शब्दवेध - पर्यायी मराठी शब्द

Submitted by हर्पेन on 15 March, 2016 - 06:37

२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.
http://www.maayboli.com/node/57867
अर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.

इथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.

नमस्कार,

हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.

आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.

तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.

आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा

तर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....

माझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.

मार्च महिना

१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र
१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण
१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना
१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार
१५ ग्रेव्ही- रस्सा
१६ डिप - बुडूक / डुबकावणं
१७ पेस्ट - वाटण
१८ मॅरिनेट - मुरमाखवणं
१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे
२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण
२१ detergent - निर्मलक
२२ file( of papers) - धारिका
२३ res. flat - सदनिका
२४ row house जोडघर
२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी
२६ Mutually exclusive - परस्परवर्ज्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराट म्हणजे पिसाळलेला, वेड भिनलेला असेच ना?
व्हायरल सारखा कसा अर्थ होईल त्याचा?
>>>
साती हे मी आत्ता वाचले.

सैराट म्हणजे स्वैर, मुक्त, स्वच्छंद, बेभान, सुसाट, वेगवान असं ऐकलंय तर तंतोतंत अर्थ तसा नसला तरी एखादी गोष्ट व्हायरल होणे या करता 'सैराट' हा आपला शब्द वापरायला काय हरकत आहे.

तसंही जो 'सैराट' चित्रपटाच्या व्हायरल होण्याला त्या कलाकृतीला मानवंदना द्यायला म्हणूनही हा शब्द अंगीकारायला हरकत नाही.

व्हायरल
कानोकानी, कर्णोपकर्णी, पंख लागणे, वाऱ्यावर उडणे, षट्कर्णी होणे इ.

कानोकानी, कर्णोपकर्णी मधे फक्त ऐकणं स्वरुपातले फैलावणे ध्वनित होते

ध्वनि, मुद्रित, दृष्य अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट
म्हणजे एखादे गाणे, चित्र, सिनेमा, बातमी, ट्वीट भाषणातले उद्गार ह्यांचे तोंडी, वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मिडीया ई. माध्यमातून विश्वभरात पसरणे या करता कानोकानी, कर्णोपकर्णी कमी पडतं असं वाटतंय

उदा. गंगनम स्टाईल गाणं आणि त्यावरचा नाच कानोकानी झाला पेक्षा सैराट झाला असं बरं नाही का वाटत?

इंग्रजीत गूगल करणे हे क्रियापद कसे नवीनच तयार झाले तसे हे सैराट होणे Happy

हो सुहास, म्हणूनच लिहिले मी. क्लीष्ट शब्दांचे जे उच्चार आपल्याला शक्य झाले तेच रुढ झाले.

Damn Beast वरुन डँबिस आणि Damn Rat डांबरट !

व्हायरल :- सर्वांना /इतरांना माहित होणे, सार्वजनिक होणे या अर्थाने घेता येईल कदाचित

सुरेख धागा आणि चर्चा

Damn Beast वरुन डँबिस आणि Damn Rat डांबरट ! >>>
मग "Damn It" ला मराठी प्रतिशब्द "इन्स्पेक्टर महेश जाधव" चालेल का ? (ज ज 'जागृती' चा) Wink

व्हायरल= फैलावणे
सैराट हा शब्द ग्रामीण भागात आधीच वापरात आहे. सुसाट शब्दाच्या आसपास जातो त्याचा अर्थ !

चूक भूल द्यावी घ्यावी हे सर्व साधारणपणे E&OE An abbreviation for "errors and omissions excepted,
अशा अर्थाने वापरले जाते. त्या अर्थी ते एका विशिष्ट प्रकारचे डिसक्लेमर आहे . अमूक तमूक झाल्यास कंपनी जबाबदार नाही अशा प्रकारचे डिस्क्लेअमर असेल तर त्याला वैधानिक इशारा म्हणता येईल.

फॉर क्रायिंग आउट लाऊड असा वाक्प्रचार असेल तर तो वैतागाने , संतापाने काही सांगायच्या आधी वापरतात .
कितीदा सांगायचं बाहेरुन आल्यावर हात धू, कितीदा सांगायचं चपला जागेवर ठेव . अशा सारखा कटकटींना फॉर क्रायिंग आउट लाऊड, वॉश यूवर हँड्स वगैरे .

त्याचा खरोखर ( लाउडली किंवा क्वायेटली ) रडण्याशी संबंध नाही .

युरो - वैश्विक स्थल निर्देशक प्रणाली की भौगोलिक स्थान आणि दिशा दर्शक प्रणाली - ह्यातले दिशा दर्शक पेक्षा स्थानदर्शक आणि वैश्विक पेक्षा भौगोलिक स्थान दर्शक प्रणाली हे योग्य वाटतंय म्हणजे वैश्विक स्थल निर्देशक प्रणाली ऐवजी विश्वातील स्थान दर्शक प्रणाली ये सुयोग्य वाटतंय

मेधा -
त्याचा खरोखर ( लाउडली किंवा क्वायेटली ) रडण्याशी संबंध नाही . मलाही असंच वाटत होतं पण खात्री नव्हती. गुगल करून खात्री करून घेतली.

क्रायिंग आउट लाऊड - म्हणजे कटकट किंवा ओरडा (भुणभुण नाही चालणार ना!)

डिस्क्लेमर असेल तर त्याला वैधानिक इशारा - डिस्क्लेमर करता वैधानिक शब्द अनावश्यक वाटतो नुसत्या इशार्‍यावर काम भागावे.

गूगल करून किंवा गूगलून असं म्हणणं अधिक योग्य आहे.
काहीजण मुद्दाम द्व्यर्थी लिहितात. नेहमीच तसं लिहिणं योग्य नाही. Happy

मेधा, धन्यवाद! मी इंग्रजी शब्दाचा नेमका अर्थ न बघता प्रतिशब्द सुचवला.
नाहक्क/न-हक्क इशारा असे म्हणता येईल का disclaimer साठी?

क्रायिंग आउट लाऊड - म्हणजे कटकट किंवा ओरडा (भुणभुण नाही चालणार ना!) >> नाही , नाही

कटकट किंवा ओरडताना वापरायची फ्रेज आहे . फॉर ख्राइस्ट्स सेक, फॉर पीट्स सेक असे म्हणतात काही जण. पण देवाचे , प्रेषिताचे अथवा संतांचे नाव असे ( विनाकरण) घेणे चुकीचे आहे असे काही लोक मानतात. त्या फॉर ख्राइस्ट्स सेक ला पर्याय म्हणून फॉर क्रायिंग आउट लाऊड वापरले जातात. जसे अरे देवा, हजारदा सांगितलं ना कपडे जागेवर ठेव

अरे देवा, देवा रामा पांडुरंगा असे काही म्हणता येईल. माझ्या सासूबाई श्रीहरी म्हणतात. त्यांनी श्रीहरी म्हटले की दोन्ही मुलांना किंवा जे कोणी समोर असेल त्यांना आता भाषण मिळणार हे कळते Happy

मेधा धन्यवाद.
चुभूदेघे हा वाकप्रचार अर्थ ध्यानात न घेताच आपण वापरत असतो.

सैराट हा व्हायरल ला पर्याय नाही होऊ शकत. त्याचे अर्थ इथे दिलेले आहेत. मागच्या पोस्टमधे गाण्यातली एक ओळ दिलीये. आपण घेतलेल्या अर्थाने त्या गाण्याचा अर्थ भयानक होतोय.

पुर्वी बिल हाताने बनवले जात असे. त्यात आकडेमोडीच्या चुका होत. ग्राहकाच्या फायद्याची चूक असेल तर ग्राहक हक्काने येत असे पण त्याच्याकडून येणे असेल, तर सहसा तो मानत नसे. म्हणून चूक भूल देणे घेणे.. असे बिलावर छापले जात असे.

मित.... Happy

कापोचे,

पाचावर धारण बसणे, बाजारात तुरी... सारखे कालबाह्य शब्दप्रयोग आपण करतोच आणि धसास लावणे, बोकांडी बसणे... असे शब्दप्रयोग तर अर्थ लक्षात न घेताच करत असतो !!!

बाजारात तुरी चा अर्थ माहीत असतो. पाचावर धारण बसणे चा वाक्यातला उपयोग माहीत असतो, पण नेमका अर्थ नाही माहीत.

Trending now साठी मराठीत काय म्हणावे?

दिनेशदा , कापोचे - तुम्हालाही काही इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द हवे असतील तर इथे विचारा ना !

पाचावर धारण बसणे म्हणजे म्हणे महागाई वाढून एका रूपयाला विस मण मिळणारे धान्य एका रूपयाला पाच मण मिळते आणि लोक महागाईने एकदम घाबरून जात .(जुन्या काळात)
काही लोक म्हणतात पंचप्राण सोडून जाण्याइतकी धारणा होते म्हणून पाचावर धारण बसणे म्हणतात.

ख खो माहित नाही.

Pages