निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालेल्या नुकसानावर रडत न बसता त्या गोष्टीकडे कानाडोळा करुन परत घरटे रचण्याचं कसब यांच्याकडून शिकावं. >> +१

खरेच, एखादे मिशन अंगावर घेतल्याप्रमाणे हे घरटे बांधणे ते पिल्लाना वाढवणे.. करतात पक्षी.

घरटे बांधताना, पाऊसपाण्याचा अंदाज, सुरक्षितता, खाद्याची उपलब्धता.. एवढा सर्व विचार करतात पण मग कोकिळेसारखे काही पक्षी जी अंडी घालतात, त्या पिल्लाना वाढवताना मात्र केवळ वात्सल्य एवढीच भावना असते. ते पिल्लू डांबरट असते, इतर पिल्लांवर हल्ला करते.. पण त्याला वाढवण्यात कुठलीच कसूर केली जात नाही. कधी कधी तर भरवणार्‍या आईबाबांपेक्षा पिल्लू मोठे असते. त्याची भूकही मोठी असते, पण त्याची भूक भागवण्यात कधीच कुचराई केली जात नाही.

समुद्री अशोकाचे बॉटनिकल नाव काय? (गावठी बदामासारखी पाने आणि लांब केसर असलेले सफेद मोठे फूल.)
समुद्रशोक नावाची एक वेलही असते.निळी तुतारीसारखी मोठाली फुले येणारी. Argyreia Nervosa.
समुद्र अशोक शोधायला गेले तर ही वेलच दिसते.

पुण्यात राजाराम पुलाकडून म्हात्रे पुलाकडे जाणार्‍या नदीशेजारच्या रस्त्याला सॉसेज ट्रीची झाडं आहेत बरीच ... काल या रस्त्याने गेले तर मस्त फळं लटकत होती या झाडांवर. फोटो काढलाय, पण पिकासा चालत नाही त्यामुळे टाकता येत नाहीये Sad फ्लिकरवर नवं खातं उघडणं सोडून दुसरा काही पर्याय नाही का फोटो टाकण्यासाठी?

गौरी, याहू वर अकाऊंट असेल तर फ्लीकर वर वेगळे उघडायची गरज नाही. तशी मायबोलीवरही डायरेक्ट सोय आहे, पण साईझची मर्यादा आहे.

हीरा, त्या वेलीला मर्यादावेल पण म्हणतात ना, खरे तर तेच नाव जास्त समर्पक आहे.

टिनाचा पक्ष्यांचा किस्सा वाचून माझा तसाच अनुभव आठवला. एकदा
घरी लौकर जायचं म्हणून हपिसातनं ५ वाजता निघाले होते. आणि नेमक्या trains रखडल्या. अर्ध्या तासाच्या train journey ला जवळ जवळ दीड तास लागला.
जाम वैताग वैताग झाला होता. बाहेर लक्ष गेलं तर ट्रॅक च्या आजूबाजूला UK ची typical डेझी फुलं वार्‍यावर डोलत होती. पांढर्‍या पाकळ्या आणि मध्ये पिवळी तबकडी. वर निळं आकाश. वर्षातून फक्त २-३ आठवडे ही डेझी फुलतात. तेव्हढं आयुष्य आनंदाने , समाधानाने जगतात. उन्हापावसाची
कशाकशाची तक्रार करत नाहीत.
माझी trains विषयीची चिडचिड एकदम कमी झाली.

धन्यवाद मनी मोहोर आणि दिनेश. मर्यादा वेल हे नाव ऐकलं होतं पण हीच ती वेल हे माहीत नव्हतं.
पण बॅरिंग्टोनियाच्या तीनही प्रजाती(अ‍ॅक्यूट अ‍ॅंग्युला, रॅसेमोसा, एशियाटिका)पैकी कुठलीच आपल्या समुद्रअशोकासारखी अगदी डिट्टो दिसत नाहीय विकीवर. थोडाफार फरक दिसतोय. त्यातल्या त्यात एशियाटिकाचं साधर्म्य दिसतंय.

सुलक्षणा, सुंदर अनुभव .. मी पण अशीच एकदा कोकण रेल्वे रखडलेली असताना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटला होता. दिवान खावटी स्टेशन जवळ एका खडकावरून धो धो पाणी वहात होते.

माझ्या सिटाउट मधे एक त्रिकूट येते. २ बुलबुल आणि एक शिंजीर. पूर्वीही असंच त्रिकूट यायचं ....हे काय असेल?>>>>>>>>

मानुषी, सीट आऊट हा शब्द ऐकला कि व्हरांड्यातल्या बसक्या कठड्यावर पाय बाहेर टाकून चहा पीत निवांत गप्पा मारत बसलेल्या मैत्रिणी नजरेसमोर येतात, फक्त माणसांनीच गप्पा माराव्यात का? पक्ष्यानि पण अशीच एखादि निवांत जागा हुडकली असेल ना?

सुप्रभात. माझ्याकडे फ्लिकर बॅन आहे. त्यामुळे मला एक पिकासाचाच आधार आहे. Happy फोटो छोटा कसा करायचा त्याचा अभ्यास करुन सांगते.

रानफुल आता भरपूर फुलायला लागली आहेत. रस्त्यानी येताना तेरड्याच्या बागा, लव्यांच्या बागा कुरडूच्या बागा फुललेल्या दिसतात मला. २० मिनिटांचा प्रवास अगदी नयनरम्य होतो ह्यामुळे.

वरती मर्यादावेलीबद्दल बोलणे चालले होते, त्याबद्दल थोडेसे.
Argyreia Nervosa म्हणजे मर्यादावेल नाही.
मर्यादावेलीचे शास्त्रीय नाव Ipomoea pes-caprae असे आहे. हिलाही गारवेलीसारखी निळी जांभळी फुलं येतात. ती त्याच कुळातली आहे. यातल्या लॅटीन pes-caprae चा अर्थ Goat's foot. गूगलवर Ipomoea pes-caprae ची पाने बघा, म्हणजे या नावाची गंमत कळेल.
आता 'मर्यादावेल' या नावाबद्दल. समुद्रकिनार्यावर, जी समुद्राच्या भरतीची काल्पनिक मर्यादारेषा असते, तिथे ही वेल वाढते. म्हणुन नाव मर्यादावेल!

Pages