Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झंपी, निलीमाच्या अंगात यायचे
झंपी, निलीमाच्या अंगात यायचे का थांबले? कोणी थांबवले ह्या प्रश्नांची उत्तरे पांडू द्यायचा विसरला आणि विश्वासरावांच्या बाबतीत तो प्रकार नेनेवकिलांच्या खूनप्रकरणाशी संबंधित नसल्यामुळे ते शोधणार नाहीत.
<< तो प्रकार नेनेवकिलांच्या
<< तो प्रकार नेनेवकिलांच्या खूनप्रकरणाशी संबंधित नसल्यामुळे ते शोधणार नाहीत.>> तसं असतं तर त्याने जतीनशेठची एवढी कसून चौकशीही केली नसती; भुयाराची [तळघराची] माहिती सांगितली नाहीं म्हणून दत्ताला झापलाही नसता. नाईकांचं घर निर्जंतूक करणं, हेंच विश्वास रावांचं मुख्य मिशन आहे; त्यासाठीं रजा घेण्यापेक्षां 'ऑन ड्यूटी' आहोत असं दाखवायला नेनेंचं खून प्रकरण त्यानी हातात घेतलंय !
<< बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं, मालिका बघतात नेमाने त्यांनापण संपताना मिळतील. >> यावर मीं माझ्या पेन्शन व ग्रॅच्युईटीची पण पैज घ्यायला तयार आहे !
>>बहुतेक सर्व प्रश्नांची
>>बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं, मालिका बघतात नेमाने त्यांनापण संपताना मिळतील
अय्यो अम्मा, ऐसी उम्मीद मत रखना जी. मी जवळपास महिन्याभरापूर्वी प्रश्नांची नोंद ठेवायचं थांबवलं तेव्हा प्रश्नांची शंभरी आली होती. एव्हढ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं मुश्किलही नही नामुमकीन है. एकवेळ डॉन पकडला जाईल. पण ह्या गुंत्याची पूर्ण उकल केवळ अशक्य आहे. तरीही आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला, उम्मीद पे दुनिया कायम है वगैरे वगैरे.....
>>झंपी, निलीमाच्या अंगात यायचे का थांबले? कोणी थांबवले ह्या प्रश्नांची उत्तरे पांडू द्यायचा विसरला
तिची अॅक्टींग होती ती सगळी असं मला वाटू लागलंय. बहुतेक जमिनीचं डिल पदरात पाडून घ्यायला वाहत्या गंगेत तिने पण हात धुवून घेतले.
घरात भुयार सापडलं तर
घरात भुयार सापडलं तर पोलिसांना का कळवायचं बुवा?
विश्वासराव पण डोक्यावर पडलेला दिसतोय.
काल तो फास काय गळ्यात अडकवून बघत होता. हा पण वेडा आहे वाटतं थोडा. काल सरिताला कोणीतरी एक कानाखाली द्यायला हवी होती. काय तो ड्रामा. म्हणे वाडा पेटवून देईन. हिच्या तीर्थरुपांची मालमत्ता आहे काय?
वाडा पेटवून देईन आणि जीव देईन
वाडा पेटवून देईन आणि जीव देईन
फारच ओव्हरॅक्टिंग होती.
<< काय तो ड्रामा. म्हणे वाडा
<< काय तो ड्रामा. म्हणे वाडा पेटवून देईन. >> ही असली काय पयलीच येळ आसा तिची; नाटकां नाय केलीं तर नाईकांच्याघरची मोठी सून शोभात तरी कशी ती !!
भाऊ तां सरीता म्हणजे
भाऊ
तां सरीता म्हणजे भावनगरी मिर्ची असाव, नुसतीच तडतडतय, ठसका लागताव, पण तिखट काय लागुचा नाय.:फिदी:
ठोकळी कायम गुर्रट स्वरात का बोलत असते? ते ही अगदी डोळे मोठे करुन करुन. जेव्हा पहावे तेव्हा फिस्कारत असते. मला पण विश्वासरावच्या बोलण्याचे प्रयोजन नाही कळले की भुयाराबाबत पोलीसांना सांगावे लागते ते. हं आता दत्ताचे वागणेच संशयास्पद असल्याने त्या भुयारात अजून काही मालमसाला असावा असे विश्वासरावला वाटत असावे. आता विश्वासराव असे एवढे मोठे नाव ठेवण्यापेक्षा आपण शॉर्टकट मारुया प्रत्येकाच्या नावाचा, मग शॉकवरुन समजून घ्या.
विश्वासराव- अकु ( भुलभुलैय्या) किंवा रणजीत विश्वासराव उर्फ रवि
अभिराम-चिंगम
देविका- चाँग
देविकाची आई- चिंग
देविकाचे बाबा-चँग
सरीता- नाव छोटे असल्याने तेच बरे
दत्ता, पूर्वा, अर्चिस, पांडु, गणेश, माई, नाथा, यमुना, छाया, अदे ( छायाचा हिरो), सुसल्या, अण्णा, बेरीनाना ही नावे पण छोटी आहेत. नेने आणी नेनीण तसेच गुरव आणी जतिन सेठ चे आपण जसे आणी त्याची बायडी कुमुदबेनचे कुसे नाव ठेऊया.
अरारारा! काल खूप चिडचिड झाली
अरारारा! काल खूप चिडचिड झाली माझी. काय तो सरिताचा थयथयाट आणि तारस्वर. त्या सासूने एक कानाखाली द्यायला हवी होती. ती बसलीय त्या मेलेल्या नवर्याभोवती रुंजी घालत. विश्वासरावने भुयाराचा विषय काढताच सरिताची बोलती बंद झाली. तेव्हा अभिरामने म्हणायला पाहिजे होतं की एव्हढं भाऊ भाऊ म्हणून कंठशोष करता तर हे का सांगितलं नाही. ती देविका आत्ता आलेय म्हणून गप्प होती. नाहीतर तिने ऐकवलं असतं. वर सरिताचं नेहमीचं पालुपद ह्या घरासाठी एव्हढं केलंन. आता तिथे रहातो तर केलं. किती वेळा उगाळणार तेच तेच?
माईला आत बसल्या बसल्या बरं भुयारावरून वादावादी झालेय हे कळलं.
त्या विश्वासरावने पत्रकार का बोलावले बुवा? हे चुकीचं आहे. भुयाराच्या आसपास नेनेंचा खून झाला असता तर एकवेळ ठीक आहे. पण तसं काहीही नसताना एखाद्याच्या खाजगी मालमत्तेबाबत असं करणं माझ्या मते तरी चुकीचं आहे. अभिरामचा मित्र असल्याचा तो गैरफायदा घेतोय. निदान ह्यांना आधी कल्पना द्यायला हवी होती.
बरं त्या भुयारातून कोण येत असेल त्याला आम्हाला ह्या बाबत माहित आहे असं दाखवायचा हेतू असला तर ती व्यक्ती आता येणार नाही. त्यापेक्षा तिथे सापळा लावून बसले असते तर ती व्यक्ती हाती तरी लागली असती. कोणाला तरी त्या भुयाराची माहिती करून देणं हा हेतू असला तर गावात अशी माहिती पसरवण कठिण नाही. मग पत्रकार वगैरे कशाला? नाईकांनी आता निलिमा म्हणते तसं वकिल करायला पाहिजे. तोच ह्या विश्वासरावला चाप लावेल.
मला तर वाटतं अण्णा ड्रग्ज
मला तर वाटतं अण्णा ड्रग्ज किंवा सोन्याची किंवा अॅन्टीक वस्तूंची तस्करी करत असावेत त्या भुयारातून. मला आताशा पूर्वाचा सुध्दा संशय येऊ लागला आहे. मागे माईच्या खोलीच्या खिडकीचे गज कापले होते तेव्हा ती अगदी शांत होती.
निलिमा काल माधवला मला हे सांगितलं नाहीस म्हणत होती तेव्हा हा ठोंब्या म्हणाला नाही की जतिनभाईचं काय काम आहे ते तू कुठे सांगितलंस.
ह्या सिरियलीतल्या सगळ्या बायका रणरागिणी (सरिता, निलिमा, यमुना, नार्वेकरीण) आणि नवरे बोटचेपे (अण्णा आणि नेने सोडून) असं का आहे?
हो, काल दत्ती लयच आरडाओरड
हो, काल दत्ती लयच आरडाओरड करत होती. कैपण म्हणा ती एक नंबर स्वार्थी आहे.
मागे दत्ताला माधवला मारायला सांगत होती तेव्हापासना जाम डोक्यात जाते.
<< मागे दत्ताला माधवला
<< मागे दत्ताला माधवला मारायला सांगत होती तेव्हापासना जाम डोक्यात जाते. >> ह्या नाईकांच्या घरात ठार मारणॅ, कापून टाकणे, गाडणे, विष घालणे, गोणीत भरून प्रेत जाळणे इ.इ. इतक्या सहजपणे केलं व बोललं जातं जितक्या सहजपणे सामान्य घरात जेवणाच्या मेन्यूबद्दलही बोललं जात नसावं ! दत्तीच अपवाद कां ठरावी ?
भाऊकाका, स्वप्ना म्हणजे उकल
भाऊकाका, स्वप्ना म्हणजे उकल शेवटीपण होणार नाही का, चला मग नकोच बघायला शेवटचे दोन भाग ;), जो काय गोंधळ घालतील शेवटी, तो कळेलच इथे.
बाकी एन्जॉय.
अरे, काल काय झालं? काय सापडलं
अरे, काल काय झालं? काय सापडलं भुयारात? bridge of spies पाहिला त्यामुळे राखेचा पाहता आलं नाही.
>>भाऊकाका, स्वप्ना म्हणजे उकल
>>भाऊकाका, स्वप्ना म्हणजे उकल शेवटीपण होणार नाही का
नही नही, कभी नही
काल ठोकळ्यो आणी ठोकळी त वाद
काल ठोकळ्यो आणी ठोकळी त वाद झाल्याने अर्चिस अस्वस्थ झाला. ठोकळ्याने इथली चर्चा वाचलेली दिसतेय कारण त्याने काल तोंड उघडले एकदाचे. ठोकळी ठो ठो करत होती तिला भुयाराबद्दल सांगीतले नाही म्हणून, मग ठोकळ्यो म्हणाला तू कुठे सांगीतलेस जतिन सेठबद्दल. तोंडघशी पडल्याने ठोकळी चिडली. त्या पूर्वी अर्चिस, पूर्वा आणी पांडुत भुयाराबद्दल बोलणे झाले. हं, देविकाबायने वडलांना फोन करुन भुयाराचे सांगीतले. बाकी सारे नंतर खाली भांडत असतांना रवि ( इम्तियाझ ) आला आणी म्हणाला भुयारात बरेच काही सापडले, म्हणजे सोन्याचा हंडा वगैरे. दत्ता-दत्ती अवाक होतात. मग पांडु पेपर घेऊन ( सकाळी ) धावत येतो आणी म्हणतो की पेपरात वाड्याचा फोटो आलाय. ठोकळ्यो घाबरतो. आजच्या भागात रवि सांगतो की हंडा वगैरे काही नाहीये.
हं आणी रवि सर्वांना विचारतो
हं आणी रवि सर्वांना विचारतो की कुणाला माहीत नव्हते का भुयाराबद्दल तर माई म्हणतात की त्यांना माहीत होते पण त्यांनी अण्णाना विचारण्याचे धाडस केले नाही. छाया म्हणते तिला पण माहीत होते कारण तिथेच ती अडखळुन पडली होती. पांडु वर पूर्वा आणी अर्चिस ला म्हणतो की अमावस्येला अण्णा भुयारात उतरायचे. तो म्हणतो की हे त्याला शे-अडिचशे वर्षापासुन माहीत आहे. अभिरामला माहीत नसतेच.
मला वाटत रविला भुयारात अण्णा आणी शेवंता पत्ते खेळतांना दिसले असतील.
भुयारात काय सापडले?
भुयारात काय सापडले?
रश्मी धन्यवाद विश्वासरावने
रश्मी धन्यवाद
विश्वासरावने माईंना पुन्हा त्या गोळ्या पाण्यातून दिल्या. आता त्या धुमशान घालणार परत. मला आता त्या गोळ्या घ्यायला लागल्या की 'दो घूंट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या' ह्याच ओळी आठवतात.
आजच्या एपिसोडमधे - भुयारात
आजच्या एपिसोडमधे - भुयारात दागिन्यांचा हंडा सांपडला असं विश्वास राव आपल्या पत्रकार मित्रांच्या मदतीने पेपरात छापून आणतो व त्यामुळे नाईकांच्या घरांत नेहमींसारखी बोंबाबोंब. यांत अख्खा एपिसोड गेल्यावर विश्वास राव सांगतॉ, भुयारात खरं तर हंडा नाहीं तर मृत देहांचे सांगाडे सांपडले आहेत पण गांवकर्याना हें कळलं तर नाईकांवर हल्ला होईल म्हणून त्याने पत्रकाराना खोटंच सांगितलं.
मला पडलेला प्रश्न - अरे, म्हणून खरं काय तें गुपित ठेव ना; पण त्यासाठीं खोटं छापून आणण्याची गरजच काय ? सगळे गांवकरी थोडेच जमले होते भुयारात काय सांपडतं तें बघायला ?
भाऊ मला तेच वाटत होते.
भाऊ मला तेच वाटत होते. वास्तवीक पत्रकारांना आधी बोलवण्याची गरजच नव्हती. दोन-चार पोलीसांना आधी आत उतरवुन मग शोधाशोध करुन बघता आले असते की. त्यात एवढा फार्स का केला ते कळले नाही, मात्र सांगाडे सापडतील असे नक्कीच वाटले होते.
>>सगळे गांवकरी थोडेच जमले
>>सगळे गांवकरी थोडेच जमले होते भुयारात काय सांपडतं तें बघायला ?
+११११११.
मला तर त्यात सांगाडे सापडले का इथपासून शंका आहे. माझी निलिमा झालेय.
रच्याकने, तिला हाडाचे सांगाडे सापडल्याचं पटलं कसं? असो. माझ्या संशयाचं कारण हे की अण्णा स्वत:च्याच घराच्या तळघरात माणसांना मारून का पुरतील? पुरायचंच तर दुसरीकडे पुरतील ना? ही एक तर विश्वासरावची थाप आहे नाहीतर कोणीतरी ते तिथे आणून ठेवलेत नाईकांना अडकवायला. तळघराचं काय आओ जाओ घर तुम्हारा अशी गत होती. ते कुलूप लावून बंद मुळीच केलेलं नव्हतं. बरं नाईक पोलिस कारवाईच्या वेळी तिथे नसल्याने तुम्ही कशावरून ते सांगाडे आणून ठेवले नसतील असं पोलिसाना विचारू शकतात की. सांगाड्याच्या टेस्ट वरून ते कधीचे आहेत हे कळेल एक वेळ पण तिथे कधीपासून आहेत हे नाही कळणार. बरं, आता नाईकांना सांगितलं तर सांगितलं ते पण सुषल्या, पांडू आणि देविका अश्या तीन नगरघंटांसमोर.ते काय सगळीभर केल्याशिवाय रहतील का? कदाचित तोच त्याचा हेतू असावा. आणि सांगाडे सापडले म्हणून गावकरी चिडायचं काय कारण? त्यांना नाईक जिलेबी पाडावी तसे मुडदे पाडतात हे ठाऊक आहे की.
काल दाखवलं की आजच्या भागात गावकरी नाईकांना जाब विचारायला येतात की आम्हाला हे हंडा असल्याचं पेपरातून कसं कळलं आणि तो पेपर जाळतात. ह्यांना काय नाईकांनी घरोघर जाऊन सांगायला पाहिजे होतं का?
रच्याकने, ते पत्रकार माधव, अभिराम आणि दत्ताला खिडकीतुन प्रश्न विचारतात तो सीन प्रोमोत दाखवला होता. एपिसोडमध्ये दाखवला का?
काल सरिताचं तोंड कसलं बंद
काल सरिताचं तोंड कसलं बंद झालं. फार बडबड करत होती. इतकी भिकारी बाई आहे. नुसती जीव सोडतेय सोन्यासाठी. आता देविकाने सुध्दा बोलायला सुरुवात केलीय. नव्याची नवलाई सरली की.
मला तर त्या सांगाड्यातून एखादा इम्होतेपण्णा उठून येणार आणि ह्यांच्या उरावर बसणार असाच सूर दिसतोय एकंदरीत.
पण तो विश्वासराव लई म्हण़जे लईच डोक्यात जातो माझ्या. स्वतःला तिस्मारखा समजतो.
विश्वासराव लई म्हण़जे लईच
विश्वासराव लई म्हण़जे लईच डोक्यात जातो माझ्या. स्वतःला तिस्मारखा समजतो.>>+१११११११११
ठो बै पण तेच समजायची आधी स्वत:ला!
कुठ्ल्या कुठे नेतायत शिरेल...
बरं, आता नाईकांना सांगितलं तर
बरं, आता नाईकांना सांगितलं तर सांगितलं ते पण सुषल्या, पांडू आणि देविका अश्या तीन नगरघंटांसमोर>>>>:हाहा: यामध्ये पांडु थोडा तरी गप्प बसेल पण या दोन भवान्या अजीबात गप्प बसायच्या नाहीत. देविका माहेरी फोन करेल आणी सुसल्या गावकर्यांना गोळा करुन झाडाखाली सभा भरवेल.:फिदी: हा येडा विश्वास त्या सुसल्यासमोर ही गोष्ट बोलतोच कशाला तोच जाणे.
माझ्या संशयाचं कारण हे की अण्णा स्वत:च्याच घराच्या तळघरात माणसांना मारून का पुरतील? पुरायचंच तर दुसरीकडे पुरतील ना?>>>>>> शंका एकदम सही आहे, पण तिथे भुयार/ तळघर असु शकते हे बेरीनाना, नाथा आणी खुद्द अण्णा या तिघांनाच माहीत असते. माई बायको असल्याने त्या बाकी धाडस करत नाहीत. बाकी गावकरी अण्णांच्या दहशतीमुळे गप्प असतील आणी पांडु सांगतो की अमावस्ये च्या रात्री अण्णा त्यात उतरायचे. अमावस्येला तर काय सणसणीत काळोख, आणी त्यातुन हे खेडे. यात उजेडाची सोय होणार नाही, त्यातुन नाईकांचा वाडा थोडा आड बाजूला. त्यामुळे याचा फायदा अण्णांनी घेतला असेल. आणी तिथे कुणी बघणार नाही अशी खात्री करुन मुडद्यांची वाट लावली असेल.
रच्याकने, ते पत्रकार माधव, अभिराम आणि दत्ताला खिडकीतुन प्रश्न विचारतात तो सीन प्रोमोत दाखवला होता. एपिसोडमध्ये दाखवला का?>>>>> माझी यातली सुरुवात गेल्याने ते मलाही पहायला मिळाले नाही.
मुडदे काय सांगाडे काय. आण्णा
मुडदे काय सांगाडे काय. आण्णा नाइक काय दरोडेखोर की डॉन होते.
मुडदे काय सांगाडे काय. आण्णा
मुडदे काय सांगाडे काय. आण्णा नाइक काय दरोडेखोर की डॉन होते.
अरेरे काय चाललंय, स्मायली
अरेरे काय चाललंय, स्मायली क्विनांनो (राण्यांनो), स्मायलीज टाका बघु छान छान. जरा बघायला जोश येऊदे
. भाऊकाकांचं व्य.चि आणि स्मायली हेच धमाल आणतील ह्या धाग्याला.
भुयारातनां येताव हां.. जपून
भुयारातनां येताव हां.. जपून र्हावा.

भारीच ग. अगदी two मिनिट्स हा,
अण्णानूं ह्या बरा न्हाय
अण्णानूं ह्या बरा न्हाय केलावं. चला माझ्यावांगडा... ही ही ही ....
Pages