रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
सुषमाच्या हातात तो डबा पाहिला, म्हनूंनच हा फोटो टाकला, तो खूप जूना असल्याने फार खराब झालाय, एकदा पॉलिश करुन घेतल तर परत चांगला होईल ना तो ?

अभिराम परत गायबलाय! तालुका एव्हढा दूर असतो का?

कोणीतरी नाईकांना गिफ्ट दिली आहे आणि ह्यांची उगाच टरकलीय. ते पान आण्णांसाठी दिलंय. लिंबू गणेशाला जमिनीत पुरायला होतील. आणि तो नारळ फोडून पांडूला द्या म्हणावं खोबरं खायला. उरली केळीची पानं. त्यावर जेऊन टाकावं नाईक मंडळींनी म्हणजे ताटं घासायचा त्रास वाचला. हाय काय नाय काय Proud

मला तर दिसतंय की निलिमाच हे सगळं करतेय. काहीतरी प्रबंध सादर करत असेल - अंधश्रध्देचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वगैरे. ती गाडीतून उतरल्यावर कॅमेरा तिच्यावर आपादमस्तक फिरवायचं कारण मला तरी कळ्लं नाही. 'ही निलिमा?' असं म्हणण्याएव्हढा फरक तिच्यात नक्कीच झालेला नाहिये. आजकाल ती जास्तच आगाऊपणे बोलते माधवशी. आता एक कानफटात देऊकच होया त्याने.

भगवती Happy तू एपिसोडचा सारांश लिहायचं का थांबवलंस? मागच्या शनिवारचा भाग पूर्ण बघता आला नाही म्हणून मी इथे आले होते वाचायला पण तुझी पोस्ट नाही दिसली. बोअर झालीस काय सिरियल बघून?

पण मला एक सांगा त्या रात्री माईच्या खोलीचा दरवाजा कोणी वाजवला? आता दत्ताला पण आण्णा दिसले. मला तरी हा मास हिप्नॉसिसचा प्रकार दिसतोय. किंवा दत्ताने आण्णांना मारलं असेल. कारण त्यांना बघून किंवा ते दिसल्याचा उल्लेख झाला तर तो नुस्ताच घाबरत नाही तर त्याच्या चेहेर्‍यावर अपराधी भाव येतात.

कालच्या एपिसोड मध्ये एव्हढा आरडाओरडा चालला होता की मी शेवटची ५ मिनिटं पाहिलं फक्त. सुशल्या रॉक्स! नाईक मंडळींना छायाच्या प्रॉब्लेमवर चर्चा करायला भाग पाडलं तिने. आता प्रोमोमध्ये दाखवत आहेत की निलिमा म्हणते की ती जमिन आपली इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे नवर्‍याने नाईकांच्या बाकी कटकटीत लक्ष घालायला नकोय तिला पण आपला वाटा मात्र पाहिजे. हे अर्थात वास्तव चित्रण आहे म्हणा.

बाकी तो पांडू थोडासा 'हायवे ऑन माय प्लेट' मधल्या मयूरसारखा दिसतो असं नाही वाटत का? Happy

<< आजकाल ती जास्तच आगाऊपणे बोलते माधवशी. आता एक कानफटात देऊकच होया त्याने. >> तसां केलां तर ती कायमचीच शेवंताच्या आवाजात बोलात, अशी भिती वाटता माधवाक ! Wink
<< निलिमा म्हणते की ती जमिन आपली इन्व्हेस्टमेंट आहे.>> तांय माकां कळलां नाय ; वडिलोपार्जित मिळालेलो वाटो 'आपलो हक्क' होवूं शकता, 'आपली इन्व्हेस्टमेंट' कशी काय होता ?

आणि तो माधव दिवसेंदिवस अजुनच बावळटासारखा वागतोहा म्हणून निलीमान त्येच्या कानाखाली जाळ काढुचा. हाकानाका.

सरीताने अगदी टिप्पीकल हातवारे केले आणी बोटे मोडली पाने ठेवणार्‍याच्या नावाने. ( म्हणजे आज दिसेल तसे) सुसल्या रॉक्स! पण ती फार म्हणजे फारच फुटेज खाते. नाथाच्या आरड्या-ओरड्यावरुन माझ्या साबाना वाटले की दत्ताच ढगात गेला.Vulture पण तसा काय दिसला नाय.

दत्ताला अण्णा दिसले पण त्या म्हसोबाने ते कोणालाच सांगीतले नाही.

Lol ते भूयार प्रकरण पण एक धमाल होतं. निधी, शुक्र-शनीवारी विशेष काही नाही दाखवले पण ते पाहुन मात्र मी जाम हसले. ठोकळ्यो आधी सुसल्याला लग्नासाठी तयार करायला तिचाशी बोलायला जातो. ती म्हणते की मी तयार आहे पण आधी माझी एक अट आहे, आधी माझ्याबरोबर मी नेईन तिथे चला. मग ठोकळ्यो तयार होतो. तेवढ्यात गपकन लाईट जातात. ठोकळ्याची ततपप होते आणी तो सुसल्याला हाका मारत सुटतो, त्या अंधारात त्याला खिडकीतुन खाली सुसल्या दिसते. आणी लाईट आल्यावर तो बघतो तर ती त्याच खोलीत असते. मग ते खाली जातात. सुसल्या त्याला जंगलाकडे नेते, तिथेच छाया आणी अजय असतात. मग त्यांचे लय राडे होतात. ठोकळ्याला कळते की छाया आणी अजय मध्ये इलु इलु आहे. मग त्या दोघीत अजय वरुन ता थैय्या॑ सुरु होते, पण ठोकळ्यो त्यांना चूप करुन घरी आणतो, पण मागचे दार बंद असते. त्यांना नाईलाजाने पुढच्या दाराने यावे लागते. त्या आधी हे दोघे घरात नसताना, दत्ता ठोकळ्याशी बोलायला वर जातो, तर तिथे त्याला खुर्चीत चिकटलेले अण्णा दिसतात. त्याची पण ततपप होते. तो कसाबसा खाली येतो. दत्ती तिथे येते आणी म्हणते की तुम्ही काही बोलत का नाही? तो म्हणतो सरीता तू गप्प बैस ( कला तू गप्प बैस च्या चालीवर ) माई पण तिथेच येतात. मग बाहेरचे दार वाजते तेव्हा तो अजून घाबरतो. पण उघडल्यावर त्याला यांची जत्रा दिसते. तो म्हणतो एवढ्या रात्रीचे कुठे उंडारत होतात? पण कोणी काहीच बोलत नाही तेव्हा सुसल्या खरे बोलुन भांडी, पातेले, कळश्या, हंडे फोडते. तेव्हा त्याच वेळी निलीमा आणी आर्चिस येतात. निलीमा जीन्स पँट, शर्ट व शोल्डर कट अशा वेषात अवतरते त्यामुळे गोंधळ उडतो. ती विचारते तुम्ही सगळे बाहेर का तर कोणीच काही परत बोलत नाही, मग सुसल्याच शेवटी सगळी तांब्या -पितळेची भांडी फोडते.

सुसल्या खरे बोलल्यावर दत्ता छायाला बाहेर गहलवायला निघतो, परत रडारड होते. पण पूर्वा गणेशला उठवुन बाहेर आणते. मग तो दत्ताला थांबवतो. त्या नंतर निलीमा येते. ठोकळा-ठोकळीचे जाम भांडन होते, ती खोलीत गेल्यावर मग ठोकळा वर जाऊन तिला समजाऊ पहातो, पण ती ऐकत नाही.

पांडु दिसला नाही २ दिवसात, खंय गेलो असां!

<< पांडु दिसला नाही २ दिवसात, खंय गेलो असां! >> "ह्येच्यात्सून तुम्हीच काय तो आतां मार्ग दाखवा" , असां गुरवाच्ये पाय धरून विनवणी करताहा तो दोन दीस; त्येकांच कळणाहा नाय ह्या स्टोरीच्या गुंत्यात्सून भायेर कसां पडूचां तां !! Wink
<< पण सुसल्या अजयवरसून का भांडता??>> सुसल्याक अजयच्या गळ्यात मारून तिकां घराभायेर काढूंचो नाईकांचो प्लान तिकां त्यांच्याच गळ्यात उतरवूंक मजा येता !!

तेव्हा सुसल्या खरे बोलुन भांडी, पातेले, कळश्या, हंडे फोडते. >>>> आता ह्या सगळया वस्तुन्चे पैसे शेवन्ता भरेल काय?

कोणीतरी नाईकांना गिफ्ट दिली आहे >>>> प्रेक्षकान्नी दिली असेल.

<< आता ह्या सगळया वस्तुन्चे पैसे शेवन्ता भरेल काय? >> शेवंताचीच भांडी असतलीं तीं सगळीं. अण्णा नुसतेच तिच्ये दागिने ढापून समाधान मानणारो माणूस थोडोच होतो/आसा ! Wink

<< पण ते सुषमाला कळायला हव ना फोडण्याआधी.>> आईच्ये दागिने ढापलेत ह्यां कळलां तसांच ह्यांय कळलां असतलांच ! Wink

Rofl
म्हणजे मी बरोबर समजलेलंय.

आता हे वरचे पोस्टी वाचून माका प्रश्नच पडलो खरांच भांडी फोडल्यान की काय म्हणून. Happy

<< म्हणजे मी बरोबर समजलेलंय. >> म्हणजे आमकां कळांकच नाय होतां, असां म्हणणां कीं काय तुमचां ? आमचांय असां भांडा फोडतास !! Wink

नीलिमा, काय घर विकायला निघालेय की काय?
तीला बहुतेक माधवाला धीट बनावायच असेल, म्हणून ती त्याला जमीन देणार नाही अस सांगायला पाठवते, आणि दूसरे म्हणजे वेळ आल्यावर ही लोक कशी वागतात हे सुद्धा दाखवऊन द्यायच असेल.
आज गाडीला आग कशी लागलय ?

<< आज गाडीला आग कशी लागलय ? >> ह्या सिरीयलीतल्या शेकडों अनुत्तरित प्रश्नात आणखी एका प्रश्नाची भर, आणि काय !!! आधीं एकदां माडीक आग लागलेली, आतां गाडीक ! Wink

आधीं एकदां माडीक आग लागलेली, आतां गाडीक !>>>>अन मग वाडीक लागतलां!

निलीमा अन सुसल्या, दोन बेभरोसे, रामभरोसे बाया हायती. इतके दिवस तर निलीमाबायची ( अण्णा जाण्या आधी सुद्धा ) गावात येण्याची सुद्धा इच्छा नव्हती, पण जमीन मिळतेय म्हणल्यावर उड्या मारुक मारुक थयं रवतयं.:खोखो:

<< निलीमा अन सुसल्या, दोन बेभरोसे, रामभरोसे बाया हायती >> सुसल्यां निदान खोटारडां तरी नाय आसा. नाईकांची मीं वाट लावतलंय असां तां खुल्लम खुल्ला सांगता. पण निलीमान माधवाक फोनवर सांगल्यान कीं ती त्या गुजराती जोडप्याक अजिबात ओळखणां नाय. नुसती ओळखच नाय तर तिचां आणि त्या जोडप्याचां आधीपासूनच बोलणांय सुरूं होतां, ह्यां काल स्पष्ट झालांच !

हां ह्ये मातुर खरा हाय! सुसल्या जे काय असेल तर तोंडावर स्पष्ट बोलते, पण निलीमा फारच आतल्या गाठीची निघाली. पण ते लोक मागच्या वेळी ज्या पद्धतीने वाडीभोवती फिरत होते, त्यावरुनच तेव्हा लक्षात आले होते की या तिघांचे काहीतरी कनेक्शन असेल.

Pages