काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटे मी आधी लिहुलेले भाकीत खरे झाले तर...
कोणीतरी जातीतलाच फालतु मुलगा येणार मग मोजोला उपरती होणार.
बगैरे..

हा ना .. म्हणजे गौरीला आलेल स्थळ चांगलं असुनही .. ती त्याच्याबरोबर सुखी राहु शकणार नाही कारण तिच शिव वर प्रेम आहे असं कधीतरी दाखवाव ना ह्यानी...नाहीतर अशी नंतर आलेली स्थळ बेकार दाखवतात जेणेकरुन मेन हिरोशी परत सुत जुळाव..

पण खरच प्रेम आहे तर कोणी हिरो का येईना फरक नाही पडला पाहिजे

हो, खरंय.
काल गवरी निर्वीकारपणे बाबांना म्हणत होती, बाबा, मी खरंच खूप आनंदात आहे. अजिबात दु:खी नाही हे लग्न मोडले म्हणून. ते ऐकून मला हसायलाच आले. आजीचेच एक्सप्रेशन्स लाजवाब होते फक्त.
काय तो निशाचा तमाशा!

हा ना .. म्हणजे गौरीला आलेल स्थळ चांगलं असुनही .. ती त्याच्याबरोबर सुखी राहु शकणार नाही कारण तिच शिव वर प्रेम आहे असं कधीतरी दाखवाव ना ह्यानी...>>> अस सोनी वरच्या कुछ रंग मधे दाखवले आहे.

हा ना .. म्हणजे गौरीला आलेल स्थळ चांगलं असुनही .. ती त्याच्याबरोबर सुखी राहु शकणार नाही कारण तिच शिव वर प्रेम आहे असं कधीतरी दाखवाव ना ह्यानी >>> + १००००० .

पण लेखकाकडून किती अपेक्शा आपण . आहे तेच झेपत नाही आहे .

अरारा मोजो काल शिव ला थम्बवायला जातो तरी गवारीचं तोंड एरंडेलातून ड्रग प्यायल्यागत

गवरी फक्त कोरीव चेहेर्‍याची महालक्ष्म्यांची मूर्ती वाटते. सुबक, रेखिव, निर्वीकार ! तसाच चेहेरा, डोळे, आहेत तिचे . तिला साडी नेसवून , दागिने घालून पाटावर उभी केली तर खरीच गौराई शोभेल.

मी लिहीलंय त्यांच्या फेसबुक पोस्टवर, करते कॉपी इथे. त्याला इथल्या हेमाताई आणि चारोळीकार चंद्रशेखर गोखले आणि अजून एकांनी लाईक केलंय.

गौरी दिसते छान, डोळेही छान त्याबद्दल तिचे कौतुक. पण त्या डोळ्यात भाव कधीच दिसत नाहीत, अभिनयात कमी पडते. हि सोडून सर्वजण उत्तम अभिनय करतात. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित माझी नजर चुकत असेल. त्यामुळे हल्ली मी हि मालिका बघत नाही.

गौरीच्या डोळ्यांवर कमेंटसाठी पोस्ट टाकलीय, झी ने.

बाकी अमराठी लोक्स मालिका बघतात त्यांचा समज असाच होईल की मराठी मुलं बरोबर नसतात. दोन्ही गौरीशी लग्न ठरवलेली मुलं बरोबर नाही दाखवलीना. त्यापेक्षा एखादा मुलगा असा दाखवला असता की गौरीला म्हणाला असता की तू कुठे गुंतली आहेस का तर त्याच्याशीच लग्न कर, मी तुला नकार देतो.

दोन्ही गौरीशी लग्न ठरवलेली मुलं बरोबर नाही दाखवली > + १ . आणि हे ल्ग्न मोडल , त्यानंतर गौरीचं प्रेम, तिचा आनंद याचा सक्षात्कार तिच्या बाबांन्ना झाला!

काल येवढ मोठं डिसिजन होउनही सगळे शांत (अम्मा सोडुन) अगदी रुटिन सुरु पण झाले यांचे..
शिव गौरी ने भेटुन आनंद पण व्यक्त नाही केला..
बांगड्या घालण्याचा सिन ओके ओके.. गौरी किंचित हसली..घे आता घाल बांगड्या असे भाव होते चेहर्यावर

रागाने हात सोड्वुन घेतला तिने..

खरंच....!!!! काहीही दाखवतात!
तो मोजो आणि आजीचा दौत शोधण्याचा सीन तर उघडच आधी शूट करुन ठेवलेला फीलर म्हणून घुसडण्यात आला.....

मी लिहीलंय त्यांच्या फेसबुक पोस्टवर, करते कॉपी इथे. त्याला इथल्या हेमाताई आणि चारोळीकार चंद्रशेखर गोखले आणि अजून एकांनी लाईक केलंय.>> लिंक द्या ना...

बाबा गौरी साठी शिव च्या अम्मा ला विचारतात ते काही एवढं कनव्हिंसिंग वाटत नाही.. उगीच मालिकेचे शिर्षक सार्थकरण्यासाठी विचारले असे वाटत होते..
आणि नेहमीप्रमाणे गौरी न्यूट्रल.. ना आनंद ना राग ना खंत ना खेद.! किती संयमित.!

इथल्या कॉमेंट्स लाजवाब!
फेसबूकवर ह्या बाफची लिंक द्यायला पाहिजे कोणीतरी. Happy

मी पसरणीला धरुन कुटणारे. गौराक्का, थंडपणाचा कहर करतायत. आज्जी आणी पसरणीची जुगलबंदी परत व्हायला हवीय, मेरेकु उस दिनका इंतजार है.

लग्न लावताय की काय शिव चं .......yellow-smiley-confused-emoticon.gif
तो ब्यांड , घराची सजावट , ती सगळ्यांची लगबग असं वाटत होतं की याचे मित्र याला उचलून सरळ मांडवातच उभं करतात की काय आता .

बनारस इतकं मागसलेलं आहे याची कल्पना नव्हती. आमच्या गावातला कोणीतरी मुंबईला जाऊन परत आला म्हणून स्वागत की काय?

आता यात जोर मुंबई, परत अशा कोणत्याही शब्दांवर देता येतो. अशा वातावरणात स्वतःला कोणतंही मत नसलेली नंदीगाय गौरीसारखी मुलगीच टिकू शकते. आठवा - राखेने हात धू - धुतले. हा ड्रेस घाल, मेक अप कर - घातला, केला. नोकरी सोड -सोडली. शिवला नसेल, पण त्यांच्या घरच्यांसाठी गौरीच योग्य आहे.

राधिकासारखी जीन्सवर साडी गुंडाळणारी मुलगी नाही टिकणार.

बाकी शिवच्या दादीने हम्माला, आणि तेही फक्त तिलाच, सफर से आके बिना शुद्ध हुए हमारे पैर छूके हमारा धर्म भ्रष्ट करोगी क्या असं म्हटलं, तेव्हा तिने गौरीच्या आजींना जे सांगितलेलं ते आठवून आनंद मानायचा की काय हा मूर्खपणा आणि डबल स्टँडर्ड्स म्हणून कपाळावर हात मारायचा अशी द्विधा मनस्थिती झाली. विमानाने आले म्हणून मी अशुद्ध होत नाही हा आणखी एक क्लास बायस.

शूटिंग खरंच बनारसला केलंय की स्टॉक शॉट्स वापरून इथे सेट उभे केलेत, चहाची टपरी तरी नकलीच वाटत होती.

अर्थातच सेट वाटत होता. अगदी काहीही मालिका आहे, गौरी वहीनीला म्हणू नाही शकत की शिव नाही फसवणार मला.

गौरी ला तर धरुन मारलं पाहिजे..
जुन्या काळातल्या आशा काळे टाईप हिरोइन सारखी वागत आहे..आणि वर सगळा जोर शिव वरच म्हणे मुंबईची
मुलगी आमच्या गावाकडे पण अशा मुळुमुळु मुली नाहियेत..

एकच वाक्य बोलली वहिनीला तु अस कस बोलतेस .. तेही वहिनीने अर्ध तोडलं..
धाड धाड बोलता येत नाही का ..आणि शिव वर विश्वास आहे की नाही..नाहीतरी यांच गाडं इथपर्यंत पोहचायला शिव नेच मदत केलिय ...तोच कॉन्फिडंट होता ना.. मग म्हणायच ना शिव मला कधीच विसरणार नाही म्हणुन...

भंकस..... Angry

हो की पुरी बावळट्ट आहे गवरी.:राग: हिच्या जागी ती उर्मी सारखी मुलगी असती तर तिने एक घाव दोन तुकडे करुन पसरणीचे तोंड बंद केले असते. काय ध्यान आहे!

हे बघा, गौरीच्या अशा मुखदुर्बळ, नंदीगाय, अवस्थेला तिचे वडील कारण आहेत. लहानपणापासून अगदी हेअरबँडसुद्धा तिला बाबाच निवडून द्यायचे, नुसता विकत घेताना नाही, तर रोजचा बांधतानाही, हे तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं मी या कानांनी ऐकलंय.

गौरी ला तर धरुन मारलं पाहिजे..:हहगलो:
खरचं ईरिटेटिंग..दुसरं कुणी मिळालं नाही का ह्यांना गौरी च्या रोल साठी?

पोच ली का वरात बनारसला? माझ्याक डे अ‍ॅप बंद पडल्या पासून हे काही दिसत च नाही मग मी नेट फ्लिक्स वर सिनेमे बघायला सुरू केले आहे.

भरत अनुमोदन. इतका मुलीत इंटरेस्ट तर अमरीश पुरी पण घेत नाही. सिम्रनला जिंदगी जगू देतो थोडी फार. काय पण कंट्रोलिंग बाबा.

शिव ची आजी फारच कृत्रिम वाटते. विनाकारण तिला विनोदी रंगविण्यात आलं आहे. तिने अम्मावर डाफरलं की हशा पिकतो व प्रेक्षक सुखावतात अशी दिग्दर्शकाची खुळचट कल्पना आहे की काय नकळे !
शिव ला मोठा भाऊ व वहिनी आहेत. वहिनी गोड वाटली. बनारस चं ( व एकूणातच उत्तरेकडचं- शो बाजी चं ) वातावरण छान दाखविलेलं. मजनूचाचाने पुन्हा दाढी काढली वाटतं?

वाराणसीचे रेल्वे स्टेशन आणि गंगेचा घाट ओरीजनल आहे .
सेट नाहीय तो .

बाकी शिवची वहिनी खूपच छान दिसतेय नाजूक आणि सुंदर.
उलट गौरी तिची मोठी जाउ वाटेल तिच्यापुढे ....

Pages