काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी अति आगाऊ, जराही ऐकून घेत नाही. किती बोलते त्याला.>> अगदीच वाइट नाहीये ती. फक्त राग चुकीच्या माणसावर काढतीये इतकच.

त्याला कळत नसतानाही ती मराठीतच बोलते, तो वेणू ट्रान्सलेट करुन सांगत असतो तर त्यालाही गप्प बसवते. आता हिंदीत बोलतेय ना ते आधीच बोलली असती तर त्याचे इतके हाल तरी झाले नसते.

नाही नाही वाईट नाहीच ती, आता तिला पश्चाताप होतोय पण बसमध्ये चार चौघात फार चुकीचं वागली, लोकांनी त्याला मारला असता म्हणजे, कारण लोकं म्हणत असतात छेड काढतो कारे? तर फक्त तो दुसरा मित्र त्याच्या बाजूने बोलायला जातो पण विकी गप्प करतो आणि गौरी काहीच बोलत नाही.

आहे ती सुंदर पण त्यासाठी तिला तोंड उघडून दात दाखवावे लागतात किंवा हसाव लागत , तिच्या अडसुळ्या दातांमुळेच ती सुंदर दिसाते .गेल्या काही भागात तिचा मुड खराब असल्यामुळे ती फारशी हसली नात्यामुळे बहुतेक फार सुंदर नाही वाटली .बाकी आता शिव अती करतो आहे अस नाही का वाटत ?

आज एक भाग पैल्यांदाच पाहिला. ईंटरेस्टींग वाटला. हिरोईनीच्या घरचे कलाकारही छान आहे. हिरो झालेलाची भोळीभाबडी स्टाईल मस्त आहे.

मला आजचा एपिसोड बघून तरी राजू बन गया जंटलमॅन आठवला.
जुही चावला आणि शाहरूखची केमिस्ट्री देखील याच पठडीतील दाखवलीय. दोघांचे स्वभाव आणि पार्श्वभूमीही.. आणि तो शाहरूखचा बूट फाटल्याने लंगडल्याचा सीन आणि त्यातून जुही चावलाचा झालेला गैरसमज.. जो दूर झाल्यानंतर पलटलेला सीन .. सेम असेच..

मी आधी लिहिल्या प्रमाणेच ऑफिस मधल तीच( गौरी च ) प्रमोशन परप्रांतीयानी लाटलं ( ज्याला तिने मदत केलेय) म्हणून ती इतकी फटकून बोलताना दाखवलेय त्या शिवशी . बेसिकली ती चागल्या स्वभावाची मुलगी आहेच . आपण पण काही वेळा आपला राग दुसर्यावर काढतोच कि ( वड्याच तेल वांग्यावर वगैरे ) तसं दाखवलाय . म्हणून लगेच काही गौरी डोक्यात जायला नकोय. मला आवडतेय ती आणि तीच वागण पण . असंच भांडणातून प्रेम जमणार आहे ना आणि शेवटी त्या शिवशी लग्न करून ती सासरी जाईल पण Happy

काल या मालिकेतही ’प्रेझेंटेशन’ आलंच... Angry

कालचा भाग जरा ताणल्यासारखा वाटला.

घरगुती दृश्यांपेक्षा ऑफिसेसमधली दृश्यं सुमार वाटतात.
एकंदर मालिका-लेखकांना कार्यालयीन कामकाज कसं दाखवावं हे नीट समजत नाही असं दिसतं. Wink

मला तर एक असे फीलिन्ग आले की रोमान्स लग्न नवथरपना हे सर्व उरकले की जी निखळ बायको उरेल त्याची प्रचिती शिवला आत्ताच येत आहे. कायम करवादणारी, उगीचच फुगून बसणारी वैतागलेली बायको ज्यांना झेलावी लागते त्यांना हे समजेल. अब उसको वौइच चाहिए तो अपुन को क्या. देख्नेका गंमत.

काल मला वाटले त्याला बस मधले लोक्स मारनार. मॉब फार आक्रमक बनू शकतो काही सेकंदात. तसे होते कि काय पन
तोडले. प्रेझेंटेशन म्हणजे वर्क रिलेटेड संवादात आलेच पाहिजे असे लेखकाचे ब्रीफ असेल. मी काल नांदा सौख्य भरे ते कादिप मधल्यावेळेत जुना पिंजरा सिनेमा बघत होते. संध्या कशी प्रत्येक संवा दाच्या आधी आता म्हण ते ते फार रोचक आहे. आज उरलेला पिंजरा.

बाकी आता शिव अती करतो आहे अस नाही का वाटत ?>>> अजिबात नाही. बसमधला प्रसंग तर कहर होता. पब्लिक वाट्टेल ते बोललं तरी ही बाई गप्प होती. शिवाय ऑफिसातला प्रसंग तर मुर्ख्पणा होता. तिचाही आणि तिच्या मख्ख बॉसचाही. एवढं सगळं झाल्यावर मग त्याने काय लग्गेच तिच्याशी हसुन बोलायचं काय?

सस्मित +१ .
तो बाॅस त्याची नोकरी घालवायला निघालाय त्याला आधी समजवायचं तर ही पर्स लावली नि शिवच्या मागे निघाली. येडपट.

रच्याकने गौरी त्या ऑफीसची मालकीण आहे की तिथे काही नियमच नाहीत. कधीही उठते, पर्स लावते नि निघते. विचारायचं सोडाच, सांगाव पण लागत नाही का? प्रमोशनच्या भागात पण आली, बसली, बाॅसने प्रमोशन अनाऊंस केलं, हिने मैत्रीणीला हाफ डे टाकायला सांगितल आणि निघाली. Uhoh

शिरेलीतल्या हापिसात हापिसातली सोडुन इतर सगळी काम होत असतात, तिथे नियम कशाला हवेत? >> Lol बरोबर आहे.
पण कारेदु च ऑफिस बरं होतं या बाबतीत. आधी अर्ज द्यावा लागायचा, तरीही नवरे डाफरायचे. कधीकधी रिजेक्ट पण व्हायचा अर्ज. पटायचं तरी ते. (सुट्टीच्या बाबतीत फक्त.) Happy

कारेदुच हापिस म्हणजे __/\__ कलाकारांच्या गळ्यात आयकार्ड्स आणि कॉफी व्हेंडींग मशिन्स दाखवुन घराच हापिस केल्यासारख वाटत होत, तिथे कॉम्प्युटर्स कधी चालु दिसले नाहीत, नुसत्या फ्लॅट फाईल्स इकडुन तिकडे करायचे त्याही बिनानावाच्या. बॉक्स फाईल्स तर कधी दिसल्याच नैत यांच्या हापिसात

जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जवळ असते तेव्हा तिची किंमत कळत नाही म्हणतात तेच खरं. कारेदु चालु होतं तेव्हा मापं काढताना हात थकत नव्हते. आणो आता बघा कशी आठवण येतेय कारेदुची Lol

बरं काल शिव जेवला का?

सस्मित Lol हापिस आल म्हणुन कारेदुची आठवण झाली.

काल फेसबुकावर कारेदु, होसुमियाघ, आणि जुयेरेगा असे तीन फोटो लावुन यापैकी कुठल्या शिरेलीने तुम्हाला जास्त पकवल असा प्रश्न होता. आता यात कशी वर्गवारी करावी? Uhoh

काल फेसबुकावर कारेदु, होसुमियाघ, आणि अजुन कुठलीतरी एक संपलेली शिरेल असे तीन फोटो लावुन यापैकी कुठल्या शिरेलीने तुम्हाला जास्त पकवल असा प्रश्न होता. आता यात कशी वर्गवारी करावी?>> अरे देवा! Biggrin

बरं काल शिव जेवला का? >> आज असेल ना ते?

तिथे तांगडे सोडुन कोण सुट्टीच मागत नव्हत. एकदा रजनी सुट्टीवर गेलेली दिसली फक्त. >> अगं जय मागायचा की सुट्टी. अगदी हाफ डे पण अर्ज देऊन मागायचा पण नवरे कायमच रिजेक्ट करायचे.

बसमध्ये अतिआगाऊपणा तिचा, ऑफिसमध्ये वाटेल तसं बोलणं आणि शिव जरासा बोलत नाही तर त्यात त्याचा अतिपणा बिलकुल नाही. मला आवडलं ते, अजून दोन दिवस तरी तिला भाव द्यायला नको त्याने.

तो काम फार सहज करतो, आधी केल्यात बहुतेक त्याने सिरीयल, असं वाचलं कुठेतरी.

अगं जय मागायचा की सुट्टी. अगदी हाफ डे पण अर्ज देऊन मागायचा पण नवरे कायमच रिजेक्ट करायचे. >>> हो का, नै आठवत आता

मघाशी सुट्टीच्या बाबतीतलं एक कारण सांगायचे राहिले.. कारेदुचं ऑफिसकाम बघून लोकांना वाटायला लागलेलं सगळ्या ऑफिसमध्ये अशीच काम चालतात.. आता हिच असं वागणं बघून वाटेल, बाॅस सुट्टी देत नाही, असं काही नसतं. आपल्याला वाट्टेल तेव्हा आपण उठून निघून जायचं. कोणीच काहीच विचारत नाही. आणि रजा मागण्याची तर गरजच नसते.

बसमध्ये अतिआगाऊपणा तिचा, ऑफिसमध्ये वाटेल तसं बोलणं आणि शिव जरासा बोलत नाही तर त्यात त्याचा अतिपणा बिलकुल नाही. मला आवडलं ते, अजून दोन दिवस तरी तिला भाव द्यायला नको त्याने. >>> + १००००

काल फेसबुकावर कारेदु, होसुमियाघ, आणि अजुन कुठलीतरी एक संपलेली शिरेल असे तीन फोटो लावुन यापैकी कुठल्या शिरेलीने तुम्हाला जास्त पकवल असा प्रश्न होता. आता यात कशी वर्गवारी करावी? >>>> Rofl

Are hi gauri new promo madhe kiti jorat oradtiy "ganpati bappa "...
Jara thanda ghe bai ...tya shiv shi normal kai bolatch nai ...nehmi chidka swar...he jara ati hotay ...

Pages