६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रिया बुरखा घालतात की नाही ह्याची देखरेख करण्यासाठी इराण नी पोलिस नेमले आहेत.
अशी बातमी दोन चार दिवसापूर्वी ऐकली.

>>> ओ दादा तुम्ही लै माग बातम्या वाचण्यात. बुरखा घातला की नाही हे बघण्यासाठी मोरालिटी पोलीस होते ते खोमेनी सत्तेवर आल्यापासून होते. ते आता मिशा आमेनी आंदोलनामुळे रद्द करणार अशी घोषणा आहे. (अर्थात ह्या घोषणेला प्रॅक्टीकली काही अर्थ नाही ही बाब निराळी. )

फेसबुक वर एक पेज आहे ' View from my window ' ........ इथे पाकिस्तान अचानक भयंकर active झालं आहे. अनेक (पाकिस्तानी) ग्रुप मेंबर्स खुप जास्त फोटोज् टाकताहेत.
(त्यावरील पाकिस्तानी लोकांच्या comments आणि एकूणच फ्रेंडली टोन वाचुन कळतं की ते लोक image cleaning आणि tourism promotion च्या जबरदस्त प्रयत्नात आहेत.) पण हे नक्की की यातील फोटो पाहुन कळतं की north पाकिस्तान किती सुंदर आहे. पहाड आणि निसर्ग सौंदर्य भरभरून आहे. एवढं सुंदर, स्वस्त आणि जवळच्या जवळ म्हणून मला पाकिस्तानला जायचं temptation होतं आहे. पण त्या ग्रुप मधील काही पाकिस्तानी नागरिकच लिहितात की त्याचा देश टुरिझम साठी सुरक्षित नाही. काही प्रतिसाद असेही होते की अगदीच नगण्य भाग प्रेक्षणीय आहे, बाकी देश गचाळ आणि गलथान आहे. (जे भारतातही आहेच). बरेच पाश्चिमात्य लोक फोटो पाहून पाकिस्तान wishlist मधे लिहिताहेत (असं प्रतिसादात तरी म्हणतात). बाकी भारतीय आणि पाकिस्तानी यांचे एकमेकांवर शाब्दिक वार इथेही असतातच.त्यामुळे अर्थात मोदींचा उल्लेख देखील असतो. मग लगेच मला माबोची आठवण येते आणि मी इथे परत येते Wink

फेसबुक वर एक पेज आहे ' View from my window
>>>>

अरे हा धागा आपल्याकडेही आहे. बरी आठवण केलीत. नुकतेच मुंबई घराच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. खिडकी व्यूचे फोटो टाकतो तिथे Happy

सलमानच्या बजरंगी भाईजानमध्येही पाकव्याप्त काश्मीर सुंदर दाखवलेले.

आता कठीण आहे Pakistan चे.
सरकार ची इच्छा असली तरी दहशतवादी ब्लोकांवर कारवाई कण्यास तेथील सरकार सक्षम नाही

आर्मी अधिकाऱ्यांना टीवी debate मध्ये बोलवणे, राजकारणात सैन्याला ओढणे.
हे उद्योग bjp sarkar पण करत आहे.
पाकिस्तान ची हालत असल्याचं मूर्ख पणा मुळे आज अशी झाली आहे.
निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना आमदार करणे,मंत्री करणे.
हे उद्योग पाकिस्तान सारखा bjp sarkar pan करत असते.
उद्या ह्याचे परिणाम देशाला भोगायला लागतील.
निवृत्त.
आयएएस,आयपीएस ,न्याय मूर्ती, सैन्य अधिकारी
ह्यांचं राजकारणातील सहभाग आणि त्यांस निवृत्त झाल्या नंतर सरकार देत असलेली पद.
हे धोकादायक च आहे.
सत्ताधारी लोकांचे गुलाम ह्या मधून तयार होतील.
बाकी चांगले काही घडणार नाही.
आपण पाकिस्तान पेक्षा काहीच कमी नाही.
हे सिद्ध करण्याची काय गरज आहे
शेषन सारखे अधिकारी देशाला हवे आहेत.

सलमानच्या बजरंगी भाईजानमध्येही पाकव्याप्त काश्मीर सुंदर दाखवलेले.
>>>> ओ.. ते पाकव्याप्त नव्हते हो. भारतातच कुठे तरी शूटिंग केले आहे त्याचे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तानचे काही भाग खूप सुंदर आहेत. फोटो बघून कळते.
पण माझ्या माहितीप्रमाणे टुरिझम साठी, खास करून पाकव्याप्त/गिलगिट वगैरे भागात भारतीयांना परवानगी नाही मिळत. कारण अर्थातच सुरक्षेचे. त्यामुळे भारतामधील नावाजलेले माऊंटेनर्सही K2 वर नाही जाऊ शकत.
फक्त काश्मिरी नागरिकांना थोड्या फार प्रमाणात ये जा करायची मुभा होती . योग्य इमिग्रेशन कंट्रोलमधून. कारण नातेवाईक, लग्नसंबंध वगैरे.
अर्थात ३५ ए काढल्यावर काय बदल झालेत माहित नाही.

पाक अफगाण बॉर्डर, हिंदुकुश पर्वताजवळचा वरचा भाग हे अप्रतीम निसर्ग सौंदर्याने नटलेले भाग. स्वात प्रांत.

https://vishwakosh.marathi.gov.in/20637/>>>>>> हेमंत भाऊ वाचा हे वेळ असेल तर.

तसे मुस्लिम धर्मियांना अभिमानाने सांगता येईल असे काय आहे ? >> आजवर तीन मुस्लिम धर्मीयांना सायंसचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यातले सलाम तर पाकिस्तानी आहेत.
सो कॉल्ड हिंदूत्ववादी अमर्त्य सेन आणि अभिषेक बॅनर्जी ह्या हिंदू नोबेल लॉरिएट्सचे धर्मावरून काय धिंडवडे काढतात हे आख्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे कुठल्या धर्माचे किती सायंटिस्ट वगैरे वरून टेंभा मिरवणे फारच डबल स्टँडर्ड झाले.

हेमंत भाऊ वाचा हे वेळ असेल तर

हे सर्व माहीत असून परत वाचले.
मुस्लिम लोकांसाठी पाकिस्तान निर्मिती हे काँग्रेस चे चाणाक्ष पणाचे उत्तम उदाहरण आहे.

अखंड भारत करत बसले असते तर आज मोठी कठीण स्थिती निर्माण झाली असती.
1956 ते 1958 ह्या काळात पाकिस्तान मध्ये चार पंतप्रधान झले त्या वरून ते लोकशाही चालविण्यास बिलकुल सक्षम नाहीत.
भारताची घटना 1950 ल निर्माण त्यांची निर्माण होण्यास 1962 साल उजडावे लागले.
लोकशाही ही ह्यांस बिलकुल पचत नाही.
हुकुमशाही,एकाधिकार शाही ही ह्याना खूप आवडते.
मला वाटतं एका पण मुस्लिम देशात निरोगी लोकशाही नाही.
त्या मानाने आपला देश खूप उत्तम आहे.
भांडतात पण अगदी टोकाची भूमिका घेत नाहीत.
अतिशय लोकप्रिय असे पंतप्रधान भारताला लाभले .
नेहरू पासून इंदिराजी, आणि आनी अटलबिहारी जी न पासून मोदी न पर्यंत .
पण त्यांनी लोकशाही चाचं सन्मान केला.
हुकुमशाही चे समर्थन आज पर्यंत तरी केले नाही..
त्यांना हवं असते तर त्यांना लोकशाही मोडीत काढणे सहज शक्य होते.
प्रचंड लोकप्रियता त्यांच्या कडे होती, आहे

त्यामुळे कुठल्या धर्माचे किती सायंटिस्ट वगैरे वरून टेंभा मिरवणे फारच डबल स्टँडर्ड झाले.>>>>>>
नीट वाचले तर ख्रिश्चन धर्माचे कौतुक केलेले दिसले असते , आणि ते सार्थच आहे कारण १९०१ ते २००० पर्यंतच्या नोबेल विजेत्या मध्ये ७२ टक्के ख्रिश्चन धर्मातील होते .
जगातील सत्तर ऐंशी मुस्लिम देशापैकी निम्या मुस्लिम देशात हिंसाचार माजलेला आहे , तेथे ते बहुसंख्य असून देखील सहधर्मियांच्या मशिदीत बॉम्बस्फोट करतात ते नाही दिसले , बुरख्या विना बाहेर पडणाऱ्या महिलांना गोळया घालतात ते नाही दिसले , पण ख्रिश्चन धर्मियांनी जगाला मोठ्ठे शास्त्रज्ञ दिले सांगितलेले खटकले .

मुस्लिम लोकांसाठी पाकिस्तान निर्मिती हे काँग्रेस चे चाणाक्ष पणाचे उत्तम उदाहरण आहे. >>>>>>
शंभर टक्के सहमत , यासाठी काँग्रेसला शतवार मुजरा !
भारतातील हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या देखील पुढील कित्तेक पिढ्या काँग्रेसचे हे उपकार विसरणार नाहीत !
नाहीतर इथे देखील २० कीलोंच्या पिठाच्या बॅग साठी एकमेकांना गोळ्या घालत बसले असते ....

धर्माची आणि शास्त्राची सांगड घालून धर्माचे कौतुक करण्यामागचे तुमचे लॉजिक गंडलेले नाही का?
ज्या ख्रिश्चन धर्माचे तुम्ही कौतुक करत आहात त्या ख्रिश्चन धर्माने प्रुथ्वी गोल आहे म्हणणार्‍या शास्त्रज्ञांना जिवंत जाळले नव्ह्ते का?

विज्ञान आणि शास्त्र धर्माच्या कोंदणात बसवायचा अट्टहास तुम्ही का करता आहात हे ईथ सगळ्यांना माहिती आहे.

मी अश्विनी +१
आणि, अभिमानास्पद कामगिरी काय फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानात होते का ? साहित्य, चित्रकला, स्थापत्य, काव्य, संगीत ह्या सगळ्यांमध्ये असते.

meaning of secularism.

Of course there are 57 Islamic countries in the world where Islam is a state religion and we cannot deny this. But we should also understand that there are many countries in the world where muslims are in majority and they follow the principle of secularism. Know in this article I’ll give a list of the secular muslim majority countries.

Secular muslim majority countries:

1. Indonesia- 87.2% Islam

2. Turkmenistan- 93.7% Islam

3. Uzbekistan- 88.6% Islam

4. Tajikistan- 96.7% Islam

5. Kazakhstan- 70.4% Islam

6. Azerbaijan- 97.4% Islam

7. Turkey- 82% Islam

8. Senegal- 95.9% Islam

9. Albania- 58.79% Islam

10. Bosnia& Herzegovina- 50.7% Islam etc.

I have give a list of only few countries but there are many countries like this. So it is not correct to say that there’s no secular muslim majority country in the world. People should not judge 1.8 billion muslims just by seeing Middle East and Afghanistan crisis.

असे पण काही मुस्लिम देश आहेत

धर्माची आणि शास्त्राची सांगड घालून धर्माचे कौतुक करण्यामागचे तुमचे लॉजिक गंडलेले नाही का?
ज्या ख्रिश्चन धर्माचे तुम्ही कौतुक करत आहात त्या ख्रिश्चन धर्माने प्रुथ्वी गोल आहे म्हणणार्‍या शास्त्रज्ञांना जिवंत जाळले नव्ह्ते का?
>>>>>>>>
हा ! मान्य .
ती जाळपोळ विसरलो होतो .
पण जगात टोटल दोनशे कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या एकातरी देशात शांतता , सहिष्णुता शिल्लक आहे का ? त्याच प्रमाणे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळाले आहेत का ?
फक्त सिलेक्टिव शास्त्र , नोबेल सारखे मुद्दे बाजूला काढून त्यांची व्हाइट इमेज करण्यात तुम्ही वेळ खर्च करत आहात .
त्यांच्या देशातील महिलांचे शोषण , ट्रीपल तलाक , हालाला सारखे मुद्दे नेहमी प्रमाणे किरकोळच वाटत असतील.
शेवटी हे सगळे मुद्दे पाकिस्तानला लागू होतात , तेथे सर्व धर्म समभाव नावाला देखील शिल्लक नाही हे खूप वेळा दिसून आले आहे .
तेथे सर्रास हिंदू , क्रिश्चन मुलींना पळवून नेवून त्यांचे जबरदस्ती ने धर्मांतर केले जाते , कोणत्याही मुद्द्यात इतर धर्मियांनी विरोध केला की ईशनींदा केस लावली जाते .
गेल्या महिन्यात दोन नामांकित डॉक्टरांच्या हत्या करण्यात आल्या कारण ते हिंदू होते .
आजच स्वीडन ने पाकिस्तान मधील स्फोटक परिस्थिती पहाता दूतावास बंद केला , हळु हळु इतर देश ही स्वीडन प्रमाणे निर्णय घेतली .
काही दिवसानंतर भारत पाकिस्तान सीमेवर हिंसाचार होण्यास सुरूवात होईल .

मला पण इतर धर्मियांच्या धर्मशास्त्राचे समर्थन करायचे नव्हते पण पाकिस्तानचा विषय आला की त्यांनी इतर धर्मियांच्या केलेल्या हाल अपेष्टा मुळे बाकीचे मुद्दे चर्चिले जातात .
बर पाकिस्तान म्हणजे कोण ? तर सामान्य मुस्लिम लोकच ना ?
ते एकदम परफेक्ट सिस्टिम्याटीकेली इतर धर्मियांना संपुष्टात आणतात , पण त्या विरोधात हू की ची कोणी करत नाही याचे आश्चर्य वाटते .

फक्त सिलेक्टिव शास्त्र , नोबेल सारखे मुद्दे बाजूला काढून त्यांची व्हाइट इमेज करण्यात तुम्ही वेळ खर्च करत आहात . >> शास्त्रज्ञांच्या संख्येवरून धर्माची श्रेष्ठकनिष्ठता मोजण्याचा मुद्दा तुम्ही आणला. मी फक्त संबंधित फॅक्ट्स देऊन त्यातला फोलपणा तुम्हाला दाखवला ईतकेच.

पण जगात टोटल दोनशे कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या एकातरी देशात शांतता , सहिष्णुता शिल्लक आहे का ? >> भरपूर देश आहेत वरती यादी आलीच आहे. मागच्याच वर्षी कतारने शांतता , सहिष्णुता आणि सुरक्षिततता सगळ्या आघाड्यांवर पुरेपूर खरे ऊतरून फुटबॉल वर्ल्डकप यशस्वीरित्या पार पाडून तुमचा मुद्दा खोडून काढला. भारत सहिष्णू, शांत आणि सुरक्षित असेल तर कधी होतेय भारतात फुटबॉल वर्ल्डकप किंवा ऑलिपिंक्स?

त्यांच्या देशातील महिलांचे शोषण , ट्रीपल तलाक , हालाला सारखे मुद्दे नेहमी प्रमाणे किरकोळच वाटत असतील. >> हुंडा, हुंडाबळी, जरठ कुमारी विवाह ज्या देशांत अगदी मागच्या वीसेक वर्षापर्यंत सर्रास चालत. ज्या देशात बलात्कार सत्तेतले नेते ते रस्त्यावरचे ऐरेगैरे पुरूष सुद्धा किरकोळ गुन्ह्यासारखा करतात आणि नंतर अशा बलात्कारी पुरूषांचा सत्कार केला जातो, ज्या देशात स्त्री-भ्रूण हत्या, ऑनर किलिंग मोठे सन्माननीय कार्य समजले जाते असा स्त्रियांप्रती कमालीचा जागरूक आणि ऊद्दात डुष्टीकोन असलेला देश जगाच्या पाठीवर कुठे आहे तुम्हीच सांगा पाहू.

मागच्याच वर्षी कतारने शांतता , सहिष्णुता आणि सुरक्षिततता सगळ्या आघाड्यांवर पुरेपूर खरे ऊतरून फुटबॉल वर्ल्डकप यशस्वीरित्या पार पाडून तुमचा मुद्दा खोडून काढला. >>>>>>>
कतार ची सहिष्णुता सिद्ध करण्यासाठी खूपच अलीकडच्या काळातील उदाहरण दिले तेही चुकीचेच .
वर्ल्ड कप मध्ये प्लेअर्स ला टी शर्ट काढण्याची बंदी होती , तर प्रेक्षकांनी पूर्ण अंग झाकणारे कपडे घालण्याच्या सूचना होत्या .
नूपुर शर्माच्या केस मध्ये याच कतार ने " भारताने माफी मागावी " असे सांगितले होते.
पण त्या म्हातर्ड्या हुसेन ने हिंदू देवतांची नग्न पेटिंग काढली , भारतात हिंदू जनतेच्या भावना भडकल्या तेंव्हा हुसेन ला कतारने नागरिकत्व दिले होते .
धार्मिक सहिष्णुता असल्याचे पुरावा देण्याची संधी त्यावेळी दवडून कट्टर धर्माभिमानी असल्याचा पुरावा दिला होता.
थोडक्यात तुमच्या आवडत्या कतार ने सहिष्णुतेच्या चिंधड्या केंव्हाच उडवल्या आहेत !
राहिला प्रश्न हुंडा हुंडाबळी चा , त्या बाबत भारत पाकिस्तान मध्ये फरक बिलकुल नाही ,दोन्ही देशांत सारखीच परिस्थिती असेल .
पण लक्षणीय फरक हा इथे भारतात मुस्लिम लहान मुलींना पळवून जबरदस्तीने त्यांचे हिंदू धर्मात धर्मांतर करण्याची एक ही घटना घडलेली नाही , जे पाकिस्तान मध्ये सर्रास होत आहे .
पाकिस्तान मधील हिंदू लहान मुलींना पळवून नेवून जबरदस्तीने धर्मांतर केल्या जाण्याच्या घटनावरील फोकस तुम्ही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करताय का ?

ज्या देशात बलात्कार सत्तेतले नेते ते रस्त्यावरचे ऐरेगैरे पुरूष सुद्धा किरकोळ गुन्ह्यासारखा करतात आणि नंतर अशा बलात्कारी पुरूषांचा सत्कार केला जातो, ज्या देशात स्त्री-भ्रूण हत्या, ऑनर किलिंग मोठे >>>>>>>>
भाजप च्या त्या भागातील मूठभर नेत्यांनी त्या बलात्कारी गुन्हेगाराचा सत्कार करून चुकीचा पायंडा पाडला , त्या आरोपीला भाजपच्या सामान्य मतदारांनी कधीच समर्थन दिले नाही .
पण त्या एका घटनेचे वारंवार भांडवल करून कित्येक घटनातील हिंदू लहान मुलींच्या बलात्कारी मुस्लिम आरोपींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातोय का?
आज पुन्हा राजकोट मध्ये रफिक ने ते कृत्य केलंय .

अजून एक महत्त्वाची बाब !
नुपूर जे बोलली तेच झाकिर ने बोलल्याचे व्हिडिओ उपलब्ध असताना नुपूर बाबत कतार ने भारताला माफी मागावयास सांगितले होते .
तर त्याच झाकिरला वर्ल्ड कप मध्ये सन्मानाने बोलावले होते !
हा कतार च्या असहिष्णुतेचा सर्वात मोठ्ठा पुरावा असावा .

वर्ल्ड कप मध्ये प्लेअर्स ला टी शर्ट काढण्याची बंदी होती , तर प्रेक्षकांनी पूर्ण अंग झाकणारे कपडे घालण्याच्या सूचना होत्या . >> बरोबर आहे की.. क्रिकेट मध्ये गांगुली ने शर्ट काढला तर त्याच्यावर टीका झाली होती. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे हा सभ्यता-असभ्यतेचा विषय आहे त्याचा धर्माशी संबंध नाही.
पण त्या म्हातर्ड्या हुसेन ने हिंदू देवतांची नग्न पेटिंग काढली , भारतात हिंदू जनतेच्या भावना भडकल्या तेंव्हा हुसेन ला कतारने नागरिकत्व दिले होते . >> भारताने बांग्लादेशच्या तस्लिमा नसरीन आणि दलाई लामांना अनेक वर्षे आसरा दिला तसा का? किंवा भारताने आरोप ठेवलेल्या माल्या, मोदींना ग्रेट ब्रिटनने दिला तसा का?
नूपुर शर्माच्या केस मध्ये याच कतार ने " भारताने माफी मागावी " असे सांगितले होते. >> माफीची अपेक्षा करणे सहिष्णू नसते का?

पण लक्षणीय फरक हा इथे भारतात मुस्लिम लहान मुलींना पळवून जबरदस्तीने त्यांचे हिंदू धर्मात धर्मांतर करण्याची एक ही घटना घडलेली नाही , जे पाकिस्तान मध्ये सर्रास होत आहे . >> तीन लाख मुलामुलींना अपंग करून ईनह्युमेन कंडिशन मध्ये रस्त्यावर भीक मागायला बळजबरी केली जाते हे आपल्या महान हिंदू देशात आजही सर्रास घडत नाहीये का?
भारतामधील हिंदू लहान मुलींना पळवून नेवून जबरदस्तीने अपंगत्व लादल्या जाण्याच्या घटनांवरील फोकस तुम्ही डायव्हर्ट करून पाकिस्तानवर वळवण्याचा प्रयत्न करताय का ? धर्म माफियाने पळवले काय किंवा बेगर माफियाने पळवले काय मुलांचे हाल संपतात का?

पण लक्षणीय फरक हा इथे भारतात मुस्लिम लहान मुलींना पळवून जबरदस्तीने त्यांचे हिंदू धर्मात धर्मांतर करण्याची एक ही घटना घडलेली नाही , जे पाकिस्तान मध्ये सर्रास होत आहे . >> तीन लाख मुलामुलींना अपंग करून ईनह्युमेन कंडिशन मध्ये रस्त्यावर भीक मागायला बळजबरी केली जाते हे आपल्या महान हिंदू देशात आजही सर्रास घडत नाहीये का?
>>>>>>>>>
+१११११
मानलं बुवा !
हा युक्तिवाद सर्वात भारी आय ओपनर आहे !
कुठे मिळते हे ज्ञान ? Happy

थोडक्यात पाकिस्तान मधील पूर्वी १८ टक्के असलेले हिंदु , ख्रिश्चन अल्पसंख्यांक लोकं आता २ टक्क्यांवर आलेत , म्हणजे ते उरलेले २ टक्के दोषी आहेत . जे अजून आपापला धर्म सांभाळून बसले आहेत .
हळु हळु माझेही विचार तुमच्यासारखेच व्हायला लागले आहेत Happy

आर्थिक अपराध हे वेगळे.आणि धर्माच्या नावावर झुंडशाही करून हिंसा करणे हा प्रकार वेगळा.
धर्माच्या नावावर स्त्रिया वर अत्याचार करणे वेगळे कारण हे अत्याचार घराघरात होतात.
आणि स्त्री वर अपराधी वृत्तीच्या व्यक्ती नी अत्याचार करणे जे वेगळे.
सर मिसळ करू नका दोन्ही मध्ये.
पाकिस्तान ची तुलना भारताशी होवूच शकत नाही.
पण पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील काही मुस्लिम देश अती धार्मिक आहेत म्हणजे सर्व च मुस्लिम देश तसेच आहेत किंवा मुस्लिम लोक तशीच असतात.
हे पण खरे नाही.
मुलांना अपंग करून भीक मागायला उपयोग करणारी काही गुन्हेगारी वृत्ती ची लोक आहेत तशीच .
अपंग, अनाथ लोकांना .
राहण्याची,खाण्याची ,शिक्षणाची व्यवस्था करणारी लोक पण भारतात आहेत आणि त्यांची संख्या खूप मोठी आहे.
दानधर्म करणारे खुप मोठ्या संख्येने भारतात आहेत.
चांगली बाजू पण आपण बघितली पाहिजे.
नेहमीच निगेटिव्ह विचार करणे चूक च.

जसा समाज असतो,जशी व्यवस्था असते.
तसाच माणसाचा स्वभाव बनतो.
कट्टर धार्मिक वूतीचा समाज असेल त्याच विचाराची राज्य व्यवस्था असेल तर तिथे राहणारा व्यक्ती पण कट्टर धार्मिक च असतो.
भारतात बेशिस्त वागणारा ड्रायव्हर दुबई,अमेरिकेत गेले की नियमाने वागतात.
माणूस तोच असतो पण बेशिस्त लोकांची संख्या तिकडे कमी असते.
शिस्त असणारी लोक जास्त असतात.

समाज सुधारणा करणे हे खूप अवघड काम असते.
अनेक वर्ष लागतात त्याला.
महाराष्ट्रात अनेक संत,समाज सुधारक होवून गेले .
त्या मुळे महाराष्ट्रात बाकी राज्यांच्या तुलनेने लोक सभ्य आहेत.
आपण घर घेताना पण हाच पहिला विचार करतो चांगल्या भागात घर हवं.
म्हणजे सुख सोयी बरोबर आजू बाजू ची लोक सुसंस्कृत असावीत.
अपराधी वृत्ती ची लोक तिथे नसावीत.
असा एक parameter असतो

Christian धर्मात लहानपणापासून नागरी मूल्ये शिकवतात. चर्च मधल्या प्रार्थनेनंतर कसे आवाज न करता बाहेर पडावे, धक्काबुक्की का आणि कशी करू नये हे मनावर बिंबवतात. हे जणू त्यांच्या धर्मात असल्यासारखेच पाळायला लावतात. त्यांच्या चर्चमध्ये, शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नात भेसळ होत नाही. ते भरपूर प्रथिने आणि इतर पोषक द्रव्यांनी युक्त असते. शाळांमध्ये बहुसंख्य मुले मिश्राहार घेणारी असताना मूठभर लोकांच्या आरडाओरडीला न जुमानता स्वस्त आणि उच्च प्रथिनयुक्त अशी ताजी अंडी मुलांना देण्यामध्ये त्यांचा धर्म आड येत नाही. अनेक गोष्टी आहेत. सामाजिक शिस्तीमुळे बेबंदशाही माजत नाही. व्यवस्था सुधारते आणि सुकर होते. निम्न स्तरावरची पिळवणूक थांबते. राष्ट्राची प्रतिमा उंचावते. सामूहिक शिस्तीमुळे राष्ट्राची प्रगती होते.
अपूर्ण.

बोहरी मुस्लिम लोकांचे च्य गुरू न च जेव्हा देहांत झाला तेव्हा मी बघितले.
काय शिस्तीत हजारो लोक आली होती.
रस्त्याच्या एका बाजूने लाईन मध्ये चालत.
ना गोंधळ ना कोणाला त्रास.
हिंदू समाज पेक्षा पण उत्तम शिस्त.
शिस्त एका माणसाला असून चालत नाही .
त्या गटाला,समजला शिस्त असावी लागते.

पाकिस्तानी मीडिया ही भारतीय मीडिया पेक्षा खूप उच्च दर्जा ची आहे.
असे मात्र माझे स्पष्ट मत बनले आहे.
चार टवाळ लोक जमा करून फालतू विषयावर किंवा धार्मिक बाबी वर बीन कामाची चर्चा करणे हे उद्योग भारतीय मीडिया करते.
न्यूज coverage कमी आणि सनसनाटी जास्त अशी भारतीय मीडिया ची वृत्ती आहे.
त्या मानाने पाकिस्तानी मीडिया खूप उच्च दर्जा ची आहे.
लता मंगेशकर गेल्या तेव्हा त्यांनी त्या प्रसंगाचे उत्तम coverage केले होते.
आपले शाहरुख नी असे केले नी तसे केले ह्या मध्येच गुंतले होते.

Pages