रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ते नेने आहेत, नाईक नाहीत भुत व्हायला. शेवन्ता सुद्दा अर्धी नाईक.>> भुत होंवची मक्तेदारी फक्त नाईकांकडेच आसा ह्यां खरांच ठावक नव्हता. माकां वाटलेलां गुरव इतके नेहमीच बिझी असतत म्हणजे गांवात सगळीकडेच भुतांचां प्रस्थ असतलां !!! Wink

हे काम गुरवकाकांचेच असणार. >>>>>>>> सुषमाचं पण असू शकतं. ती पण लग्नाला गेली नव्हती, घरीच होती. नेने वकील लग्नाला जातो असं सांगून नाईकांच्या घरी गेले असतील आणि तिथे सुसल्याबरोबर काही बाचाबाची झाली असेल.

पण आजच्या भागात २ माणसे ( साध्या वेषातील पोलीस असावेत) नाईकांकडे चौकशीला आलेले दाखवलेत.

ह्या सिरीयलीबाबत कसलेय कयास बांधणां मी केंव्हांच बंद केलंय. सिरीयल बघूंचा केंव्हां बंद करुंया, ह्येचो फक्त कयास सध्यां बांधतंहंय ! Wink

मला तर देविकाच्या आईचा पण संशेव येतो कधी कधी. पण नाईकांचे चुलत नातेवाईक पण असतात ना, ते काही करत असतील तर? कारण त्यांचे नाईकांशी पटत नसल्याचा उल्लेख आलाय.

मला पण कालचा (सोमवारचा) भाग पाहून पांडूवरच संशय आला. वेड पांघरून पेडगावला जाणार्‍यातला असावा तो बहुतेक ............. Happy

आता काल काय झालं??? पावसाच्या धुमाकुळाने लाईटी गुल होतात आमच्याकडे मध्येच. Uhoh

काय झाला बरं? हां, तां अभिराम भावचे लगिन झाले ना तर देविकावैनी घराक इली. घरात छाया ताय लय मोठ्याने दार वाजवुक वरडत होत्या, मंग माधव भावने गणेशाक दार उघडुक सांगीतल्याव. छाया ताय खाली येऊन लय बडबड करत होत्या. त्या आधी काय झाला? हां! नवीन जोडप घराक इल ना, तर नाव घेण्याचो कार्यक्रम झालो. मगे ते घरात इले. नेने वकिलांचो इशय निगालो.

थयं यमुना वहिनी आणी नाथा वाद घालत् होते. यमुना वैनी नाराज होत्या, नाथाभावने ( खडसेंचे नाथा भाऊ नव्हेत) यमुनाक समजावले. मगे घरात देविका वैनी आत पाणी पिऊक गेल्यावर त्येंका ठसको लागल्यो. मग अभिराम भाऊ आणी वैनीने देवाचे दर्शन घेतलाव.

मग मियां घराक इलय आणी दत्ता भाऊक सांगीतला का ते गेले ना, ज्यांचे कागद फाडुन पाऊस पडलो होतो, त्येंच्या घराक मियां गेलो होतो.

आधीचे 100 भाग सीरियल पार गोंधळुन गेली होती, आता पुढचे 100 भाग प्रेक्षक गोंधळून जाणार Wink

प्रज्ञा ताई.. +१ Happy

नेने वकीलांना भलत्याच कोणीतरी मारले असणार. त्यांनी जागेची बरीच लफडी करून ठेवली होती ना.

नेनेवकीलांचा खून झाला त्तेंव्हां छाया व सुसल्या सोडून बाकी सगळे नाईक, पांडू, नाथा व त्याची बायको लग्नाला हजर होते व त्याला सर्व गांवकरी साक्ष होते. मग हे नाईक आपल्यावर आळ येईल म्हणून इतके घाबरतात कां ?

अग मालवणीत मी ला मियां म्हणतात ना! मियां इलय, मियां सांगीतलय असे. निधीने विचारले ना काय झाले, मग मी ते लिहायच्या ऐवजी पांडुने सांगीतलय असे कल्पुन लिहीले >>> अच्छा, असे आहे काय!

भगवती धन्यवाद.:स्मित: पण मला तुझ्यासारखे बारकावे देता येत नाहीत, उलट तूच छान लिहीतेस.

भाऊ, मागच्या वेळी नाईकांनी नेनेना दवाखान्यात नेऊन उपचार केले तरी केवळ जमिनीचे वाद आहेत म्हणून त्यांच्यावरच आळ आला. त्यामुळे ते गेल्यावर हे लोक परत नाईकांनाच धरणार.

पण मागे गुरवांनी दत्ताला जमिनीकरता बळी दे असे सांगीतलेले असते, त्यामुळे जी जमीन त्यांना पण हवी आहे त्याकरता त्यांनीच परस्पर नाईकांवर आळ आणला असेल. त्यामुळे दत्ता घाबरला असेल.

काल चुकून एपिसोडचा थोडा भाग पाहिला तर अभिराम देविकाला ढकलत पलंगापर्यंत नेत होता. ती धपकन पलंगावर बसली. आता हा काय करतोय म्हणेतो हा बाबा भक्त हनुमानासारखा तिच्या पायाशी बसला. Uhoh त्याआधी त्याने 'आवडलं का आपलं घर?' असं विचारलं तिला. मी म्हटलं असतं बाबा रे, तेव्हढा एक एशियन पेंटचा हात तरी मारून घ्यायचास खोलीत. सगळीकडे 'पोपडे आणि सन्स' दिसताहेत. मग तिने त्याला 'तुम्ही ह्या लग्नाने खुश आहात ना?' असं विचारलं. हे थोडं वरातीमागून घोडं नाही वाटत? वर म्हणे आई-बाबा लग्नाची घाई करत होते. अग चोंबडे, मग तू काय हातात टाळ घेऊन भजन म्हणत होतीस काय? गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होतीचस ना? मग दोघं जरा लाडात आले तेव्हा शेजारचं कपाट बघून मलाच भीती वाटली की आता त्यातून आण्णा एन्ट्री मारतात का काय.....

तो अभिरामचा मित्र थोडा इम्तियाझ खान सारखा दिसतो नै. मला आधी वाटलं होतं की छायाला हिरो म्हणून आणलाय. पण तिच्यापेक्षा लहान दिसतो. सुशल्याला हिरो म्हणून आणला असेल.

दत्ताची खरंच दया आली. पु.लं. म्हणतात तसं लोकांच्या स्वप्नात रमणीय घाट, शांतपणे पावलं टाकत येणारी सुंदरी वगैरे वगैरे.....आणि ह्याच्या स्वप्नात नेने वकील. मला तर वाटलं त्यांचं मुंडकं कापलं होतं त्यामुळे स्लीपी हॉलो सारखं एका हातात फायली आणि दुसऱ्यात मुंडकं घेऊन येतात का काय. वर म्हणे सगळ्यांना सांग माझा खून झालाय. आता स्वत: स्वत:चं मुंडकं कापून आत्महत्या कशी करणार मला काही कळलं नाही. तो खूनच असणार ना. असो. त्यांचं "डोकंच ठिकाणावर नाही" म्हटल्यावर काय बोलणार Happy

>>नेनेवकीलांचा खून झाला त्तेंव्हां छाया व सुसल्या सोडून बाकी सगळे नाईक, पांडू, नाथा व त्याची बायको लग्नाला हजर होते व त्याला सर्व गांवकरी साक्ष होते. मग हे नाईक आपल्यावर आळ येईल म्हणून इतके घाबरतात कां ?

खरं तर अभिराम आणि देविका सोडून बाकी कोणा नाईकांना पक्की alibi नाहिये. ते लग्नातून मध्येच गायब झाले असते तरी कोणाला पटकन लक्षात आलं नसतं. .

<<अभिराम देविकाला ढकलत पलंगापर्यंत नेत होता. ती धपकन पलंगावर बसली. आता हा काय करतोय म्हणेतो हा बाबा भक्त हनुमानासारखा तिच्या पायाशी बसला.>> Lol

Pages