे असे केल्यास, खेळाडू वेळ पडल्यास स्वतःचा पैसा नि वेळ खर्च करून आपला खेळ सुधारण्याचा कसून प्रयत्न करतील. इतर क्षेत्रात जर असे काही कारण सांगून अपयश आले तरी पैसे मिळत नाहीत, नोकरी टिकत नाही!
एकदा पैसे कमी झाले की आपसूक लोक जागे होतील.
तीस चाळीस वर्षांपूर्वी भारताची टीम जगात अगदी सुमार होती. निदान खेळाडूंवर एव्हढा पैसा तरी खर्च होत नव्हता. एक प्रकारे अन्याय होता, पण आता एकदम दुसरे टोक!

असहमत >> माझे पोस्ट World Cup आधी मोठे पर्सोनल बदल करून टेस्ट च्या खेळामधे मोठा फरक पडणार नाही ह्या संबंधी आहे. IPL च्या कामगिरीवर आपण टेस्ट निवडतो तसे World Cup साठी कोचिंग स्टाफ ट्स्ट वरून निवडावा असे तुझे म्हणणे आहे का ? Happy

BTW World Cup च्या आधी वर्षभर मोठे बदल नको असे तूच म्हणत होतास ना रे Happy

माझे पोस्ट World Cup आधी मोठे पर्सोनल बदल करून टेस्ट च्या खेळामधे मोठा फरक पडणार नाही ह्या संबंधी आहे. >> वर्ल्डकपमध्ये हे बघायला लागू नये म्हणून टेस्ट वरून धडा घेऊन बदल करा असे मी म्हणत आहे. त्याच इंग्लिश खेळाडुंंसमोर त्याच इंग्लिश कंडिशनमध्ये आहे ना वर्ल्ड कप? पाकिस्तानी स्विंग बॉलर समोर काय होणार आपले?
टेस्ट वेगळे वन डे वेगळे... लाल चेंडू पांढरा चेंडू मला माहित आहे रे.. Wink

BTW World Cup च्या आधी वर्षभर मोठे बदल नको असे तूच म्हणत होतास ना रे >> शास्त्री मोठा बदल आहे होय रे Lol पार्टी मॅनेजर ला काढून कडक कोच आणा म्हणत आहे... खेळाडू तेच असू देत.

World Cup मधे असे सिवंगिंग पिचेस नसणार रे - बॅटींग ला धार्जीण्या असणार गोष्टी. खुद्द इंग्लंड ची limited overs बॅटींग त्याच प्रकारावर आधारलेली आहे - जाणून बुजून गेले २ वर्षभर प्रयत्न करून केलेले आहे, ते बदलणार नाहित. ICC will ensure that pitches will favor batsmen whose country has largest share of viewers Happy अगदी ह्या दौर्‍यात सुद्धा limited overs चे pitches वेगळे होते बघ.

शास्त्री मोठा बदल आहे होय रे >> शास्त्रीचा वकूब वगैरे बाजूला ठेव. त्याला आणण्यासाठी किती आटापिटा केला गेला नि काय रामायण झाले त्यामागे हे बघता मोठा बदल ठरेल असे मला वाटते.

आतां मोठे बदल करून फक्त तोंडसुख घ्यायला नवीन नांवं मिळणयापलीकडे कांहीं साध्य होईल असं मला नाही वाटत . कांहीही दीर्घकालीन उपाय न करतां , कसोटी सामनयांसाठीचं तंत्र, मानसिक ठेवण व दौरयासाठीचा वैशिठयपूर्ण सराव इ.कडे दुर्लक्ष करून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं हास्यास्पद आहे. आत्तां तरी एखाद- दुसरा बदल करून खेळाडू इंग्लंडच्या वातावरणाशी जमेल तितकं लवकरात लवकर जुळवून घेतील अशी आशा व प्रार्थना करावी. ( अगदीं नवीन खेळाडूना सद्यस्थितीत बळीचा बकरा करूं नये ,
असंही मला वाटतं . )

अगदीं नवीन खेळाडूना सद्यस्थितीत बळीचा बकरा करूं नये , >> मला वाटते नव्या खेळाडूंना संधी देताना इथे अपयश आले तरी ते त्यांच्या विरुद्ध १००% धरले जाणार नाही ह्याची खातरजमा त्यांना कप्तान, कोच नि निवड समिटि ने करायची गरज आहे.

BTW हनुमा विहारी बद्दल वाचले, तो एव्हधा मोठा तिसमारखां झाला आहे Domestic cricket मधे हे माहित नव्हते.

शास्त्री किंवा अजून कुठले मोठे बदल करून फार काही फरक पडणार नाही. आपण पुरेशा तयारीविना खेळातोय हा मुख्य problem आह. >> असहमत... कुंबळेने बुडावर हंटर मारून प्रॅक्टिस गेम खेळायला पिटाळलं असतं.... तयारी त्यातूनच होते ना? .>> हो नक्कीच. पण बहुधा म्हणूनच थोर मोठे खेळाडू तयार नव्हते. आणि प्रॉब्लेम असा आहे की इथे सर्वांना बरोबर घेउन जायचे म्हणजे कोहली व इतर बिग गन्स ना सांभाळावे लागते. टीपिकल टीम मोराल लॉजिक. चॅपेल ला यामुळेच हाकलला ना?

पण बिग-३/बिग-४ ना जाब विचारायलाच हवा. त्यांच्याही काळात ते साधारण असे उडालेले आहेत. So they should know better

मला वाटते नव्या खेळाडूंना संधी देताना >>डिफाईन नवीन. सध्या प्लेईंग ११ मध्ये नवीन कोण आहेत? कुलदीप ?

इथे अपयश आले तरी ते त्यांच्या विरुद्ध १००% धरले जाणार नाही ह्याची खातरजमा त्यांना कप्तान, कोच नि निवड समिटि ने करायची गरज आहे. >> नवीन खेळाडूचे अपयशासाठी कोच आणि कॅप्टनला जामीन धरावे.

मला वाटते नव्या खेळाडूंना संधी देताना >>डिफाईन नवीन. सध्या प्लेईंग ११ मध्ये नवीन कोण आहेत? कुलदीप ? >> पंत, ठाकूर. नय्यर इंग्लंड मधे खेळला नाहिये त्यामूले त्यालाही धरतोय. मला वाटते भाऊंनाही हेच अपेक्षित होते ज्याचा संदर्भ फे फे च्या वरच्या पोस्ट मधे आहे.

नवीन खेळाडूचे अपयशासाठी कोच आणि कॅप्टनला जामीन धरावे. >> जामीन धरावे वगैरे knee jerk reaction नाही का ? 'अमकी तमकी संधी दिली जाईल, ह्या दौर्‍यातले नाही जमले तरी अजून संधी मिळेल. अगदी सलग नसले तरी पुढचे ६-७ सामने खेळवले जाईल' अशा प्रकारे (- ह्यालाही अपवाद येतील हेही साहजिक आहे), एखादा मध्यम मार्ग काढता नाही येणार का ?

बर्गा मोठा बदल माहित पण काही बदल होण्याची शक्यता बळावलि आहे एव्हढे मात्र नक्की
http://www.rediff.com/cricket/report/kohli-shastri-may-face-bcci-grillin...

Is it for better or worse will be next question. Honestly I'm not sure if we can blindly follow Aussie model. It does not bode well for us based on history.

Pages