काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात आजी भारी..निशा ला काय मस्त झापते आणि बांगड्या काढून घेण तर लय भारी.
शिव च्या बाबूजीं ना तर मस्त बोलते..
हमारा रेडियो, तुम्हारा भोंपू.:D Lol Lol

कालचा थोडा भाग पाहिला. आजी निशाला छान झापत होती. तर ती गवरी आजीलाच थांबवत होती. वर तर वर शुगो पण आजीला थांबवत होती. अरे पण का? Angry तुम्हाला न जमणारं काम आजी करत होती ना? मग कशाला मधे पडायचं? आणि मला एक कळत नाही आहे, शुगोचा नक्की problem काय आहे? ती निशाला बोलत का नाही? training साठी ललिताला पाठवूया का तिकडे ? Wink

ती पहिल्यापासून शांत, सोशिक दाखवली आहे.>> सोशिक असली म्हणून काय झालं? काही self respect आहे की नाही? असल्या (कांगावा करणाऱ्या) सुनेकडून काहीही ऐकून घेणं म्हणजे काय?:राग:

काही self respect आहे की नाही? असल्या (कांगावा करणाऱ्या) सुनेकडून काहीही ऐकून घेणं म्हणजे काय?राग हेच तर जमत नाही तिला..म्ह्णून मोजो तिला नेहमी म्ह्णतात,तु निशाला काही बोलत नाही,लाडावून ठीवल..

कालचा भाग गंडला होता.. काय तो गवरी चा ड्रेस..
नेह्मी प्रमाणे, मुलगा सो सो च असण.,लगेच आई वडिलाना मुलगी पसंत असणं,मुलीने गाणं म्हणणं...
ते ही ईतकं बकवास..! ती ईतक्या जोरात गात होती की शेजारी पण एकू गेलं..!:हहगलो:

नेह्मी प्रमाणे, मुलगा सो सो च असण.>>> मुलगा सो सो नाही दाखवला तर गौरीचे शेवटी शिवशीच लग्न कसे होईल?

काळ बदलला तरी वधूपरीक्षेची जुनी रीत कायमची आहे. "मुली, गाणे म्हणून दाखव." अरे, सुनेला लग्नानन्तर 'सारेगामापा' मध्ये पाठवायचा विचार आहे का?

आणि तो मुलगा गौरीचे गाणे ऐकतच नव्हता, सतत आपला फोन बडवत होता. Maybe, फेसबुक वर अपडेट टाकत होता वाटत," listening the song of my would-be-wife." Lol मोजोला राग कसा नाही आला त्याचा?

गौरी बरोबर शिव पण इरिटेट करायला लागला आता. काय ते गौरी च्या मागे जातो, त्या मुलाला काहीही बोलतो.
काहीच्या काही..राधिका बरी..सांभाळून तरी घेते.
गौरी नेहमी प्रमाणे मख्ख..काहीच भाव नाहीत चेहर्यावर..शिव बरोबर प्रेमात होती तेव्हा पण आणि आता हा मुलगा काही ही बोलतो तरी तेच..किती न्यूट्रल..

गौरीच्या चेहर्यावर भाव नाहित त्यामुळे शिवचे तिच्या मागे जाणे जस्टिफाय होत नाही..

तीने जरा जरी प्रेमाने पाहिलं असत तर असं वाटलं असत की दोघांची किती तगमग होत आहे ई.

आता गौरी तर खुशाल बिन्धास्त वाटत आहे..

असं वाटत म्हणतेय की टाय्टल साँग बघितल ना तुम्ही हा सगळा टाईमपास चालु आहे माझ लग्न तर शिव शीच होणार

तो मुलगा गौरीच्या बाबतीत एक मात्र खरे बोलला.

hotel मध्ये जेवण मागवायच्या वेळी, "मला वाटलच, तु बाबाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ ठरवते." असे काहीतरी म्हणाला होता तो.

चान्गली लाज काढली त्याने गौरीची.

ही मालिका इतकी टुकार आहे की बघणे कधीच सोडून दिले होते. बर्‍यापैकी खुलवता येण्यासारखे कथानक, मोजो, शुगो, आजी, अम्मा, शिव सारखे चांगले अभिनेते असतानाही कसा बट्ट्याबोळ करता येतो ते या मालिकेने दाखवून दिले. आणि याचे सगळे खापर दिग्दर्शक, संवाद लेखक आणि गवारीच्या माथी!

तर या मालिकेची आठवण यायचे कारण म्हणजे काल नविन मालिकेची झलक बघितली. बघितल्या बघितल्या मनात म्हटले:

संपव या शी!!!! रीयली ला
भवानी आई रोडगा वाहीन तुला

कादिप बंद होत नसावी! सध्या हीच मालिका त्यातल्या त्यात बरी वाटते आहे (खुलता कळी किंवा नवर्‍याची बायको वगैरे टाईप्सपेक्षा!). त्यामुळे आय होप की ही संपवणार नसतील..नाहीतर काय बघायचं हा प्रश्नच पडेल!

ही मालिका बघताना 'माझ्या नवर्‍याची दुसरी बायको'ची शेवटची दोन मिनिटं दिसतात. ती बघून अचानक काहे दिया परदेस खूपच चांगली वाटायला लागलीय.

गौरीच्या (आताच्या) लग्नाचं देण्याघेण्यावरून गडबडेल बहुतेक. मुलाकडचे खूपच श्रीमंत आहेत. मुलाची आई प्रेमळ वाटली तरी मुलाला पैशाचा माज आहे. आणि त्याच्या वडिलांनी आमच्या मुलाच्या स्टेटसला साजेसा समारंभ हवा असं म्हटलंय.
यातूनही निभावून गौरीचं त्या मुलाशी लग्न झालेलं दाखवून शिवचा सरस्वतीचंद्र केला तर मजा येईल. Wink

ही मालिका बघताना 'माझ्या नवर्‍याची दुसरी बायको'ची शेवटची दोन मिनिटं दिसतात. ती बघून अचानक काहे दिया परदेस खूपच चांगली वाटायला लागलीय.>> या शिरेलीच्या आधी 'खुलता कळी खुलेना' असते. 'खुकखु' सगळ्यांत बकवास शिरेल आहे सध्या.

यातूनही निभावून गौरीचं त्या मुलाशी लग्न झालेलं दाखवून शिवचा सरस्वतीचंद्र केला तर मजा येईल. >>> जो पर्यंत गवारी आहे तोपर्यंत काही केले तरी मजा येणे शक्य नाही. अभिनेत्री बदलून त्याजागी ती राधिका आली तर खूप फरक पडू शकेल.

झी वाले हा बाफ वाचतात ना? Wink

कालच्या भागात मोजो नी कहर केला निशा ची स्तुती करून.. आणि ती माठ गौरी ऐकत असते फक्त.म्ह्णत पण नाही कि वहिनी ने च तर मला प्रोत्साहन दिलं होतं,पळून जायला पण सांगत होती, शिव च्या अम्माला पण हिने च फोटो पाठवले......
गौरी कडून ही फारच अपेक्षा होईल नाही का..ती बोलली असती,चांगला अभिनय केला असता तर काय..

बर्‍यापैकी खुलवता येण्यासारखे कथानक, मोजो, शुगो, आजी, अम्मा, शिव सारखे चांगले अभिनेते असतानाही कसा बट्ट्याबोळ करता येतो ते या मालिकेने दाखवून दिले. आणि याचे सगळे खापर दिग्दर्शक, संवाद लेखक आणि गवारीच्या माथी! अग्दी अगदी...

भिक्कार हा शब्द कमी पडेल असे कथानक, दरिद्री दिग्दर्शन, काही मठ्ठ कलाकार.... भंगार सिरियल.
आज्जी, मोजो आणि छुट्टन च त्यातल्या त्यात सहन करणेबल आहेत.

मोजोच काल असहनीय झाले..

नीशा आता एकदम छान छान वाटायला लागली त्याना??..
गौरी आणि तीची आई नीशा बद्दल मोजो चांगल बोलतना तर कौतुकाने बघत होत्या..
ठार वेड्या वाटल्या दोघी

आज्जीच नॉर्मल वागत आहेत.. सरळ सरळ जाब विचारणे..मनात असेल ते डायरेक्ट बोलणे ई.

शिव बिचारा गौरीच्या प्रेमात पडला तिथेच चुकला..

शिवपण आता काहीतरी दिसायला लागलाय.अगदी कडकडीत वाटतोय.गौरीच्या मानाने बरी असली तरी अ‍ॅक्टिंगची बोंब आहेच.

भिक्कार हा शब्द कमी पडेल असे कथानक, दरिद्री दिग्दर्शन, काही मठ्ठ कलाकार.... भंगार सिरियल.>>> कथानक चांगले आहे. ते नीट फुलवता आले नाही. थँक्स टू दिग्दर्शक आणि मठ्ठ गवरी.

गौरी आणि तीची आई नीशा बद्दल मोजो चांगल बोलतना तर कौतुकाने बघत होत्या..>>> आनंदी तुला गवरीच्या गवरीच्या नजरेत कौतुक दिसले Uhoh मला तिच्या नजरेच कधीच काही दिसत नाही Proud

मला तर गवरी ड्रगी वाटते फिदीफिदी
भावशून्य फक्त नशा शोधणारे डोळे...>> तसच असेल.
कोणीतरी लिहीलं होतं मागे कि ती थायरॉइडच्या गोळ्या खाऊन काम करते म्हणून..

Pages