Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माई सैराट झाल्यात. >>>> १००
माई सैराट झाल्यात. >>>> १०० मोदक. कसल्या सुटल्या होत्या माई कालच्या भागात. पोटच्या पोरीला पण इतक कधी शोधलं नसेल तितकं सवतीच्या पोरीला शोधत होत्या ................
बाकी त्या विश्वासरावला पण तेच तेच संवाद दिले आहेत, काही नाविन्यच नाही. अशानं अजून एक दोन भागांत तो पण बोअर व्हायला लागेल.
हो. मला तर वाटले की झिंगाट
हो.:फिदी: मला तर वाटले की झिंगाट होऊन पिंगा घालतात की काय! पण ठोकळी म्हणली ते बरोबर आहे, बहुतेक माई फ्रस्ट्रेशन येऊन सायको बनल्यात. विश्वासराव गुरवाला घोळात घेत होता, पण गुरव बारा गावचे पाणी प्यायलेला असल्याने बहुतेक दाद देणार नाही. ती सुसल्या खरच गायब झालीय की लपुन बसलीय्?:अओ:
लाइव्ह भाग पहायला लिन्क द्या
लाइव्ह भाग पहायला लिन्क द्या ना कुणीतर्री..
माई काय ऐकत नाहीत कुणाला
माई काय ऐकत नाहीत कुणाला
http://expertblogz.com/Discus
http://expertblogz.com/Discussion.aspx
इथे पहा हेम
"थयसर असा सुसल्या, थय हा
"थयसर असा सुसल्या, थय हा सुसल्या"
माईंचा नुसता थयथयाट चालु आहे.
घरी असताना बाहेर काढण्यासाठी थयथयाट आणि आता बाहेर गेली तर तिला पकडण्यासाठी थयथयाट
पण अॅक्टिंग मस्तच
काय चाल्ला काय हां
<< पण अॅक्टिंग मस्तच >>
<< पण अॅक्टिंग मस्तच >> सहमत. पण त्याचबरोबर एक शंकेची पाल मनात चुकचूकताच. खुद्द माईच तर अॅक्टींग मारत नसतीत ना ? कारण -१] अण्णा हयात असतानाच्या सुरवातीच्या एपिसोडात माई अण्णांकडे खुन्नसनेच बघत असताना दाखवलेलां [ अण्णा तसे होतेच म्हणा गुणी !] ; मग आतांच तिचां अण्णांवरचां प्रेम इतक्यां उफाळून कसां येता ? २] माईकय ठावक आसा कीं दागिन्यातले बरेचसे, किंवा सगळेच, शेवंताच्येच आसत; माई जर इतकी सरळ, साध्वी असती, तर सुसल्याक आपणहून त्येतलो निदान एक वांटो तरी दिल्यानच असतो. शेवंता आणि अण्णा दोघय आतां हयात नसताना, तसां न करतां, माई त्येंच्यावरचो खुन्नस सुसल्यावर काय म्हणान काढता ?
दुसरी एक शंका- माई घरातल्या कोणाकय दागिन्यांकडे फिरकूंक देणां नाय;चोरीची दाट शक्यता असूनय दागिने बँकेत ठेंवक विरोध करता. खरे दागिने फुकून टाकून अण्णानी नकली दागिने तर नाय ठेवलेत घरात ? माईक तां भांडा फुटण्याची तर भिती नाय ?
]
[ हंय चर्चेक आणखी एक वाट फुटांक होई म्हणान ह्यां पिल्लू सोडलय, असां समजा !
हायला ! बरेच दिवसानी पाहिला
हायला ! बरेच दिवसानी पाहिला एक एपिसोड
विश्वास राव भारीच आहे हां ! काय कूलली रूबाब मारतो तो .
भाऊकाका, पण नेनेवकिलांना कोणी
भाऊकाका, पण नेनेवकिलांना कोणी मारले?
सुसल्या ही चालते मंद मंद,
सुसल्या ही चालते मंद मंद, छाया ही चाले मध्यम मध्यम
अंधार्या राती शेवंता नाचते, माई पण करतात थय थय
थय थय थय थय, थय थय थय थय
कुणाला सांगु, कसे मी सांगु
अण्णांची आहे अजून एक गंगु
म्हणून वाटते भिती मला, दागिने कोणाक देऊचा नाई म्या
विश्वाssssssssssss आस, विश्वास गेला पानीपतात
सुसल्या ने दिली तुरी हातात, दिसते मला ती ठाई ठाई
उकाड्या राती मशाल हाती घेऊन फिरते सुसल्या वनात
म्हणून करते मी थय थय थय थय थय थय....
हे वरचे गाणे रात भी है कुछ मध्यम च्या चालीवर वाचावे. हसु वा रडु आल्यास मी जबाबदार नाही.
कवित्व आणि स्माईली सुपर्ब!
कवित्व आणि स्माईली सुपर्ब!
रश्मी एकदम झिंगाट मूडमध्ये,
रश्मी एकदम झिंगाट मूडमध्ये, भारी
.
रश्मी
रश्मी
<< कवित्व आणि स्माईली सुपर्ब!
<< कवित्व आणि स्माईली सुपर्ब! >> +१
<< भाऊकाका, पण नेनेवकिलांना कोणी मारले? >> मला माहित आहे पंण आत्तां नाहीं सांगणार; बघूं माझा चेला, विश्वास राव, काढतो का तें शोधून !
धन्यवाद देवकी, अंजू, प्रज्ञा
धन्यवाद देवकी, अंजू, प्रज्ञा आणी भाऊ. आणी जिप्सीला पण थँक्स
कारण त्याच्या प्रतीसादावरुन कविता सुचली.:स्मित:
भाऊ, मला काही वेळेस वाटते की माईंनीच सुसल्याचा काटा काढला असावा. किंवा मग तसे नसेल तर त्यांना ते सहन होत नसेल की इतक्या सहजासहजी सुसल्या सुटली. पण मग सुसल्याच्या पिशवीत माईंचा फोटो व जमिनीची कागदपत्रे कुठुन आली? की मग यमुनाने हा खेळ केलाय्?:अओ: कारण त्या दिवशी या येड्यांनी कपाट उघडे टाकल्यावर यमुनालाच जास्त चान्स होता सगळे गायब करण्याचा.
कारण -१] अण्णा हयात असतानाच्या सुरवातीच्या एपिसोडात माई अण्णांकडे खुन्नसनेच बघत असताना दाखवलेलां>>>>> कारण त्याच वेळेस देविकाच्या आईला पाहुन अण्णा म्हणतात की विहीणीला पण एक साडी देवा. ते ऐकल्यावर माई खुन्नसने बघतात कारण अण्णांचा रंगेलपणा त्यांना माहीत असल्याने आता यांची नजर विहीणीवर पण आहे का असे माईंना वाटते.
रश्मी राॅक्स
रश्मी राॅक्स
भाऊ, म्हणजे तुम्ही तुमच्या
भाऊ, म्हणजे तुम्ही तुमच्या शिष्याची परीक्षा घेताय, असच ना
(No subject)
रश्मी खरच गन्गू आलीये का
रश्मी
खरच गन्गू आलीये का सिरीयल मध्ये.
सुषमाचि पण death झाली ?:अओ:
>>माई जर इतकी सरळ, साध्वी
>>माई जर इतकी सरळ, साध्वी असती, तर सुसल्याक आपणहून त्येतलो निदान एक वांटो तरी दिल्यानच असतो.
हायला, कुठली बाई असं करेल?
>>खरे दागिने फुकून टाकून अण्णानी नकली दागिने तर नाय ठेवलेत घरात ? माईक तां भांडा फुटण्याची तर भिती नाय ?
हे मात्र शक्य आहे.
मला तर त्या रणजित
मला तर त्या रणजित विश्वासरावची मजाच वाटते. सुशल्या म्हणजे गांधीजी असल्यासारखं पोलिसांना फोन करून सांगतो की नाईकांच्या वाड्यातून सुषमा गायब झालेय तर तिला शोधा. निदान फोटो वगैरे द्यायला नको का? मित्राच्या घरी लग्नाला आलाय तर gloves खिशात घालून का फिरतोय? मला तर त्यानेच सुशमाला मुद्दाम गायब केलंय असा कधीचा संशय आहे. रच्याकने, सुषमा त्या भुयारात नसेल ना?
अभिराम आणि विश्व्वासराव दोघांना चांगले शर्ट आणून दिले पाहिजेत. त्या दिवशी अभिरामने काय तो लाल बनियन घातला होता. पोस्टाची पेटी दिसत होता अगदी. गरीबांचा सलमान खान
वर ती मुलुखमैदान सासू फोनवर काय बोलत होती ते त्याला ऐकू आलं नाही? मला तर वाटलं देविकाला फोन न वापरता सुध्दा ऐकू आलं असतं.
नाना त्या दिवशी म्युझिकच्या तालावर दर्दे-डिस्को का करत होते काय माहित. त्यांच्या गळ्याचा क्लोजअप का मारतात? तो काय मस्तानीचा गळा आहे का?
मला तो विश्वासराव अजिबात आवडला नाहिये. वादळवाट मधला एसीपी समर आठवतो??? काय शोभला होता लोकेश गुप्ते. हा विश्वासराव दोन्ही गालात लाडू ठेवून बसलाय असं वाटतं. त्याच्या फॅन्सना सॉरी.
आण्णा काय खडूस सारखं माईशी
आण्णा काय खडूस सारखं माईशी बोलतात. त्यापेक्षा झाडावर शेवंताकडे का जात नाहित काय माहित. माईने त्यांना हाकलून दिलं पाहिजे. मला तर वाटलं त्या दिवशी माधवला आण्णा दिसून त्याची दातखीळ बसते का काय. निलिमा नाहीतर चुरुचुरू बोलते. आणि विश्वासरावशी बोलायला माधवला पुढे केलं. छायाचा हिरो आणि निलिमाचे गुजराती फ्रेन्ड्स ऐसे गायब हो गये है जैसे गधे के सर से सिंग.
>>सुषमाचि पण death झाली ?
नाही, अजून तरी तिची डेड बॉडी सापडली नाहिये.
पांडू पुन्हा इसरला असेल.
पांडू पुन्हा इसरला असेल.
मला तर त्यानेच सुशमाला
मला तर त्यानेच सुशमाला मुद्दाम गायब केलंय असा कधीचा संशय आहे. रच्याकने, सुषमा त्या भुयारात नसेल ना?>>> भु.भु मध्ये नाही का अक्षय कुमार अमिषा पटेलला तिच्या मर्जीनेच एका खोलीत कोन्डून ठेवतो. हे पण तसेच असेल.
तात्यानुं, नाईकांच्या घरांत
तात्यानुं, नाईकांच्या घरांत पानाचो डबो नाय , तंबाखू ओढूंक गुडगुडी नाय, आंबे,फणस, रतांबे ह्येतलांय कधी काय नाय, गुरां नाय, कोंबड्यो नाय, दारांत चाफ्याचा किंवा कसलांच फुल झाड आणि नारळाचो माड, सुपारीची फोपळय नाय, शेती असानय शेतीचीं अवजारां नाय, घरांत मासे-मटणाचां नांव नाय, टीव्ही सोडा पण रेडीओय नाय, एकाच्याय तोंडात कधीं गाळी नाय आणि बोलतत तां मालवणी नाय, घरावर दगड पडतत पण वानर मात्र कधीं धुमशान घालणत नाय.... ....अणि तरीही भेटता तो मात्र असां कसां हो म्हणता, ' आम्ही फक्त कोकणातल्या वातावरणासाठी ही सिरीयल बघतो ' !!!
ह्या बाकी एक्दम बरोबर हां ,
ह्या बाकी एक्दम बरोबर हां , काकानु
त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी
त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी काहीतरी शिकायला पाहिजे माईंकडून. गेले २-३ एपिसोड्स त्या 'पोकेमॅन गो' खेळतायत आणि ते सुद्धा मोबाईल हातात न घेता ............
त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी
त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी काहीतरी शिकायला पाहिजे माईंकडून. गेले २-३ एपिसोड्स त्या 'पोकेमॅन गो' खेळतायत आणि ते सुद्धा मोबाईल हातात न घेता ..>>>>:हहगलो:
भाऊंनु काय बोलताव?
भाऊंनु
काय बोलताव?
तात्यानुं, नाईकांच्या घरांत पानाचो डबो नाय>>>>> कसा असणार? तां डब्यो शेवंता घेऊन गेली आन तो तां सुसल्या घेऊक हिंडताव. तसां पण माझ्या पोरांना सुपारीचे खांडाचे पण व्यसन नाय, गुणाचे हायेत माझी मुलं. तां सुसल्याच व्यसनी असां, तिका इचारा. माझ्या पोरांना नावे ठेवायची नाय, हां, सांगुन ठेवतयं!
आंबे,फणस, रतांबे ह्येतलांय कधी काय नाय, गुरां नाय, कोंबड्यो नाय>>>> कसा असेल? तां शेवंता जेवा अबोलीचा गजरा माळुक ह्येंच्या समोर इल होती, तेव्हापासुन हे तिच्यावांगडा गावोगाव फिरत होते. मगे मी संतापुन घरा-परसासमोरची सारी फुले-झाडे उपटुन टाकलीव.:राग: मग अभिराम च्या साखरपुड्याक जेव्हा ह्येंनी प्रेमाने गजरो आणलो, तेव्हा मी गजरो माळलय.
नारळाचो माड, सुपारीची फोपळय नाय,>>>>> तां शेवंता जेव्हापासुन झाडाक लटकली, तेव्हापासुन आमी नाईक लोक कोणत्या पण झाडाक घाबरतो. आणी बाजारात्सुन नारळ-सुपारी आणतो, नायतर गुरव भावोजी हायेत की द्येयाला.
शेती असानय शेतीचीं अवजारां नाय>>>> अहयेत की, तुमी बघीतला नाय तां? अंगणातच ठेवली होती किती येळेस. तुमी बघीतलाव नाय, त्येचा दोष आमाक का देता?
घरांत मासे-मटणाचां नांव नाय>>>> आमी शिवराक खाताव.
बोलतत तां मालवणी नाय, घरावर दगड पडतत पण वानर मात्र कधीं धुमशान घालणत नाय....>>>>. कसा येणार? घराजवळ एक फळझाड लावले नाय, मगे वानरे कसे येणार?
आणी भाऊंनु तुमी माका सांगा ह्ये समदे कोण बोलले तुम्हाला? त्येंका पाठवा हयं.
अरुण
रश्मी मस्त. शिवराक म्हणजे
रश्मी मस्त.
शिवराक म्हणजे काय?
Pages