काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडील-लेकीचं अपेक्षित मायेचं घट्ट नातं कधी दिसलच नाही. >> तरिही झी वाल्यांना पोरीच कशा बापाच्या लाडक्या असतात हे दाखवायचा सोस किती? Uhoh
आधी जी जानी, मग ती शरद पोंक्षे ची सिरियल ( बघा नाव पण आठवत नाही.) मग कारेदु.. आता ही बया..

उर्मी व तिचे बाबा, जानी व तिचे बा॑बा, स्वानंदी व तिचे बाबा...किती छान घट्ट नाती दाखविली आहेत ! (आणि हो, इव्हन बानू व अजामेळ पण! Happy )
त्या मानाने, ग व री व मोजो मधले नाते हे भीती व धाक यांवर आधारलेले वाटत्ये. ते मेनली गौरीच्या निर्वीकार, थंड अभिनयामुळे व ढिसाळ पटकथा लेखनामुळे असावे.
(दक्षिणा, ती सिरीयल असे हे कन्यादान होती! :-))

काल गौरी जेवण झाल्यावर किचनमध्ये शुगोला टोमणे मारत होते का नक्की काय करत होती काहीच कळले नाही. प्रेमभंग झाल्यावर ते दु:ख सहन न होऊन काही लोक वेडसर वागू लागतात तसे वाटले मला तिचे बोलणे.

आणि काय तो सूर लावला होता 'आई बापाची लाडाची लेक' गातांना.. अरेरेरे..
आणि नचिपण उगाच जबडा हलवुन हलवुन 'अवघे पाऊणशे वयमान' बोर गात होता. बेसूर गायन स्पर्धा होती अगदी.

पियू Rofl
चुकला माझा एपिसोड कालचा.. आता यु ट्युब वर पाहिन.

दहिहंडीच्या दिवशी पण तिचा नाच चुकला होता माझा.. नंतर पाहिला... का? का? का?
:नाक वेडंवाकडं करणारी बाहुली:

आणि नचिपण उगाच जबडा हलवुन हलवुन 'अवघे पाऊणशे वयमान' बोर गात होता. बेसूर गायन स्पर्धा होती अगदी.>>> होना पण "दगडा पेक्षा वीट मऊ" तसे "गवरी पेक्षा नची बरा" अशी परिस्थिती होती.

काय पिळवणूक चालू आहे या शिरेलीत! गवरीचो बापूस आणि शीवची हम्मा इतके हिस्टेरिकल वागत आहेत की जणू काय यांची पोरं नव्हे तर बायको/नवरा कोणाबरोबर पळून चाललेत. पझेसिव्ह असण्याचा किती तो मूर्ख अतिरेक! आणि गवरीचे काही ड्वायलॉक बघताना हिला शीवच्या तडाख्यातून सुटका झाल्याचा आनंद झालाय असं वाटलं. एकदा काय म्हणे, "आता शीव बाबांसोबत बोलेल आणि मग सगळं पहिल्यासारखं होईल." प्रेम काय असं असतं का? आणि बिचारा तो शीव सगळं का सहन करतो? त्या वहिनीचे आकांडतांडव बघून तर मरणाचा वैताग आलाय. आता अधून मधून पण बघू नये असं वाटायला लागलंय.

काल मी जरा उशीरा लावला होता एपिसोड. आधी असे वाटले की सावन्त family ला वेडा-बिडा चा झटका आलाय की काय दु: खाच्या भरात, अचानक सगळे गाणी गाऊ लागले. गौरीने शपथ काय घेतली, सगळे तिच्याशी गोड वागायला लागले.

शिवची अम्मा काल बरोबर बोलत होती. बापलेक दोन्ही मिळून शिवच्या जखमेवर मीठ चोळतायत मोठया आवा जात गाणी गाऊन. खरतर शिवला राग यायला ह्वा होता की, इकडे माझे काय हाल होताहेत याची गौरीला काहीच पडलेली नाही. ती मात्र मजेत आहे. उगाच नाही त्याने गौरीला टोमणा मारला," उगाच दु:खात असण्याचे नाटक का करतेस? काल तर चान्गली खुश होतीस तु, गाणी काय गात होतीस."

हिला शीवच्या तडाख्यातून सुटका झाल्याचा आनंद झालाय असं वाटलं. >>> उगाच नाही ती काल गाणी म्हणत होती मोठया आवाजात. आनंदच प्रकट करत होती ती.

सावंत कुटुंब आणि शिवाम्मा २०१६ सालातले वाटतच नाहीत.६०/७० सालातली विचारसरणी आहे. गौरीच कुटुंब तर मुंब ईतल असुनपण इतक मागासलेले विचार कसे?

>>>>आणि काय ते गौरीला घास भरवणं! प्रेमाचा दुरून सुद्धा संबंध वाटत नाही. निर्विकार गौरी कायम भेदरलेली, आणि कस्ली लाडकी लेक. वडील-लेकीचं अपेक्षित मायेचं घट्ट नातं कधी दिसलच नाही.<<<<<<
+॑१००००१ टक्का.

काहीच नातं किंवा भाव जाणवत नाही था गौरी आणि मधूसुदनात, दोघेही अलिप्तच आहेतट्त्या भावना दाखवण्यात.
रोज घास भरवणं कहर आहे प्रकार.

>>>>>काल गौरी जेवण झाल्यावर किचनमध्ये शुगोला टोमणे मारत होते का नक्की काय करत होती काहीच कळले नाही. प्रेमभंग झाल्यावर ते दु:ख सहन न होऊन काही लोक वेडसर वागू लागतात तसे वाटले मला तिचे बोलणे.
आणि काय तो सूर लावला होता 'आई बापाची लाडाची लेक' गातांना.. अरेरेरे.
आणि नचिपण उगाच जबडा हलवुन हलवुन 'अवघे पाऊणशे वयमान' बोर गात होता. बेसूर गायन स्पर्धा होती अगदी.<<<< Rofl

मला वाटले गौरीला अअ‍ॅट्क आला, काय ते जोरात ओरडून बोलणं... आणि कारल्याची भाजी २५ वर्षात गधडीला आवडली नाही आणि अचानक आज घास खायला तोंड पुढे. आणि आईने काय आजच जेवण केलं की काय गौरी झाल्यापासून की, आजच कळले हिला की आई आणि आजीच्या जेवणाची चव सारखीच लागते?

दळीद्री आहे क्रीयेटीवीटी मध्ये तो दिग्दर्शक.

आप सफर से आयी हैं | आप को छू लिया तो हमें फिर नहाना पडेगा|

(मुंबई की) सोसायटीवालों को कभी तो शुद्ध घी की मिठाई नसीब हो|

आप सफर से आयी हैं | आप को छू लिया तो हमें फिर नहाना पडेगा|.हे खरच काही च्या काही होतं..

आजी आल्यावर जास्त च ईंटरफियर करायला लागल्या..!
आणि गौरी नेहमीप्रमाणे मख्ख..

पण कोंडी फोडायचं काम आजीशिवाय आणखी कोण करणार? मला काल त्या अभिनेत्रीचं काम खूप आवडलं. अनेक दिवसांचा मालिकेपासूनचा दुरावा संपल्याचाच आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होत्या. शिवाय निशा आणि हम्माला काउंटर करणं बाकी कोणाला जमणार नाही.
पण सरूने, डायरेक्ट तुला परत मामाकडे सोडेन हे म्हटलेलं आणि आजीने ते खपवून घेतलेलं खटकलं.

आज्जीचं मराठीमिश्रीत हिंदी आवडतय. माझी आजी सुद्धा दुधवाल्या भय्याशी असंच मराठी बोलायची.

मोजो ला कोणीतरी (म्हणजे हम्मानेच) सांगायला हवं होतं की हा तुमच्या घरचा गणपती नाहिये, अख्ख्या सोसायटीचा आहे, तेंव्हा नैवेद्य काय ठेवायचा आणि किती ठेवायचा ते तुम्ही कोण ठरवणार?

सोसायटीने मिळूनच ठरवलंय ओ. मंग्याच्या आईशिवाय आणखी कोणालाही ते लाडू नको होते.

आणि हम्मा नैवेद्यापेक्षा तिथे अन्न दान करायला आली होती. तिने हैसियत हा शब्द वापरला. वर माझ्यामुळे तुम्हाला शुद्ध घी की मिठाई खायला मिळतेय असंही सुनावलेलं.

मला तरी मो जो चा स्टँड आवडला. संपुर्ण सोसायटी चे ठरलेले नियम मोडण्याचा हम्माला काय अधिकार? Uhoh हैसियत असली म्हणून कुठेही घुसता येतं हा समज चुकिचा आहे. शिवाय अगदी जर नैवेद्य किंवा प्रसाद द्यायचाच असेल तर सोसायटीच्या लोकांशी किंवा गणपती उत्सवाच्या प्र्मुखाला विचारायला नको? Uhoh

बाकी गवरी संपुर्ण भंजाळल्यागत दिसते. आणि ती निशा कसली ढोंगी आहे..

Yes I agree with Bharat. Haisiat dakhvane is wrong. Small town mentality.

काल आजीचे अ‍ॅक्टिंग एकदम टॉप क्लास. निशा एकदम चॅप्टर बाई आहे....
आणि ते हिंदी ग्रेट सुप्पर. मी दोनदा पाहिला एपिसोड तिच्या साठी. आणि आईच्या बांगड्या मस्त काढून

घेते. मला पण अश्शीच आई हवी. गौरी शिवचे काही गोडवा, आपले तुपले असे काही दिसतच नाही.
वर बघायला आले आहेत तरी ही ढिम्मच.

Pages