काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिकडच वातावरण छान दखवलय...

शिवच्या आज्जीला कळणार ती होकार/ नकार देणार / गोन्धळ करणार..बरच बाकी आहे अजुन.. २-३ महिने जातिल लग्नाला वाटतय..

अशा वातावरणात स्वतःला कोणतंही मत नसलेली नंदीगाय गौरीसारखी मुलगीच टिकू शकते. >>> शिवच्याच बाबतीत मात्र बरी असतात हिची मते. नालायक, डरपोक, चान्गला वै वै. Angry

शिव ला मोठा भाऊ व वहिनी आहेत. वहिनी गोड वाटली.>>> सध्या तरी गोड दाखवलीये. पुढे मात्र काय दाखवतील माहीत नाही. Lol

सफर से आके बिना शुद्ध हुए हमारे पैर छूके हमारा धर्म भ्रष्ट करोगी क्या असं म्हटलं, >>> आ, लेकिन बनारस मे तो औरतोसे पैर नही छुआते ना? ऐसा अम्मा कह रही थी गौरी से. Uhoh

सफर से आके बिना शुद्ध हुए हमारे पैर छूके हमारा धर्म भ्रष्ट करोगी क्या असं म्हटलं, >>> आ, लेकिन बनारस मे तो औरतोसे पैर नही छुआते ना? ऐसा अम्मा कह रही थी गौरी से. >>> जितना मैने सुना सुलु , ( रिअल लाईफ मे ) , बेटीयोन्से नही छुआती . क्योन्की बेटीया घर की लक्श्मी होती है Happy

दूसर्यान्ची लक्श्मी आपल्या घरी आली की तिला पाया पडायला लावतातच .

कालचा एपिसोड तर नुस्ताच फीलर! काहीच घडलं नाही. आणि हम्माचे जमाई बाबू का नाराज दाखवलेत म्हणे? उगीच आपलं...कहानी मे ट्विस्ट! शिव ची बहिण वहिनी सेम आहेत दिसायला. गवरी सगळ्यात वेगळी आणि तिला खूप जड जाणारेय. Happy

ही एकच सिरियल बघत आहे सध्या.. अगदी तर हिंदी पण कुठली नाही..
ही एकच फॉलो करत आहे..

आणि शिव अजुनही आवडत आहे..काहीतरी बरं दाखवाव ही इच्छा

ही टु इन वन आहे. मराठी आणि हिंदी.
शिवचंही तोंड काही उघडेना. तोंड उघडलं की मांजरी आडव्या जातात. आधी हम्मा मग जिजी.

शिवचंही तोंड काही उघडेना टिपीकल सिरीयल.. दुसरं काय.!जे काही महत्त्वाचे बोलायचे असेल ते कधीच ह्या लोकांना तेव्हा च्या तेव्हा बोलता येत नाही..

जितना मैने सुना सुलु , ( रिअल लाईफ मे ) , बेटीयोन्से नही छुआती . क्योन्की बेटीया घर की लक्श्मी होती है >>> हो पण शिवची बहीण त्यान्च्या घरची आहे ना? मग तिला सुद्दा पाया पडायला लावल्या?

दूसर्यान्ची लक्श्मी आपल्या घरी आली की तिला पाया पडायला लावतातच .>>> मग त्या न्यायाने गौरीचे पाया पडणे जस्टिफाय झाले. जरी अम्मा तिला बहू मानत नसली तरी एक ना एक दिवस तिच शिवची नवरी होणार ना.:डोमा:

हम्माचे जमाई बाबू का नाराज दाखवलेत म्हणे? >>> काय तो जमाई बाबू, साध त्याच्या बायकोने आपल्या भावाच्या (शिव) खान्द्यावर हात ठेवलेले, त्याच्याशी मोकळ वागलेले त्याला आवडत नाही. साध त्याच्या तोन्डावर हसुदेखील नव्हते.

तिकडे मोनिकाचं गुपित फुटलं आणि इकडे गौरीच्या आज्जीचं हृदय (गौरीला हृदयच नसल्याने ते तुटायफुटायचा काही प्रश्नच उद्भवत नाही). शिवच्या दादीने गौरीच्या आज्जीला फोन करून सांगितलं की हे नातं होणं शक्य नाही. शिवाय आता दादी शिवची शुद्धी करून घेणार आहे आणि मग त्याचे लग्न स्वतः च्या पसंतीच्या मुलीशी करणार आहे. आता दादीच्या पसंतीला थंडाक्का कशी पडते हे बघायचे बस्स.

बाकी शिवच्या दादीचा अभिनय आणि वेशभूषा दोन्ही अतिशय बकवास आहे. नुसता आरडाओरडा आणि ओव्हर acting करते आणि तिचे खरे वय सारखेच दिसून येते.

वा वा! शूरवीर शिव ने दादीला इसमें मां की कोई गलती नही है, चाचा की कोई गलती नहीं है हे म्हटलं. गौरीच्या आजीला काही बोलू नको असं हम्माला सांगितलं. पण ऐरीगैरी लडकी दहा वेळा ऐकूनही त्यावर अवाक्षर उच्चारलं नाही. आम्ही काहीही चूक करत नाही असंही म्हणत नाही. त्यांचा दोष नाही, म्हणतोय म्हणजे नक्कीच काही पाप झालंय. .त्याच्याच लग्नाचा विषय आणि त्याने त्यात बोलायचं नाही.
शिव गौरी अगदी राम मिलायी जोडी आहेत की नाहीत? ही नंदीगाय आणि तो मुकातोंडफुगवलेलानंदी.

शिव कडे फारच भयानक दिसतय सगळं.तो जावई म्हणतो ऐसे कुछ किया होता.. म्हणजे बाहर के लडकी के साथ विवाह तो मै मेरि बिवी को यहा कभी भेजुंगा नही..

तो ताउजी की कोण म्हणतो ऐसा कुछ हुआ तो मै यहा कभी आउंगा नही..

बाकी शिवचे सगळे घरचे इंट्रोड्युस होत होते तेव्हा त्याचे असे भाव होते की अच्छा हा असला आहे माझा परिवार..
असं वाटत होत तो पण पहिल्यांदाच भेटत आहे या सगळ्याना Proud

इथे जरा अतिशयोक्ती दाखवत असतीलही..पण उत्तर प्रदेश - बिहार मधे अशीच मेंटॅलिटी आहे. शो ऑफ,नणंदेला-जावयाला अतीरेकी मान सन्मान, बडेजाव, नातेसंबंधातली चढाओढ, सुनेला अतिशय खालची वागणूक, मानपान देणी घेणी........

>>>>
इथे जरा अतिशयोक्ती दाखवत असतीलही..पण उत्तर प्रदेश - बिहार मधे अशीच मेंटॅलिटी आहे. शो ऑफ,नणंदेला-जावयाला अतीरेकी मान सन्मान, बडेजाव, नातेसंबंधातली चढाओढ, सुनेला अतिशय खालची वागणूक, मानपान देणी घेणी........<<<<<<
+१

खास करून नॉर्थ मध्ये जर ज्यस्तच्ग

शिव बाबूंचा महाभारता युद्धातला अर्जुन झालाय. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति|

आजीबाईंनी ऐरीगैरी लडकी म्हटलं, त्यावर काही बोलेना. एका मित्राने लडकी के खानदान का पता नहीं त्यावर चेहर्‍यावर गौरीसारखे निर्बुद्ध भाव. मजनूचाचाच्या रूपाने कृष्ण मिळालाय. पण इथे कृष्णाने रथही चालवायचा आणि युद्धही करायचे.
गौरीकडे तिच्या बाबांचा एकच गड जिंकायचा तर आपल्या घरी ही अभेद्य किल्ल्यांची रांग आहे याची शिवबाळाला कल्पना नव्हती का?

त्याचे ते दोन्ही मित्र रोज तीच कापडं घालतात. मॉडर्न कापडंवाला मित्र दकियानुसी विचारांचा आणि धार्मिक कापडं घालणारा मॉडर्न विचारांचा.

नाही. काहे दिया परदेस या टायटलवरून आणि मजनूचाची कशी पळून गेली, हम्मा किती ड्रामा करयेत आणि शिवच्या तोंडाला लागलेल्या कुलुपावरून शिवगौरीचे लग्न झाले की गौरी आशा काळे किंवा अलका कुबलचे भोग भोगायला तयार होईल, असे वाटते.

पण मजनू चाचाचा स्टँड आवडला.....एकदम फर्म सपोर्ट.
दादी चे मन यांना अचानक पणे बनारसला बोलविण्या इतके कसे बदलले ?

अम्माचा आक्रस्ताळे पणा मस्त! म्हणजे काही स्त्रिया आपलेच खरे करण्यासाठी असे वागतात.

गवरी च्या चेहेर्‍यावर थोडे बरे भाव होते काल.

Pages