६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्थिक अपराध हे वेगळे.आणि धर्माच्या नावावर झुंडशाही करून हिंसा करणे हा प्रकार वेगळा.
धर्माच्या नावावर स्त्रिया वर अत्याचार करणे वेगळे कारण हे अत्याचार घराघरात होतात.
आणि स्त्री वर अपराधी वृत्तीच्या व्यक्ती नी अत्याचार करणे जे वेगळे.
सर मिसळ करू नका दोन्ही मध्ये.
पाकिस्तान ची तुलना भारताशी होवूच शकत नाही.
पण पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील काही मुस्लिम देश अती धार्मिक आहेत म्हणजे सर्व च मुस्लिम देश तसेच आहेत किंवा मुस्लिम लोक तशीच असतात.
हे पण खरे नाही. >>>>>>>
नाही हो , हेमंत शेठ तुम्ही चुकताय !
अश्विनी यांचेच बरोबर आहे , त्यांच्या मतास मी उदय यांनी विनाकारण सहमती दर्शवली आहे का ? लेखन शैली , टाईम पिरियड जरा ओळखीचा वाटत होता. असो ! Happy

पण पाकिस्तान मधील क्रूर लोकांना सॉफ्ट कॉर्नर देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता .
अजून बरेचसे अगम्य विचार बाहेर यायचे बाकी असतील .
जसे की -

हिंदूंना राम मंदिराचे रक्षण करता आले नाही म्हणून बाबरी बांधली गेली होती , नंतर हिंदूंनी गुंडगिरी करून बाबरी पाडली तर त्याचा बदला घेण्यासाठी दाऊद ने मुंबईत बॉम्बस्फोट केले तर दाऊद चुकीचा कसा ?

भारतातील २२ कोटी मुस्लिम नागरिकांच्या समाधानासाठी पाकिस्तान मधील मुस्लिमांना मदत करण्याचे कर्तव्य येथील प्रत्येक हिंदूचे आहे .

रेल्वेच्या इतर कोणत्याही गाडीवर दगड फेक होत नाही , पण वंदे मातरम् एक्स्प्रेस वर मुस्लिमबहुल भागात दगडफेक होत असते .
यात भाजप सरकारचीच चूक आहे , त्या भागात निशाण ए पाकिस्तान एक्स्प्रेस पाठवली तर दगडफेक होणार नाही
.

कालच्या प्रतिसादाचा पुढील भाग. ( कदाचित अवांतर)
माणसाला दर दिवशी साधारण ४५ ग्राम प्रोटीन लागते. विविध पदार्थातून ते मिळवण्यासाठी दिवसभरातून साधारण दीड किलो वेगवेगळ्या प्रकारचे अन्न सेवन करावे लागते. एव्हढे अन्न आपल्याकडची जनता खात नाही. खाऊ शकत नाही. त्यामुळे मुले लहानपणापासूनच कुपोषित रहातात. हिमोग्लोबीनची, विविध जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. त्यांच्या मेंदूची चांगली वाढ होत नाही.निर्णय घेण्याची क्षमता, ज्ञान ग्रहणाची क्षमता कमी होते. सुदृढ आनंदी नागरिक जन्माला येत नाहीत. दीडशे कोटी लोकसंख्येच्या देशात समतोल, सुदृढ, स्वतः विचार करू शकणारे धैर्यवान( संयमी, patient) अशा लोकांची संख्या प्रमाणाने अत्यल्प आहे. धर्म आणि अज्ञानाने जोपासलेल्या अंधश्रध्दा, परंपरा, तथाकथित संस्कृतीने जोपासलेल्या रूढी, आणि धर्मानेच ज्ञानविन्मुख केलेली प्रचंड लोकसंख्या ह्यामुळे देश अपेक्षित प्रगती गाठू शकत नाही.
एव्हरेस्ट सारखी काही शिखरे महान उचीची आहेत म्हणून हिमालय रांगांची सरासरी उंची वाढल्यासारखी दिसते.
तसेच आपल्या समाजाचे आहे. सरासरी काढण्याची ही पद्धत सदोष नसली तरी न्यायपूर्ण नाही. तेच जर कोट्यवधी माणसांची बौद्धिक मानसिक उंची दोन इंचांनी वाढती तरी ते इष्ट ठरते.

पुरोगामी च सर्व च चूक आहे असे नाही.

Vt ला घातलेला गोंधळ,स्त्री पोलिस न वर उचलेला हात.
शाहिद स्मारकाची केलेली विटंबना.
आणि शांत बसलेले पोलिस आणि त्या वेळचे सरकार.
भिवंडी मध्ये कबत्रस्तान साठी घातलेला धुडगूस.
आणि शेपूट घातलेले तेव्हाच काँग्रेस सरकार.
अशा घटना आहेत .
काँग्रेस सरकार नी त्या होवू दिल्या रोखल्या नाहीत.
डावे विचारवंत नी पण त्या वर कधी निषेध नोंदवला नाही.
Bjp sarkar आल्या पासून हे सर्व बंद आहे.
अबू आझमी सरकार ला दमदाटी करायचा त्याचा आवाज च बंद आहे.
ओवासी प्रक्षोभक विधान करण्यास घाबरत आहे.
काश्मीर मध्ये रोज अतिरेकी गोळीबार करायचे.
ते आता बंद झाले आहे.
भारताला दम देण्याचे धाडस आता पाकिस्तान करत च नाही.
पहिले उठसूठ भारताला पाकिस्तान दम द्यायचा.
हा बदल bjp sarkar आल्या पासून झाला आहे.
डावे आता आग ओकत नाहीत .
भारताच्या संस्कृती वर.
हा बदल निश्चित च चांगला आहे

विज्ञान ना मध्ये सर्वात जास्त शोध कोणत्या धर्मियांनी लावले हा प्रश्न अयोग्य आहे.
कोणत्या प्रदेशात लागले हा प्रश्न योग्य आहे.

ज्या प्रदेशात शांतता आहे, ज्या देशात शिक्षण व्यवस्था उत्तम आहे, कायदा सू व्यवस्था आहे.
त्या देशात /प्रदेशात च शोध लागले आहेत.
आणि समाज परिपक्व आहे.
मग धर्म कोणता हो असू ध्या.
चीन,जपान मधील बोध्य धर्मीय आणि भारतातील बोध्द धर्मीय.
धर्म एक च पण विचार क्षमता मध्ये प्रचंड फरक.
भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तान मधील मुस्लिम.
आणि uAE मधील मुस्लिम धर्म एक च पण वागण्यात प्रचंड फरक.

चीन,जपान मधील बोध्य धर्मीय आणि भारतातील बोध्द धर्मीय.
धर्म एक च पण विचार क्षमता मध्ये प्रचंड फरक.
भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तान मधील मुस्लिम.
आणि uAE मधील मुस्लिम धर्म एक च पण वागण्यात प्रचंड फरक.
>>>
भारतातील अणाजी आणि ऊसगावातील अणाजी ह्यात काय फरक आहे सान्गा पाहू.

हा प्रश्न मला पडतो च.
सिकंदर नी पूर्ण जग जिंकले. आणि ही कथा नाही तर इतिहास आहे.
ज्या देशात सिकंदर च जन्म झाला .
त्या देशातील नागरिक अजून त्याची जयंती,पुण्य तिथी साजरी करतात का?
अजून त्या दिवशी मोठमोठ्या मिरवणुका काढतात का?
भारतात वीस वर्ष पूर्वी चा नेता/राजा ह्या पासून हजारो वर्ष पूर्वी चे राजे महाराजे,बादशाह ह्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजरी होते.
मिरवणुका काढल्या जातात.
भारतात जसे महापुरुष होवून गेले तसे प्रतेक देशात होवून गेले आहेत .
पण त्या देशात असला प्रकार होत नाही.
ते वर्तमान काळात जगतात.
इतिहास पासून बोध घेतात.
पुरातन वास्तू,शास्त्र,ग्रंथ ह्यांचं ढोंगी अभिमान ठेवत नाहीत.
त्या वास्तू/ माहिती ह्याचा अभ्यास करतात.
सत्य शोधायचा प्रयत्न करतात.
आणि त्यांच्या कोणत्याच धार्मिक भावना त्या मध्ये अडकलेल्या नसतात.
भारतात अजून पण प्रगल्भ समाज नाही.
त्या मुळे प्रगती नाही.,शोध नाहीत.

भारतातील अणाजी आणि ऊसगावातील अणाजी ह्यात काय फरक आहे सान्गा पाहू.

काही फरक नाही कारण ते मूळचे भारता मधीलच .
त्या मुळे त्यांची मानसिकता पण भारतीय समाज शी साम्य असणारी आहे.
जडणघडण येथील च आहे.
मी वेगळे lihale आहे .
जपानी,चिनी,पाकिस्तानी,अरबी .
असा फरक केला आहे.

ईजिप्त मध्ये पिरॅमिड आहेत.उत्तम वास्तू रचना आहे,भव्य आहेत.
कसे बांधले असतील ह्याचे कुतूहल सर्वांना आहे.
मग आज चे ईजिप्त ची लोक त्या पिरॅमिड वरून आम्ही खूप हुशार,श्रेष्ठ असे दावे करतात का?
जसे भारतात केले जातात .
हा फरक लक्षात घ्या .
अपरिपक्व समाज आणि परिपक्व समाज ह्या मधील फरक लक्षात येईल

ज्या प्रदेशात शांतता आहे, ज्या देशात शिक्षण व्यवस्था उत्तम आहे, कायदा सू व्यवस्था आहे.
त्या देशात /प्रदेशात च शोध लागले आहेत.
आणि समाज परिपक्व आहे.
मग धर्म कोणता हो असू ध्या.

>>>सरांशी सहमत आहे.

इथे अमेरिकेत राहणारे खूप लोक आहेत.
मला हे जाणून घायचे आहे.
अमेरिका मध्ये शालेय शिक्षणात अमेरिकेचा इतिहास.
अमेरिकेचे स्वतंत्र युद्ध,.
अमेरिकेतील महान महापुरुष.
अमेरिकेची महान संस्कृती .
हे विषय शिकवले जातात का?
की वर्तमान काळातील घडामोडी वर च शालेय शिक्षणात विषय निवडलेले असतात

माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभव घेतलेला एकमेव व्यक्ती जे T.N शेषन आहेत.
त्यांनी भारतातील निवडणूक पद्धत च बदलली.
व्यवस्था च बदलणे किती अवघड असते हे सर्वांना माहीत आहे.
म्हणून त्यांच्या नंतर त्यांचे पुतळे उभे करून पण त्याच्या विचाराशी विपरीत वागणे ठेवून चालणार आहे का?
रात गयी बात gayi.
वारसा पुढे घेवून जात असाल तर च त्याला महत्व आहे

सिकंदर नी पूर्ण जग जिंकले. आणि ही कथा नाही तर इतिहास आहे.
ज्या देशात सिकंदर च जन्म झाला .
त्या देशातील नागरिक अजून त्याची जयंती,पुण्य तिथी साजरी करतात का?
अजून त्या दिवशी मोठमोठ्या मिरवणुका काढतात का?
भारतात वीस वर्ष पूर्वी चा नेता/राजा ह्या पासून हजारो वर्ष पूर्वी चे राजे महाराजे,बादशाह ह्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजरी होते. >>>>>>>
सगळ्यात मोठा मूर्खपणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयांती च्या दिवशी सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाजात दुचाक्या फिरविणारे तरुण आणि त्यांच्या या पराक्रमकडे कौतुकाने पाहणारे त्यांचे आईबाप, हे दृष्य पाहण्यासारखे असते....

ब्रिटीश नी पूर्ण जगावर राज्य केले पण ते आता वर्तमान काळात कुठे आहेत ह्याची जाणीव त्यांना आहे.
ते उगाच पूर्वी च्या काळाचा कोळसा उगाळत नाहीत आणि त्या काळात जगत पण नाहीत

दिवशी सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाजात दुचाक्या फिरविणारे तरुण आणि त्यांच्या या पराक्रमकडे कौतुकाने पाहणारे त्यांचे आईबाप, हे दृष्य पाहण्यासारखे असते....

हा प्रकार मला पण पटत नाही.
गुण झीरो, कार्य झीरो, असे ते कार्यकर्ते असतात.

पाडव्याच्या शोभायात्रासुद्धा मला आवडत नाहीत. साईबाबांच्या पालखी पदयात्रा आवडत नाहीत. गणपतीची एक विसर्जन यात्रा ठीक आहे. पण मुखदर्शन, करपूजन, पादपूजन वगैरे गर्दीने करायचे प्रकार आवडत नाहीत. शिवजयंती, शिवराज्याभिषेक, कोणत्याही निमित्ताने धार्मिक गटाने रस्त्यावर मिरवणुका काढून अडथळे निर्माण करणे आवडत नाही. त्यातला कानठळ्या बसवणारा आवाज अजिबात आवडत नाही. शांतपणा असता तर कदाचित सोडून दिलं असतं. मुसलमानांची ताबूताची मिरवणूक आमच्या भागात निघत नाही. पण निघाली असती तर आवडली नसती. किंवा कदाचित वर्षातली एकच मिरवणूक म्हणून सोडूनही दिले असते.

हिरा .
योग्य मत आहे.
भारतात चालणारे हे प्रकार बंद च होणे गरजेचे आहे.
वर्तमान काळातील समस्या आणि त्या वरील उपाय , आव्हान,ह्याच गोष्टी ल महत्व आले पाहिजे.
बस झाले आता इतिहास चा गौरव.
इतिहास मधून शिकणे वेगळे आणि त्याचा उस्तव करणे ,वेगळे

मुघलांचा इतिहास bjp sarkar नी काढून टाकला अभ्यास क्रमातून.

त्या नंतर हिंदू चा पण इतिहास शालेय अभ्यासक्रम मधून काढून टाकला पाहिजे.

पण मुखदर्शन, करपूजन, पादपूजन वगैरे गर्दीने करायचे प्रकार आवडत नाहीत. शिवजयंती, शिवराज्याभिषेक, कोणत्याही निमित्ताने धार्मिक गटाने रस्त्यावर मिरवणुका काढून अडथळे निर्माण करणे आवडत नाही. त्यातला कानठळ्या बसवणारा आवाज अजिबात आवडत नाही. >>>>>>> सहमत आहे. शिवजयंतीला मिरवणूक काढण्यापेक्षा ती त्या त्या गडांवरच साजरी व्हावी. त्या निमीत्ताने लोकांना इतिहासाची पुनरावृत्ती पहायला मिळेल. ( देखाव्या द्वारे ) याच गड किल्ल्यांचे संरक्षण व्हावे. तिथल्याच स्थानिक लोकांना गडावर नेमुन साफसफाई, देखरेख साठी कामे करवुन घेतली तर त्यांना पण रोजगार मिळेल. फालतु अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, जी आज विशाळगड, लोहगड किल्ल्यांवर झालीत. काय संबंध या लोकांचा? कष्ट घेतले महाराजांनी, मावळ्यांनी, मग हे लुटारु कुठुन आले तिथे अनधिकृत बांधकामे करायला? यांच्यावर वरद हस्त आहे तो पूर्वीच्या नेभळट सरकारचा.

शिवजयंतीला मिरवणूक काढण्यापेक्षा ती त्या त्या गडांवरच साजरी व्हावी.>>>
रस्ते आडवुन, मान्डव टाकुन लोकांना अडथळा निर्माण करण्यापेक्षा गणपती उत्सव केवळ गणपती मंदिरातच साजरा करण्यात यावा.

फालतु अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, जी आज विशाळगड, लोहगड किल्ल्यांवर झालीत>>
गगनगड, सज्जन(?)गडावर जे झालय त्यला काय म्हणाल वैनी? WhatsApp फोर्वर्ड मध्ये त्यचा उल्लेख येत नाही का?

जास्त नाही पण तीन चार गडावर मी गेलो आहे.
पन्हाळा, अजिंक्यतारा, रायरेश्वर.
सज्जन गड

पण खरेच सांगायचे झाले तर .
नीट व्यवस्था,जपणूक त्या स्थान ची झाली नाही.
बाकी गड किल्ल्यांची पण वेगळी अवस्था नाही.
कार्य आणि दिखावू पण .
ह्या मध्ये फरक असतो.
मिरवणुका काढणे आणि त्या प्राचीन स्थळ ची जपणूक करणे खूप फरक आहे.
स्थानिक लोक पर्यटक लोकांना कसे लुटत असतात ह्याचे शेकडो व्हिडिओ u tube वर आहेत.
ना पिण्याच्या पाण्याची सोय ,ना स्वच्छता गृह .
अशी अवस्था आहे

अनधिकृत बांधकाम तर आपल्या कडे 100 फुटावर दिसतील.
गटार ,पाण्याची पाइप लाईन,फूट पथ, रस्ते ,मैदान, डोंगर माथी ,,रेल्वे station, bus station , खाड्या, समुद्र, नद्या, तलाव काही ही लोकांनी सोडले नाही.

प्रतापगड च्या पायद्याशी अफजल खान च्या कबरी भोवती झालेले अनधिकृत बांधकाम देशात आणि राज्यात एकमेव नाही.
करोडो अनधिकृत बांधकाम देशात आहेत

शिवजयंतीला मिरवणूक काढण्यापेक्षा ती त्या त्या गडांवरच साजरी व्हावी.>>>
रस्ते आडवुन, मान्डव टाकुन लोकांना अडथळा निर्माण करण्यापेक्षा गणपती उत्सव केवळ गणपती मंदिरातच साजरा करण्यात यावा.>>>>>>मग रोजा सोडतांना तो देखील आप आपल्या घरातच व्हावा. भर रस्त्यात चटई टाकुन कशाला अडथळा? नमाज सुद्धा रस्त्यातच पढले जातात. महाराष्ट्रा मध्ये ते बंद झाले पण प. बंगाल मध्ये चालले होते की. ममताळुने परवानगी दिली असेल.

रहाता राहिला गणेशोत्स्वाचा प्रश्न. तो लोक सोडवतील की. शिवजयंतीला मिरवणूका काढण्याची ना नाही, पण जर एवढ्या मेहेनतीने उभे केलेले किल्ले लोकांच्या लापरवाही मुळे खराब होत असतील तर फायदा काय? जिथे तिथे आक्रमण का?

विशाळगडा बाबत सध्याच्या सरकारने कारवाई केली आहे. बाकी माझे वॉट्स अ‍ॅप बंद असल्याने कुठल्याही राजकीय धार्मिक न्युज मला येत नाहीत. नेटवर लोकसत्ता व घरात सकाळ इतकेच पेपर ज्ञान मला मिळते.

गेला पंधरवडाभर मुंबईतल्या पश्चिम उपनगरांच्या एका खूप मोठ्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीय. कारण काय? ठाण्याजवळ एक बोअर वेल खोदताना मुख्य जलवाहिनीला भोक पडले आहे किंवा तिचे नुकसान झाले आहे.
आता हा हलगर्जीपणा आहे, मग्रुरी, बेजबाबदारपणा आहे, निष्काळजीपणा आहे, काय आहे ?आणि कोणाचा, सरकारचा की खाजगी कंत्राटदाराचा? जवळजवळ वीस पंचवीस लाख लोकांना त्रास होतो आहे. वाटेल त्या अफवा आहेत. कोणी म्हणतात असे पाणी चोरण्याचे काम बरेच ठिकाणी चालते.
पण हे सरकारचेच जलवाहिनीदुरुस्ती वगैरे काम असावे. मुंबईत तरी जमिनींअंतर्गत पाणीचोरी होत नाही. एकाच सोसायटीच्या दोन इमारती असतील तर मात्र अशी पाण्याची पळवापळवी झाल्याची उदाहरणे आहेत.

रहाता राहिला गणेशोत्स्वाचा प्रश्न. तो लोक सोडवतील की.>>>
मग प. बंगाल मधिल लोक पण त्यांना भेडसवणारे प्रश्न सोडव्तील की. जास्त लोड घ्यायला तुम्ही काय ट्रांसफोर्मर आहात काय?

पण जर एवढ्या मेहेनतीने उभे केलेले किल्ले>>>
इतिहासाचा अभ्यास वाढवा आणि कोणी किती किल्ले बाधले आणि कोणी किती वापरले हे समजेल.

रस्ता अडवून केली जाणारी गणेश आरती असो की चाटाया टाकून नमाज पद्णे असो दोन्हीही बाबत मूर्खपणा चालला आहे .
अगोदरच लोकसंख्येच्या वाढीचा वेग कमी व्हायला तयार नाही ,त्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमी पडत्येय .
जो तो हफ्त्यावर गाड्या घेवून रस्त्यांवर १०/२० च्या स्पीड ने गुमान जातोय .
त्यात भर जयंत्या साजऱ्या करणाऱ्यांची आणि नमाजी लोकांची दादागिरी करणाऱ्यांची पडत आहे .
ज्याने त्याने धर्म आपापल्या घरी जोपासावा ना ,रस्त्यावर प्रदर्शन करून इतरांना त्रास का ?
माझ्या मते तर दोन्ही धर्मियांचे आदरणीय स्थाने सुद्धा खोटारडे असतील , जी आपापल्या भक्तांना सुयोग्य मार्ग दाखवत नाही ....

सवय लगेच मोडणार नाही थोडा वेळ लागेल.
पण विक्षिप्त रूप आले आहे उस्तवं ना.
भक्ती राहिली नाही..
मग ते नमाज असू किंवा गणेश ustav.
किंवा बाकी जे काही जयंत्या, पुण्य तिथी च ustav हे पण आले
फक्त शक्ती प्रदर्शन .

महाराष्ट्रातल्या काही शहरांमधल्या (सीमित) अनुभवावरून.

मी रस्त्यावर नमाज पढताना आजवर एकही व्यक्ती पाहिला नाहीये. (हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. ब्रॉड दावा नाही.)

हो खरं तर मीही आमच्या वस्तीत पाहिलेलं नाही. पण आमच्या भागात फारसे मुसलमान नाहीत. आणि जे आहेत त्यांना मशीद पुरेशी असते.रस्त्यावर नमाज पढण्याची गरज भासत नाही. पण कदाचित जुन्या मुस्लिम मोहल्ल्यात होत असेल तसं. कारण तिथे मशिदी कमी आणि छोट्या आणि लोक अधिक.
शिवाय काही विशिष्ट पवित्र दिवशी एका मुख्य मशिदीत नमाज पढण्यासाठी इतर ठिकाणचे लोक येत असतात. तेव्हा तसे होत असेल. पुण्यात दगडू हलवाईच्या मंदिरात होते तसे. म्हणजे स्त्रियांचे अथर्वशीर्ष सहस्रावर्तन वगैरे. किंवा मुंबईत महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकासमोर एक दोन किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात तसे. पण तिथे सामूहिक प्रार्थना होत नाहीत.

Pages