काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी &tv वर नवीन सिरियलमधे दिसली आज. 'परफेक्ट पती' सिरियल. जयाप्रदा पण आहे वाटतं त्यात. गौरीच्या हिंदीवरचा मराठी अॅक्सेंट अजूनपण तसाच आहे. मराठी सिरियलमधे ठीक वाटायचं पण हिंदीमधे कानाला खटकतंच.

थंडाक्का आता एका पैठणीची गोष्ट मध्ये झळकणार आहे. मध्यंतरीच्या काळात पु.ना.गाडगीळ यांच्या एकदोन जाहिराती केल्या.चेपुवर सायली संजीव selects नामक collection ही पोस्ट करतात. पहा कधीतरी नशीब जोरदार असेल तर गुणवत्ता नसली तरी चालते. आपल्याला तिचा अभिनय एवढा खटकला पण तिला जयाप्रदाबरोबर हिंदी सिरीयल मिळाली. म्हणून म्हणावेसे वाटते की खुदा मेहेरबान तो थंडाक्का सुपरस्टार:(:(:अरेरे

परफेक्ट पती and tv >>>>>>>> हि माहितीये. थंडाक्काला काही एपिसोडसनन्तर अपघात झाला. सो तिला दुसर्या हिरवीणीने रिप्लेस केल.

थन्डाक्काचा चित्रपट येतोय ' आटपाडी नाईटस' नावाचा. प्रणव रावराणे हिरो झालाय तिचा. सुभा निर्माता आहे चित्रपटाचा.

Pages