२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.
http://www.maayboli.com/node/57867
अर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.
इथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.
नमस्कार,
हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.
आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.
तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.
आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा
तर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....
माझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.
मार्च महिना
१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र
१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण
१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना
१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार
१५ ग्रेव्ही- रस्सा
१६ डिप - बुडूक / डुबकावणं
१७ पेस्ट - वाटण
१८ मॅरिनेट - मुरमाखवणं
१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे
२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण
२१ detergent - निर्मलक
२२ file( of papers) - धारिका
२३ res. flat - सदनिका
२४ row house जोडघर
२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी
२६ Mutually exclusive - परस्परवर्ज्य
Lifehack - क्लृप्ति (मला इथे
Lifehack - क्लृप्ति (मला इथे लिहीता येत नव्हता. कॉपी-पेस्ट केला आहे. शुद्धलेखन तपासून घ्यावे. )
कुमार आणि सीमंतिनी यांनी
कुमार आणि सीमंतिनी यांनी सुचवलेल्या शब्दांना अनुमोदन. दोन्ही शब्द आधीच वापरात आहेत आणि चपखल आहेत.
क्लृप्ती
क्लृप्ती
गुगल इंडिक हिंदी करून लिहिता आला. दोन्ही शब्द सुयोग्य व चपखल !
Trick- म्हणजे क्लुप्ती नाही
Trick- म्हणजे क्लुप्ती नाही का.?
Trick आणि lifehack हे तसे
Trick आणि lifehack हे तसे समानार्थी आहेत. Every lifehack is a trick but not every trick is a lifehack. उदा: https://www.youtube.com/watch?v=DkmeZwsi3HA हे असले खारीसाठी ऑबस्टॅकल कोर्स बांधणे ह्यात गंमत आहे, Trick म्हणता येईल पण त्याने कुठला जीवनावश्यक प्रश्न सुटत नाही. क्लृप्ती मध्ये प्रश्न सोडवणारी शक्कल उर्फ 'जुगाड' अभिप्रेत आहे.
Lifehack साठी हिंदीतील
Lifehack साठी हिंदीतील जुगाड (जिवंत मधला ज) हा शब्द योग्य वाटतो. हा असाच्या असा (उच्चारासकट) मराठीत वापरायला हरकत नाही. ज चा दुसरा उच्चार वापरला तर भलताच अर्थ निघू शकतो असा संशय येतोय.
'जुगाड' अभिप्रेत आहे. >>
'जुगाड' अभिप्रेत आहे. >> हायला! सीमंतिनी, तू देखिल नेमका हाच शब्द सुचवलास की.
हो, ग्रेट माईंडस जुगाड
जुगाड हा शब्द योग /युक्ती या
जुगाड हा शब्द योग /युक्ती या संस्कृत शब्दांपासूनच तयार झालायं असं ऐकलयं. 'य' चा उच्चार कधी कधी 'ज' होतो.
Military tank = रणगाडा
Military tank = रणगाडा
Bulldozer = खणगाडा
बुलडोझर खणण्याचे काम करत नाही
बुलडोझर खणण्याचे काम करत नाही, ते मुख्यतः माती ढकलण्याचे काम करते. हे यंत्र फारतर माती खरवडून काढू शकते. सबब त्याकरता खणगाडा हा शब्द बरोबर नाही. पोक्लेन कंपनीचे एक मशीन असते त्याला खणगाडा म्हणता येऊ शकेल.
पोक्लेन कंपनीचं नाव आहे.
पोक्लेन कंपनीचं नाव आहे. एक्सकेव्हेटर म्हणतात त्या यंत्राला.
होय हरचंद पालव. बदल केला आहे.
होय हरचंद पालव. बदल केला आहे. धन्यवाद.
एक्स्कॅव्हेटर जेसीबी कंपनीचेही असते (ज्याला ट्रॅक्टर सारखी चाके असतात) त्यालाही खणगाडा समर्पक ठरणार नाहीसे वाटतंय म्हणून पोक्लेनचा उल्लेख
बुलडोझरची तांत्रिक माहिती
बुलडोझरची तांत्रिक माहिती काही नाही पण अमुक ढमुक यांनी झोपडपट्टी उध्वस्त करायला वापरला असेच जास्त ऐकले आहे. जमीनदोस्तगाडा म्हणता येईल??
बुलडोझर हे अर्थ मुव्हिंग मशीन
बुलडोझर हे अर्थ मुव्हिंग मशीन आहे त्याला झोपडपट्टी तोडायला म्हणून वापरणे हा भारतीय जुगाड असावा.
मग प्रतिशब्द सोपा आहे -
मग प्रतिशब्द सोपा आहे - मातीवाहक यंत्र ! किंवा मृदवहन यंत्र.
सी, ते यंत्र माती ढकलतं
सी, ते यंत्र माती ढकलतं वाहून नेत नाही.
A bulldozer or dozer is a large motorized machine that travels on tracks and is equipped with a metal blade to the front for pushing material: soil, sand, snow, rubble, or rock during construction or conversion work.
आणि फक्त मातीच असं नाही
ज्या प्रमाणे बुलडोझर या केवळ
ज्या प्रमाणे बुलडोझर या केवळ नावावरूनच ते यंत्र काय काय करतं याचा उलगडा होत नाही त्या प्रमाणेच मराठी प्रतिशब्द शोधताना त्या शब्दाने असा सर्व उलगडा होईल अशी अपेक्षा का ठेवावी?
जमीनदोस्तगाडा - चांगला शब्द
जमीनदोस्तगाडा - चांगला शब्द आहे. जमिनीचा दोस्त असलेला गाडा , असा कर्मधारय तत्पुरुष समास सोडवून त्यात माती ढकलणे, दगड पाडणे वगैरे दोस्तीची कामे समाविष्ट करता येतील.
भुईसपाटक
भुईसपाटक
बुलडोझरला 'धडकयंत्र' म्हणत
बुलडोझरला 'धडकयंत्र' म्हणत येईल.
त्या शब्दाने असा सर्व उलगडा
त्या शब्दाने असा सर्व उलगडा होईल अशी अपेक्षा का ठेवावी? >> नवीन शब्द हा अर्थाचा उलगडा करत असेल आणि उच्चारायला अतिशय सोपा असेल तर तो शब्द बोली भाषेत आत्मसात होण्याची शक्यता वाढते, ह्या विचारातून ते आलं असावं.
मराठी प्रतिशब्द शोधताना त्या
मराठी प्रतिशब्द शोधताना त्या शब्दाने असा सर्व उलगडा होईल अशी अपेक्षा का ठेवावी?
का ठेवू नये ?
मराठी प्रतिशब्द वाचून असा उलगडा होत नसेल / अर्थ ध्वनित होत नसेल / वेगळाच अर्थ वाटत असेल तर सरळ इंग्रजीच शब्द वापरावा.
मी म्हणतोय की ते जे काही करते
मी म्हणतोय की ते जे काही करते त्या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा नको. उदा. जमीनदोस्त, भुईसपाट करणारे यंत्र या अर्थी शब्द मिळाला तरी पुरेसा आहे. त्याने अजून काय काय करता येते, केव्हा वापरतात वगैरे हे त्या शब्दाचा अर्थ देताना नमूद केले असेल.
मस्त प्रतिसाद.
मस्त प्रतिसाद.
मातीतघालयंत्र ... ढकलून मातीत घालते म्हणून !
झोपड्यांची, लोकांच्या घरादारांची माती करते. माती सुद्धा मातीत घालते असे सर्वमातीव्यापी
पाताळयंत्र
पाताळात ढकलणारे किंवावा पाताळ खोदून काढणारे म्हणून
पाताळयंत्र
मातीतघालयंत्र
मातीतघालयंत्र
मातीतघालयंत्र >> फारच
मातीतघालयंत्र >> फारच साहित्यिक होतंय
पण बुलडोझर ला मराठी प्रतिशब्द
पण बुलडोझर ला मराठी प्रतिशब्द हवाच कशाला? आणि तो प्रतिशब्द वापरणार कुठे?
सावरकरांनी जेव्हा मेयरला
सावरकरांनी जेव्हा मेयरला महापौर असा पर्याय निर्माण केला तेव्हाही लोक म्हणाले मेयर ला पर्याय कशाला? मेयर च का नको? पण आज आपण महापौर हा शब्द अगदी सहज वापरतो. संपादक, दिग्दर्शक, स्तंभ (वर्तमान पत्रातील) हे शब्दही असेच.
तेव्हा पर्याय सुचवत राहिले पाहिजेत. ते कितपत रुळतात ते समाजच ठरवेल. लोकांना इंग्रजीच जास्त जवळची वाटू लागली तर नवे मराठी शब्द चालणार नाहीत कदाचित. बघू.
दोन प्रकारच्या प्रेरणा आहेत भाषेविषयी अभिमान आणि सोपे, सुटसुटीत मराठी शब्द हवेसे वाटणे.
५०-६०-७० वर्षापूर्वी जे नवे शब्द रुळले असते ते आज रुळतीलच असे नाही.
तांत्रिक विषयात मराठी शब्द फार वापरले जात नाहीत. पण म्हणून तसे शब्द सुचवणे ही चूक आहे असे मला वाटत नाही.
नवे शब्द निर्माण न करू शकणारी भाषा हे ती भाषा मृत होऊ घातल्याची चाहूल असावी बहुतेक!
Pages