Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते जरा अँबिग्युअसच वाटलं
ते जरा अँबिग्युअसच वाटलं मलाही ! म्हणजे ती उगाच शिवच्या अम्माला असं म्हणताना दाखवलेली ना, "पछतावे की जो आग मे हम जल रहे है, जौनपूरवाली, तुझे भी उस आग मे न जलना पडे ..इसलिये.." और, " हम तो इस घर को बदनामी से बचा रहे है, नासमझ!"..इ इ....पण ते तेव्हढ्या पुरतंच!
आता अचानक "मुंबई वालोंको" शादी के बारे मे बात करने के लिए कसं काय बोलावलंय कुणास ठाऊक!
आणि गौरीचे बाबा इतके बदलले कसे...मिठायांचे करंडे, फळफळावळ.. मागे गणपतीत हेच तर शिवच्या अम्माने पाठविलेलं ना...तर किती तमाशा केला! बाकी शुक्ल लोकांचे जावई एक नं आहेत हं विक्षीप्त पणात!
धन्यवाद. आंबट गोड
धन्यवाद. आंबट गोड
बाकी शुक्ल लोकांचे जावई एक नं
बाकी शुक्ल लोकांचे जावई एक नं आहेत हं विक्षीप्त पणात!>>> सुनाही काही कमी नाहित
हमा आणि गवरी दोघीही
शिवची दादी अचानक तयार कशी
शिवची दादी अचानक तयार कशी झाली लग्नाला? हो ना. काय झालं? >>> तिने गौरीच्या डोळ्यात प्रेम ( थंडपणा) बघितला आणि तयार झाली असे तिने शिवच्या अम्माला सांगितले
बाकी गंगाकिनारी राहाणारे स्वताला स्वर्गात राहिल्यासारखे समजतात हे मी स्वता अनुभवले आहे.
९ ऑक्टोबर ला शिवगौरीचे लग्न
९ ऑक्टोबर ला शिवगौरीचे लग्न आहे. दोन तासांचा स्पेशल एपिसोड!>>> काल सैराट बघताना खालती टिकर वाचल. म्हटल, आ, एवढया लवकर लग्न लागल सुद्दा.:अओ: मला वाटल, आता एक महीना लावतात कि काय लग्न ठरवायला.
गंगा किनारी राहणारे स्वतःला
गंगा किनारी राहणारे स्वतःला विशेष का समजतात बरे..? म्हणजे गंगा नदी ही पवित्र, श्रेष्ठ वगैरे असली तरी त्यात यांचे काय काँट्रिब्युशन? उलट तर ते तिला अस्वच्छ करण्यातच हातभार लावतात! काल छुट्ट्न चाचाचे काम मस्त ! गवरी व तिच्या आईला एकाच कलर चा साड्या का बरे नेसवल्या...? सेम जांभळ्या दिसत होत्या दोघीही!
आणि शुगो ते डोक्यावरुन पदर मधे वगैरे फारच विचित्र व बेकार दिसत होती. उलट शिवचे अम्मा बाबूजी, चाचा वगैरे सगळेच किती सहज अॅक्टींग करताहेत!
गल्ली चुकलेलि
अरे काल उशिरा एक शॉट बघितला.
अरे काल उशिरा एक शॉट बघितला. गौरीचे आई बाबा किती लाचार होऊन समोर बसलेले, १५० बारातींची व्यवस्था उत्तम हॉटेलात करायची वगैरे, पाहुणचार उत्तम व्हायला हवा. गौरी कुठे असते तेव्हा. एखादी मुलगी म्हणेल हे एवढं आम्ही करू शकणार नाही, लग्न साधेपणाने करायचं असेल तर करा नाहीतर मी करणार नाही.
ते मोजो मुंबईत भय्या लोकांना
ते मोजो मुंबईत भय्या लोकांना शिव्या घालायचे , आता त्यांची पार शेळी होउन गेली राव.
गौरी कुठे असते तेव्हा बहूतेक
गौरी कुठे असते तेव्हा बहूतेक त्या सीन मध्ये ती नाही.
गौरी कुठे असते तेव्हा बहूतेक
गौरी कुठे असते तेव्हा बहूतेक त्या सीन मध्ये ती नाही.>>> त्या वेळी शिव गौरीला घर दाखवायला घेऊन जातो. सोबत वहीनीही असते.
रच्याकने, ती वहिनीसुद्दा निशाची बहीणच निघाली वागण्यात.
आणि शुगो ते डोक्यावरुन पदर
आणि शुगो ते डोक्यावरुन पदर मधे वगैरे फारच विचित्र व बेकार दिसत होती. उलट शिवचे अम्मा बाबूजी, चाचा वगैरे सगळेच किती सहज अॅक्टींग करताहेत! >> +१००
गौरीला एकटीला बनारस लाच ठेवून
गौरीला एकटीला बनारस लाच ठेवून सावंतांची जोडी मुंबईत परतली की काय ........?
इकडे मुंबईत आजीबाई आणि इतर लिस्ट वाचताना आणि पैशाची जुळवाजुळव कशी घालायची याची सांगड घालत असतांनाचा सीन संपल्यानंतर ,
गौरी शिव बरोबर बनारस फिरतांना दाखवलीय आजच्या भागात ......
तेच ते घिसे पिटे डायलॉग बोलतांना .....तू आहे म्हणून माझा विश्वास आहे आणि लगेच तो गोरी नाही रे गौरी ,
गोरी हो या गौरी है तो शिव की नवरी वगैरे बोलतांना .......
फालतु पणाचा
फालतु पणाचा कहर...
त्यांच्याकडे दहा लाख सुद्धा नसणे, निशासारख्या लुच्च्या
सूनेवर परत विश्वास ठेवून कर्ज काढायला सांगणे,
अडाणी असल्या प्रमाणे न वाचता सह्या करणे मोजोने...
गौरीला एकटीला बनारस लाच ठेवून
गौरीला एकटीला बनारस लाच ठेवून सावंतांची जोडी मुंबईत परतली की काय ........? >>>> नाही ते तिला आठवत असतं.
तो गोरी गवरी सीन झाल्यावर ती तो आठवून स्वतःला काहीतरीच टपली मारताना दाखवलीये
एकंदर मराठी मालिकांमधल्या
एकंदर मराठी मालिकांमधल्या पात्रांना सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट्स, कर्ज याबद्दल काहीही माहीत नसतं.
इतकी वर्षं नोकर्या आणि टुकीने संसार करून यांची सेव्हिंग १० लाखसुद्धा नाही.
इथे बँकावाले लोन घ्या लोन घ्या म्हणून आमच्या मागे लागतात. इथे सरकारी ऑफिसरला बँक कर्ज नाकारते.
वर ज्या मुलीच्या लग्नासाठी हे सगळं चाललंय, तिच्यापासून हे लपवायचं. कारण ती पाळण्यात असून तिचा बालविवाह होत असल्याने, तिला यातले काहीही कळणार नाही.
बाकी अक्षतच्या वेळी आम्ही मध्यमवरर्गीय, आमच्या बजेटमध्ये बसेल इतकंच करू, चालत असेल तर घ्या नाहीतर फुटा, असं म्हणणारे सावंत नुसना शिव शेजारीच राहणार आहे म्हणून सगळ्या गोष्टी आनंदाने करायला तयार झालेत.
आता आज गौरीला कर्ज प्रकरण कळतंय का, की पुन्हा त्यावर सारवासारव?
निशाला सह्या देऊन मालिकेत आणखी एक अननेसेसरी ट्रॅक वाढवायची सोय केलीय.
मला उगाच असं वाटत होतं कि ही
मला उगाच असं वाटत होतं कि ही सगळी नौटंकी करून शेवटी रेजिस्टर पद्धतीने लग्न करतील....शिव आणि गौरी तसं पटवतील वगैरे वगैरे ....२ तासाचा भाग फक्त लग्नाचा....अरेरे .....नशिब अचानक लागलेल्या लॉटरी चं टिकिट दाखवल नाही...
हे सगळं बरोबर आहे...मला फक्त
हे सगळं बरोबर आहे...मला फक्त एव्हढंच म्हणायचंय की त्यांना १० लाख अधिकचे हवे आहेत. त्यांच्या कडे ७-८ लाख आहेत......
शिव च्या घरच्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करायला.
रिटायरमेंटला आलेल्या, मालकीचं
रिटायरमेंटला आलेल्या, मालकीचं घर असलेल्या, दोन कमावती मुलं, कमावती बायको, कमावती सासू असलेल्या सरकारी अधिकार्याचं सेव्हिंग (तेही नवराबायकोचं मिळून) ८-१० लाख? ते काही उधळपट्टीही करत नाहीत.
अर्थात मराठी मालिकांच्या निर्मात्यांच्या बजेटमध्ये तेवढंच बसतं.
तो भामटा विकी यांचं सगळं सेव्हिंग हडप करून पळाला असेल तर माहीत नाही. तेव्हा मी ही मालिका पाहत नव्हतो.
त्या सोसायटीच्या वॉचमेनने स्वतःच्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चाचे आकडे ऐकवले होते. तेव्हा सावंत म्हणे की हा चौबे ते शुक्ल. दोघांचं वायलं वायलं.
अर्थात मजनूचाचा कृष्ण बनून सारथ्य करणार असल्याने लग्न नीट पार पडेल.
काय वाट्टेल ते! इतकं सगळं
काय वाट्टेल ते! इतकं सगळं घडलं? मी गेले काही दिवस पाहिलीच नाही आहे ही सिरियल. मोजोंचं पात्र पार गंडवलं की.
आणि ती शिव ची आज्जी शिवच्या आईला सारखं जॉनपुर्वाली का म्हणते?
जौनपूर हे एक गाव आहे उत्तर
जौनपूर हे एक गाव आहे उत्तर प्रदेश मधलं....... तिथली!
काल नची बरोबर बोलला. त्याच्या
काल नची बरोबर बोलला. त्याच्या बाबतीत तत्वाचा बागुलबुवा करणारे सावंत इथे सगळी तत्व गुंडाळून ठेवतात.
@अंजली_१२ तो गोरी गवरी सीन
@अंजली_१२
तो गोरी गवरी सीन झाल्यावर ती तो आठवून स्वतःला काहीतरीच टपली मारताना दाखवलीये >>>>>>>
अच्छा अच्छा नेमका माझा तो "टपलीचा" सीन स्किप झाला बहुतेक


काय करणार ? नजर अगदी खिळवून ठेवेल असलं कथानकच नाहीये
सगळा बाळ्बोधपणा चाललाय .
ठीके नताशा..........तो नचि
ठीके नताशा..........तो नचि तरी कोणता धड वाणाचा आहे? निशाला म्हणे, " माझा तुझ्या वर स्वतः पेक्षा जास्त विश्वासे!"

मला उगाच असं वाटत होतं कि ही
मला उगाच असं वाटत होतं कि ही सगळी नौटंकी करून शेवटी रेजिस्टर पद्धतीने लग्न करतील....शिव आणि गौरी तसं पटवतील वगैरे वगैरे ....२ तासाचा भाग फक्त लग्नाचा..>>>> रजिस्टर लग्नाचा दोन तासाचा भाग?
शिव च्या घरच्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करायला.>>>> actually, शिवच्या दादीने काहीच जास्त मागवलेल नसत. ती अम्मा आधीची लिस्ट बदलते आणि ओरिजनल लिस्टमध्ये अधिकच्या वस्तून्ची भर घालते.
नशिब अचानक लागलेल्या लॉटरी चं
नशिब अचानक लागलेल्या लॉटरी चं टिकिट दाखवल नाही...>>>>
जौनपूर हे एक गाव आहे उत्तर प्रदेश मधलं....... तिथली!>>> दादी गौरीला मुम्बईवाली म्हणते.
मुलीच्या घरच्यांचा असा छळ्वाद
मुलीच्या घरच्यांचा असा छळ्वाद चाललेला बघून कसेतरीच वाटते.
मराठीमालिका अजुनही हुंडा,
मराठीमालिका अजुनही हुंडा, सासुरवास, छळवाद, कारस्थानं यातुन बाहेर पडत नाहियेत, लोकांना तेच पहायला आवडतं अशी समजूत तर नसेल ना झाली त्यांची??
पावर ऑफ अटर्नी दिल्यावर काल
पावर ऑफ अटर्नी दिल्यावर काल कसल्या सह्या केल्या मोजोने? निशा सारखी अशी सरळ सरळ लुटणारी माणसं आजुबाजुला असताना पुन्हा पुन्हा त्याच त्या चुका करणारे सावंत कुटुंबिय धन्य.
बाकी ती निशा आणि जौनपुर्र्वाली बोलताना कुण्णीच कस ऐकत नाही. मला मालिकांच कायम कौतुक वाटत, चोरुन/नकळत्/सहज ऐकायला फक्त नेगेटीव पात्रांनाच कस काय येतं बुवा ??
मजनूचाचा ऐकतात
मजनूचाचा ऐकतात आजकाल.
बाकीच्यांनी त्या तीन सुप्रसिद्ध माकडांचा आदर्श ठेवलाय. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो
Pages