Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्राव्होनी घेतलेला कॅच जास्त
ब्राव्होनी घेतलेला कॅच जास्त जबरी होता.. फॉलो थ्रू मध्ये .. बॉल बुंगाट येतो समोरुन तेव्हा पूर्ण जजमेंटनी हात मधे घालवा लागतो..
मी ती गोष्टि डोक्यात ठेवल्या
मी ती गोष्टि डोक्यात ठेवल्या - reaction time, reflex, presence of mind.
1. Relay catch : Enough reaction time for Watson, Weise shows sharp reflex in short reaction time. Watson shows good presence of mind to throw ball in the air albeit, throw was bit wayward which forces Weise to work harder than it should have been. In other words, there was less synchronization between two than typical relay catches are showing this year (of course they play for different domestic teams and hence may not be familiar with each other)
2. Kohli's catch : Had to cover quite a few distance on dipping ball. Had to put in drive and ensure fingers slide below ball. Everything is normal until this point as any good fielder would have done the same. What happens from this point on is noteworthy. He shows good reflex in short reaction time (not to mention weird body position) to catch the ball which has slipped from his hand, showing enough presence of mind to roll fingers around it to ensure that ball does not touch ground. Throw in his injured hand for additional marks.
3. Rain's catch : Shortest reaction time (though not as short as typical slip catch where ball comes at body directly), superb reflex to go for catch with his stronger hand.
I think Kohli's catch score points on all 3 aspects I was looking at, after first attempt makes it better catch than other 2 for me.
तात्या, कार्थिक चा रन आऊट पाहिलात का आत्ताचा ? बोल्ट चा थ्रो स्टंपच्या बेस पाशी होता. काल हेच सांगायचा प्रयत्न करत होतो.
गुजरातने १६०+ मजल मारली ! नॉट
गुजरातने १६०+ मजल मारली ! नॉट बॅड !! मुस्ताफिझूरचं नसणं हैदराबादला तीव्रतेने जाणवलं असावं !!
गुजरातने १६०+ मजल मारली ! नॉट
गुजरातने १६०+ मजल मारली ! नॉट बॅड !! मुस्ताफिझूरचं नसणं हैदराबादला तीव्रतेने जाणवलं असावं !!
भाऊ ,एकदा सांगितल्यावर ऐकू
भाऊ ,एकदा सांगितल्यावर ऐकू येते आम्हाला !::दिवा:
वॉर्नर [नाबाद ७४ ] वि. गुजरात
वॉर्नर [नाबाद ७४ ] वि. गुजरात ! १३०-६ [१७.३ षटकं. आतां २.५ षटकांत सगळा रोमान्स गच्च भरलेला !!!
<< भाऊ ,एकदा सांगितल्यावर ऐकू येते आम्हाला !:>> झोपलां नाही ना, याची खात्री करून घेतली; नाहीं तर उगीचच कशाला आपण पुढची बडबड करायची !!
गच्च बिपुल शर्माचा धवल
गच्च
बिपुल शर्माचा धवल कुलकर्णीला मारलेला फ्लिक सिक्स कसला क्लासी होता.
भाऊ इथे बघा जरा
http://www.maayboli.com/node/58824
सही वॉर्नर वि. कोहली बघायला
सही वॉर्नर वि. कोहली बघायला मजा येणार.
बिपुल शर्मा सहीच खेळला.
बिपुल शर्माने काम सोपं केलं
बिपुल शर्माने काम सोपं केलं वॉर्नरचं. ग्रेट विन फॉर हैदराबाद अँड वॉर्नर ! बॅड लक, गुजरात.
[असामी, लिन्क देताना कांहीं चुकलंय का ? ]
असामी, लिन्क देताना कांहीं
असामी, लिन्क देताना कांहीं चुकलंय का ? >> का हो ? चालतेय कि.
थंड ठेवून खेळला हे भारी मह्त्वाचे होते. वॉर्नर भयंकर मॅच्युअर होऊन खेळतोय सध्या एकंदर. आजचे नंतरचे शॉट्स पण क्लासी होते. प्रवीण कुमार उगाचच हुकला.
<< का हो ? चालतेय कि.>>
<< का हो ? चालतेय कि.>> असामीजी, तुम्हाला खरंच '.. सोडे कसे ओळखावे ? ' यावर माझ्या एक्सपर्ट कॉमेंटस हव्या आहेत ?
टप्पा थ्रो चा वेग हा हवेतून
टप्पा थ्रो चा वेग हा हवेतून डायरेक्ट केलेल्या थ्रोपेक्षा जास्त असतो. म्हणून बहुतेक खेळाडू टप्पा थ्रो करण्याचा प्रयत्न करतात.
<< ...म्हणून बहुतेक खेळाडू
<< ...म्हणून बहुतेक खेळाडू टप्पा थ्रो करण्याचा प्रयत्न करतात.>> शिवाय, नेम चूकलाच तर स्टंपजवळच्या यष्टीरक्षक/गोक्लंदाज/ फिल्डरलाही फलंदाजाला सहज धांवचित करण्याची संधी मिळते, हेंही कारण असूं शकेल.
टप्पा थ्रो चा वेग हा हवेतून
टप्पा थ्रो चा वेग हा हवेतून डायरेक्ट केलेल्या थ्रोपेक्षा जास्त असतो >> माझ्या माहिती नुसार हे फक्त डीप फिल्डरसाठी असते. त्तिथून बॉल उंचावरून फेकल्यामूळे हवेच्या विरोधामुळे स्लो होउ शकतो म्हणून शक्यतो फ्लॅट थ्रो एक टप्पा घेऊन फेकला जाणे स्वीकारले जाते. जवळचे फिल्डर जर बॉल कलेक्ट करायला बाजूला कोणी नसेल तर स्टंपच्या बुडाजवळ थ्रो करायचा प्रयत्न करतात.
भाऊ मला खरच वाट्ले कि तुम्हाला सोड्यांबद्दल माहिती असेल
<< भाऊ मला खरच वाट्ले कि
<< भाऊ मला खरच वाट्ले कि तुम्हाला सोड्यांबद्दल माहिती असेल >> तशी जुजबी माहिती आहे मला. पण क्रिकेटसारखं त्याबाबतींत एक्सपर्ट असल्याचा आव नाही आणतां येणार मला; इथं लोक घेतात संभाळून पण खाण्या-पिण्याच्या बाबतींतला आगाऊपणा नाही सहन करून घेत कुणी !
फायनलवर पावसाचं सावट !
फायनलवर पावसाचं सावट ! अटीतटीच्या सामन्यानी रंगलेल्या या मोठ्या स्पर्धेचा 'अँटीक्लायमॅक्स' न होवो म्हणजे मिळवली !!
अहो, पुढच्या आयपीएल ऑक्शनला खूप वेळ आहे. तोपर्यंत,
यादी दिलीय तें सामान आणा वाण्याकडून !!!
RCB ने जसे टर्न अराउंड केले
RCB ने जसे टर्न अराउंड केले तसेच माझ्या आणखी एका आवडत्या स्पोर्टस मध्ये (अर्थातच सायकल) काल व्हिन्चेझो निबली ने जिरो दि टालिया मध्ये केले. ४:५० मिनिटे लिडर पेक्षा पाठीमागे असताना स्टेज १९ आणि २० मध्ये ( हायर अल्टिट्युड माउंटेन्स मध्ये) त्याने प्रयत्नांची पराकाष्टा करत ५२ सेकंदची लीड मिळवून ऑलमोस्ट जिरो जिंकली आहे. आज शेवटची स्टेज आहे आणि ती जनरल क्लासिफिकेश्न्सची नसून स्प्रिंटर्सची आहे. त्यामुळे तो कालपासून अघोषित विजेता आहे, आज फक्त मोहोर उमटेल.
http://www.bbc.com/sport/cycling/36405621
http://www.giroditalia.it/eng/
आणि आज विराट पण
दोन्ही फायनल्स एका दिवशी असल्यामुळे ( खरेतर गेले २२ दिवस दोन्ही खेळ एकाच वेळेस) माझी स्थिती, किती घेऊ दोन डोळ्याने झाली आहे.
सुपर संडे.
कोहली नि वॉरनर दोघेही आवडत
कोहली नि वॉरनर दोघेही आवडत असल्यामूळे पंचाईत झाली आहे आज
माझी स्थिती, किती घेऊ दोन डोळ्याने झाली आहे.>> काल घेतलेस ना एव्हढे ?
मला कोहली, युवी अन धवण आवडत
मला कोहली, युवी अन धवण आवडत असल्यामुळे पंचाइत.
धवन आणि युवीने ५० करावेत. त्यांच्या स्कोअर १८०+ व्हावा. आणि कोहलीने ७५ -१०० करून चेस करावे.
( किती त्या इच्छा
) )
एक पूर्ण झाली. सनरायझर्सची बॅटिंग.
विराट अँड कंपनीची मोठं लक्ष्य
विराट अँड कंपनीची मोठं लक्ष्य 'चेस' करण्याची व आपली तें बघण्याची ईच्छा सफल होणारसं दिसतंय. सनरायझर्स ९+ च्या सरासरीने धांवा काढताहेत . ८८-१ [९ षटकं] !
दे आर नॉट फ्लिपफ्लॉप डॅनी, दे
दे आर नॉट फ्लिपफ्लॉप डॅनी, दे आर चप्पल्स, कोल्हापूरी चप्पलस.
त्या वॉर्नरला आवरा आता. युवीला लायसन्स द्या.
आयला, खरंच विकेट पडली.
आयला, खरंच विकेट पडली.
विराटच्या स्वप्नाला वॉटसन अन
विराटच्या स्वप्नाला वॉटसन अन जॉर्डन तडा देत आहेत. १८-१९-२० कसल्या ओव्हर्स. १८ व्या ओव्हर मध्येच शेन क्रॅक झाला होता. परत २० वी का दिली? १६ व्या ओव्हर मध्ये १८० पण होणार नाही असे वाटताना २०० क्रॉस झाले. ३ ओव्हर्स मध्ये ५२ धावा !!
बॅटींगला विकेट तर सोईची
बॅटींगला विकेट तर सोईची वाटतेय.विराट, एबीडी टॉप फॉर्ममधे आहेत. गेल,वॉटसन आहेतच. स्टेज इज सेट फॉर अ फिटींग क्लायमॅक्स टू आयपीएल-२०१६ !
आरसीबी - १०० -० [९षटकं ! गेल
आरसीबी - १०० -० [९षटकं ! गेल सहाचा पाढाच म्हणतोय ३५ चेंडूत ७० !
अहो, तो कॉलनीतल्या मुलानी
अहो, तो कॉलनीतल्या मुलानी मारलेला नसणार.
तो गेल खेळतोय झपाटल्यासारखा !!
१५०-३.गेल, विराट व एबीडी बाद.
१५०-३.गेल, विराट व एबीडी बाद. सामना एका नाजूक वळणावर !
मस्त बोलिंग केली हैदराबाद
मस्त बोलिंग केली हैदराबाद ने
नेहरा नसुन पण
मुस्ताफिझुर व भुवनेश्वर
मुस्ताफिझुर व भुवनेश्वर .कुमार यांच्या अप्रतिम शेवटच्या ओव्हर्स निर्णायक ठरल्या ! आरसीबीच्या झंझावाती सुरवातीने हताश न होतां वॉर्नरने संघाला प्रेरीत केलं. छान सामना झाला. अभिनंदन , सनरायझर्स !
बॅड लक, आरसीबी .
RCB पेक्षा कोहली बद्दल वाईट
RCB पेक्षा कोहली बद्दल वाईट वाटले. एकट्याने शक्य तेव्हढे खेचली टीम. can not fault him. किती ती दळभद्री बॉलिंग ? अॅबे ने फायनल्स मधे न खेळण्याचा रिवाज मोडला नाही. कोहली नि भुवी वगळता हा सामना दोन्ही संघांमधल्या परदेशी चारांवर ठरला.
भुवी आयपील मधली बॉलिंग लक्षात ठेवून तोच क्रम पुढे चालू ठेवेल अशी आशा करूया.
Pages