काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित असच मानून घ्यायला हव
त्या
गौरीचा व्हॉल्युम कमी व्हायला हवा .....>>> आता राग ओसरेल तिचा मग होईल व्हॉल्युम कमी, आजच्या भागात शिव तिच्या बाबांना मदत करणार आहे , ही त्याची सुरूवात आहे .

शिवने पण इथली भाषा शिकण्याचे प्रयत्न दाखवायला हवेत, इथल्या खाण्याबद्दल, संस्कृतीबद्दल कुतुहल दाखवायला हवं. गौरीनेपण ताडताडताड न बोलता समजाऊन सांगायला हवं सर्व. हे पण मी झीवर लिहीलं आहे.

शिवने पण इथली भाषा शिकण्याचे प्रयत्न दाखवायला हवेत, इथल्या खाण्याबद्दल, संस्कृतीबद्दल कुतुहल दाखवायला हवं. >>> प्रेमात पडला की करेलं की . हळूहळू करेल . आल्याबरोबर लगेच कसं होइल ??
एकतर होमसिक झाला आहे तो . त्यात त्याला गौरी सारखी शेजारी Sad . त्याची ईच्छा तरी कशी होईल ??

मला टायटलसाँग आवडलं. "वादा घरवालोंसे तेरे.." वगैरे आजपर्यंत कुठल्या हीरोने म्हटलेलं मी तरी नाही ऐकलं. तिच्या घरच्यांचासुद्धा इतका विचार करत असेल तर ग्रेट!

तो शिव अम्माला, ते सावंत लालची आहेत, आजीकडून काम करून घेतात हे असलं का बाहेर उभा राहून सांगत बसतो.

आता तो मदत करेल ते बाबा रस्त्यात पडतात तर. मोहन जोशींचे काही डायलॉग मस्त. नवीन पिढीशी जुळवून घ्यायला हवं तेव्हा जुन्या पिढीशी पण जुळवतो, चांगल्या बाबतीत हवं जुळवून घ्यायला ह्या आशयाचं म्हणतात.

त्या आजी नातसुनेला चहा देतात, हरकत नाही पण तिने अधूनमधून तरी त्यांना आणि बाकीच्यांना द्यायला हवाना. ती नोकरी करते फक्त, घरात काही करत नाही. मुलगापण तसाच. बाकी आजी, बाबा, आई, गौरी सगळे कामसू आहेत. घरात पण आणि बाहेरही आघाड्या सांभाळतात. आजी बाहेर जात नसली तरी कामाचा व्याप मोठा आहे तिच्या.

मी पण बघायला लागले ही मालिका मोजो मुळे.
आत्ता तरी आवडतेय. जावई सासू नोकझोक मस्त!
शुभांगी गोखले टिपरेमधूनच पुढे कंटीन्यू झाल्यासारखी वाटतेय. ती पण फारशी किचनमधे दाखवली नाही. सारखी पेपर नायतर वह्या तपासते.

आज नव्हती किचनमध्ये नाहीतर असते थोडा वेळ ;). तिला त्यादिवशी पोळ्या नीट करता आल्या नाहीत म्हणून आजी तिला हाताखाली घेतात बहुतेक. Lol

हम्म एकंदर आज्जींच्याच हातात स्वयंपाकघराचा ताबा दिसतोय. Happy बादवे तो बसस्टॉप वगैरे परिसर होसुमीयाघ मधलाच वाटतोय.

पास्पोर्ट वैगेरे तयार होइपर्यंतआपण परदेशात स्थायिक होणार आहोत हे मुलं घरी सांगत नाहीत हे पट्लं नाही. पण असम होउ शकतं Sad

तो शिव असा जजमेंटल कसा झाला? पैसोके लिये बुढी नानीसे काम कराते है वैगेरे? मला नै आवड्लं.
का ते कोणा दुसर्‍याबद्दल असेल?

जजमेन्टल नाही झालाय तो, त्याला त्या विकीने सांगीतलय तसं.

विकी अत्यंत इरिटेटींग आहे हे पुन्हा एकदा नोंदवून ठेवते.

जजमेन्टल नाही झालाय तो, त्याला त्या विकीने सांगीतलय तसं. +१
युपी/ बिहारमध्ये सुना आल्या की मागची पिढी काम करत नाही ordery सोडतात व सुपरविजनच काम करतात हे २० वर्षापूरवीच सांगतेय सध्याचा trend माहीत नाही ...

शिवची युपीयन तेहजीब चांगली दाखवलीय पण. तो व्यवस्थित चिडका दाखवलाय हेही आवडलं. एकंदरीत त्याच्यातलं बरंच आवडलय.

मोहन जो, आज्जी शुगो शिव छान वाटत आहेत
गौरी ला उगाच लाऊड केलय..

परवाच गणपती बाप्पा वाल स्पीच तर हास्यास्पद वाटल अगदी..

तो २-३ दिवसा पुर्वी आलाय त्याने मुंबै अजुन नीट पाहिलि पण नाही..

खरतर हिचच चुकलय आणि वर हिच लेक्चर देत आहे..

वाटल की मधेच ही काय बड्बड करायला लागली..

कालच्या भागात आजी आणि मोजोचा सीन फार आवडला मला. एकीकडे एकमेकांना टोमणे मारत असतात आणि मो जो बाहेर जायला निघतात तेव्हा आजी आयकार्ड आणि काय काय घेतल की नाही त्याची आठवण करुन देतात आणि मो जो सुध्दा माझा लाईव्ह कार्यक्रम आहे तो ऐका अस सांगतात. त्यांच्या संवादा मधून परस्परांबद्दल वाटणारी काळजी पण डोकावत होती. Happy

जनरली सासू सुनेचा नातं दाखवलं जातं पण इकडे जावई आणी सासूबैंचा नातं मस्त जमून आलंय … हे म्हणजे तुझा माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असला प्रकार आहे :इश्श:.. मोठा मुलगा, सून, गौरी आणि विकी जाम irritating आहेत Angry … बाबा , आजीबाई आणि शिव फारच सहज Happy … आणि त्यांचा घर पण आपल्यातलच वाटावं असं आदरमोद…. वेणू पण innocent वाटतो पण तो काही बोलूच शकत नाही ....

हे म्हणजे तुझा माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असला प्रकार आहे >>> + १०००० .

एक पटत नाही . गौरीमुळे शिवची नोकरी गेली ह्याच कोणालाच कसं वाईट वाटत नाही.
म्हणजे वाईट वाटत पण ते वरवरचं . वर " तु काही मुद्दाम केलं नाहीस ना" असं म्हणतात .
बाहेरगावावरून आलेल्या एका माणसाची नोकरी आपल्या मुलीच्या फालतुपणामुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे जाते , याचं गाम्भिर्य कोणालाच कसं नाही. वर मोजो आणि त्यांची सुकन्या त्याच्यावरच कावलेले असतात .

हो एकंदरीत नोकरी गेल्याचे गांभीर्य कसं नाही ह्याचं मलापण आश्चर्य वाटलं. त्या दिवशी गौरीला लगेच कळले तर तिने पाहिलं तिच्या बॉसना जाऊन सांगून त्याची नोकरी वाचवायला हवी होती, मग त्याची माफी मागायला त्याच्या पाठीमागे जायचं.

बरं शिवपण भरपूर पैसे असल्यासारखा त्या विकिला हे घे पैसे करत असतो.

मो जो ना अजून राग यायचं कालचे कारण योग्य होतं कारण हा शिव आईला कळवतो त्याच्या, हे लालची लोक्स म्हाताऱ्या आजीला कामाला लावतात. शिवचं चुकलंच ते. आजचा रात्री १२ला बघेन.

हो हो माउ तोच.

आजचा भाग मस्त, तो शिव काय दिसत होता, क्युट. कामपण किती सहज, नैसर्गिक करतो.

अरे तो हाॅस्पिटलचा स्टाफ आहे की मस्करी... सरळ तु घेऊन जा म्हणून सांगतात.. मग हे कामगार कशाला?? Angry

शिवने ऑफिसमध्ये जाऊन बघायला पाहिजे होतं ना त्याची नोकरी खरंच गेलीय का नाही ते. मठ्ठ कुठला. Happy

शिव काय दिसत होता, क्युट.>> +१. मला त्याचे डोळे फारफार आवडतात. Happy
आणि गौरीचे अज्जिबात आवडत नाहीत. अर्धोन्मेलित का काय म्हणतात त्यापेक्षा थोडेसेच जास्त उघडे असतात. Happy पण ती हसली की मस्त दिसते एकदम.

बाकी कोणाचं काय व्हायचं ते होवो, पण त्या विकीला कोणीतरी चोपचोप चोपलेला बघायचय मला Angry

निधी + १००००००० .
त्याला कळतं की हे गौरीचे बाबा आहेत आणि त्याला आठवत की आपण अम्माशी फोनवर काय बोलत होतो.
तेव्हा त्याचे डोळे आणि चेहरा एकदम कातिल !!!

बाकी कोणाचं काय व्हायचं ते होवो, पण त्या विकीला कोणीतरी चोपचोप चोपलेला बघायचय मला>> पहिले ह्याला अनुमोदन.

शिव काय दिसत होता, क्युट.>> +१. मला त्याचे डोळे फारफार आवडतात. >>>>>>>>> मग ह्याला अनुमोदन. Happy

जावई-सासु मस्तच.
गौरी नाही आवडते. शिव आवडतोय. काल शिव मोजो गॉरीचे बाबा आहेत हे समजल्यावर कसला खजील झाला होता. त्याचं अम्माशी फोनवर चं संभाषण मोजो ने ऐकलेलं हे आठवुन.

Pages