रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

Nene vakilana berinanani marla aahe. Barech diwas disle nahi ani laagnala pan aale navte

हो

अभिरामला त्याचा मैतर इनिस्पेक्टर आहे हे माहीत नाही म्हणजे अतिच झाले!

मला वाटलंच किव्वा वाटतच होत विश्वास इन्स्पेक्टर तरी असेल नाही तर सीआयडी . अभिरामला कदाचित माहित असेल पण तो मला काहीच माहित नाही असं भासवत असेल विश्वास च्या सांगण्यावरून . किव्वा अभिरामनेच हे जे काय घरात चाललंय ते शोधून काढायलाच लग्नाच्या निमित्ताने त्याला बोलावलं असेल पण घरातल्यांना त्याला सांगायचे नसेल Happy

मी काल खूप दिवसांनी बघितली सिरियल , अजून तेच दागिने दगिने चालू आहे. कालच्या भागात तो अभिराम चा मित्र म्ह्णाला की तो खूनाचा शोध लावायला आला आहे, आणि तो तर लग्न व्हायच्या आधीच आला होता ना?

हे काल झाले. सुसल्यावर तो विश्वासराव संशय घेतो नेनेंच्या खुनाचा. ती चवताळते, नेहेमीच्या स्टाईलमध्ये घरात जाऊन ठोकळ्याशी भांडते की विश्वास रावला समजावा. मग घरातले पण तिला सामिल होतात, अगदी छायासकट. माई व दत्ता पण त्या विश्वासरावला बोलतात. तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर संशय घेताय / रागवताय तर पोलीसांना बोलवा. मला घरा बाहेर काढा. मग तोच पोलीसांना फोन करुन बोलावतो. पोलीस आल्यावर सगळे चिडीचूप होतात.

पण कालच्या भागात खरच त्याचे बोलणे अगदी छान, आत्मविश्वासपूर्ण आणी पोलीसांना साजेसे होते. मला फार आवडले. ईन्स्पेक्टर असावा तर असा, संयमी, शांत वगैरे नाहीतर हिंदी सिनेमात फार उग्र आणी भडकु दाखवतात. काल खरच जाणवले की डोके शांत ठेवले तर कुठलाही कठिण प्रसंग आपण पार पाडु शकतो.

काल तो सांगतो की वाड्यात ज्या काही घटना घडतायत ते तपासण्या साठी मी आलोय, पण नेने वकिलाम्चा खून तो लग्नाला आल्यानंतर होतो, मग मी या तपासासाठी आलोय असे तो कसे सांगु शकतो? त्याला हे आधी कळले होते का की नेनेंचा खून होणार आहे ते. मग त्याने तो खून होऊ नये याची काळजी का नाही घेतली? डायरेक्शन चुकलेय.

आजच्या भागात तो पांडुला विचारतो की सारखा म्हणतोस की विसरले म्हणून, मग तू खरच विसराळु आहेस की काही लपवतोस? पांडु गप्प होऊन खाली मान घालतो.

हो आता सिरीयल खरच रंगणार असे दिसतेय.:स्मित: नाहीतर जय मल्हार प्रमाणे हिचे पण शेपूट वाढतच चालले होते.:फिदी:

थोडा वेग वाढवला आणि संवादलेखनावर जरा लक्ष दिलं तर खरच रंगेल ही मालिका ..............

पण नेने वकिलाम्चा खून तो लग्नाला आल्यानंतर होतो, मग मी या तपासासाठी आलोय असे तो कसे सांगु शकतो? त्याला हे आधी कळले होते का की नेनेंचा खून होणार आहे ते. मग त्याने तो खून होऊ नये याची काळजी का नाही घेतली? डायरेक्शन चुकलेय.>>>>>नाही डायरेक्शन नाही चुकलं. विश्वासराव सांगतो ना वाड्यात होणारे विचित्र प्रकार आणि नेनेवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची चौकशी करायला आला होता आणि त्याच दरम्यान नेनेंचा खुन झाला.

सुशल्या नाही का माधवला म्हणाली माझ्याशी कोण लग्न करणार. म्हणून हा विश्वासराव आणलाय तिचा बाहुला म्हणून. आता तिचा होणारा नवरा म्हणून एक, दुसरा इन्स्पेक्टर एव्हढी पात्रं कशाला वाढवायची म्हणून त्यालाच इन्स्पेक्टर बनवलाय. हाय काय नी नाय काय. नाहीतरी त्याच्यात आणि सुशल्यात आधी वाद झालेत. हिंदी चित्रपटांच्या कथेला अनुसरून 'आधी तक्रार आणि मग प्यार' हेही होईल. दम धरा थोडा. बाकी पोलिस सुधारलेत म्हणायचे. पूर्वी खून झाला म्हणुन फोन आला की दचकून उभे रहायचे. किंवा व्हिलनला पश्चात्ताप झाला की सायरन वाजवत यायचे. आजकाल आधीच येतात. काय वाटत असेल इफ्तेकार आणि जगदीश राज ह्यांच्या आत्म्यांना Happy

मला वाटतं की तो लग्नालाच आला असावा. आता अनायासे खून झालाच आहे तर थांबलाय. बाकी इथे अमेरिकन सिरियल्स मध्ये असतं तशी ज्युरिसडिक्शनची भानगड नसते का? म्हणजे कोकणातले पोलिस त्याला 'मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है' म्हणणार नाहीत?

कालचा एपिसोड पाहिला. आता नवं पात्र आलंय तर काही एपिसोड चेक करेन म्हणते.

सरिताची चांगली जिरली. भारी त्या दागिन्यांसाठी जीव टाकत होती. दत्ता त्या विश्वासला उडवायच्या का मागे लागलाय? गुरव फनी वाटतो आजकाल. उगाच ह्याला उडवेन, त्याला उडवेन. देव काय ह्याचं ऐकायलाच बसलाय वर? तरी बरंय सुशल्याला बघून टरकायची ह्याची. काल त्या दत्ताने मुलाला मस्त झापलं. मला त्याचा भारी राग यायचा. पाखंडी मेला!

अक्षयकुमारचा भुलभुल्लया हा सिनेमा कुणी पाहीला आहे का? त्याचीच थीम या रात्रीस खेळ चालेवाल्यांनी उचलली आहे.त्या सिनेमातही अक्षय मित्राच्या घरी रहायला येतो व केस सॉल्व करतो.इथेही हे नविन पात्र केस सॉल्व कराय्ला आले आहे.

तशा बऱ्याच थीमा एकसारख्या असतात. प्रेमकहाण्यासुद्धा एकसारख्या असतात.
सादरीकरण उत्तम पाहिजे कि जुनीच कथा असली तरी बघायला इंटरेस्ट वाटलं पाहिजे Happy

अक्षय मित्राच्या घरी रहायला येतो व केस सॉल्व करतो.इथेही हे नविन पात्र केस सॉल्व कराय्ला आले आहे.>>>> आणि अमिषा पटेलशी आय मीन सुशल्याशी लग्न करायला आलेला आहे. तसही सिनेमात सुद्दा अक्षय आधी अमि षावर संशय घेताना दाखवला आहे.

परवाका एपिसोड बघणेके बाद तो मुझे अब छाया पे भी संशय आने लगा हय ............ Happy

विश्वासराव इन्स्पेक्टर आहे म्हटल्यावर सगळ्यात जास्त तिचीच टरकली होती ............. Happy

Pages