Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती एका लग्नाची तिसरी गोष्ट
ती एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे होती का? धना की घना (प्रेग्नंट अस्ते ती)? उमेश कामत च्या देखाव्यातल्या फॅमिलीतली वहिनी?
हो बहुतेक ती धनाच असावी.
हो बहुतेक ती धनाच असावी. अंजू, मला पण जास्त पहाता आली नाही ही मालिका ( सौभाग्यवती) त्यामुळे लक्षात नाही. पण रावी म्हणतेय ती आणी ही सौभाग्यवती सिरीयल येता-जाता कधीतरी पाहिल्या गेल्यात.
तु गुंतता हृदय हे बघितली
तु गुंतता हृदय हे बघितली होतीस का, मला त्यातलीच ती लक्षात येतेय. पल्लवी सुभाषची मैत्रीण गौरी, तिने फार सुंदर काम केलं होतं.
होती बहुतेक ती उमेशच्या सिरीयलमध्ये, तिची आणि संदेश कुलकर्णीची जोडी होती.
हो, ती पण बघीतली होती, पण मला
हो, ती पण बघीतली होती, पण मला चेहेरे पट्कन लक्षात रहात नाहीत.:अरेरे: त्यातल्या त्यात तिसर्या लग्नाची गोष्ट थोडी अलीकडली म्हणून आठवतेय.:स्मित:
http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=4626551&TPN=7 हीच ना दत्ताची सौ?
आणी वरच्या लिंक मध्ये फोटो
आणी वरच्या लिंक मध्ये फोटो च्या वर स्नेहाच्या सौभाग्य आणी एका लग्नाची या दोन्ही सिरीयलचा उल्लेख आहे.
हो हीच ती. एकदा आमच्या
हो हीच ती.
एकदा आमच्या माधवीने, दत्तांच्या फोटोना like केलं होतं तेव्हा मला ते दिसलं माधवी माझी fb फ्रेंड आहे म्हणून त्यावरून मला कळले हे दोघं नवरा-बायको आहेत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/48848?page=2
यात प्रचि क्र. ४५ मध्ये स्नेहा माजगावकर आणि सुहास शिरसाट आहेत.
कोणी "डिस्को सन्या" च्या
कोणी "डिस्को सन्या" च्या "चिन्गा बुन्गा" गाण्यामध्ये दत्ताला नाचताना पाहिले आहे काय?
ठोकळीचं एक बरं आहे, जरा स्वतः
ठोकळीचं एक बरं आहे, जरा स्वतः चा टीआरपी कमी झाला, की लगेच मुंबईला जायची टुम काढते. आत्तापण सगळे जेंव्हा माईंचा पोकेमॉन गो चा खेळ बघत होते, तर हिने मुंबईला जायचं टुमणं लावलं ................
माईंचा पोकेमॉन गो चा खेळ
माईंचा पोकेमॉन गो चा खेळ >>>>>>:हहगलो:
(No subject)
सुसल्याचो पत्ता कट झालो. आता
सुसल्याचो पत्ता कट झालो.
आता शेवंता बदला घेणार काय?
माका वाटतय की माईच हे सारे करताव. पण माझ्या साबा म्हणाल्या की सुसल्या चांगलीच ताकदवान आहे, माईंना ती जुमानणार नाही, पण मागे सरीताबरोबर माईंची धिंगामस्ती बघीतली त्यावरुन वाटल की माईंना हे सहज शक्य आहे. एकतर त्या वेडाच्या भरात हे करत असतील, नाहीतर वेड्याचे सोंग करुन बदला घेत असतील म्हणजे त्यांच्यावर कोणी संशेव घेणार नाय.
<< पण मागे सरीताबरोबर माईंची
<< पण मागे सरीताबरोबर माईंची धिंगामस्ती बघीतली त्यावरुन वाटल की माईंना हे सहज शक्य आहे. >> हो, त्या 'लिंक'मधे त्याना नाचताना बघूनही ही शक्यता दुणावते !
नाही ग रश्मी, ती लपून बसली
नाही ग रश्मी, ती लपून बसली आहे ना?
ती विहिरीतली सुशल्या भावली
ती विहिरीतली सुशल्या भावली वाटत होती... माईंचे आणि इतरांचे मनाचे खेळ किंवा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विश्वासराव हे सगळं करत असणार... मालिकाभर सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा दाखवायच्या आणि शेवटच्या काही भागात ते सगळं कस खोटं असतं ते भासवायचं...
निलीमा तर डे वन पासून हेच
निलीमा तर डे वन पासून हेच सांगतेय.
क्रमश: भाग २ मधे
क्रमश: भाग २ मधे
भाग - २ क्रमश: भाग - ३ मध्ये
भाग - २
क्रमश: भाग - ३ मध्ये
सुहास जी कोणेत?
सुहास जी कोणेत?
भाग ३ क्र्मश: भाग ४ मध्ये
भाग ३
क्र्मश: भाग ४ मध्ये
अग सस्मित हे सुहास जी (
अग सस्मित हे सुहास जी ( गोखले) हे मायबोलीकरच् आहेत, ते के पी पद्धतीने ज्योतिष्य बघतात. वर लिहीले आहे बघ त्यांनी पुढीलप्रमाणे -: "सहज विचार आला, या मालीकेच्या लेखक – निर्माता असा वाद झाला , लेखक पुढ्चे भाग लिहून द्यायला तयार नाही किंवा अन्य कारणामुळे लेखक आता पुढचे भाग लिहण्याच्या स्थितीत नाही असे असताना ही मालीका संपवायचे (चांगल्या अर्थाने) कंत्राट मला (किंवा कोणा दुसर्याला) मिळाले तर.? .. त्या अंदाजाने ह्या कथेचा उलगडा असा होईल ... मी काही कड्या जोडून दाखवतो बाकीच्या जोडायला जमतात का ते पहा, शक्यतो आत्ता पर्यंत मालिकेत जे दाखवले त्याचाच आधार घ्यायचा आहे ..."
सुहास छान लिहीले आहे तुम्ही. कारण इतक्या सहजासहजी हे प्रकरण सुटणार नाही असे वाटतेय. पण कालच्या भागात सुषमा, जी मेली आहे असे माईंना वाटते आहे, ती आजच्या भागात येणार आहे. तशी काल झलक दिसली. पण प्रेक्षकांना बरीच उत्सुकता असल्याने कधी माई, कधी दत्ता, तर कधी सुषमा, तर कधी नाथा-यमुना हे कल्प्रिट वाटतात. पुढे बघु काय होते ते. तुमचे बरेच अंदाज मस्त वाटले, विशेषतः भुयार आणी अण्णांबाबत.
भाग - ४ क्रमश: भाग - ५ म
भाग - ४
क्रमश: भाग - ५ म
सुहासजी ग्रेट आहात . खरतर २ च
सुहासजी ग्रेट आहात . खरतर २ च भाग वाचले आहेत.
बाकीचे नंतर वाचते पण जे दोन भाग वाचलेत त्याकरता अगदी साक्षात दंडवत वगैरे
>>ती विहिरीतली सुशल्या भावली
>>ती विहिरीतली सुशल्या भावली वाटत होती...
बाहुलीच होती ती. चॅनेलवर जे टिकर दिसतं त्यात पुढच्या भागाबद्दल आधीच सांगतात. त्यात असं काहीसं लिहिलं होतं की 'विश्वासरावला हुलकावणी देऊन सुषमा नाईकवाड्यात येणार'. आता टिकर दाखवताहेत की 'भास-आभासाच्या खेळात विश्वासरावही अडकणार'. आता त्याला पण आण्णा दर्शन देणार वाटतं.
मला तर ती पोकेमॉनची पोस्ट वाचल्यापासून माईंनी 'गो....' म्हणून हाक मारायला सुरुवात केली की ह्या पुढे 'पोकेमॉन' असं म्हणतात का काय असं वाटतं.
काल सुषमा पण तोच खेळ खेळून आली असेल. मोबाईल आहेच तिच्याकडे.
अभिराम रणजित विश्वासरावला
अभिराम रणजित विश्वासरावला विश्वास का म्हणतो काय माहित. रणजित म्हणायला पाहिजे. असो. काल त्याने त्या सेठला मस्त टरकावलं. हा आपला सरळ जिने चढून वर जायला निघाला होता. मॅनरलेस माणूस! परस्पर निघून गेला तर बरंच आहे. मला तर सुषल्या विश्वासरावच्या सांगण्यावरून नाई़कांना उचकवतेय असा दाट संशय आहे. काल निलिमाची पण छान जिरली. म्हणे लॉयर हायर करू. खायचं काम आहे का कोर्ट कचेरी म्हणजे? त्यातून माधवचा काही उपयोग नाही.
दागिने चोरून श्रीमंत व्हायचं यमुनेचं लॉजिक मला काही कळलं नाही. ते विकायला गेलं की पोलिस धरणार नाहीत का?
<< दागिने चोरून श्रीमंत
<< दागिने चोरून श्रीमंत व्हायचं यमुनेचं लॉजिक मला काही कळलं नाही. ते विकायला गेलं की पोलिस धरणार नाहीत का? >> खेड्यांमध्ये असे चोरलेले दागिने विकत घेणारे बरेच दुकानदार असतात. (अर्थात शहरांमध्ये पण असतात पण खेड्यांत जास्त).
काल प्रोमोमध्ये दाखवत होते की
काल प्रोमोमध्ये दाखवत होते की विश्वासराव आणि अभिराम नेने वकिलांच्या ऑफिसात शोधाशोध करतात. अभिरामला त्याने तिथे कसं नेलं? अभिराम त्याचा मित्र असला तरी सामान्य नागरिक आहे, पोलिस नाही. आणि त्याच्या कुटुंबाचे नेनेंसोबत वाद होते हेही विश्वासरावला माहित आहे.
काल आर्चिस कशाला एव्हढा उकळत होता काय माहित? ह्या मुलाला कधी अभ्यास वगैरे नसतो का? मुळात हा परत गावी आलाच का? एकट्याने शहरात राहण्याएव्हढा मोठा तो नक्कीच आहे.
विश्वासरावला अजून कोणी
विश्वासरावला अजून कोणी म्हणालं नाहिये की तुझ्या अंगार्याचा माईवर काही परिणाम झाला नाही. कोणी बोलणारही नाही म्हणा.
काल आण्णा काय झाडाखाली उभे राहून शेवंता तयार होऊन खाली यायची वाट बघत होते का? अर्थात विश्वासरावने दोन-दोन वेळा जतीनशेठला त्याचं वर्णन करून सांगितल्याने त्याला भासही झाला असेल. विश्वासरावला अण्णा दिसले तर बात कुछ और है. बाकी नाईकांच्या घरात एव्हढी माणसं येतात का की जतीनशेठ कोण आहे ते सरिता आणि दत्ताला आठवू नये?
अभिरामचा मित्र म्हणून विश्वास
अभिरामचा मित्र म्हणून विश्वास राव घरांत राहिला आहे. त्यामुळे, ' मीं खूनाच्या चौकशीसाठी आलोय म्हणून ह्या घरांत मीं सांगेन तसंच होईल ', हें पटत नाही व त्या बाबतींत तरी मीं निलीमाशीं सहमत आहे. साधी घराची झडती घ्यायलाही पोलिसाना वॉरंट आणावं लागतंच ना ! [ शिवाय, नेनेवकीलांचा खून होण्यापूर्वीच तो नाईकांकडे रहायला आला अहे , हेंही तो विसरतोय !]. नाईक हे आरोपी नाहीयेत [ अजून तरी]. त्यामुळे, त्यांच्या घरावर पाळत ठेवणं, घरातल्यांची व त्यांच्याकडे येणार्यांची चौकशी करणं ठीक आहे पण घरातच मुक्काम ठोकून अशी दादागिरी एक पोलिस ऑफिसर म्हणून करणं अयोग्य व आक्षेपार्ह आहेच आहे.
भाऊकाका.. +१. विश्वासराव पण
भाऊकाका.. +१.
विश्वासराव पण अंगारे लावायला लागला का???
Pages