निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांच्या गप्पा आणि प्रचि नेहमीप्रमाणेच मस्त!
सुलक्षणा,
तुम्ही पान क्र. २६वर रोपावरची कीड मारण्यासाठी खडा हिंग वापरण्यास सुचवले आहे. तो नक्की कसा वापरायचा ते कृपया सांगाल का? पूड करावी लागेल का त्याची? माझ्या वांग्याच्या रोपांवर पडलेल्या कीडीवर साबण + तेल+ पाण्याच्या मिश्रणाचा काही उपयोग नाही झालेला दिसला. हिंगाचे मिश्रण वापरून बघेन.

मस्त फोटो vt220! >> +१
ह्या दिवसात कोकण म्हणजे साक्षात् स्वर्ग धरेवर ! >>> अगदी

कोकण दर्शन मस्तच.
ह्या दिवसात कोकण म्हणजे साक्षात् स्वर्ग धरेवर ! >>> १०० Happy

सगळी कडे हिरवागार आणि फुलांनी रंगलेला निसर्ग! रान फुलं तर किती प्रकारची आणि विविध रंगांची असतात. मला कित्येक वर्षात हे सगळं पहाता आलेलं नाही. जीव तळमळतोय. Sad

मस्त फोटो vt220! >> +१००
देवळातून दिसणारं शेत खासच!+१
ह्या दिवसात कोकण म्हणजे साक्षात् स्वर्ग धरेवर ! >>> १००

सुंदर कोकण!!
श्रावणात पाऊस ठिक्ठाक झालेला असला, की आपल्याकड्ची गावं अगदी स्वित्झर्लंड सारखे सुंदर होऊन जातात!

चंद्रा, हिंगाचा अगदी छोटासा तुकडा - समजा हरभर्याच्या डाळीएवढा घ्या आणि साधारण अर्धा लिटरच्या स्प्रे बॉटल मधे कोमट पाणी, हिंगाचा तो खडा, एक छोटा थेंब गोडेतेल, एक चिमूट हळद मिक्स करा. हिंग विरघळला र्की पण्याचा वास घेऊन बघा. स्ट्राँग वास येत नसेल तर अजून थोडा हिंग घाला. मुद्द्याचा पॉइंट हा आहे की हिंगाचा *जरा* स्ट्राँग वास येणारं + जरा कोमट असणारं मिश्रण असलं पाहिजे. हे तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्प्रे करा.
दिनेशदा की जागूताईंचा नुस्खा होता हा? please comment.

जो_एस, भारीच!
vt220, सुंदर! मी पावसाळ्यापुर्वीचा कोकण पाहिला आहे. एकदा पावसाळ्यात जाण्याची इच्छा आहे.

धन्यवाद! अर्थात श्रेय पाउस, कोकणच्या निसर्गाचे!!

देवळातून दिसणारं शेत खासच! >>> माझादेखील तो फोटो आवडता आहे. खरतर तो फोटो शेअर करण्यासाठीच गूगल ड्राईव्ह वरून फोटो शेअर कसे करावे ह्याचे संशोधन केले! Happy

जो शास्त्रशुद्ध पक्षीनिरीक्षक पिल्ले असलेल्या घरट्याजवळ जाऊ नये असा सल्ला देतात. बऱ्याच पक्षीनिरीक्षणाला वाहिलेल्या फोरमवर घरट्याचे फोटो ban असतात. होप तुम्ही पुरेशी काळजी घेत आहात.

आल्याच्या फुलाचा फोटो सुरेख आहे.

एकदा पावसाळ्यात जाण्याची इच्छा आहे. >> जाच तुम्ही! परत परत जावे वाटेल! Happy मी इतक्यात दोन सफरी केल्या. गणपतीआधी आंबोली, गोवा, गोकाक केलेले... परत कासला जावे वाटते. Happy

ते पक्षी मला ओळखू लागले आहेत
उन्हाळ्यात त्यांच्या साठी झाडांवर पाणी नाही उडवलं तर माझ्या भोवती ओरडत उडत रहातात.

जो_एस.. ऑस्सम!!!!!!!! सुर्रेख.. स्टेप बाय स्टेप प्रगती विटनेस करायला मजा येत आहे

मानुषी, किती दिवसांनी ? छान वाटलं तुझी पोस्ट बघून .
फोटो टाकता येत नाहीत म्हणून येत नाहीस का इकडे ?

हो गं ममो...
आणखीनही बरीच कारणं ....संसारातली! :स्मित:...कशात ना कशात उगीचच बीझी!
दिनेश........:फिदी:

इथे बीबीसी ची लिंक दिली तर चालेल का? तिथल्या न्यूज चा भाग -
An image of a fan-throated lizard is the winning photo of the ZSL Animal Photography Prize 2016. The shot was captured in the Chalkewadi plateau in India by Pratik Pradhan. It was also chosen as winner in the Weird and Wonderful category.

पालीची नवीन प्रजाती आढळली
- -
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 - 01:45 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EBFBKU

Tags: sail, new species, pune
पुणे - जमिनीवर आढळणाऱ्या पालीची नवीन प्रजाती भारतात तब्बल 130 वर्षांनंतर आढळली असून, या प्रजातीच्या पालीला "सिरतोडक्‍टलस गिरी‘ असे नाव दिले आहे. ही पाल महाराष्ट्रातील अमरावती, चंद्रपूर, नांदेड, या परिसरात दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील "झुटेक्‍सा‘ या जर्नलमध्ये यावर आधारित शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अमेरिकेत विलोनोवा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या डॉ. ईशान अग्रवाल यांनी केलेल्या संशोधनात ही पाल नव्याने आढळून आली. या पालीला डॉ. गिरी यांचे नाव देण्यात आले असून, यापुढे पालीची ही प्रजाती ""सिरतोडक्‍टलस वरद गिरी‘ या नावाने ओळखली जाईल. पालीची ही दुर्मिळ प्रजाती पाला-पाचोळा असणाऱ्या जंगलात प्रामुख्याने आढळते. रात्रीच्या वेळी या पाली फिरत असतात, तर दिवसा ती दगडाच्या खाली किंवा लाकडी ओंडक्‍याखाली लपते. या पालीची लांबी साधारणत: सहा सेंटीमीटर लांब आहे. देशात आतापर्यंत जमिनीवर राहणाऱ्या पालींच्या जवळपास 22 प्रजाती आढळून आल्या आहेत. डॉ. अग्रवाल यांना या संशोधनात बंगलोर येथील राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रातील झिशान मिर्झा, अनुराग मिश्रा, मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे शौनक पाल आणि विलानोवा विद्यापीठातील ऍरान बौर यांनी सहकार्य केले आहे.

यापूर्वी देशात जमिनीवर राहणाऱ्या पालींमध्ये "कोलेगल ग्राउंड गिको‘ या प्रजातीची 1870मध्ये केरळात पहिल्यांदा नोंद झाली होती. त्यानंतर आता "सिरतोडक्‍टलस‘ प्रजातीतील ही पाल नव्याने आढळली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात आणि मध्य प्रदेशातही काही ठिकाणी, तर दक्षिण-पूर्व आशिया आणि श्रीलंका येथील काही भागात या प्रजातींतील पाली आढळून येतात, असे वन्यजीव संशोधक डॉ. वरद गिरी यांनी सांगितले. "सिरतोडक्‍टलस वरद गिरी‘ या प्रजातीची पाल यापूर्वीही अभ्यासकांना दिसून आली, मात्र तिला "कोलेगल ग्राउंड गिको‘ असे म्हटले जायचे; परंतु डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या संशोधक गटाने या पालीची गुणधर्मीय वर्गवारी आणि गुणसूत्रे (डीएनए) याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार ही पाल वेगळ्या प्रजातीतील असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिची नव्याने नोंद झाली, असे डॉ. गिरी यांनी नमूद केले.

Pages