काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायिका प्रियांका चोप्राच्या कोलगेट अ‍ॅडमध्ये पण आहे.... तिच्यावर फोकस नाहिये फार पण हीच आहे ती.

मला ही नायिका बघून आणि तिचा आवाज आणि उंची बघून कायम "पुर्वा गोखले" आठवते.

मस्त होता आजचा भाग, कधि नव्हत एखादी मालिका बरी वाटतेय तर झी ने भ्रमाचा भोपळा फोडला नाही म्हणजे मिळवली ....
आयला ! झी ला कसला देखणा क्युटी हिरो गवसलाय , लय भारी! अभिनयही सहज करतोय अगदी, मोजो तर टॉपच...गौरीचा तोन्डावळा निवेदितासारखा वाटतोय.

आजीला विकी आवडतो गौरीसाठी ?????
नssssssssssssही
त्या ठोंब्याला मीच बदडु काय असं वाटतं मला एवढा तो इरीटेटींग आहे.

विकी चा सगळ्याना एवढा राग येतो आहे हेच अपेक्षित आहे ना त्या भुमिकेसाठी....
म्हणजे जो कोणी तो अभिनेता आहे त्याने बरोबर पकडलय ते कॅरॅक्टर..ईरीटेटींग, लब्बाड माणसाचं...लोकांना त्याचा खुप खुप राग येइल तेव्हाच शिवचा चांगुल्पणा उठुन दिसेल ना...सगळेच चांगले असले तर मग आपल्या हीरो ला काय अर्थ ;-)....अर्थात हे माझं वैयक्तीक मत....

बाकी शिव खरच मस्त आहे ( बदाम बदाम बदाम ) Wink

हॉस्पिटलच्या एका दृश्यात मो.जो. बायकोला तिच्याच स्टाईलमध्ये 'शांतता, शांतता' म्हणतो, ते मो.जो.ने फार सहज घेतलं... काळजी + उस्फूर्तता नेमकी पकडली.

हिरोचे डोळे फार बोलके आहेत.

हिरवीण खेळकर, हलक्याफुलक्या प्रसंगात अधिक चांगली वाटते; पण गंभीर प्रसंगांत तिच्या डोळ्यांत कुठल्याही भावाचा अभाव जाणवतो.

विकीचा इतका उगीच हलकटपणा त्या भूमिकेकरता अजिबात अपेक्षित नाही. थोडीफार लबाडी, वर वर गोड बोलणं पुरेसं होतं.
आणि वाटणार्‍या इरिटेशनचं क्रेडिट त्या अ‍ॅक्टरचंच तर आहे शंभर टक्के. फरक इतकाच की त्यात त्याच्या भूमिकेच्या कौशल्याचा भाग नाही, त्याचा जनरल वावरच इरिटेटींग आहे प्लस भूमिकेचं लिहिणे.

हिरॉईनचा वावर सहज आहे, प्रसन्न आहे. बाकी अभिनयातली मॅच्युरिटी तिला भूमिकेची नस मिळत जाईल तशी येत जाईल असं वाटतं. तसंही सिरियलमधे काम करायला मोजक्या पाच-सहा एक्स्प्रेशन्सपेक्षा जास्त वाव असतो कुठे कुणालाही.

मागे कुणीतरी लिहिलं होतं वॉर्डरोबबद्दल. तर मलाही जाणवतय की त्याच त्याच स्टाईलच्या ड्रेसेस मुळे खूप मोनोटोनी येते नायिकेच्या दिसण्यात. इमेज बिल्डिंगचा भाग म्हणून मुद्दाम त्याच त्याच स्टाईलचा वापर करत असतील का असंही वाटतं. पण रेग्यूलर बघत राहिलं तर नक्कीच बोर होणार.

खलनायक्/नायिका देखील इंटरेस्टिंग करता येतात. उदा.असंभवमध्ये सुलेखा राऊत हे पात्र इतकं जबरी करायची नीलम शिर्के की तिच्यासाठीच ती मालिका आवर्जून बघितली जायची. कारेदु मध्ये रजनी किंवा होसूमीमध्ये जान्हवीची आई हीदेखील निगेटिव्ह पात्रं असली तरी उत्तम अभिनय असायचा म्हणून शशिकला होसुमीमध्ये खिळवून ठेवायची. मात्र हे विकी हे पात्र आणि तो कलाकार खरंच टाकाऊ आहेत.

खलनायक्/नायिका देखील इंटरेस्टिंग करता येतात. उदा.असंभवमध्ये सुलेखा राऊत हे पात्र इतकं जबरी करायची नीलम शिर्के की तिच्यासाठीच ती मालिका आवर्जून बघितली जायची. कारेदु मध्ये रजनी किंवा होसूमीमध्ये जान्हवीची आई हीदेखील निगेटिव्ह पात्रं असली तरी उत्तम अभिनय असायचा म्हणून शशिकला होसुमीमध्ये खिळवून ठेवायची. मात्र हे विकी हे पात्र आणि तो कलाकार खरंच टाकाऊ आहेत. + १

विकीबाबत शर्मिला फडके आणि मानिनि च्या सगळ्या पोस्टस ना अनुमोदन.
आज्जीला नक्की विकीच आवडलाय गौरीसाठी Angry

नचिकेतचं वागणं आधीही चुकलं.. पण नंतरही त्याला गिल्ट देउन आईवडीलांना सोडून करीयरच्या निमित्ताने लांब जाणार्यांवर उगाच ताशेरे ओढलेत असं वाटलं. नंतर त्याने जाणंच कॅन्सल केलं तेही फार पटलं नाही. आणि नेहेमीप्रमाणे त्यांना (विशेषतः त्याच्या बायकोला) वाईट दाखवलंय तेही आवडलं नाही. त्यांचीही काही बाजू असेल असं वाटून गेलं. (मे बी सिमिलर फेजमधून जातेय म्हणून असेल).

नचिकेतचा पासपोर्ट मोहन जोशींकडे असतो हे त्याला माहित नसतं ना? तरीही तो आणि निशा मस्तपैकी शॉपिंग करत एन्जॉय करत फिरत असतात का?
आय मिन- जर तुम्ही परदेशात नोकरीसाठी/सेटल होण्यासाठी जाणार आहात आणि १५ दिवस आधी तुमचा किंवा जोडीदाराचा पासपोर्ट हरवला तर तुम्ही असं एन्जॉय करु शकाल का?

दुसरी गंमत म्हणजे आजी मोहन जोशींना सांगते की तुम्ही नचिकेतवर चिडू नका कारण मुलगी लग्न होऊन गेल्यावर तुम्हाला त्याचाच आधार आहे. त्यावर मोजोंनी सांगायला हवं होतं की तुम्ही जसं माझ्याकडे राहाता तसा मी आणि तुमची मुलगी पण गौरीकडे जाऊन राहू Wink

दुसरी गंमत म्हणजे आजी मोहन जोशींना सांगते की तुम्ही नचिकेतवर चिडू नका कारण मुलगी लग्न होऊन गेल्यावर तुम्हाला त्याचाच आधार आहे. त्यावर मोजोंनी सांगायला हवं होतं की तुम्ही जसं माझ्याकडे राहाता तसा मी आणि तुमची मुलगी पण गौरीकडे जाऊन राहू +१

कालचा तो ऑफिसमधल्या मैत्रिणीचा अभिनय म्हणजे शुद्ध बावळटपणा वाटला. डोळ्यांत बदाम समजू शकतो, पण काल ती त्या अ‍ॅक्सच्या जाहिरातीतल्या बायांसारखी वाटत होती Angry
विनोदी म्हणून टाकलेल्या प्रसंगाने उबग आला...

>>>>>>कालचा तो ऑफिसमधल्या मैत्रिणीचा अभिनय म्हणजे शुद्ध बावळटपणा वाटला. डोळ्यांत बदाम समजू शकतो, पण काल ती त्या अ‍ॅक्सच्या जाहिरातीतल्या बायांसारखी वाटत होती राग
विनोदी म्हणून टाकलेल्या प्रसंगाने उबग आला...<<<<+१

अतिशय कळस होता लोचटपणाचा. विकी सारखेच एक आणखी पात्र.

एवढं वसवसल्यासारखे कोन मुलगी बघेल असे काही वाटत नाही.

ह्या सिरियलमधली आतापर्यंत अतिशय खटकणारी गोष्ट(गोष्टी)

१) सुरुवातीला उगीच हिंदी भाषिक भाजीवाले चांगले दाखवणे
२) अतिशय उच्च स्वरात नायिका बोलणे
३) ऑफीसचा अति मुर्ख सीन( अगदी आवाज ताणून किम्चाळतच सुटने नायिकेचे की आजीचा डब्बा का नाही खल्ला). ऑफ्फेस मधून उठ सूठ लवकर पळून घरी मात्र संध्याकाळीच येते ती नायिका. Sad
४) शुभांगी गोखले फक्त, शांत शांत... सतत अधून मधून डोक्याला हात लावणे एवढेच. टीचर असल्याने बहुधा तिला तेच म्हणायला जमतं
५) आजीचे अशुद्ध मालवणी(इथेही आहेच)
६) मुंबईत येवून काही दिवस झाले तरी नायकासमोर सतत मराठी कशाला बोलणे, गिव हिम सम टाईम!
७) उर्मट आवाजात भुकेल्या नायकासमोर, 'हम' समजावणे म्हणजे घुसडलेला सीन होता.
८) मुलगा पराकोटीचा बावळट दाखवणे, आणि बापाने उगाच बाहेर जायचे स्वप्न असलेला मुलगा म्हणजे आकाश कोसळलय अभिनय... इतके आजचे आई वडील नसतात. अगदी आमच्या कामवालीचा मुलगा बाहेर गेला, पन ती शाळेत न गेल्ली बाईला समजले की, काय करणार वो ताई, त्याचा कामच हाय.
९) विकी बोरींग पात्र

मी पहातच नाही ही सिरियल.. झी मराठी ला सध्यातरी रामराम ठोकला आहे. अगदीच वेळ नसेल जात तर पाहिन. तसंही कुठून पण पहायला सुरूवात केली तर कळेल अशाच असतात टिव्हीवरच्या शिरेली.

Pages