रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो भगवती. तो विगच वाटतोय. पहिल्या वेळेस ( परत आल्यावर ) तर अगदी डोक्यावर हलकेच ठेवल्यासारखा वाटला.

<< तिचे ते खरे केस नाहीयेत.>> तरीच ती रागावल्याचां नाटक करून माधवाक जवळ येवक देणा नाय; वगीच 'विग'चां भांडा फुटांक नको !! Wink

ही संपायची चिन्ह दिसेनात, मी नाही बघत. ठरवलंय की संपायला आली की बघू शेवटचे दोन दिवस, पण डी 3 सुरु होण्याची शक्यता काही दिसत नाहीये. उगाच पेपरला हूल उठली होती का?

झी चं अजून एक channel सुरु होणार आहे झी यंग नाव (सोर्स- माझी भाची) असेल बहुतेक तिथे कदाचित दाखवणार असतील डी 3 पण वेळ आहे अजून.

आज गाडीला आग कशी लागलय ? >>>> अशी अचानक गाडीला आग लागू शकते, आपण नाही का newspaper मध्ये वाचत अधुन-मधुन की अमक्या गाडीने अचानक पेट घेतला.

हो भगवती. तो विगच वाटतोय. पहिल्या वेळेस ( परत आल्यावर ) तर अगदी डोक्यावर हलकेच ठेवल्यासारखा वाटला.>>>> Rofl

माधव (घाबरून) - अगं निलीमा, गाडीला आग लागली. खूप नुकसान झाले.
निलीमा - इनफ माधव, गाडीला आग लागू शकते ना, ही तुझी अंधश्रद्धा आहे. सो इनफ.

भगवती Lol ठोकळ्याचे नवीन नामकरण इनफ माधव.

ठोकळ्यो:- अगं निलीमा, तुला माहीत नाही इथे काय काय घडलं ते.:अरेरे:

ठोकळी:- इनफ माधव, आता मला तेच तेच सांगु नकोस की सुषमा तुझ्याशी बोलायला आली होती.

ठोकळ्यो:- तुला कसं माहीत?

ठोकळी:- कारण मीच शेवंता आहे.Vampire Mask

सरीता:- काय वो, तां माई,छाया, सुसल्या, माधव भावजी, गणेशा, अभिराम भावजी सगळे खयं गेले असां? यमुना, नाथा आणी पांडु पण दिसुक नाय तां?

दत्ता:- सरीता तू गप रवं!

सरीता:- माका कित्यांक गप रवायला सांगता? हयंसर कोणी दिसुक नाय म्हणून इचारला.

दत्ता:- सरीता, माका अण्णाCigar दिसले!Scared and sweating

सरीता:- अगे माजे बाय!In Disbelief तरीच माझे दोन्ही डोळे फडफडताहा! आता काय करायचे?

दत्ता:- आता काय नाय, पांडु लेखक हाय ना, तोच बगील.

पांडु:- काय तां? मी लेखक? इसरलयं!Wondering

Rofl

ती ठोकळी आधीच काही बरी नाहीये आणि कापलेल्या अवतारात तर प्रचंड भयाण दिसते. जाड जुड पण आहे. काय ते केस कापलेले आणि तसाही तिला चिडकाच रोल आहे त्यामुळे न हसणारी .माधवच्या अंगावर सारखी ओरडणारी . त्याला डोळ्यांनी जरबेत ठेवणारी :).

निलिमाचा नवा लुक अज्जाबात आवडला नाय.

सरिता नुसता भोचक आसा... तुका काय करुचा त्या माणसांचा निलिमाकडे काय काम आसा ता. Angry

गाडीक आग लागल्यार तो ड्रायव्हर आग विझवूसाठी गाडीवर माती उडवी होतो ता बघून हसून हसून पोटात गोळो इलो माझ्या. Rofl

तसाही तिला चिडकाच रोल आहे त्यामुळे न हसणारी .माधवच्या अंगावर सारखी ओरडणारी . त्याला डोळ्यांनी जरबेत ठेवणारी>>>> ती गौरी ची मोठी बहीण आहे.

रश्मी तै!!! मस्तच!!
निलिमाचा नवा लुक अज्जाबात आवडला नाय. > +१ कै च्या कैच लुक
ती ठोकळी आधीच काही बरी नाहीये आणि कापलेल्या अवतारात तर प्रचंड भयाण दिसते. जाड जुड पण आहे. काय ते केस कापलेले आणि तसाही तिला चिडकाच रोल आहे त्यामुळे न हसणारी .माधवच्या अंगावर सारखी ओरडणारी . त्याला डोळ्यांनी जरबेत ठेवणारी स्मित. >>> सहमत

<< निलिमाचा नवा लुक अज्जाबात आवडला नाय. >> "तुं वैनीच्या ताटाखालचां मांजर झालहस ", असां दत्ता बोललो ना माधवाक परवां ? आतां बायलेचो नविन लुक बघल्यार माधव खुशाल दत्ताक इचारूं शकता " बोल, आतां मांजर कोणाक म्हणशीत, माकां कीं तिकां ?' !!! Wink

भाऊकाका.. Biggrin खराच निलिमा मांजरासारखी दिसता. तरीपण काल दत्ता माधवाक बायकोच्या ताटाखालचा मांजर म्हणालोच.

काल दत्तादत्तीचं चिडणं पटलंच. ठोकळी मुद्दाम घरातल्यांनीच हे सगळं मुद्दाम केल्यासारखा त्यांच्यावर संशय घेते. लॅपटाॅपच्या वेळेस पण पूर्वावर संशय घेतला तो अर्चिसवर का नाही घेतला..

ठोकळी प्रत्येक वेळेस हे कोणीतरी मुद्दाम केलंय, मी शोधून काढेनच म्हणते. शोधण्याचा प्रयत्न तर करत नाही. प्रत्येक घटनेला सायंटिफिक कारण असतं म्हणते तर अजूनपर्यंत एकाही घटनेमागचं योग्य कारण पण देता आलं नाहीये तिला. Angry

मिसेस इनफ उर्फ ठोकळी खरच डोक्यावर पडलेली आहे. आपल्याच लोकांवर संशय घेते. स्वतःला फार शहाणी समजून दुसर्‍याला अडाणी आणी तुच्छ लेखते. हिच कॅरेक्टर खरच गंडलय. पांडु कारेदुचा लेखक आहे हे कळल्यावर हे लक्षात आले की त्याला निलीमाचे पात्र खुलवताच नाही आले. अतीशय एकसूरी वागते ती. या लोकांचे संवाद शोले पेक्षा लोकप्रिय झालेत.

१- इनफ माधव,

२- ह्ये काय असां ते भयंकर असां,

३- तू बघताहास ना घरात काय चल्लाहा ते.

४- तुमी बघताव ना घरात काय चल्लाहा ते.

५- ह्याच्या मागे कोण आहे ते मी लवकरच शोधून काढेन.

६- खयं असां?

७- माझ्या वांगडा कोणी बोलतच नाही

Pages