काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती वहिनी यडचाप आहे. मुंबईत तरी चारो बाजुनी नव्या फ्लॅट च्या माहित्या अंगावर कोसळत असतात. एफ एम रेडिओ वर पण चालू असतेच. ३ कोटी चा फ्लॅट ५० लाखाला मिळेल कसा? काय जॉब करते ही? आणि ते खोटे गोड बोलणे वैताग वाणे आहे. काल काय झाले?

ही शिरेल डिरेल झालेली हे! माठ गौरी, भोचक आजी, शांत आई, बुरसटलेले बाबा, पकाऊ विकी, आणि नसते तरी फरक नस्ता पडला असे नचि-वैनी... आणि ती मितु! Angry तो शिवच बरा वाटतोय किंवा या वासरात लंगडी गाय आहे!

शूटींग गोरेगावात झालंय असं तिथेच राहणारा मित्र म्हणाला.

अंजू सब जानती हैं। >>> एकदम पटेश Proud

बाकी गेले २-३ दिवस मालिका पाहिली नाहीये त्यामुळे इतर बाबतीत पास Happy

अगदी माठ नाही वाटत..

स्वानंदी, आधु, पसंत आहे मुलगी ची हिरोईन पेक्शा लाख पटीने बरी आहे.. निदान

पहिल्या काही भागात हिरॉईन काय लाऊड बोलत होती, आत्ता आत्ता बरी बोलतीये आणि तो शिव कसला घामट आहे, अक्टिंग चांगल आहे, पण घामटपणा इग्नोर करताच येत नाही... यक्क्क्क ....

शेवटी ही पण स्वानंदु अधु सारखीच माठ >>>>> अजुन पुरति अधु नाहि झालि , होइल हळु हळु >> Rofl

तो शिव कसला घामट आहे, अक्टिंग चांगल आहे, पण घामटपणा इग्नोर करताच येत नाही... यक्क्क्क ....>> असुदे, मुंबईच्या उन्हाळ्यात कडकडीत उन्हातान्हातनं फिरतो तो. घाम नै येईल तर काय..

तो शिव कसला घामट आहे,
>>>>>>>>>>>>>>

राखेचा मधल्या सुशल्या पेक्षा कमीच Proud

असुदे, मुंबईच्या उन्हाळ्यात कडकडीत उन्हातान्हातनं फिरतो तो. घाम नै येईल तर काय..

काहीही हं.... इतर लोक काय फिरत नाहीत काय मुंबईच्या उन्हात .... Lol

राखेचा मधल्या सुशल्या पेक्षा कमीच >> +१२३४५६७८९.

इतर लोक काय फिरत नाहीत काय मुंबईच्या उन्हात >> फिरत असतील.. त्यांना पण घाम येत असेलच की मग फक्त आमच्या बदामालाच आलेला घाम कसा दिसतो हो तुम्हाला. वर भुंग्यांनी म्हटलय तसं त्या सुसल्याला तर कित्ती घाम येतो. त्यावर नाही ते बोललात?? Proud Light 1

शूटींग गोरेगावात झालंय असं तिथेच राहणारा मित्र म्हणाला.>>>>> गौरीचे घर दाखवले आहे ती गोरेगाव पूर्वेची अरुणाचल बिल्डींग आहे. कालच्या भागात समोरची मधुश्री बिल्डींग दिसत होती.

अरे मला फार बोअर व्हायला लागलीय ही सिरीयल, काल मी तो चॉकलेट डबा सीन बघितला, आजी फारच भोचक. विकी आवडतो त्याला गोड द्यायला गेलीय म्हणते.

मोजोंनी लग्न ठरवीण्याआधी विकीची साधी चौकशी पण केली नाही? की त्याच्या घरचे कोण आहेत, तो कुठे नोकरी करतो? ते प्रश्न शीवला पडतायं. वीकीच्या घरच्यांचीपण औपचारीक का होईना पण पसंती विचारात घ्यायला हवी होती.

आधी घरातच चर्चा करताहेत. आता मुलीला मुलगाच पसंत नसेल तर कशाला करतील मुलाच्या हजार चौकश्या?

मोजो म्हणतात ना, मी मुलाची चौकशी करणार आहे.

बर, त्या आजीच्या तोंडात तीळ भिजत नाही. भारीच वाचाळ. सूनेसमोर कशाला विकी आणि गौरीचे पुराण?

------------
परवा पर्यंत अगदी वचावचा शिव च्या अंगावर ओरडणारीला आता डोळे बंद केल्यावर लगेच शिव दिसायला लागतो?

कमाल आहे.

परवा पर्यंत अगदी वचावचा शिव च्या अंगावर ओरडणारीला आता डोळे बंद केल्यावर लगेच शिव दिसायला लागतो?>> यावर प्रकाश पाडा. मी ऑलमोस्ट रोज मिसतेय ही शिरेल. Uhoh

>>>>
इथे चौकशी न करताच मोजो शिवला सांगतात की गौरीचे विकीशी लग्न होणअय्याय्य्याप्प <<<<<<

अय्या हो ते विसरलेच. हा भाग. हो, शिवला आधीच का सांगितले ते कळले नाहीच.
जर दोघे (शिव आणि गौरी) नुसते बरोबरच येतात आहेत आणि मुलीवर विश्वास आहे तर त्याला "बाहेरच्याला" अशी समज द्यायची काय गरज?
मोजो एक्दम जुनाट विचारांच दाखवले आहेत. मुलीलाच सांगायचे मग , बाई गं तू लग्नाची झालीस आता गल्लीतल्या मुलाबरोबर बोलू नकोस. Proud बुरसटलेपणा मोजोंचा.

आधी मुलीला पसंत आहे की नाही माहित नाही , नवरा मुलगा काय दिवे लावतो माहित नाही आणि शिवला समज देताहेत..

------

मीतु, अगदीच किळस येइल असा प्रकार... कोणी मुली असतात काय अश्या?

Aj meetu shiv barobar bus stand var dance kartey asa swapna baghte.
Tyat tichya payatle sandals je dakhvlet te gauri ghalte tech ahet.....
Same sandals nastat bara ka Don maitrininche.... hahaha

इथे चौकशी न करताच मोजो शिवला सांगतात की गौरीचे विकीशी लग्न होणअय्याय्य्याप्प <<<<<<

मला वाटतय मोजो म्हणतात विकिच गौरीशी लग्न होनार आहे समजलास ना.. आणि शिव पण वेगळ्या अर्थाने मान हलवतो ..अस वाटल मोजो त्याला सांगत आहेत की तु त्याची चौकशी कर

म्हणुन तर शिव लगेच चौकशी सुरु करतो ना..

Tyat tichya payatle sandals je dakhvlet te gauri ghalte tech ahet.....
Same sandals nastat bara ka Don maitrininche>>
Travelling in same boat. किंवा दुसर्‍याच्या बुटात जाऊन बघतात ना कसे वाटते ते. तो प्रकार असेल. Proud

मला तर काल त्या भावाची दया येउन राहिली आहे. वडिलांनी ड्रामा केल्याने ऑस्ट्रेलियाचा चान्स गेला. इथली नोक री सेट होती ती डळमळीत झाली. बायको बिथरलेली आहे आता आर्थिक नुकसान पण होणार. न जायचा निर्न य घ्यायला नको होता लगेच भावना प्रधान होउन. उलट जाउन आईबाबां ना बोलवायचे. मराठी सिरीअल कांगारूलँड मधून. आणि ती आई साधी कॉफी देते तर किती ड्रामा. आधी देण्याचे मग कशी झाली आहे अरे काय मिशे लिन ग्रेड रेसीपी आहे का?

गपारे ! ती मालिका आत्ता कुठे सुरु झाली आहे. जानव्ही च बाळंतपण लांबल अशी काही परिस्थीती अजुन आलेली नाही. एकदा त्या मीतु ने ओव्हर अ‍ॅक्टींग केली. किती शिव्या शाप देता.

विकी मो.जो.समोर एक से एक पुड्या सोडतो... एमबीए होऊन नासात नोकरी वगैरे Uhoh रेडिओवर नोकरी करणारे गृहस्थ, यांचं सामान्य ज्ञान इतकं सामान्य असावं, की या पुड्यांचा त्यांना संशयही येऊ नये!!

आणि तो डोळे बंद केल्यावर समोर शिव दिसणे वगैरे यशचोप्रा-स्टाईल सीन पण जरा लवकर आला.... आणखी काही एपिसोड्स जाऊ द्यायला हवे होते त्यासाठी.

Pages