रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सुषमा ज्या पध्दतीने माधवच्या डोक्यावरून हात फिरवत होती ते मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. सावत्र झाला तरी तो तिचा भाऊ आहे.>>>> अश्या वेळी निलिमा कुठे गायब झाली?:अओ:

आता मला माधवचीच दया यायला लागलीय.. सगळे त्याच्या जीवावर उठलेत.>>>> निलिमा सुद्दा? :अरेरे

'बेस्ट कॉमेडी अ‍ॅवार्ड'ची हमखास मानकरी ठरणार आतां ही सिरीयल !!!
'बेस्ट व्हिलन' सारखं 'बेस्ट मर्डरर' असं अ‍ॅवार्डही सुरूं होणार आहे; पहिल्या वर्षीचीं सर्व नॉमिनेशन्स या सिरीयलमधल्या भुमिकांसाठीच आहेत !!!

तिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय>>>>अरेरे मी मिसला तो भाग.

<<मुडदे पाडायचं म्हणजे काय खोबर्‍याच्या वड्या पाडायच्या आहेत? >> आमच्या घरात पण अशीच कॉमेंट . बाजारातली भाजी घेऊन कापा नाहीतर चिरा तशी ती यमुना सांगते नाथाला Happy

शनिवारच्या भागात अभिराम नेन्यांकडे शेवंताच्या जमिनीचे पेपर्स मागतो. मुळात ते पेपर्स आधी यांच्याकडेच असतात ना? ते पेपर्स बघितल्यावरच यांना कळतं ना की रस्त्याकडेची जमिन शेवंताच्या नावावर आहे ते.. मग आता ते पेपर्स नेन्यांकडे कसे गेले?? Uhoh

नाईकांकडे कै लिंबांचं झाड आहे?? तो गणेश उठसूठ खिशातून लिंब काढून जादूटोण्याचे प्रकार करत असतो. सरिता बरी त्याला एवढी लिंब फुकट घालवायला देते.

काय गों निधी! ह्ये काय बोलतां! अगो तां गणेशा, सरीताचो लाडको झील असां ना, मग? तां त्या लिंबाचो लोणचो घालुन दे, नायतर पिळुक सरबत करां दे. सरीताको काय फरक पडणा नाय !

अगो लोणचां घातलान काय नायतर सरबत केलान काय तर ती फुकट तरी नाय जावची. ह्यो त्येच्यावर हळद पिंजर टाकून त्येच्यात गंजलेलो खिळो खुपसतां त्याना बाकी कोणी सरबत करुचा म्हंटला तरी करु शकणां नाय. ५ रु. १ लिंबू मिळता बाजारात. बाकी सरिता पैसो पैसो करत असता तर ह्या नाय कळत त्याका. Wink

चार-पांच मुडदे पाडून [ माधवाचो नंबर वरचो आसा त्या चार-पांचात!] दत्ता तां २५० तोळे सोनां मिळवतलोच अशी खात्री आसा सरिताची ! तिकां आतां आठ-धा लिंबां आणि मिरच्ये म्हणजे किस झाडकी पत्ती !!!
[ ही सिरीयल म्हणजे खुळ्यांचो बाजार झालोहा आतां ! Sad ]

भगवती आता नायगो भारतात एवढी स्वस्त.

बाय द वे कोकणात झाड ज्याचं असेल लिंबाचे आणि लिंब येत असतील तर फुकट असतीलना, ह्यांचे असेल मागच्या दारी.

जाब विचारलं पण त्याला नीट उत्तर मिळालं नाहीच. तो ठोकळीचा आर्चिस गाडीत बेशुद्ध पडला होता आणि दत्या ला पण सैरभैर झालं. दत्या चा गणेश काहीतरी करतोय वाटत. ती हावरट सरिता पुढच्या भागात दागिन्यांच्या कपात उघडणार आहे. परत तिला कोणीतरी भयंकर दिसणार काहीतरी. गणेश तिचाच मुलगा लिबांचा काहीतरी करून आला असेल Happy

<< ....आणि लिंब येत असतील तर फुकट असतीलना, ह्यांचे असेल मागच्या दारी.>> झाड असातय पण त्येकां लिंबा तर लागांक होईं ना !! अहो, कोकणात इतको आंबे, काजू, फणस ह्येचो जोरदार सीझन आत्तां येवन गेलो. तरी नाईकांच्या झाडांवर किंवा घरात ह्येच्यातलां दिसलां काय तरी तुमकां ? ह्येंच्या झाडांक कसलींच फळां लागणत नाय, लागलींच तर प्रेतां नाय तर भूतां मात्र लागतत !! Wink

हो भाऊकाका सही, मी बघत नाही ना म्हणून वाटलं, असेल कोपच्यात कुठेतरी लिंबाचे झाड. बाकी जे कोकणात जास्त नसतं ते ह्यांच्या घरात जसं पालक.

निधी, काही नाही, दत्ता छायाला तिच्या खोलीत कोंडतात कारण तिच्या बाहेर (त्या मुलाबरोबर) फिरण्याने कुटूंबाचे नाव बदनाम होईल आणि पुर्वाच्या लग्नाला पण ह्या बदनामीची झळ पोहोचू शकते. गणेश आत्याची बाजू घ्यायचा प्रयत्न करतो पण दत्ता त्यालाही अडवतात. इकडे निलीमा अर्चीसला फोन करून थकते पण तो फोन उचलत नाही, ती काळजीत असते कारण तो सुशमाबरोबर बाहेर गेला असतो. मग अभिराम आणि दत्ता त्याला शोधायला निघतात तेवढ्यात सुशमा येतांना दिसते. ते तिला विचारतात पण ती काही माहिती देऊ शकत नाही. इकडे गणेश शीळेसमोर बसून त्याच्या वडिलांना वश का काय ते करण्याकरिता मंत्र तंत्र म्हणत/करत असतो.
निलीमा माधवंना अर्चिसविषयी सांगते. इकडे अभिराम व दत्तांंना अर्चिस त्याच्या गाडीत बेशूद्ध झालेला दिसतो. ते त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला जागे करतात, तो सांगतो की कसा तो सुशमाला सोडल्यावर निघणार तेवढ्यात त्याला खूप लाल मुंग्या दिसल्या वगैरे. इकडे दत्तांंना गणेशच्या मंत्र तंत्रामुळे चक्कर येते. अभिराम त्याची बाईक तशीच सोडून त्या दोघांना कारने घरी घेऊन येतो.
माई, सरिता आणि पुर्वा खाली असतात, आणि वर छाया तिच्या खोलीचे दार वाजवत असते, पुर्वा तिच्या खोलीकडे जायला निघते पण सरिता तिला अडवते. इकडे गुजराथी शेठ निलीमाला सारखा फोन करत असतात. माधव निलीमाला त्या विषयी विचारतात तर ती सांगते की त्यांंना आपली जमिन एका प्रोजेक्टकरिता हवी आहे.

चक्क भगवती रात्रीस खेळ चालेच्या धाग्यावर चुकल्यात!
धाग्यालाही कोणी झपाटले कि काय?

मी ही सिरियल बघायचं सोडलंय. आत्तापर्यंतच्या एपिसोडमधले प्रश्न (९०+) इथे पोस्ट करू का? त्यांची उत्तरं मिळतील असं काही वाटत नाही. कोणाला ती लिस्ट पुढे चालू ठेवायची असेल तर......

आत्तापर्यंतच्या एपिसोडमधले प्रश्न (९०+) इथे पोस्ट करू का? >>> नविन धागा काढ. मालिकेपेक्षा जोरात पळेल तो धागा ............ Happy

Happy

बरोबर तीन महिन्यांनी हि सिरियल्चा एक भाग पाहिला.

आणि बंद केला.

काही गोष्टी त्याच त्याच आहेत. अभिरामा आणि देविका... वगैरे.

नीलिमाने केस कापले? आणि जाडी सुद्धा कमी केलीय( किंवा झालीय? गावी गेलो की माणूस बारीक होतो , हा आमचा समज होता/आहे)

ती पँट घालून फिरत होती. माईंका चाल्ता ता? का माई सुधारल्या?

माई कसल्या सुधारल्या?, त्येंच्यात आता अण्णा घुसलेत. डब्बल प्रयोग चाल्लाय. काल त्यांनी सरीताला दागिने काढतांना रंगबिरंगी हाताने पकडले, पण हाय राम! त्या तिला शेवंता समजल्यात. शेवंताने लुबाडल्यापासुन त्यांना एवढे फ्रस्ट्रेशन आलेय, की ज्याला त्याला शेवंती समजून बोलत असतात. सरीताला त्या हात धरुन घराबाहेर काढतात, बराच धुमाकुळ झाला. मग शेवटी ठोकळीने दत्तोबाला सांगीतले की मागच्या दाराने जा आणी तिला सोडव.( कारण माई सरीताबरोबर बाहेर येऊन बाहेरचे दार बाहेरुन लावतात.) मग दत्ता अखेर सरीताला सोडवतो आणी नाथाला दार उघडायला लावतो. सरीता रडुन घर डोक्यावर घेते.

अण्णा आतुन येतात त्यावेळी बेरीनाना बडबडत असतात, मला वाटले अण्णा बेरी नानांना झपाटुन त्यांच्यात घुसुन एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावतील पण तसे काही झाले नाही. माई अण्णांशी बोलतात तर ते म्हणतात झाले ते चांगले नाही झाले पण सरीताने घरासाठी खूप केलेय, त्यामुळे यावेळी तू तिला माफ कर. माई अण्णांशी बोलत असतांना नाथा आणी यमुना घाबरुन बघत असतात. तिकडे देविका ताई अंधारात फिरत विचार करत असतात की घरात खरच अडीचशे तोळे सोने आहे का?

उद्याच्या भागात ठोकळी दत्तीला समजावताना दाखवलीय, नेने वकील गुरुवांना सांगतात की बाकीची जमीन मी लुबाडणार. आणी एक म्हसोबा नाईकांच्या घरी येतांना दाखवलाय.

१०० एपिसोड पार केलेल्या एका अतिशय लोकप्रिय मालिकेचे लेखक-अभिनेते यांचा फोटू व मुलाखत आजच्या 'आफ्टरनून' या मुंबईच्या सायंदैनिकात आली आहे. कांहीं नाटकं, शॉर्ट फिल्म्स व नंतर सिनेमा अशा त्यांच्या भावी योजना असल्याचं व त्यासाठीच्या त्यांच्या स्क्रिप्टस तयार असल्याचंही श्री. प्रल्हाद कुडतरकर [ उर्फ 'पांडू'] यानी सांगितलं !!!

आधीं 'आमच्या कोकणातली सिरीयल ' म्हणान नाच नाच नाचलास; आणि आतां
रात्रीच्ये साडे धा वाजले रे वाजले कीं हंय उशींत डोक्यां खुपसून अशे रवतास !!
sleeping.JPG

Rofl

Pages