काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि सगळे स्कूलबसने गेल्यासारखे काय जातात. सर्व अ‍ॅडल्ट आहेत आपापले जाउ शकतात ना? >> हो ना . रिक्शाने पण जात नाहीत एकत्र , किन्वा टॅक्सीने .
नाही ते सगळे एकाच ठिकाणी कामाला आहेत .

बसने एकत्र जातात किंवा शिव तिथे थेट राहायला आला यात काही ऑड वाटलं नाही मला.
शिव यायच्या आधीपासून विकी आजीला सांगत असतो की उद्यापासून एक डबा जास्त आहे. म्हणजे शिव आणि विकीची आधीपासून काहीतरी ओळख असणार.

शिव आणि विकीची आधीपासून ओळख असती, तर विकी त्याच्याशी सुरवातीपासून मराठीत बोलल्यावर शिव त्याला काहीही म्हणत नाही, हे मला पचायला कठीण आहे. असेल बापडी. मी तरी आजवर कुठल्याच नवीन जॉब मिळालेल्या माणसाला असे आधीपासून घर बुक केलेले पाहिलेले नाही. लोक मोस्टली प्रत्यक्षात घर बघूनच मग ते नक्की करतात. तो आधी येऊन गेलाय म्हणावे तर त्याला पत्तादेखील माहीत नसतो. असो.

असे विकी सारखे लोक पण असतात आणि ते नव्या आलेल्यांचा गैर फायदा पण घेतात. राज्या बाहेरच्यांना राज्यातले लोक पण कसे फसवतात ते चांगले दाखवले आहे. दोन झटके बसल्या शिवाय शहाण पण येत नाही. ते असे. मराठी समाजातला भामटे पणा दाखवला आहे. ह्या शिवला म्हाळसे ऐवजी बानू मिळावी हीच प्रार्थना.

लली +१. कित्ती ओरडते एकतर ती बया. तेही घरी आल्यावर आपले काहीतरी चुकलय हे जाणवत असताना. येडचपपणाच करतात लोक.

राज्या बाहेरच्यांना राज्यातले लोक पण कसे फसवतात ते चांगले दाखवले आहे. दोन झटके बसल्या शिवाय शहाण पण येत नाही. ते असे. >>+१

मी ऐरोली डीएव्हीत नवीन असताना गेले होते. व ड्रेस शिवायला टाकायचे होते. तर शाळेतून बाहेर पडल्यावर राइट गेल्यावर पाच मिनिटाच्या अंतरावर ते टेलरचे दुकान होते - शाळेने स्पेसिफाय केलेले. -
तर आटोवाल्याने ऐरोली ब्रिज परेन्त नेउन मग सापडत नाही म्हणून मध्येच उतरवून टाकलेले.

प्रॉपर्टी एजंट ने जास्त चार्ज लावला घर रेंट करताना. व घरातही अनेक बाबी होत्या ज्या आम्हाला नंतर कळल्या.

मोलकरणीने जास्त पैसे मागितले. आता हे सर्व देण्याआधी मी चेक करायला हवे होते १००% पण आपण मराठी म्हणून विश्वास टाकतो. किम्वा अनभिज्ञ असतो व आर्थिक नुकसान थोडे होते. तो पक्के पणा मुंबाईत राहून अनुभव आल्यावरच येतो असे मला वाट्ते. शिवच्या चेहर्‍यावरचा गोंडस पणा बघून हा देखील चार धक्के खाईल व मग पक्का होईल असे वाटले मग हीच काय कितीही पोरी फिरवेल. पाच दहा रुपया साठी वाद घालेल. काटेकोर वागेल. जास्त माहिती देणार नाही. जैसे यहां होता है.

ती गौरी काल जी गेलीये ती डोक्यातच आहे अजुन माझ्या. आज बघु की नको.
तो विकी होताच स्ट्रेस त्यात हिचीही भर. काल जाम पकवलं तिने. जे काही भाषण दिलं ते शिव बरोबर माझ्याही डोक्यावरुन गेलं. (आणि ती डोक्यात)
आजीनी पण निराशा केली. तोडकं मोडकं हिंदी यायला हवं होतं त्यांना.

मोलकरणीने जास्त पैसे मागितले. आता हे सर्व देण्याआधी मी चेक करायला हवे होते १००% पण आपण मराठी म्हणून विश्वास टाकतो. किम्वा अनभिज्ञ असतो व आर्थिक नुकसान थोडे होते. तो पक्के पणा मुंबाईत राहून अनुभव आल्यावरच येतो असे मला वाट्ते. >> मुंबईतच असं काही नाही. कुठल्याही नवीन ठिकाणी रूळताना हे सगळं कमीअधिक प्रमाणात होतंच असतं.
कधीही नाव न ऐकलेल्या नकाशावरही न दिसणार्‍या गुजराथमधल्या गावात ट्रान्स्फर झाली तेव्हा माझ्या नवर्‍याचीही अशीच परिस्थिती झालेली होती. इथल्या मेन ऑफिसकडून तिथल्या मेन ऑफिसचा पत्ता आणि तिथल्या मॅनेजरचं नाव फोन नंबर मिळाला होता. कधीही न पाहिलेल्या भेटलेल्या मॅनेजरशी फोनवर बोलून त्या गावात माझी राहण्याची सोय करू शकाल का असा प्रश्न आणि त्यावर त्याचा होकार एवढं एकच काम इथून बॅगा घेऊन निघताना झालं होतं. बाकी जेवणाबिवणाची सोय तिकडे गेल्यावरच केली होती. पहिला दिवस तर ओळखीपाळखी करून घेण्यात गेल्यामुळे उपासच घडला होता. इथल्या लोकांना गावात नवीन आलेल्या पाहुण्याला जेवायला विचारायचीही पद्धत नाही असं मत झालं होतं नवर्‍याचं. सभोवती माणासांचा गराडा असल्याने सोबतचे तहानलाडू भूकलाडूही खायला मिळाले नव्हते. घर नामक प्रकार मिळाला होता ती एक रिकामी खोली होती. बाथरूम घराबाहेर वीसेक फुटांवर होतं. बाकी स्वयंपाकासाठी ओटा-बीटा तर दूरचीच गोष्ट, तरीही पहिल्या दिवशी पाठ टेकायला जागा आणि डोक्यावर छप्पर मिळालं या समाधानात तो राहिला. मग हळूहळू रूळत गेला तशी राहण्याजेवण्याची सोय स्वतःला मानवेल अशी त्याने करून घेतली. ते गाव सोडताना इतका लोकसंग्रह जमा झाला की आज तीन-चार वर्ष झाली तरी रोज तिथल्या किमान ५ लोकांचे ख्यालीखुशाली विचारायला फोन येतात. Happy

ही झीवरची मालिका आहे, डेली सोप आहे त्यामुळे या मालिकेकडून कसलीही अपेक्षा ठेवणे गैर आहे हे मला माहिती आहे. मी हे वर लिहिलेलं सगळं इथे खूपच अवांतर आहे, पण जे आपण बघतोय ते त्यातल्या केवळ वाईटच किंवा खटकणार्‍या गोष्टीच नोंदवण्याकडे आणि फक्त नावं ठेवण्याकडेच कल दिसला, मालिकेतली एखादीही चांगली गोष्ट कोणाला नोंदवावीशी वाटली नाही म्हणून हे सगळं लिहावंसं वाटलं.

घर छान आहे. उगाच भलं मोठं किंवा बंगला नाही. माण्सं नॉर्मल आहेत. उगा टोकाची ही आणि टोकाची ती नाहीत. Happy

विकी डोक्यात जातो. पण अशी लोकं असतात हे माहित आहे.

पण गौरी खरोखरंच डोक्यात गेली काल.

आणी शिव डायरेक्ट रहायला येतो ह्यात मला काहीही गैर वाटलं नाही.

मलाही ही मालिका पाहून असं वाटतयं की काहीतरी कमी आहे. म्हणजे कलाकार चांगले आहेत,प्राईम टाइम आहे पण सतत असं वाटतं की काहीतरी उणीव आहेच. सीन मध्ये संलग्नता वाटत नाही.एक सीन पूर्ण न करता घाईघाईत उरकून लगेच दुसरा सीन आला असं वाटतं. संवाद ही तोकडे वाटतात.
हिरो मात्र खरचं छान आहे. दिसतो छान आणि कामही मस्तच.
हिरोईन चं काम नाही आवडलं.

आई बाबा पण क्यूट आहेत गौरीचे. माझ्यामते ही फॅमिली कमिटी डिसिजन घेउन बनवतात. इतके पर्सेंट प्रेक्षक तरूण तर एक तरूण जोडी, एक मध्यम वयीन जोडी, एक म्हातारे पात्र जे बोलू शकत नाही किंवा फार बोलते. एक तरूण जोडपे. विथ देअर ओन प्रॉब्लेम्स. प्रेमाची फोडणी, बारके क्रायसिस वगिअरे. ...
जास्तित जास्त प्रेक्षकांना एक रेझोनन्स भेटला पाहिजे. त्या आतल्या गाठीच्या वहिनी सारख्या कितीतरी असतील. तसले दाढी वाले भाउ टाइप पण किती तरी दिसतात.

मी त्या झी फेसबुकवर. हम आप कमेंट नोंदवली. शिव आवडतो, विकी डोक्यात जातो. गौरी अति रूड वागते कधी कधी, सगळं लिहून आले Wink .

मला ही मालिका आवडते त्यातल्या त्यात आत्ता तरी. सध्या चालु असलेल्या पसंत आहे मुलगी किंवा नांदा सौख्यभरे किंवा सौभाग्यवती पेक्षा खूप बरी आहे. लोकं नॉर्मलआहेत घर नॉर्मल आहे हिरो हिर्वीण बेअरेबल आहेत असे किती तरी...

त्यातल्या त्यात आत्ता तरी.>>>+१
मी कालच साबा ला म्हणाले की, जानु-श्री बसस्टॉपवर भेटायचे तेव्हा मला होसुमीयघ आवडायची तशी आता ही कादिप पण थोडे दिवस आवडेल. मग आहेच येरे माझ्या मागल्या.

आजींना हिंदी बोलता येत नाही त्या चौबेकडून रेसीपी कशी घेतात . त्या फोनवरून चौबेशी बोलताना (ए चौबे अस ओरडून सुरूवात करतात )दाखवल्या आहेत ते कस ?

Pages