निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभाच्या गुलाबांनी शोभा आलेय.
ममो नदी खुप सुंदर खळखळतेय.
घरच्या मिरच्यांचा आनंदच काही वेगळा.

हो शोभा, हिमाचल मधलाच आहे बियास नदी. >>>>>>>>>>विचारणारच होते, "बियास" नदी का? माझ्याकडेही हिचा फोटो आहे. Happy

सरिवा... कचाकच खायचो मी हि करवंद.. माझ्या गोव्यातल्या घराजवळच मोठे झुडूप होते.
आपल्याकडे गोड पदार्थात घालायची चेरी मिळतात ती यापासूनच करतात.

शोभा मस्त आलाय फोटो.

ही करवंद आम्ही ल्हानपणी केसात माळायचो. पहिला फोटो अगदी नथी सारखा वाटतोय.

आपल्याकडची पाकवलेली चेरी फसवी असते. खरी चेरी पण मिळते पाकवलेली, पण ती महाग असते.
पण हि फसवी चेरीच छान सुबक आकाराची असते !

सुप्रभात निगकर्स!

व्वा! सर्व फोटो आणि माहिती मस्त
आणि चेरीचर्चाचविष्ट! Proud
सध्या पाऊस थांबला की ( हो हो ....आमच्या नगरातही सध्या प्रचंड पाऊस) माझ्या सिटाउट मधे एक त्रिकूट येते. २ बुलबुल आणि एक शिंजीर. पूर्वीही असंच त्रिकूट यायचं ....हे काय असेल?
एक अडाणी प्रश्न.....मंडळी पिकासा बंद झालं का शेवटी? आताफक्त गुगल फोटो मधेच दिसतात सगळे .....पिकासावेब म्हटलं की गुगल अर्काइव्ज उघड्तंय....
इथे कसे डकवायचे ( डोकं खाजवणारी बाहुली)??????

.

मानुषी, कोकिळेसारखे इतरही काही पक्षी दुसर्‍या पक्ष्यांकडून अंडी उबवून घेतात.. तसे असेल काहितरी !

फोटो, माहिती सर्वच छान.

मैत्रीदिनाच्या सर्वाना शुभेच्छा.

नागपंचमीच्यापण शुभेच्छा.

मानु.. पिकासा नाही बंद झालंय..
तू गूगल प्लस डाऊन केलेलं दिसतंय.. त्यामुले तुला पिकासा दिसत नसेल.

तू पूर्ववत करून घे अल्बम्स पुन्हा. गूगल प्लस काढून टाक.

गूगल क्रोम मधे पिकासा वेब अल्बम दिसणार नाही. त्या करता इंटरनेट एक्सप्लोरर उघड.

बघते बै वर्षू... : संपूर्ण्पणे भंजाळलेली बाहुली: :डोक्याचं खोकं झालेली बाहुली:
How to run Internet Explorer on your iPad/iPhone (no jailbreak required)
Griffin Law 18,178 views....." टूशन " घेते आता!
एनीवे ठांकू ग.

मानुषी ताई, परवाच्या शनीवारी तुमच्या नगरात येऊन गेले, मेहेरबाबा आश्रमाला भेट दिली. मागे कधीतरी तुम्ही त्याचे फोटो टाकले होते तेव्हा पासुन येण्याची इच्छा होती. खरेच खुप सुंदर जागा आहे. परत निघावं असं वाटतच नव्हतं Happy

काय राव!! (खास नगरी संबोधन) स्निग्धा....आम्हीही काल सकाळी तिथे होतो. एक मेसेज टाकायचा ना. भेटलो असतो. रवीवार ऐवजी शनिवार केला असता

खरचं छान जमलं असत. पण झाल असं की शुक्रवारी संध्याकाळी भावाकडे गेलो होतो, सगळेजण जमुन १ दिवस तिथेच राहून गप्पा मारायचा बेत होता, आणि तिकडे गेल्यावर भावाने सांगितल की, गाडी बुक केली आहे, घरात बसून टाईमपास करण्यापेक्षा आपण सगळे नगर आणि आसपासचा परीसर फिरुन येऊ. मग काय, रांजणगांव, नगर, नेवासे, शनी शिंगणापूर, देवगडच दत्तमंदिर असं मस्त भटकून आलो. नगर म्हटल्या बरोबर मला तुमची आठवण आली पण फोन नं. नव्हता आणि इथे लॉगिन करुन तो घेण्या इतका वेळ झाला नाही Sad

सगळे एकत्र जमल्यावर गप्पा आणि हास्यविनोद, मुलांचा दंगा यातच वेळ जातो Happy

ओह्हो.. तर या गुलाब्बो करवंदांना चेरी म्हणून खपवायचे ?? काय डोकं आहे ना भारतीयांचं..

शेंगदाण्यांना गरिबांचे काजू म्हणणे, मिथुन ला गरीबांचा(प्रोड्यूसर) अमिताभ म्हणणे.. आणी करवंदाना चेरी म्हटणे.. Lol

जो एस खूप सुंदर फ्रेश फुलं.. आणी कॉबवेब तर भार्रीच नाजूक.. मस्तं आलेत फोटोज

ते पांढरे दगड , शिळा पाहूनच हिमाचल लक्षात येतो.:)

गुलाब, घरच्या मिरच्या.. अप्रतिम!!

स्निग्धा फोटो छान.

मेहेरबाबा राहिलंच आमचं बघायचं. शिर्डी आणि देवगडला बरेचदा जाणे व्हायचं. देवगड सुंदर परिसर.

सुप्रभात निगकर्स....कुठे आहात ?
मला लिखाण करून फोटो टाकायचेत. दोन्ही तयार आहे. फोटो कसे टाकायचे कळत नसल्याने Angry
वा स्निग्धा
छान फोटो!

मानुषी, फ्लीकर वर नवीन खाते उघडून फोटो टाकता येतात. नॅव्हीगेशन जरा वेगळे आहे पिकासापेक्षा पण थोड्या प्रयत्नाने जमतेय. लिंक तशीच देता येते. फक्त प्रॉब्लेम असा आहे कि काही लोकांना ते फोटो दिसत नाहीत.

ह्म्म्म्,म,
बघू ....
आजही ते तीघे परत आले होते. १ शिंजीर आणी २ बुलबुल.
उद्या त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करीन

घरी असलेल्या काळ्या अंगुराच्या वेलीवर एका वटवट्याने घरटं बांधल..
काही दिवसांनी ते पूर्ण मोडलेलं दिसलं मला.. कुठल्या प्रिडेटर पक्ष्यासोबत झटपट झाली असेल अथवा लिझार्ड कुळातील एखाद्यासोबत.. कारण खाली फुटलेली अंडी आढळली.. उगा जीवाला हळहळ Sad

आज तो वटवट्या परत ते घरट विणताना दिसला..

झालेल्या नुकसानावर रडत न बसता त्या गोष्टीकडे कानाडोळा करुन परत घरटे रचण्याचं कसब यांच्याकडून शिकावं.
लेट इट गो असं म्हणनं आपल्याला इतकं सोप्यारितीने जमलं असतं तर किती बर झाल असत अस राहुन राहुन वाटतं..

चलो...हॅप्पी फॉर हिम.. Happy

टीना, खरंच निसर्गासारखा गुरू नाही. वटवट्याने अंडी वाचवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. ती नाही वाचवता आली म्हटल्यावर पुन्हा नवं घरटं बांधायला सुरुवात!!! माणसाला आयुष्यात एखाद घर बांधणं आणि एक - दोन मुलं वाढवणं पुरून उरतं Sad

Pages