निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आल्याचं फुल प्रथमच बघतेय.
आल्याला फूल येत हेच नव्हतं माहित मला .

जो, सुंदर फोटो.. आणखी फुले आली कि परत फोटो हवा बरं का !

सारीका, जिथे शीट पडते तिथे रिकामी कुंडी ठेवून पहा. ती भरली कि बाजूला करून त्यात मातीची भर घालून झाड लावता येईल.

ते अजूनही तिथेच आहेत म्हणजे त्यांना ती जागा सुरक्षित वाटतेय, शिवाय तूम्हा मंडळींवर विश्वासही बसलाय त्यांचा.

दिनेशदादा, कुंडी नाही ठेऊ शकत कारण मुख्य दरवाजासमोर होइल येता जाता अडथळा होणार सध्याचा उपाय रात्रि एक पेपर किंवा प्लास्टीक शिट अंथरणे पण बर्‍याचदा ते लक्षात रहात नाहीच Sad

सारीका, दरवाजाचा आणि तो बल्ब आणि घरटं दोन्ही दिसतील असा एक फोटो इथे टाका
काहीतरी जुगाड नकीच करता येइल. (घरनंबर आणि नेमप्लेट दोन्ही ब्लर करून फोटो टाका हवं तर, privacy जपण्यासाठी.)

आल्याचं फूल मस्त. कधी बघितलं नव्हतं Happy

विदुषी इरावति कर्वे, यांचे निबंध वाचत होतो... त्यात काही मजेशीर ( माझ्यासाठी नवीन ) उल्लेख वाचले.

अगदी पुर्वी एखाद्या स्त्रीला जूळे झाले तर तिला व्याभिचारिणी ठरवले जात असे, कारण एकाच संबंधातून जूळी मुले होऊ शकतात हेच समाजाला मान्य नव्हते ( त्यापुर्वी तर अपत्य जन्मात पुरुषाचा सहभाग लागतो, हेदेखील माहीत नव्हते )

आता तूम्ही म्हणाल काहितरीच काय ...
तर हा सबंध थेट महाभारतात आहे. माद्रीचे, नकुल आणि सहदेव जुळे होते आणि या कारणास्तव कुंतीचा तिच्यावर संशय होता.. आणि रामायणाचा काळ तर त्याहूनही जुना... लव आणि कुश हि जुळेच...

आता इरावति बाई लिहितात म्हणजे त्यामागे त्यांचा अभ्यास असणारच. ( त्या मानववंश शास्त्रातल्या विदुषी होत्या. )

मी २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर तसेच २२ किंवा २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर मुंबईत असणार आहे. मला ह्यावेळी निगकरांना नक्की भेटायचे आहे. मला वाशी, कुर्ला किंवा मुंबईत कुठेही भेटायला जमेल.>>>>>२७ ते ३० ऑक्टोबर बहुतेक सगळे दिवाळीत बिझी असतील, सो २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान गटग फिक्स करूया का? Happy

>२७ ते ३० ऑक्टोबर बहुतेक सगळे दिवाळीत बिझी असतील, सो २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान गटग फिक्स करूया का? २३ कींवा २४ चालेल. २५ ला रात्री माझा परतीचा प्रवास.

वेळ , ठिकाण तुमच्या सोयीने ठरवा.

हाय..नलिनी...... वेलकम होम!!!!! Happy

ऑक्टोबर मधे कदाचित पुण्यात असेन.. पण एंड नोवेंबर जमेल नक्कीच..

लूकिंग फॉर्वर्ड टू सी यू

धन्यवाद मित्रानो

आणखी फुले आली कि परत फोटो हवा बरं का !>>> हो टाकतोना

सोनटक्या प्रमाणेचे कळीचा गाभा दिसतो आहे आल्याचा>> हो तसाच दिसतो अगदी , थोडा लहान असतो फक्त

मस्त फोटो! शिंपी पक्ष्याचं घरटं मस्तच!!!

मेधा, गणपतीच्या सजावटीतल्या फळांचा हा क्लोजपः
20160921_092021
(याचं नाव मैत्रिणीलाही आठवत नाहीये.)

आल्याचं फूल मस्त. हे माझ्याकडे एकदा आलं होतं. ह त्याचा ब्लॉगवर टाकलेला फोटो:

हे वाचा :
http://prahaar.in/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B...

"आमच्या मुलुखात गणपतीची माटवी सजविण्यासाठी ‘कांगले’ लागतात. एका जातीच्या रानवेलीला आलेल्या सुंदर आणि चिमुकल्या फळांचे हे तांबसर हिरव्या रंगाचे हे घोस माटवी सजवतातच. पण त्याचबरोबर ‘ज्योतिष्मती’ नावाच्या एका बहुगुणी अशा औषधी वनस्पतींची ओळखही घडवून आणतात. तीच गोष्ट लालभडक, पण आकर्षक असलेल्या ‘कवंडळे’ नावाच्या फळांची. "

>>माझे बाबा त्याचे नाव "कांगण्यो" असे सांगत आहे>>
बरोबर आहे. याला माळकांगुणी माळकांगोणी म्हणतात.
Celastrus paniculatus गुगलून पहा

vt220, शोभा, आदिजो, तुम्ही ग्रेट आहात सगळे! त्या फळांचं झाड कसं असतं, फुलं / पानं कशी आहेत, नाव काय काहीच माहित नव्हतं त्यामुळे गुगल सर्च पण शक्य नव्हता. पण नुसत्या फळाच्या फोटोवरून लगेच इथे माहिती मिळाली!!! या बिया रुजवण्याचा प्रयत्न करून बघते.

तुम्ही ग्रेट आहात >>>>>>>>..अग, मी ग्रेट वगैरे नाही. कोकणात बालपण गेल्याने, नाव आठवत होतं. पण बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी, गुगलला कोकणाचं कोड घातलं तेव्हा हे मिळालं. मला स्वत:ला काही माहित नसतं. Happy

मालकांगोणी म्हणजे ज्योतिष्मतीबद्दल माहिती होती,पण वनस्पती पाहिली नव्हती!धन्यवाद गौरी. ही मेधावर्धक आहे.

ह्या वर्षी मी पहिल्यांदाच गणपतीला गावी असल्याने कोकणातली सजावट बघितली. सोनसळी, सरवड, कळलावीच्या फुलांनी सजवलेल्या मांडण्या बघितल्या. हिरवागार कोकण बघितला. आमच्या कातळाच्या जागेत फुललेले मिनी कास बघितले... काही फोटो मोबाईलवर काढलेले...

गणपती

वहीणीने केलेली गौरी आणायला जातानाची तयारी

दारासमोरील शेत

मंदिरातून दिसणारे शेत

भरलेले दाणे

मिनी कास १

मिनी कास २

मिनी कास ३

दवबिंदू

सकाळच्या कोवळ्या उन्हात चमचम

Pages