सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
जिप्सी वाढदिवसाच्या
जिप्सी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिसली का?
हॅप्पीवाला बड्डे जिप्सी!!
हॅप्पीवाला बड्डे जिप्सी!!
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दीक
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा....
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा योगेश... बर्याच वर्षांनी तिथी पण तिच आलीय ना ?
जिप्सी वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिप्सी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिप्सी वाढदिवसाच्या लाख लाख
जिप्सी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जिप्सी तू कसे टाकलेस फोटो इथे? अजून वेगळ्या पद्धतीने टाकता येतात का फ्लिकर सोडून. आधीचे पिकासावरचे आहेत त्यामुळे काही जणांना दिसत नाहीत.
अजून वेगळ्या पद्धतीने टाकता
अजून वेगळ्या पद्धतीने टाकता येतात का फ्लिकर सोडून>>
गुगल अर्काइव्हज मधे उजव्या हाताला मॅनेज इन गुगल फोटोजचा ऑप्शन येतो आहे. ते सिलेक्ट केल्यावर आपण नव्या ठिकाणी जातो. तिथे उजव्या हाताला शेअर अल्ट्चे ग्लिफआयकॉन आहे. तो क्लिक केल्यास गेट अ लिंक हा पर्याय दिसतो त्या ऐवजी पहिल्या वेळेस new shared album आणि नंतर add to shared album. हे पर्याय निवडायचे. आपल्याला हवा तो फोटो ह्या shared album मध्ये टाकला की त्यावर right click करून image address copy करायचा जो इथे इमेज उपलोड विंडो मध्ये टाकून इमेजची हवी ती लांबी / रूंदी ठरवून इमेज अपलोड करायची.
हे फोटो मात्र कधी कधी सफारी वर दिसत नाहीत. आयफोन वरून दिसतात पण आयपॅडवरून दिसत नाहीत.
ओह. पण इथल्या इमेज अपलोड
ओह. पण इथल्या इमेज अपलोड मध्ये टाकला की काही दिवसांनी ते फोटो गायब होतात. मी पूर्वी इथुनच अपलोड करायचे माझे बरेच फोटो गायब झाले जुने.
नि.ग. ग्रुप बरोबर एक शेयर
नि.ग. ग्रुप बरोबर एक शेयर करायचे आहे. काही नि.ग. माबोकर व इतर निसर्गग्रुप एकत्र येऊन उरण-चिरनेर येथील एक सर्पमित्र जयवंत ठाकुर यांना लॅपटॉपची मदत केली आहे.
श्री जयवंत ठाकुर हे परीसरातील अनेक संकटात पडलेल्या सापांची सुटका करुन त्यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना पुन्हा जंगलात सोडून त्यांना जीवनदान देतात. तसेच सर्पपीडीत व्यक्तिंनाही हॉस्पीटल मध्ये नेणे, कोणत्या सापाचा दंश आहे ते सांगणे अशा गोष्टींसाठी मदत करत असतात. शाळांमध्ये व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सापांविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांना लॅपटॉप ची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांना ही मदत देण्यात आली. जयवंत ठाकुर हे फ्रेंड्स ऑफ नेचर ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
जयवंत व त्यांच्या संस्थेच्या माहीतीवरील लेख मी लवकरच टाकेन.
योगेश, वाढदिवसाच्या खूप खूप
योगेश, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

जिप्सी, सरिवा, दोघांचे ही फोटो दिसतायत . मस्त फोटो .>>>>>>>>+१
मला जागू, टीनाने टाकलेले फोटो दिसत नाहीयेत.>>>>>>+१
वर्षू, मी पिसीवरून अप्लोड केलाय फ़ोटो.
जिप्सी , वाढदिवसाच्या खूप खूप
जिप्सी , वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेकोत्तम आशीर्वाद !
वा शोभा सुंदर फोटो. पीसि
वा शोभा सुंदर फोटो.
पीसि वरून म्हणजे मायबोलीच्या इमेज विन्डॉ मधुनच ना? तेच थोड्या दिवसांनी गायब होतात.
तेच थोड्या दिवसांनी गायब
तेच थोड्या दिवसांनी गायब होतात.>>>>>>>.हो का? हे माहितच नव्हतं मला.
Happy B'day जिप्सी शोभा१,
Happy B'day जिप्सी
शोभा१, फुल कसलं भारी दिसतय!! आधी मला वाटलं vanilla and raspberry केक आहे!!
जिप्सी,वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
फोटो मस्त आलेत
फोटो मस्त आलेत
क्रूष्णकमऴ कसे लावतात माहिती
क्रूष्णकमऴ कसे लावतात माहिती हवी होती
कोणाकडे कृष्ण्कमळ असेल तर
कोणाकडे कृष्ण्कमळ असेल तर त्याच्या बाजूला रोपे येतात. फांदीही जगते असे ऐकले आहे. आणि आजकाल नर्सरीत बर्याच व्हरायटी मिळतात कृष्णकमळच्या.
जागू धन्यवाद. माझ्या मुलीनी
जागू धन्यवाद.
माझ्या मुलीनी वेगळ्या रंगाचे कृष्ण्कमळचे रोप विकत आणले आहे. आज तिला जांभळ्या रंगाचे झाड दिसले त्याची फांदी आणली आहे. जाईच्या वेला सारखी गाठ करुन लावतात की कसे ? अशी माहिती हवी होती.
हा आमचा बोका 'बिट्या'.
हा आमचा बोका 'बिट्या'.
(No subject)
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!!!!
मस्त बिट्या आणि जास्वंदही..
मस्त बिट्या आणि जास्वंदही.. कलर अगदी मॅचिंग दोघांचे !!!
हा आमचा बोका 'बिट्या'.>>>>
हा आमचा बोका 'बिट्या'.>>>> काय मस्त आहे हो बिट्या!
फोटो सर्वच सुंदर. बिट्या
फोटो सर्वच सुंदर. बिट्या भारी.
मस्त गप्पा फोटो.. माझ्या
मस्त गप्पा फोटो..
माझ्या मुलीनी वेगळ्या रंगाचे कृष्ण्कमळचे रोप विकत आणले आहे. आज तिला जांभळ्या रंगाचे झाड दिसले त्याची फांदी आणली आहे. जाईच्या वेला सारखी गाठ करुन लावतात की कसे ? अशी माहिती हवी होती.+++ हो जाईच्या वेला सारखाच लावायचा..:) छान पसरतो.. साधारण जुन ते डीसेंबर फुलांचा काला॑वधी असतो...
माझ्या कडे एका मोठ्या कुंडीत आहे, जुन पासुन रोज ३, ४ फुलं देतोय...
(No subject)
धन्यवाद सायु आणि जागू .
धन्यवाद सायु आणि जागू .
दिड दोन वर्षांपूर्वी
दिड दोन वर्षांपूर्वी लिंबाच्या काही बिया कुंडीत घातल्या होत्या. यथावकाश त्याला कोंब फुटून त्याचे झाड झाले. वाढलेही छान. अर्धा एक फुटाच्या चार पाच फांद्या झाल्या. पानेही छान तुकतुकीत.. दुमडली तर लिंबाचा मंद वास असलेली.
एक दिवस कुणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. एक एक पान कुरतडलेले दिसत होते. काही कळेना कशाने झाले. पण सोडून दिले. मग कधीतरी नीट निरखून पहाताना, काही पानांच्या मागे ट्रान्स्परन्ट पांढऱ्या रंगाचे रिकामे कोष दिसले. म्हणजे फुलपाखरे उडून गेली होती.
आत्ता मला कळले ती कुणाची दृष्ट नव्हती.... तो कुण्या फुलपाखराने शोधलेला निवारा होता. आता मला शोध घ्यायचा होता त्या फुलपाखराचा....
आठ दहा दिवसापुर्वी एक थोड्या मोठ्या आकाराचे काळ्या रंगाचे एकच केशरट ठिपका असलेले फुलपाखरू झाडाभोवती भिरभिरत होते. झाडाचे निरीक्षण केले खरे, पण काही अंदाज आला नाही. परवा मात्र त्याच झाडावर एक फुलफखाराची अळी दिसली. काही पाने कुरतडलेली दिसली. चला म्हणजे पुन्हा चक्र सुरु झाले. आता नजर ठेऊन राहावे लागेल.
घरी जाईपर्यंत रात्र होते, त्यामुळे शनिवारपर्यंत थांबावे लागेल. आता त्या लिंबाच्या झाडाला फळे नाही आलीत तरी चालतील.
लिंबाच्या झाडाला फुलपाखरे
लिंबाच्या झाडाला फुलपाखरे आली... असे म्ह्णणाल तेव्हा मात्र फोटो हवाच .
Pages