काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढे जरा ओळखी वाढल्या की विकीच्या लांड्यालबाड्या कधीतरी शिवला कळणार, तो गौरीला नाहीतर आजीला सांगण्याचा प्रयत्न करणार, त्यांना आधी राग येणार, गैरसमज होणार, मग तो खरंच बोलत होता हे लक्शात येणार, ती प्रेमाच्या गाडीतली शेवटची काडी ठरणार >> लली द रायटर!

तो विकी एकदम विलन मटेरीयलच आहे.>> +१.
किती गोग्गोड बोलतो यार.. डोकं आऊट व्हायची वेळ आली.

परवाच्या भागात ती आजी अगदी दाराजवळच्या कपाटातून पाकीट काढून त्याला पैसे देते. मला वाटलं आता हा तिचं सगळं पाकिटचं गायब करणार की काय? केवढं टेन्शन आलेलं मला.

निधी Lol

तो फार पैसे लुटारू आहे. मित्रांकडून ४ हजार घेतो डब्याचे आणि आजीना २ हजार देणार. कोणाचातरी रवा उचलून ह्यांना दिला. अजय मयेकर डायरेक्टर म्हटल्यावर फार अपेक्षा ठेऊ का नको असं वाटतंय.

अजय मयेकर डायरेक्टर म्हटल्यावर फार अपेक्षा ठेऊ का नको असं वाटतंय.>>> ह्यांच्या अजुन कोणत्या शिरेली होत्या अंजू?

द ग्रेट कमला, वर्षभर होते बहुतेक तेच. पहिली पंधरा दिवस बघितली मग मागे कधीतरी शनिवारी अशोका नसते म्हणून नवऱ्याने सहज लावली तेव्हा तेच होते. नवरा म्हणाला अग हि मालिका एक वर्षापूर्वी जिथे होती तिथेच आहे अजून, मग आम्ही टीव्हीच बंद केला. Lol

कमलाच्या आधी माझ्या दुसऱ्या आवडत्या शिरेलीचे होते दोन-तीन महिने. ती ओके नेली, ठीक ठाक.

झी जॉईन करायच्या आधी कलर्स (इ टीव्ही मराठी) ला होते ते.

मंजूडे त्यात काय लॉजिकल आहे? Uhoh
जरा विस्कटून सांग. मी काल पहिल्यांदा संपुर्ण एपिसोड पाहिलाय या शिरेलीचा. कारण मी रात्रीचे रिपिट्स पाहू शकते फक्त. त्यात नविन शिरेलीने शिरकाव केला की बन्द पडेल माझं पाहणं.

दक्षिणा, तिचे ऑफिसातले प्रमोशन, जे अग्दी तिलाच मिळ्णार अशी तिच्या स्वत:सकट, तिची फॅमिली आणि मित्रमंडळाची पण खात्री असते, ते एका शर्मा कलीगला मिळते. मग ही खुप दु:खी होते. हापिसातुन बाहेर पडते तो हा छो गं कि वाला भेटतो. तो हिंदितुन पत्ता विचारतो. वर मला प्रमोशन मिळलेय म्हणून मी सगळं सोडुन इथे आलोय असंही सांगतो. मग ती चिडते.

गौरी मुद्द्दामून अशी रुड बोलताना दाखवलेय. एक तर ऑफिस मध तीच प्रमोशन परप्रांतीयांनी लाटलं.त्यात पण ज्याला प्रमोशन मिळालं त्याला तिने ( परप्रांतीय असूनही ) मदत केली होती. त्यामुळे आत्ता ती वैतागलेय. म्हणून त्या शिव शी ती अशीच बोलणार. रुड्लीच. सगळी भडास बाहेर काढतेय ती. पटतंय तीच बोलण Happy

लेकीन हमको रीझल्ट्से मतलब मुग्धा.

शेवटी विंडीज मैदानात उड्या मारत होते तेव्हा मला बाहुबलीमधल्या त्या शत्रु टीमची आठवण आली Lol

काल शिव ला शिंका येउ लागल्या. गौरी अजूनच साधी सुमार दिसू लागली आहे. तो आईला विचारत असतो पँट कहा सॉक्स कहा वगैरे. बस मिस होते तिथ परेन्त पाहिले. मग शर्मांजी हपिसातले मनोगत शेअर करतात ते पाहिले.

कालचा एपिसोड छान झाला . थोडा हलकाफुलका , थोडा भावूक . सासू आणि जावयाची नोक्झोक आवडली.

गौरी अजूनच साधी सुमार दिसू लागली आहे >>> आणि तो शिव अजूनच क्यूट.काल गौरीची चोरी मस्त पकडतो .
शेवटी ते दोघे एका फ्रेम मध्ये येतात तेन्व्हा मस्त वाटलं.

काल हे तिघे रिक्शाने गेले आज काय त्या बिचार्याची बस चुकावी म्हणून बस ने का?

अरेच्चा! ती मुग्धा सुरुवातीला त्याला टवका बोलली तर सगळ्यांनी प्रश्नचिन्ह काढलं. आणि गौरीच टवकी आहे सांगत होतात... आता सगळ्यांनाच शिव टवका, क्यूट, चिकना वाटायला लागला का??? Happy Proud

मला नाही माहीत हां ! मला तो सुरवातीला पण ठीक वाटला होता . परवा त्याचे डोळे बघितले , खूप आवडले . आता तो क्युट वाटतो त्याला काय करणार गं ताई . गौरी पहिल्यापासूनच ठीक वाटते . मी काय अमांना अनुमोदन दिलं नाही Happy

अरेच्चा! ती मुग्धा सुरुवातीला त्याला टवका बोलली तर सगळ्यांनी प्रश्नचिन्ह काढलं. >>>> कोण मी का ग ? कोणाला टवका म्हणाले?

कोण मी का ग ? कोणाला टवका म्हणाले>> हो तूच गं! शीव ला.

सस्मित. Lol

स्वानंदीचे बाब्बा पण आवडतात.>> Biggrin Uhoh आता बघायला हवेत कोण ते.

कोण मी का ग ? कोणाला टवका म्हणाले>> हो तूच गं! शीव ला. नै ग, मी अजुनतरी शिवच्या दिसण्याबद्दल काही कमेंट केलेली नाही. कारण येवढ नीट मी त्याला अजुन पाहिलेलच नाही.

अमा Rofl

Pages