रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अभिराम देविकाच्या लग्नात काय मानपान होणार त्या वरुन मानापमान नाट्य घडलं. अभिराम म्हणाला मला काही नको, सरीताला राग येतो. नंतर अभिराम देविकाला आणी कुटुंबाला सोडायला बाहेर येतो. परत येताना त्याला टाकुन आलेला ( प्यायलेला) दत्ता भेटतो, त्यांच्यात बोलाचाली होते, दत्ता लय चिडलेला असतो.

निलीमा सालाबादप्रमाणे लॅपटॉप बडवत बसलेली असते, तिला गुज्जुभाईंचा फोन येतो, मग तिची सटकते. ती माधवला सांगते की आत्ताच्या आत्ता जाऊन ते जमिनीचे पेपर्स घेऊन ये. सगळे खाली झोपलेले असतात, दत्ता-अभिराम बाहेर बडबडत असतात. ठोकळ्याला कुठुन तरी किल्ली मिळते. तो कपाट उघडतो, आणी त्याचे माग लक्ष जाते, तो भयंकर दचकतो.

पुढे काय घडले त्या साठी पहात रहा रात्रीस खेळ चाले-झी मराठी, सोमवार ते शनीवार रात्री १०:३० वाजता.

हुश्य.... वाचला माधव ! जीवावर बेतल ते खांद्यावर निभावलं !>> +१.

पण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग.

पण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग.>>>>अगदी अगदी.

माई बेरीनानाच्या अंगावरचे पांघरून दूर फेकुन देते आणि निलिमा तिथे येते तेंव्हा ते त्यांच्या अंगावर दाखवलंय. निलिमा जेंव्हा बेरीनानाला पाणी द्यायला जाते तेंव्हा परत पांघरूण पायाजवळ दाखवलंय.

माईंची अ‍ॅक्टिंग झकास होती. Proud

पण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग>>> @निधी.. हे अगदी खर..पण त्यामुळे काल खरच रात्रीस खेळ 'चालत' होता. कारण सगळे नुसते कुठुन तरी कुठे तरी चाललेच होते.. अगम्य होता कालचा भाग.
इतर कोणी आजारी पडल तर..गोळ्या देणारी निलीमा या वेळी चक्क घाबरुन नुसती उभी होती...प्रथोमपचाराच लॉजीक शेवंता ने गिळल होत बहुतेक Happy

अभिराम आणि देविका जेव्हा एका खोलीत बोलायला जातात तेव्हा अचानक दरवाजा बन्द होतानाचा प्रोमो पाहि ला . वाटल, किती चावट आहे ही शेवन्ता! Wink

मला तरी तसेच वाटत. ठोकळीच्या अंगात शेवंता जरी येत असली तरी घरात अण्णांचेच अस्तित्व जाणवते.( जर सिरीयल मध्ये भुताटकी आहे असे गृहीत धरले तर )

<< ... बेरीनाना तर हे सगळं करत नसतील? बेरीनाना आणि पांडू? >> << एखादवेळेस गणेशने नसेल मारले ?? >> <<बहुतेक, कारण नाथाने पण हे केले नसावे कारण त्याला बराच अनुभव आहे.>>> मंत्रीमंडळ विस्तारासारख्यां संशयितांचां ह्यां मंडळ वाढतच चल्लांहा ! आतां हंयल्या माबोकरांच्या पोष्टी बघून त्येंच्यावरय संशय घेंवूक सुरवात होतली !! Wink
नाईकांच्या घरात मासे , मटण कधीं दिसणत नाय पण माणसाक कापूच्ये गोष्टी मात्र अगदी भाजी चिरण्यासारखेच करतत ! कालच्या एका एपिसोडात, पांडू- सुसल्या घरातल्या सगळ्यांक उंदीर समजून मारण्याचो बेत आंखतत, 'माधवाक तुम्ही खल्लास केलास तरि मी तुमकां दोष देवचंय नाय ' असां सरिता दत्ताक सांगता, नाथाची बाईल तर त्येकां घरातल्या सगळ्यांक मारून टाकून दागिने मिळवण्याचो सल्लो देता !! ह्यां घर नाईकांचा आसा कीं खाटीकांचां !!!

हायला, ती यमुना सर्किटच आहे. एकेक करून मुडदे पाडा म्हणे. मग संशय ह्यांच्यावर नाही का येणार? मुडदे पाडायचं म्हणजे काय खोबर्‍याच्या वड्या पाडायच्या आहेत? आणि सोनं घेऊन ही काय किंवा सरिता काय दोघी काय करणार आहेत? ते विकायला गेलं की पोलिस धरणार नाहीत का? यमुनाचं सोडून द्या पण सरितावैनी पेपर वाचतात की नाय? पांड्याला जांभळं कुठून मिळाली ह्या महिन्यात?

बाकी माईंनी त्या नानांच्या अंगावरचं पांघरुण का काढून टाकलं? मग तिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय. अभिराम त्या देविकाला खोलीत कपाटावरचं कुलूप दाखवायला घेऊन आला का? माधवकडे किल्ली कशी आली? सगळे घरभर फिरत का होते? त्यांचं ते फिरणं बघून मला 'गुमनाम है कोई' ची आठवण झाली.

मला एक कळत नाही....सरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत? अभिराम तिथे रहाणार नाहिये, तो शेती करणार नाहिये, मग त्याला विचारायचं. माई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमिन घेऊन ती विकू शकतात. छायासुध्दा तिच्या जमिनीवर शेती करणार नाहिये. ह्या कोणालाही ती पडीक जमिन विकून पैसे देऊन त्यांची जमिन त्या बदल्यात घेता येऊ शकते.

काल सुषमा ज्या पध्दतीने माधवच्या डोक्यावरून हात फिरवत होती ते मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. सावत्र झाला तरी तो तिचा भाऊ आहे.

तिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय.>> Rofl

मला एक कळत नाही....सरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत? अभिराम तिथे रहाणार नाहिये, तो शेती करणार नाहिये, मग त्याला विचारायचं. माई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमिन घेऊन ती विकू शकतात. छायासुध्दा तिच्या जमिनीवर शेती करणार नाहिये. ह्या कोणालाही ती पडीक जमिन विकून पैसे देऊन त्यांची जमिन त्या बदल्यात घेता येऊ शकते. >> +१. माधवच्याच जमिनी मागे का??

आता मला माधवचीच दया यायला लागलीय.. सगळे त्याच्या जीवावर उठलेत. Sad

सरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत? >> अभिरामच्या वाट्याला खालच्या आळीची दोनच एकर जमिन आली आहे.
माई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमीन घेऊन ती विकू शकतात. >> माईंच्या वाट्याला दागिने आणि शेतीतील उत्पन्नाचा वाटा आलाय. बहुतेक जमिनीचा वाटा आला नसावा.
छायाला शेतीच्या उत्पन्नातील १२% वाटा आणि कायमस्वरूपी रहायला नाईकांचा वाडा आलाय.
केवळ माधवंच्या नावे ६ एकर वरच्या आळीतील जमिन आली आहे.

भगवती, अभिरामला खालच्या आळीतली ४ एकर जमीन, माईला नदीकाठची ५ एकर जमीन आणि कलमांचा हक्क मिळालाय.
अभिरामची जमीन पण कमी कसाची असू शकते एकवेळ.. पण माईंची नदीकाठची जमीन तर सुपीकच असणार ना.. ती ५ एकर जमीन घेऊन त्यातला शेतीचा वाटा तो माईंना देऊ शकतोच. जसं डिल तो माधवची जमीन घेऊन करणार होता तसंच डिल माईंची जमीन घेऊनही करता येऊ शकतंच.

Pages