काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या मोजो साखरपुडा मोडायची भाषा करणार! आजीनेही कमाल केलेली आहे! मस्त!

आज मोजोना समजलंय की गौरम्मा केवळ शपथ म्हणून आपलं सगळं ऐकतेय. त्यत उद्या अक्षत येऊन्मध्यमवर्गीय कार्यालय निवडलं म्हणून ते रद्द केल्याचं सांगणार आहे. हे ऐकून मोजो भडकणार आहेत. मग शाब्दिक ढिशक्यांव!! हुश्श!
ती गौरम्मा इतकी कशी थंड अभिनय करते!

अरारारारा! काल त्या आजीचे काम करणार्‍या शुभांगी जोशींसमोर गौरी फारच कमी पडत होती. त्यामुळे हल्ली तिला फारसे संवादही नसतात बहुतेक. समोरून अभिनयाचा प्रतिसाद चांगला नसताना इतके चांगले काम करणार्‍या शुभांगी जोशी खर्‍याच ग्रेट!

काय तर म्हणे मला बाबान्ना दुखावून काही करायचे नाही. हा विचार शिवच्या प्रेमात पडायच्या आधी करायचा होता ना हिने. Angry

गंगेत घोडं नहाणार वाटत आहे..
बाबा गौरी ला तुमच्या घरची सुन करुन घ्या म्हणतात तेव्हा शिवच्या चेहर्यावर मस्त भाव आहेत ..आनंदी

पण गौरी खाली कुठेतरी ढिम्म बघत आहे..

गॉड ब्लेस शिव........................

ही गौरी स्थितप्रज्ञाचं उदाहरण आहे.
तिला ना राग, ना लोभ, ना प्रेम , ना दु:ख, ना आनंद.... Happy
शिव ने दहीहंडी फोडली तेव्हा आनंद व्यक्त करायला किती विचित्र नाचली.... ! छे छे...! तिच्या सारख्या जोगतिणीकडून अशी अपेक्षाच नको करायला....!!
आजी इतकं तळमळीने बोलत होती तरी ढिम्म, थंड डोळ्यांनी तिच्या कडे बघत होती व मग ग्लिसरीन चा अश्रू पात! बरं, तिचा आवाजही अनुनासिक, सपाट आहे. त्यातूनही काही भाव व्यक्त करता येत नाहीत.
शिव च्या अंगावर तिने वरुन पाणी ओतले तो सीन परवा रिपीट दाखवला...त्यात तर ती कहर थंड पणे पहाते त्याच्या कडे...जराही मिश्कीलपणा, हास्य नाही !!!

शिव ने दहीहंडी फोडली तेव्हा आनंद व्यक्त करायला किती विचित्र नाचली.... !> मला बघायला मिळेल का हा मनोरंजक भाग नेटवर कुठे? असेल तर लिंक द्या प्लीज. Happy

बाबा गौरी ला तुमच्या घरची सुन करुन घ्या म्हणतात >> हे कधी झाल? आणि कस>>>>>>>>>>>>

पुढिल भागात म्हणुन दाखवलं आहे..
आज दाखवतिल .. शिव अम्मा बाबुजी परत निघाले आहेत .. गेट पाशी त्याना सोडायला सगळे जमले असताना मोजो म्हणतात..

गौरीचा तो डान्स अशक्य कोटीतिल फालतु होता..मला तर बघायला ही ऑकवर्ड झाला..

दहीहंडी वाला एपिसोड पाहुन इच्छुकांनी लाभ घ्यावा..

गवरीचा डॅन्स पाहिला. आणि हंडी किती थरांची होती म्हणे. शिवजी आणि गवरीची नजरानजर अगदी समोरासमोर होते. गौरम्मा २-३ मजले धावत खाली येते काय लॉजिकच नाय

काल तो अक्षत मोजोला एवढ बोलत होता तरीही गौरी जराही ढिम्म हलली नाही. हेच का तिचे बाबावरचे निरतिशय प्रेम? अक्षत च्या जागी शिव असता आणि तो असे काही बोलला असता, तर हि थन्डाक्का रणरागिणी सारखी चवताळली असती त्याच्यावर," अरे, मी तुझ्या अम्मासाठी काय काय नाही केले, माझ्या बाबान्ना असे बोलण्याची तुझी हिम्म्तच कशी काय झाली, कोण समजतोस काय स्वतःला, गेलास खड्डयात वै वै."

इथे मला जान्हवीचा तो सिन आठवतो, त्यात ती अनिल आपटे सुनावते,"माझ्या बाबान्ना बोलण्याचे काहीच काम नाही हा. निघायच इथून." पण कुठे ती जान्हवी, आणि कुठे ही थन्डाक्का.

बर आता तरी सगळ तिच्या मनासारख झालय, मोजोने शिवला accept केलय. तरीही तिच्या चेहर्यावर आन्नद दिसतच नाही कुठे. Uhoh थन्डाक्का ती थन्डाक्काच.

तिला डायरेक्टर काही सांगत नाही काय?

थोडस हलकस हसु शकते ना.. एकदम मख्ख..

ती ओपन होउन अभिनय करत नाही असं वाटत .. चला हवा येउ द्या मधे आली तेव्हा नॉर्मल वाटत होती..

सगळे चांगले कलाकार समोर आहेत त्यामुळे अजुनच दबुन जाते...

Pages