काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर काय.. शिवाय विकी आणि त्या वहिनीचा सीनही वैतागवाणा.

संकल्पना चांगली, अभिनेते चांगले तरी एक्झिक्युशनमधे, वाईट दिग्दर्शनात काय वाट लागू शकते सिरियलची याचं हे आदर्श उदाहरण.

मी काल बघायला विसरले. पण विशेष काही वाटले नाही. कंटाळा यायला लागला बहुतेक मला. त्या हिरोसाठीच बघितली तर बघेन मधेच.

विकी वहिनीला घेउन घरी आला. वहेनीने सगळ्याची माफी मागितली .
आता तीची वागणूक एक्दम बदलली आहे .

शेवटी आजी ने गौरी आणि विकी ची जोडी लावलीच .
मोजो नी सान्गितलं की सगळी चौकशी केल्यावरच ठरवूया , घाई नाही .
तिकडे शिव ची अम्मा पण त्याच लग्न ठरवतेय

विकी , निशाला फसवतोय . घर द्यायच स्वप्न दाखवून पैसे लुबाडणार .
आणि निशा पूरती भुललीय . आणि ती विकीला सांगते की त्याच्या आणि गौरीच्या लग्नाचा विशय चलल आहे घरी.

त्या गौरीला तोंड आहे तर पटापटा बोलत का नाही विकीबद्दल विचारल्यावर. झीमाठ्हिरविण ही पण.
एखादी नॉर्मल मुलगी असती तर असं पट्कन विकीशी तुझं लग्न ठरवतोय म्हटल्यावर निदान
'काय?' असं वस्सकन आश्चर्याने रीअ‍ॅक्ट तरी झाली असती.
हिच्या चेहर्‍यावर काही एक्सप्रेशनच नाहीत.

आणि आधी मुलाला विचारा ना. लगेच काय गावभर ढिंडोरा.

मोजो ना शिव-गौरीचं जुळणार असे पुर्वसंकेत मिळाले वाटतं. Happy काल त्याला एकट्याला त्या झोलरशी गौरीचं लग्न होणारे असं सांगत होते.

आणि आधी मुलाला विचारा ना. लगेच काय गावभर ढिंडोरा.

नीलम शिर्के गायबच झाली एक्दम. चांगली होती ती.>> या शिरेलीत होती???? मला नाय दिसली कधी. Uhoh

सस्मित... Lol तू शुगो सारखं एकच वाक्य थोड्या डायलाॅगनंतर का टाकतेयस?

मी पण सोडलं बघायचं. पसंत आहे मुलगी मध्ये पन दोन कारस्थानी बायका आल्या आहेत. त्यामुळे ते देखिल सोडले. नांसौ बघते फक्त. जेवताना. काल संपदाचा सीन छान होता.
आता नै वाट्तं गौरी ओरडत. मला ती वहिनी आजिबात आवडत नाही.

सस्मित... हाहा तू शुगो सारखं एकच वाक्य थोड्या डायलाॅगनंतर का टाकतेयस?>>>>>>>>>> कोणतं वाक्य गं? खरंच कळलं नाही मला.

विकी ला वहिनीने गौरीच्या लग्नाबद्दल सांगताच त्याच्या डोळ्यात लगेच चमक दिसली... काहितरी करणारच हा..

ती वहिनी अतिशय थोराड दिसते . मलाही नाही आवडत .
आणि सारख आपलं नवर्याला शोना आणि बेबी म्हणते ... म्हणून आणखी डोक्यात जाते .

नीलम शिर्के गायबच झाली एक्दम. चांगली होती ती.>> या शिरेलीत होती???? मला नाय दिसली कधी + १ मलाही नाही दिसली कधी, नाव काय आहे तिच्या पात्राचे यात

नीलम शिर्के गायबच झाली एक्दम. चांगली होती ती.>> या शिरेलीत होती???? मला नाय दिसली कधी + १ मलाही नाही दिसली कधी, नाव काय आहे तिच्या पात्राचे यात

आणि आधी मुलाला विचारा ना. लगेच काय गावभर ढिंडोरा.>> हे वाक्य, सस्मित!!

तू एकाच पोस्टीत दोनदा लिहिलंस.. मानिनी तर पोस्टीच दोनदोनदा टाकतेय. Happy Light 1

विकी आणि वहिनी डोक्यात जातात.

ह्या दोघाबद्दल काहीही दाखवतात. विकी रुममेट चा शर्ट काय घालतो त्याचा रुमालानी त्याचा समोर शेंबुड काय पुसतो. वहिनीला ३ कोटीचा टेरेस फ्लॅट ६० लाख, नंतर आजुन १० लाख कमी करुन ५० लाखात, घेउन द्यायचे वचन देतो आणि नवर्याला सांगु नको म्हणुन काय सांगतो. आणि वहिनी पण त्याचा विंनन्तीला मान देउन १ लाख रोख आणि ४ लाख नंतर द्याय्चे कबुल करते.

ही पात्र जास्त दिवस राहिली तर सिरियल बघायची सोडावी लागेल. ....

निधी Happy
अरे त्या दादा-वहिनीला पाठवा ऑस्ट्रेलियाला आणि विकीला झोल करण्य्च्या, फसवणुकीच्या आरोपात जेलमधे. हाकानाका.

अरे त्या दादा-वहिनीला पाठवा ऑस्ट्रेलियाला आणि विकीला झोल करण्य्च्या, फसवणुकीच्या आरोपात जेलमधे. हाकानाका. >> हे व्हायला होसूमीयाघ च्या संदर्भाप्रमाणे मिनीमम २ वर्षे लागतील...

गौरीला डोळे बंद केल्यावर शिव दिसला चक्क..

येवढ्या लवकर??

शिव मात्र सगळ्यात मस्त कॅरॅक्टर पकडुन आहे..

मस्त्च वाटतो तो..

Pages