रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता खर सांगायचं तर हीच अवस्था होते, पण चार मालवणी वाक्य ऐकायला मिळतात म्हणून परत बघत बसते ही सीरियल .

<< हे तुम्ही तर नाही ना? >> मीं कधींच 'विग' किंवा कलप वापरणंय नाय आणि माझी बाईल टीव्ही सोडून माकां ओरडूंक येंवची तसदी घेवची नाय ! Wink

<< माई जर शेवंता समजुन बोलत असतात तर आण्णा सरिता समजुन कसे उत्तर देतात >> कारण त्यावेळीं अण्णाना माईंच्या जागीं शेवंता दिसत असेल ! ह्या सिरीयलमधे प्रश्नांचीं उत्तरं आपंणच आपले तर्क लढवून शोधायचीं हा नियमच झाला आहे !! Wink

अण्णा शहाणे आहेत. खर्‍या शेवंताने अण्णांना लुटल्याने आणी सुषमाला वाटा दिल्याने माई सैरभैर झाल्यात. त्यांना भास व्हायला लागलेत की सगळे जण दागिने आणी घरावरच टपुन बसलेत. त्यामुळे त्या सरीताला पण शेवंता समजतात.

आजच्या भागात चक्क अभिरामला पण अण्णा दिसतात.

<< खर्‍या शेवंताने अण्णांना लुटल्याने आणी सुषमाला वाटा दिल्याने माई सैरभैर झाल्यात. >> अण्णानीच उलट शेवंताक लुबाडलां असण्याची शक्यता खूपच अधिक आसा !

अभिरामचा मित्र आलेला पाहून ही मालिका आता 'भुल भुलैया" च्या वळणाने जाणार असे वाटू लागलेय ...>>>>अगदी हाच विचार आला कालचा एपिसोड पाहताना. Happy

नेहमीप्रमाणेच खास काहीच झालं नाही. ठोकळी नुसतंच " घरी लग्नकार्य आहे, सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे" असं नुसतं बोलते, पण स्वतः काहीच करत नाही. अभिरामला त्याच्या मित्राचा 'विश्वासराव' चा फोन येतो (दोन वेळा) आणि सांगतो की तो लग्नाला येऊ शकणार नाही, पण या शेवटी तो येतो.

अभिराम लग्नात सुट शिवायला नकार देतो. आणि लग्नासाठी म्हणून देविकाच्या घरी (निदान) बांगड्या भरण्याचा तरी कार्यक्रम होतो.

अभिरामचा मित्र आलेला पाहून ही मालिका आता 'भुल भुलैया" च्या वळणाने जाणार असे वाटू लागलेय ...>>>आणि पांडू अशा प्रकारे लिहायला विसरला तर?

अरे? सीरेल जत भुभु च्या वळणाने जाणार तर अभिरामचा येणारा मित्र अक्षय कुमार मग कोणीतरी विद्या बालन हवीच ना? मला तर त्या ढ्म्मावरच सौशय होता Happy

ह्यॅ! मग आमी जे तोमार म्हणतांना ठोकळी कशी वाटेल?Samba

त्यापेक्षा छाया बरी. मग परेश रावल म्हणजे ठोकळ्यो, मनोज जोशी म्हणजे दत्ता आणी तो रघुवीर यादव म्हणजे पांडु.:खोखो:

मग सुषमा कोण असेल?>>>>तां माका काय माईत?Cat chasing tail

हयं माका मी कोण हाय तेच कळुचा नाय, मगे सुषमा चो रोल कोण करतला ते माका कसां ठावक असां? ह ! ह! ह !

हयं नेने वकिलांचो खून झालो असां, कोणी केला, का केलाव, ते पण माका ठावक नाय, मगे तुका काय सांगणार? त्येंका छ्तावर लटकल्याव कोणतरी.Hanging

बघूंया आतां अण्णा, शेवंतासारखे नेने वकील कोणाक दिसतत आणि कोणाच्या अंगात येतत तां !
नाईकांच्या गांवात पोलीस तपास बहुतेक गुरवाक इचारुनच होत असतलो; 'ह्यां साधासुधां प्रकरण नाय ', असां गुरवान म्हटल्यान कीं ' प्रकरण पोलीसांच्या अखत्यारीत येणां नाय ' असो शेरो मारून केसची फाईल बंद ! नेनेवकीलावर प्राणघातक वार झालो तीय केस अशीच बंद झाली असतली. अण्णा -नाथा जोडीन इतके मुडदे गाडले त्येय केसी अशेच कपाटबंद ! Wink

हो ना, अभिराम आणी घरची मंडळी ( छाया सोडुन ) सगळे देविका कडे लग्नाला जातात. छाया दार वाजवुन रदौन ओरडते की तिला बाहेर काढा. तिकडे लग्नाच्या तिथे होम व इतर विधी सुरु असतात. त्यातच निलीमाला जतीन भाईचा फोन येतो पण ती तो कट करते. मग आधी सरीता दत्ताला बाहेर बोलावुन घेऊन सांगते की आपले घर १० मैलावरच आहे. आताच जाऊन तुम्ही दागिन्यांवर डल्ला मारा कारण घरात कोणी नाही. इकडे नेने वकील सर्व पोशाख करुन बाहेर निघतात तर त्यांची बायको विचारते की कुठे चाललात तर नेने म्हणतात की अभिरामच्या लग्नाला. तर ती विचारते की एवढे होऊनही का जाताय? तर ते म्हणतात माझ्याशिवाय लग्न होणार नाही. इकडे मग दत्ता, सरीताला म्हणतो की लग्नाचे इतर विधी चालू असताना तो जाईल. त्याच वेळी यमुना पण नाथाला हेच सांगते की घरात कोणी नाही तर तुम्ही जाऊन हात साफ करा. तो पण म्हणतो की वेळ मिळाला की जाईल.

जतीन्भाई आणी कुमुदबेन नाईकांच्या वाड्यावर येतात तर तिथे कोणीच नसते. मग त्यांच्या लक्षात येते की घरात लग्न आहे. मग कुमुद म्हणते की त्यांनी आपल्याला लग्नाला बोलावले नाही. मग ते परत निघुन जातात. इकडे मग आधी दत्ताला फोन येतो की नेने वकिलांचा खून झालाय, ते ऐकुन तो प्रचंड घाबरतो. त्याच वेळी माधवला पण कोणीतरी फोन करुन सांगत की नेनेंचा खून झालाय. नेने वकिलांची बायको बाहेर कट्ट्यावर बसलेली असते तेव्हा तिच्या हातावर रक्ताचे थेंब वरुन पडतात तेव्हा ती घाबरुन वर बघते आणी हबकुन खूप मोठ्याने ओरडते. इथेच थांबवलेय.

छाया दार वाजवुन रदौन ओरडते की तिला बाहेर काढा. त्यातच निलीमाला जतीन भाईचा फोन येतो पण ती तो कट करते. >>>> निलिमा सुद्दा काहीच बोलली नाही कि छायाला का नाही नेत लग्नाला म्हणून? बिचारी छाया!

तर ते म्हणतात माझ्याशिवाय लग्न होणार नाही.>>>> का? अभिराम-देविका रजिस्टर पद्दतीने लग्न करणार आहेत का?

आधी दत्ताला फोन येतो की नेने वकिलांचा खून झालाय, ते ऐकुन तो प्रचंड घाबरतो. त्याच वेळी माधवला पण कोणीतरी फोन करुन सांगत की नेनेंचा खून झालाय.>>> फोन करणारा कोण असतो? तोच खुनी असावा.

ए, लग्नाच्या वे़ळी सुषमा कुठे असते? Uhoh

बघूंया आतां अण्णा, शेवंतासारखे नेने वकील कोणाक दिसतत आणि कोणाच्या अंगात येतत तां !>>> ते नेने आहेत, नाईक नाहीत भुत व्हायला. शेवन्ता सुद्दा अर्धी नाईक.:स्मित:

मग कुमुद म्हणते की त्यांनी आपल्याला लग्नाला बोलावले नाही >> लग्नाला बोलवायला तुम्ही कोण? तुमचा काय संबंध, आमचे काका का मामा Lol (आभार: अशी ही बनवा बनवी)

Pages