Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
eliminator १ कोणीच बघत
eliminator १ कोणीच बघत नाहिये?
<< eliminator १ कोणीच बघत
<< eliminator १ कोणीच बघत नाहिये? > प्रत्येकाने बहुतेक आपल्याला आवडतो तो संघ जिंकणारच असं गृहीत धरलं असावं !
हैदराबाद १३षटकांत ९४-३. केकेआरसाठी किमान १६०- १७० लक्ष्य आवश्यकच .
नेहराशिवाय हैद्राबाद ची
नेहराशिवाय हैद्राबाद ची बॉलिंग कच्ची वाटते.
मी बघतोय. हैद्राबाद जिंकावे
मी बघतोय. हैद्राबाद जिंकावे असे वाटत आहे. टीम मुळे नाही तर लक्ष्मण मुळे
दोन गेल्या केकेआरच्या...
दोन गेल्या केकेआरच्या... युवीने जबरी रन आऊट केला..
पांडे आहे तो वर KKR जिंकू
पांडे आहे तो वर KKR जिंकू शकता.
युवीचा रन ऑट खतरू वाटलेला. पण मधे रिप्ले बघताना वाटले कि थ्रो डायरेक्ट नव्हता. एव्हढ्या कमी अंतरावरून डायरेक्ट थ्रो नव्हता त्यामूळे तो नशिबाचा भाग काय कि बॉल एव्हढा बाऊन्स होऊनही स्टंपला लागला.
पांडे आणी यादव आहेत तोपर्यंत
पांडे आणी यादव आहेत तोपर्यंत केकेआर ला संधी आहे. पुढच्या २० रन्स मधे जर हे दोघं गेले, तर मॅच चुरशीची होईल.
गेला यादव.. नेमका रसेल नाहीये
गेला यादव.. नेमका रसेल नाहीये आज.. नाहीतर त्यानी आणली असती मॅच.. पांडे बेभरवश्याचा वाटतो..
पांडे मन्रो च्या आधी नि
पांडे मन्रो च्या आधी नि होल्डर ला सतिश च्या आधी पाठवायला हवे होते का ? पांडे वि. मुस्तफिझुर बघायला मजा येतेय,
गेला ना पांडे.. मॅच संपल्यातच
गेला ना पांडे.. मॅच संपल्यातच जमा..
एव्हढ्या कमी अंतरावरून
एव्हढ्या कमी अंतरावरून डायरेक्ट थ्रो नव्हता त्यामूळे तो नशिबाचा भाग काय कि बॉल एव्हढा बाऊन्स होऊनही स्टंपला लागला. >>
मोस्टली एक टप्पा पाडूनच स्टम्पवर मारतात त्यामुळे मला तरी तो नशिबाचा भाग वाटला नाही.
अरे केदार काहितरी काय ? close
अरे केदार काहितरी काय ? close in fielders especially ones on point guard, always try to hit stumps in direct path or as closest to the base of stumps in order to avoid mis-hit. परत युवीचा थ्रो कुठे बाऊन्स झाला आहे ते बघ नि स्टंपवर किती वर लागलाय ते बघ.
असामीजी, तांत्रिक दृष्ट्या
असामीजी, तांत्रिक दृष्ट्या हें खरं असलं तरी , मला वाटतं, 'क्लोज-इन फिल्डर' ज्या पोझिशनमधे चेंडू अडवतो त्याच पोझिशनमधून क्षणार्धांत चेंडू फेंकून त्याला रन-आऊटची संधी साधणं यालाच अग्रक्रम अपरिहार्य असतो. त्यामुळे कांहींशी नशिबाची साथ असणं अशा रन-आऊटमधे आवश्यकच असावं. [ कदाचित , जाँटी र्होडसने हें वाचलं तर तो माझ्या थोबाडीतच मारेल ! पण जाँटी र्होडसला हें लागू होतच नाहीं
]
रैना ची मुलगी नेदरलँड मधे कशी
रैना ची मुलगी नेदरलँड मधे कशी काय जन्मला आली ? त्याची बायको भारतीय होती असे वाटते >> ती भारतीयच आहे.. बँकर आहे.. नेदरलँडसमधे पोस्टेड आहे सध्या..
'पहिली बेटी , धांवांची पेटी '
'पहिली बेटी , धांवांची पेटी ' ठरो रैनासाठी !!
नाही, 'पळून जावून लग्न'
नाही, 'पळून जावून लग्न' म्हणजे 'रन-आऊट'सारखं नाहीं ! 'रन-आऊट' झालं,
तर पॅव्हिलीयनमधे जावं लागतं; आपल्याला मैदानातच रहायची पाळी येईल !!!
भाऊ बाकी काय रनिंग बिटवीन
भाऊ
बाकी काय रनिंग बिटवीन बघुन मला त्यांना मैदानातच रहा सांगावेसे वाटत होते. युवी नशिबाने वाचला होता.
<< युवी नशिबाने वाचला होता.>>
<< युवी नशिबाने वाचला होता.>> युविच्या जिद्दीला दाद द्याविसं तर नेहमीच वाटतं. पण , पूर्वीचा युवी आठवून आतांचा युवी कधी कधीं केविलवाणाही वाटतो, हेंही खरं. .
"युविच्या जिद्दीला दाद
"युविच्या जिद्दीला दाद द्याविसं तर नेहमीच वाटतं. पण , पूर्वीचा युवी आठवून आतांचा युवी कधी कधीं केविलवाणाही वाटतो, हेंही खरं. ." - १++
युविच्या जिद्दीला दाद
युविच्या जिद्दीला दाद द्याविसं तर नेहमीच वाटतं.पूर्वीचा युवी आठवून आतांचा युवी कधी कधीं केविलवाणाही वाटतो, हेंही खरं. ." - १++ >> +१ तसेच आयपील मधे तरी तो बराच पूर्वीसारखा खेळतो मधे मधे असे वाटले.
, मला वाटतं, 'क्लोज-इन फिल्डर' ज्या पोझिशनमधे चेंडू अडवतो त्याच पोझिशनमधून क्षणार्धांत चेंडू फेंकून त्याला रन-आऊटची संधी साधणं यालाच अग्रक्रम अपरिहार्य असतो. त्यामुळे कांहींशी नशिबाची साथ असणं अशा रन-आऊटमधे आवश्यकच असावं >> भाऊ, केदार ने माझ्या पोस्टमधले फक्त शेवटचे वाक्य उचलल्यामूळे नशिबाचा अर्थ बदला आहे. लाईव्ह मधे बघताना जेव्हढा जबरदस्त थ्रो वाटला तेव्हढा अॅक्शन रिप्लेमधे वाटला नाही. किंबहुना, तो बॉल जितका आधी बाऊन्स झाला ते बघून तो नशिबाने स्टंपला लागला असे म्हणालो. पूर्वीचा युवी असता तर हाच थ्रो डायरेक्ट किंवा स्टंपच्या जवळ असता.
ज्या पोझिशनमधे चेंडू अडवतो त्याच पोझिशनमधून क्षणार्धांत चेंडू फेंकून त्याला रन-आऊटची संधी साधणं >> तुम्हीच जाँटीचा उल्लेख केला आहे म्हणून त्या बद्दल त्याच्या पुस्तकात वाचलेले. बॉल अडवल्यानंतर तो कसा फेकायचा ह्यबद्दल तो विचार करत असे. कुठे असताना कुठल्या बाजूने बॉल अडवल्यावर कुठल्या दिशेने बॉल फेकायचा ह्याबद्दल त्याने प्रॅक्टिस करताना आराखडे बांधले होते. प्रत्यक्ष मॅच मधे त्याचा उपयोग होत असे. त्याचे हाय लाईट्स बघितले तर जाणवेल कि बॉल अडवला कि तो लगेच फेकण्यासाठि अचूक पोझिशनमधे येतो.
लाईव्ह मधे बघताना जेव्हढा
लाईव्ह मधे बघताना जेव्हढा जबरदस्त थ्रो वाटला तेव्हढा अॅक्शन रिप्लेमधे वाटला नाही >>>
अरे भाऊ, ते सगळं इतकं फास्ट होतं की त्यात विचार करायला एक क्षणही नसतो. यु जस्ट एम अॅन्ड थ्रो. आणि मोस्टली युवी, जडेजा, रैना टाईप लोकं ९०% अॅक्युरेट असतात. म्हणून म्हणले नशिब कमी आणि जजमेंट जास्त. तेच जर हा थ्रो प्रविणकुमारने फेकला असता तर मी सहमत झालो असतो.
असो. नशिब तर नशिब. आउट झाला.
असामीजी, << पूर्वीचा युवी
असामीजी, << पूर्वीचा युवी असता तर हाच थ्रो डायरेक्ट किंवा स्टंपच्या जवळ असता.>> एकदम कबूल.
<< << चे हाय लाईट्स बघितले तर जाणवेल कि बॉल अडवला कि तो लगेच फेकण्यासाठि अचूक पोझिशनमधे येतो.>> , जाँटी हा जाँटीच आहे.! त्याचे रेफ्लेक्सिस, फिट्नेस, क्षेत्ररक्षणावर त्याने घेतलेली प्रचंड मेहनत व चापल्य यातली इतरांमधील कमतरता फक्त नशिबाच्या साथीनेच भरून निघूं शकते , असं मीं म्हणणं अधिक योग्य ठरलं असतं !
अरे भाऊ, ते सगळं इतकं फास्ट
अरे भाऊ, ते सगळं इतकं फास्ट होतं की त्यात विचार करायला एक क्षणही नसतो. यु जस्ट एम अॅन्ड थ्रो. >> त्याच्या हातात बॉल आला, त्याला संधी दिसली त्याने बॉल फेकला. त्यानंतर काय झाले ते मह्त्वाचे होते. नि माझे पोस्ट त्याबद्दल आहे. "यु जस्ट एम" ह्यातले जे एम आहे ते स्टंप्च्या दिशेने जनरल असे नसून स्टंपच्या बुडाच्या दिशेने असणे जरुरी असते. चांगला फिल्डर तेच अचूक जमवतो म्हणून त्याचे कौतुक असते. जुना युवी किंवा रैना, जाडेजा वगैरे असते तर हा थ्रो काल झाला तेव्हढा आधी बाऊन्स झाला नसता. युवी चे जजमेंट असायला हवे तेव्हढे चांगले नव्हते म्हणून "नशिबाचा भाग काय कि बॉल एव्हढा बाऊन्स होऊनही स्टंपला लागला" म्हणालो. (इथे तू प्रवीणकुमार ला घुसवून नवीनच काहि तरी सुरू केले आहेस, तुलना युवीच्या लेव्हलच्या लोकांशी कर रे)
त्याचे रेफ्लेक्सिस, फिट्नेस, क्षेत्ररक्षणावर त्याने घेतलेली प्रचंड मेहनत व चापल्य यातली इतरांमधील कमतरता फक्त नशिबाच्या साथीनेच भरून निघूं शकते >> खरय. त्याने मुंबई इंडीयन्स च्या फिल्डींग मधे जे काहि प्रयत्न केले त्याबद्दल वाचायला आवडेल.
<< बॉल अडवल्यानंतर तो कसा
<< बॉल अडवल्यानंतर तो कसा फेकायचा ह्यबद्दल तो विचार करत असे. कुठे असताना कुठल्या बाजूने बॉल अडवल्यावर कुठल्या दिशेने बॉल फेकायचा ह्याबद्दल त्याने प्रॅक्टिस करताना आराखडे बांधले होते.>> जाँटी र्होडस सारख्या क्षेत्ररक्षकांमुळे गोलंदाजी, फलंदाजी इतकंच महत्व क्षेत्ररक्षणालाही आलं आहे व त्याच्याही तांत्रिक बाजू व बारकावे आतां अधिकाधीक समोर येताहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कधींही नव्हे इतका आतां तो वरच्या दर्जावर गेला आहे, हें निर्विवाद. विशेष म्हणजे भारतीय खेळाडू आतां याबाबतींत इतरांपेक्षां कमी नाहीत, ही आनंदाची बाब !
क्षेत्ररक्षणाचा दर्जा कधींही
क्षेत्ररक्षणाचा दर्जा कधींही नव्हे इतका आतां तो वरच्या दर्जावर गेला आहे, हें निर्विवाद. विशेष म्हणजे भारतीय खेळाडू आतां याबाबतींत इतरांपेक्षां कमी नाहीत, ही आनंदाची बाब ! >>_+१. रैना, जाडेजा,राहाणे , पांडे, सथिश इ. नॅचरल वाटतात. कोहली, धवन, रोहित, इशांत पंत , चहल , सूर्यकुमार यादव, मिश्रा इत्यश्रापण मेहनत करून आपापला दर्जा उंचावताना दिसत आहेत.
त्या निमित्ताने आयपीलमधल्या
१. वॉटसन -डेव्हीड विसेचा रिले कॅच
२. कोहलीचा परवाच्या सामन्यामधला लाँग ऑन वरून धावत येत घेतलेला रोलिंग टंबलीग कॅच
३. रैनाचा स्लिप्मधला डाविकडे उडी घेत उजव्या हाताने डोक्यावर घेतलेला कॅच
ह्यात तुमच्या मते अवघड कॅच कुठला ?
कोहलीचा परवाच्या सामन्यामधला
कोहलीचा परवाच्या सामन्यामधला लाँग ऑन वरून धावत येत घेतलेला रोलिंग टंबलीग कॅच >> हाताला टाके पडले असताना अशी कमिटमेंट दाखवणं हे महान आहे..
मला जॉन्टी नंतर अझरचा पिक अप
मला जॉन्टी नंतर अझरचा पिक अप थ्रो आवडायचा... अत्यंत जलद... आणि अचूक...
टेक्निकली स्लीप मधले कॅचेस
टेक्निकली स्लीप मधले कॅचेस नेहमीच जास्त अवघड असतात. रिअॅक्शन टाईम खुप कमी असतो आणी बॉल चा वेग, अँगल चा अंदाज ईतक्या कमी वेळात घेणं अवघड असतं. रिले कॅचेस साठी दोघांमधलं सामंजस्य, टायमिंग सिंक होणं ह्या दृष्टीनं तो कॅच दुसर्या क्रमांकावर येईल. कोहली च्या कमिट्मेंट ला १००% गुण, पण तांत्रिक दृष्ट्या एक कॅच म्हणून मला तो ह्या तीनांत, तीसरा वाटतो.
मी फेफशी सहमत आहे.
मी फेफशी सहमत आहे. रिअॅक्सशन टाईम मुळेच.
गुजरात अडचणीत येण्याची
गुजरात अडचणीत येण्याची शक्यता. ६४ -३ [८षटकं.]
दिनेश कार्तिक चांगला स्थिरावून खेळत असताना फिल्डरच्या हातातल्या चेंडूवर धांव घेण्याचा आतताईपणा करून बाद !
Pages