काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी सुमार दिसू लागलीय, अनुमोदन. शिवच्या डोळ्यांकडेच माझं जास्त लक्ष असतं. फक्त हाईटच्या मानाने तो लुकडा वाटतो, हाईट मस्तच. थोडं वजन वाढलं त्याचं की सॉलीड दिसेल.

मी रात्री १२ ला बघते. एवढ्याशा पाण्याने केवढी सर्दी त्याला, छानपैकी भरपुर थंडी असणा-या प्रदेशातून आलाय की.

पण ऑफिसात प्रमोशन हुकलं आणी ते एका उभाला मिळालंय तर हिने इतकं पण छळायला नको हा शिवला. उगीच बिचारा तावडीत सापडल्यासारखा झालाय. पाणी टाकायची काही गरज होती का? अजिबात समजदार नाहीये ती गौरी.

तो शिव अम्माच्या जवळ दिसतोय, अर्थात इतक्या लांब आईची आठवण येणं स्वाभाविक पण बाबांबद्दल किंवा घरातल्या इतरांबद्दल काहीच चौकशी करत नाही. आई आणि तोच आहे की काय.

मुग्धा, मला तर तूच म्हणालीस असं आठवतं. पण कोण म्हणालेलं ते शोधणं अशक्य . कारण सुरुवातीच्या पोस्टस् गायब आहेत. Happy

स्वानंदीचे बाबा तर ह्या हिरोंनाही मागे टाकतील. >> आता बघायलाच हवेत. Happy

निधी

मुग्धटली | 11 March, 2016 - 12:11
काय वाटत आतापर्यंतचा सर्वात टवका , सुंदर नायक नायिका कोण ( मराठी मालिकांमधे ) ? >>>> आदित्य देसाई. मी ह्या टवक्याबद्दल बोलत होते ग..

स्वानंदीचे बाबा. ओके तुमच्या काँप्लिमेंट त्यांच्या ख-या मिशेश पर्यंत पोचवण्यात येतील >> अहो वैनींना कशाला मध्ये घेता? त्यांनाच सांगा बरे. फ्रेंडशिप देता का म्हनाउ.

मला समजला तुमचा गोंधळ..

या मालिकेचे हिरो-हिराॅइनपण टवकेच आहेत की >> हे डीस्कशन आपण दुसृया घाग्यावर केलेय...नक्की आठ्वत नै पण कारेदु च्या वाटतं ..तील रिप्लेस्मेंट ही शिरेल येतेय असं ... हिरो-हिराॅइन टवके आहेत असं मी बोल्लि होती तर कोणीतरी म्ह्णले कि अधीचे झी चे हिरो-हिराॅइनपण ट्वकेच होते की अश्या अर्थाचं

हिरो-हिराॅइन टवके आहेत असं मी बोल्लि होती >> हायला, तू बोल्लीस का.. बरं झालं सांगितलंस. माझ्या डोक्याला भुंगा लागला होता आठवण्यासाठी. Happy

शीर्षक्गीतात , ती दोघंजण होडीत असतात , तेन्व्हा बाजूने पक्षी उडतात म्हणून ती त्याला बिलगते .
त्यावेळी त्याचे केअरिंग गेस्चर एक्दम 'बदाम' आहेत Happy

तो विकी डोक्यात जातोय. अत्यंत इरिटेटींग आहे त्याचं कॅरेक्टर. मालिका फिलगुड असेल या हेतूने पाह्यला सुरुवात केली. पण त्या विकीमुळे स्ट्रेस येतोय त्यामुळे मी पहाणार नाही कदाचित. गौरीही उगीच लाऊड केलीय.

ती गौरी डोक्यात जायला लागलीय. (असं लिहिताना पण यातना होतायत. माझं लग्नापूर्वीच नाव गौरी असल्यामुळे.) अरे ही काय बोलतेय तेच त्याला अज्जिबात कळत नाहीये तर हिने थोडं तरी त्याला समजेल अशा भाषेत बोलायला नको का. Angry बावळट कुठची.

अरे तो विकी काढ्याचे १५० रु. सांगतो आणि हिरोचा विश्वास बसतो. तो अजुन पैसे देऊन काढा मागवतो. काहीच्या कै दाखवतायेत. त्याने त्याला पैसे देण्यापेक्षा गौरी भेटेल तेव्हा तिलाच ऑर्डर द्यायचीना काढ्याची. ती गौरी अतिहुशार समजते स्वतःला तर विकीची लबाडी अजुन लक्षात नाही आली, वेगवेगळ्या प्रकारे करतोय तो, ब-याच बाबतीत आधीपण केला असणार पैशाचा घोळ.

ज्या उभा मुळे गौरीच प्रमोशन हुकलं त्याच्याशी एवढं नीट बोलते आणि काहीही संबंध नसताना बिचाऱ्या शिवशी भांडते ते पण मराठीत... तो सांगतो कि <आप क्या बोल राहे हो हमको कुछ समझता नाही>... कीव येते बिचाऱ्याची..... फारच रुड attitude दाखवलाय बाईचा Uhoh

नुकत्याच आलेल्या शिवला मराठी इतक्यात कसं येईल, हे नको का गौरीला समजायला. तिने नीट समजाऊन सांगायचं त्यापेक्षा की इथली भाषा शिकायचा प्रयत्न कर हळुहळु.

नेक्स्ट एपिसोडमधे अजुन अ‍ॅटीट्युड दाखवणार बहुतेक ती, असं वाटतं.

दक्षि म्हणाली होती ते एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं, ती गोड हिरवीण हळुहळु मला आगोड वाटायला लागली आहे. त्यामुळे मी जास्त बघेन असं वाटत नाही.

मराठी-हिंदी फ्युजन सिरियल केलीय तर गरज आहे तिथे हिंदीच संवाद ठेवा ना. शिवला मराठीचा गंधही नसताना गौरी त्याच्याशी शुद्ध मराठीत बोलत राहतेय ( त्या हिंदी कलीगच्या बाबतीतही तेच ) हे इतके प्रचंड खटकतेय. खरंतर अतिरंजित आणि विनोदी वाटतेय हे. हिंदी बोलणे ही फार काही खास बाब राहिलेली नाही आता.

आजच्या जमान्यात पुणेरी पेठीय मुलगी सुद्धा असं वागणार नाही तर मुंबईत असे दाखवणे कहर आहे !! Proud

बाकी सिरियलप्रमाणे ह्याही सिरियलला पास. पहिले तीन भाग ( इंटरनेटवर सुद्धा ) सलग पाहू शकले नाही. आता इथे वाचून प्यार का इकरार, सासरच्यांशी पहिली भेट, लग्न वगैरे टप्प्यांवर बघेन फक्त Wink

शिवला मराठीचा गंधही नसताना गौरी त्याच्याशी शुद्ध मराठीत बोलत राहतेय ( त्या हिंदी कलीगच्या बाबतीतही तेच ) हे इतके प्रचंड खटकतेय.>>>> +१

शिवला मराठीचा गंधही नसताना गौरी त्याच्याशी शुद्ध मराठीत बोलत राहतेय >>> अगो, तू माझ्या गावात आला आहेस तर तुला माझी भाषा शिकून घ्यावीच लागेल असं गौरी शिवला सांगते. तिचं प्रमोशन तिला डावलून फेवरिटिझ्ममुळे तिच्या भैय्या कलिगला दिलेलं असतं आणि त्यामुळे शिव गौरी पहिल्यांदा भेटतात त्यावेळी विस्कटलेल्या मन:स्थितीत असते. गौरीशी तो हिंदीत बोलतो आणि वर तो तिला सांगतो की हम पहली बार बंबई आए है, प्रमोशनपे आए है. त्यामुळे ती त्याच्यावर खार खाऊनच असते.
आता हळूहळू तिचं मत बदलेल. मायबोलीवरचा 'भांडणातून मैत्री' हा बाफ त्यांनी वाचला असणार नक्की Wink

ती गौरी अति आगाऊ, जराही ऐकून घेत नाही. किती बोलते त्याला.

आता चूक कळल्यावर ताळ्यावर आली म्हणा. त्याने मस्त काम केलं, acting चांगली आहे त्याची.

Pages