डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बिचारे हौसेने चुकीचे डायग्नोसिस आणि कमी दर्जाची मेडीकल सेवा घ्यायला आलेले असतात.

वर लिहिलेल्या केसमध्ये जिथे जीवच गेला आणि जिथे आयुष्यभराचे अपंगत्व आले तिथे तो पेशंट काय म्हणणार? जसा ज्याचा अनुभव तसे तो म्हणणार ना?

साधना, मी अगोदरच लिहीलंय, कुणाच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल मला चुकीचे म्हणायचेच नाहीये
माझ्या ता सगळ्या पोस्टस दिगोचि यांचे परदेशातले एक डॉक्टर 'भारतात आजारी पडलात तर ताबडतोब परदेशी निघून या, भारतात डायग्नोसिस चांगले नाही' असे म्हणाले त्याबद्दल आहेत.
तुम्ही माझ्या पोस्ट्स नीट वाचलेल्या दिसत नाहीत.

भारतात आजारी पडलात तर ताबडतोब परदेशी निघून या>>> धिस इज टु मच.
काही हातावर मोजण्याइतके डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या वाइट अनुभवावरुन असा अर्थ कुणी काढु नका प्लीज.

वरचे विधान अजिबात पटलेले नाही. ओळखीचे दोन डॉक्टर असे आहेत ज्यांनी बाहेरच्या देशामध्ये इतकी वर्शं नोकरी केली आणि आता ते भारतात परत आले आहेत. लेकीचा पेडीआट्रीशीअन फारच नावाजलेला "नवजात शिशुंच्या पोटाची सर्जरी" करणारा सर्जन आहे. (त्याचे एक्झाक्ट काहीतरी गॅस्ट्रो*&^%$सर्जन असे लांबलचक आहे) त्याच्या मते, त्याला भारतात आणि बाहेर मिळणारा पैसा यामध्ये फारसा फरक नाही. मग इथंच आलेलं काय वाईट आहे. हे त्याचे मत असू शकते. पण सरसकट भारतातले डॉक्टर वाईट असला निष्कर्ष काढणारे महानच म्हणायला हवेत.

आता हा अनुभव "वाईट" म्हणता येण्यासारखा नाही, पण मजेदार नक्कीच होता :
नुकत्याच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होताना सर्व हिस्ट्री सांगत असताना त्या डॉक्टर मुलीने (बी एच एम एस) मला एक मेल बेबी असल्याचं लिहिलं. हे लिहिताना डॉ. लेकीसोबत खेळतेय, गप्पा मारतेय!! मी म्हटलं अहो, फीमेल लिहा. तर म्हणे "ओह चुकून लिहिलं" मग बाईंनी त्या मेलच्या आधी एफ आय लिहून त्याचं फीमेल केलं. त्याच मुलीला नंतर मेडीकल टर्म्स लिहिताना स्पेलिंग टू स्पेलिंग कॉपी करताना मी पाहिलं. हिने किमान तीन वर्षं मेडीकल शिक्षण घेतलं आहे का असा प्र्श्न मला खरंच तेव्हा पडला होता.

माझ्या आजवरच्या अनुभवानुसार सरकारी कॉलेजेसमधून शिकलेले डॉक्टर अधिक निष्णात असतात. मत चुकीचं असू शकतं पण अनुभव मात्र अजिबात चुकीचा नाहीये हे नक्की.

>>>>> त्याच प्रमाणे भारतातला डॉक्टर तुलनेने (१३० कोटी लोकान्ना सेवा पुरवायची आहे) जास्त काम करतात. <<<<
उदयशेठ.... विनोद करु नका हो या धाग्यावर... जरा गंभिरतेने घ्या Wink

राजू ७६ , धन्यवाद.

सार्वत्रिकीकरण टाळावी एव्हढच आवाहन आहे. इथे आलेल्या अनुभवांवरून त्या डॉक्टरकडे जाताना, जात असल्यास खबरदारी घेता यावी, शंका विचारल्या जाव्यात हा उद्देश आहे. इतर कुठल्याही क्षेत्राप्रमाणे पुरेसं ज्ञान नसताना तक्रारीचा सूर लागल्यास त्याचंही निराकरण होईल, जे इतर अनेक संस्थळांवर दिसतं. अशा तक्रारी सुद्धा कॉमन असतात. पण जेन्युईन तक्रारींबाबत त्या क्षेत्रातल्या विचारी लोकांनी नोंद घेतली तर चांगलंच आहे की.

मध्यंतरी डॉक्टरांना मारहाण व्हायची तेव्हां ईमेल्स, ब्लॉग्ज, वर्तमानपत्रे, टीव्ही या माध्यमातून अनेक गोष्टी ठसवण्यात आल्या. डॉक्टर सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे, त्याला झोप आवश्यक आहे.

या गोष्टींची जाहीरात करायची पाळी यावी याचं वाईट वाटलं होतं. कारण सर्वच पेशंट्स रात्री फोन करत नाहीत. मारहाण करत नाहीत. खरं म्हणजे वैद्यकीय शपथ पाहिली तर या प्रोफेशनला नोबल प्रोफेशन का म्हणायचं हे कळतं. एक विशिष्ट काळ आदर्शवादी संकल्पना रुजवून गेला आहे. शिक्षक हा सुद्धा नोबल प्रोफेशन आहे. त्यांच्याकडून ब-याच अपेक्षा असतात. हल्ली शिक्षकांना त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे मान राहीलेला नाही. पैसा सर्वोच्च झाला आहे. मग डॉक्टरांनी पैसा का कमावू नये याला उत्तर नाही. प्रामाणिकपणे कमवायला हरकत नसावी. पेशंटला त्रास देऊन कमवायला विरोध आहे. अनावश्यक चाचण्यांतून कमिशन काढण्याऐवजी फीज मधेच ते पैसे वसूल केल्यास पुढचे नुकसान आणि हेलपाटे टळतील.

वैद्यकीय क्षेत्रात काही वाईट अनुभव येतात. त्याबद्दल सत्यमेव जयते मधे सविस्तर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा तेच जुने ईमेल्स फॉर्वर्ड करायला सुरूवात केली. अतिरेक नसावा. डॉक्टर मनुष्य आहे हे बहुसंख्य लोकांना कळतंय. पण हेच सांगून रात्री-बेरात्री चिडचिड करणा-या डॉक्टरांचे समर्थन देखील नको करायला ( हा अनुभव घेतलेला आहे. डॉक्टरांच्या बायकोने झापलं होतं. विषबाधेची केस होती. मग फॅ.डॉ. ने फोन केल्यावर काम झालं). जीव काही सूर्य उगवेपर्यंत जायचा थांबत नाही. डॉक्टर सुद्ध माणूस आहे, तो चुकू शकतो वगैरे सगळं मान्य आहे. पण चुकीचा माणूस इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणूनच अनुभव शेअर केले जात आहेत.

पेशंट्सने होमवर्क करून यायचा कि नाही हा त्याचा प्रश्न असला पाहीजे. त्याला चंगल्या वैद्यकीय सेवा (कुठल्याही सेवा ) मिळणे हा त्याचा हक्क असला पाहीजे. त्याने होमवर्क केला नाही म्हणून तोच जास्त जबाबदार हे तोकडे कपडे घातले म्हणून बलात्कार झाल असं म्हणण्यासारखं आहे.

थोदक्यात तारतम्य दोन्हीकडून बाळगलं गेलं तर विनाकारण होणारे वाद टळतील.

निष्काळजी पणाचा अनुभव तुलनेने कमी येतो. पण कट प्रॅक्टीसचा अनुभव मोठ्या प्रमाणावर येतो.

या बीबीचा मुळ उद्देशच नाहीसा होऊन सरसकटीकरण चालु झालेले आहे.

भारतात खास ट्रिटमेन्ट घेण्यासाठी अनेक परिचयाचे लोक गेले आहे, जातात. सेवा स्वस्त आहे, आणि पैशाच्या तुलनेत दर्जा चान्गला मिळतो.>> +१०१

इथे डॉक्टरचे नाव व आलेला वाईट अनुभव एवढेच लिहीणे अपेक्षीत होते ना? कृपया तेव्हढेच लिहीले तर मागचा शहणा होईल. हॉस्पीटलचा वाईट अनुभव, स्वच्छता, मेडीक्लेम असल्यामुळे लुबाडले जाणे याकरता वेगळा धागा काढावा.

कृपया जनरलाईजेशनही करु नये व उगाच दुसर्‍या डॉक्टरच्या चुकीचे समर्थनही होऊ नये असे वाटते. साती यांचा स्टँड या बाबतीत योग्य वाटतो. त्यांना इतर डॉक्टरने केलेल्या चुकांबद्दल खेदही प्रतित होत आहे व त्यांच्यामुळे वैद्यक व्यवसायाला वाईटपणा येतो याचे दु:खही होत आहे.

पेशंटला योग्य ती ट्रिटमेंट मिळुन त्याला बरे करावे या करता झटणार्‍या सर्व डॉक्टरवर मात्र या मुठभर वाईट अनुभवांमुळे/डॉक्टरांमुळे अन्याय होतोय असे वाटते.

साती, मला माहितीय तुम्ही दिगोचींना प्रतिसाद म्हणुन लिहिलाय ते. मी वाचल्यात तुमच्याही पोस्टी. दिगोचींचे मत जसे सर्वसमावेशक नाहीय तसेच तुम्ही दिनेशदांच्या पोस्टीनंतर जे लिहिलंत तेही सर्वसमावेशक नाही. एवढेच मला मांडायचे होते. बाकी तुम्ही इथले प्रतिसाद उडदामाजी काळे गोरे असायचेत म्हणत घेताहात ते मला माहित आहे. वर वाईट उदाहरणे दिलेल्या अनेक पोस्टींचा शेवटही शेवटी चांगले डॉक्टर मिळाले आणि वाचलो हा आहे.

>>>> हल्ली शिक्षकांना त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे मान राहीलेला नाही. <<<<
या विधानाबद्दल आक्षेप.....
कोणाच्या खिशात किती पैसा आहे यावरुन मान द्यायची पद्धत व मान देणारी आशाळभूत जमात जगात कायमच अस्तित्वात आहेच्च, पण त्याव्यतिरिक्तही, खिशात दमडा असो वा नसो, निव्वळ बुद्धिमत्तेचा आदर करण्याची पूर्वापार परंपरा गेल्या पाचपंचवीस वर्षात जाणुनबुजुन धुळीला मिळवली गेलीच, शिवाय शिक्षकी पेशात "नोकरि" म्हणुन आलेल्यांना स्वतः स्विकारलेल्या स्वतःच्याच शिक्शकी पेशाबद्दल ना स्वाभिमान, ना आदर, व निव्वळ पगारी नोकर म्हनून राबण्याची स्वतःचीच वृत्ती त्यांना कसा काय मान मिळवुन देणार? अनुभव असा की तुमचे वर्तन आदर्श असेल, तुमच्या कडुन इतरांना काही घेण्यासारखे उअपयुक्त विचार्/ज्ञान मिळत असेल, तर आजहि तुम्ही आदरासच प्राप्त होता, भले तुमच्या खिशात दमडाही नसेल.
तेव्हा आर्थिक स्थितीमुळे मान राहिला नाही हे विधान धादांत असत्य दिशाभूल करणारे असुन, खरे तर शिक्षकी पेशात उतरलेल्यां मधे स्वतःचा आब स्वतःच राखण्याची तारेवरची कसरत/कष्ट/जिद्द नसल्यामुळे त्यांना मान राहिलेला नाही.

हे विषयांतर नाही, कारण हीच गत डॉक्टर/वैद्यकीय व्यवसायाची झालेली आहे, किंबहुना मी तर असे म्हणेन की जेव्हापासुन डॉक्टर/वैद्यकीय हा "पेशा" (अंगभूत कर्तव्य) समजायचे ऐवजी "व्यवसाय" बनला, तेव्हापासुनच डॉक्टारांचे/वैद्यकीय पेशाबाबतच्या आदरप्राप्ततेत अधोगती पहायला मिळू लागली व आज तर निव्वळ "कसायांची टोळी" इतकीच उपमा देण्याचे शिल्लक राहिले आहे. व्यवसाय बनण्याचे मूळ कारण "वैद्यकी शिक्षणाची शिक्षणसम्राटांनी बनविलेली बाजारपेठ" हे होय.

अपवाद आहेत, पण ते अपवाद, सध्यस्थिती सिद्ध करण्याकरताच आहेत अशी परिस्थिति आहे.

>>>>> वर वाईट उदाहरणे दिलेल्या अनेक पोस्टींचा शेवटही शेवटी चांगले डॉक्टर मिळाले आणि वाचलो हा आहे. <<<<
येवढी चर्चाचर्विचरण करतात लोकं, पण "शेवटी चांगले डॉक्टर मिळाले अन वाचलो" हे "चांगल्या नशिबाचे लक्षण वा देवाचीच कृपा" असे मात्र कोणीही म्हणताना दिसत नाही.... मान्य करणे फारच दूरचे... नै का ? Wink Proud

डॉ. म्हात्रे (गायनॅक) - कुर्ला इथे प्रॅक्टिस - माझी शेजारीण १-२ महिन्यांची गर्भवती होती. ह्या बाइंकडे तपासायला गेली. (तिची गायनॅक वेगळी आहे. पण हिच्याकडे का गेली होती माहित नाही.) तर म्हात्रे मॅडम यांनी तिला जुजबी तपासले आणि नंतर तिची फाईल पाहिली. तर फाईल मध्ये त्यांना एक प्रेस्क्रिप्शअन मिळाले.... जवळ जवळ २ महिन्यांपुर्वीचे. म्हणजे त्यावेळी माझी मैत्रिण प्रेग्नंट असावी पण तिला माहित नव्हते. सर्दिवरचे काहितरी औषध होते. ते पाहून डॉ. ने सांगितले की, ह्या औषधाने पोटातल्या बाळावर प्रचंड वाईट परिणाम झाला असेल, त्याच्यात १००% व्यंग आलेले असणार. ती प्रेग्नंसी सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आताच्या आता अबोर्ट करा. माझ्या मैत्रिणिच्या शरिरातले त्राणच निघून गेले. डॉ. डायरी उघडून बसली आणि म्हणाली, डेट सांगा कोणत्या तारखेला येताय अबोर्ट करायला. माझी मैत्रीण रडू लागली आणि म्हणाली, सोनोग्राफी करुन पाहू का? मग डॉ ने सांगितले की जा करुन या, पण लवकर डेट सांगा.
ही रडत रडत सोनो करुन आली. नंतर सोनो चा रिपोर्ट नॉर्मल होता.
नेहमीच्या गायनॅकला दाखवले तर त्याने सांगितले असे काहीच होणार नाही. माझ्या मैत्रिणीने त्यानंतर जवळपास ३-४ गायनॅकना जाऊन रेफर केलं. सर्वांनी सांगितलं काहीच प्रॉब्न्लेम नाही होणार. तरीही पुर्ण गर्भावस्थेत माझी मैत्रिण तणावाखाली होती.

त्यांनतर तिला मुलगी झाली. ती अगदी सुद्रूढ आहे.

लोकं हामेरिकेतुन तिथल्या डॉ. च्या पोटावर पाय देऊन भारतात उपचार घेऊ लागली तर ते म्हणणारच ना की इथे या नि बरे व्हा.
Wink

लोकं हामेरिकेतुन तिथल्या डॉ. च्या पोटावर पाय देऊन भारतात उपचार घेऊ लागली तर ते म्हणणारच ना की इथे या नि बरे व्हा.
Wink

बापरे अमी.... Uhoh

आयला, तिकडे एखादा ज्योतिषी सांगतो "तुझे भले होईल, थोडा धीर धर, थोडे देवाधर्माचे कर, हे ही दिवस जातिल, तुझ्या नशिबात चांगले योग आहेत" .... जातक आनंदात घरि जातो व पुढचा बराच काळ त्या आनंदात जगतो. तर त्यावर रान उठवले जाते की "अंधश्रद्धा पसरवितात, कर्म करण्यापासून रोखतात, खिशावर डल्ला मारतात" वगैरे.......

इकडे डॉक्टर धन्द्याशी-प्रॉफिटशी प्रामाणिक रहात अबॉर्शनची एक केस वाढवायला म्हणा, वा पूर्ण तया बेजबाबदार बेअक्कलेने म्हणा, अबोर्ट करायला सांगतो, त्यामुळे त्या बाईला नऊ महिने मनःस्तापासह, इतर अनेक ठिकाणी चाचन्यांचा भुर्दंड पडतो, अन तरी आपण म्हणायचे की या डॉक्टरी सेवा "वैज्ञानिक/सायन्साधारीत" आहेत, त्यातुन कोणीही कुणाच्याही खिशावर डल्ला मारीत नाही, शिवाय त्यामुळे कोणालाही शारिरीक-मानसिक इजाही होत नाही... Uhoh अबॉर्टाच्या अशा सल्ल्यानंतरही हेच्च म्हणायचे हा आग्रह... वा रे वा.... !

अवांतर:
मला हॉस्पिटलचे खूप वाईट अनुभव आहेत.

दहावीला असताना मोठे काका जवळपास महिनाभर हॉस्पिटलला आयसीयूमध्ये होते. महिन्याभराने त्यांना पाहायला गेलो आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्ये राहण्याची माझी ड्युटी लागली. त्याच रात्री त्यांच देहावसान झालं.

त्यानंतर एक चुलत काका असेच साधारण पंधरवडाभर हॉस्पिटलमध्ये होते आणि मी पंधरा दिवसांनंतर त्यांना पाहायला गेलो आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्ये राहण्याची माझी ड्युटी लागली. त्याच रात्री त्यांच देहावसान झालं.

चार वर्षांपूर्वी बहिणीची सासू अशीच महिनाभर आयसिसीयुमध्ये होती. तिला पण असाच महिन्याभराने पाहायला गेलो आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्ये राहण्याची माझी ड्युटी लागली. त्याच रात्री तीच देहावसान झालं.

आताच सहा महिन्यांपूर्वी आजोबाना गावी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. चार दिवस त्यांच्याबरोबर हॉस्पिटललाच होतो, पाचव्या दिवशी त्यांच देहावसान झालं.

आता कोणी सांगितलं कि हॉस्पिटल मध्ये पाहायला जायचे आहे, मग मी टाळतोच.

सूनटून्या, यात तुमचा काहिही दोष नाही.
योगायोग आहेत.
तुम्ही ज्यांच्याबरोबर रहात होता ते क्रिटीकली इल पेशंटच होते ना?

सूनटून्या.. तुम्ही प्रतिसाद विनोदाने दिलाय कि उपहासाने ते कळत नाही. परंतु अश्या प्रकारचे प्रतिसाद देऊन धाग्यातले/ धाग्याचे गांभिर्य कमी केले नाहीत तर बरे होईल. ___/\___

>>>> सूनटून्या, यात तुमचा काहिही दोष नाही. योगायोग आहेत. <<<<<
त्यालाच आम्ही "नशिब/दैव" असे म्हणतो.....
हो, अन एक राहिलच की सांगायच, मीच सांगुन टाकतो, बर्का सुनटून्या, यात जसा तुमचा काहिही दोष नाही, तसेच "हॉस्पिटस्लचाही" काहिही दोष नाही. Happy उगाच गैरसमज पसरायला नकोत, तुमच्याबद्दल अन त्या त्या हॉस्पिटस्ल बाबतही. Happy
पियु, मी मात्र वरील प्रतिसाद गांभिर्यानेच दिलाय, जेणेकरुन धाग्याच्या विषयाचे गांभिर्यास धक्का बसु नये, बसलेल धक्का उतरावा... Happy

साती
हो, योगायोग आहेत. सुदैवाने सगळे डॉ/हॉस्पिटल्स चांगलीच होती, पेशंट्सच क्रिटीकली इल आणि वयोवृद्ध होते.

पियू
विनोद किंवा उपहास नाही. वाटलं म्हणून लिहिलं.

>>>> आता कोणी सांगितलं कि हॉस्पिटल मध्ये पाहायला जायचे आहे, मग मी टाळतोच. <<<<
हे जर सत्यच असेल, तर माझाही अनुभव काहीसा असाच विचित्र आहे. Sad
मी थोरामोठ्यांना वयस्करांना नेहेमीच वाकून नमस्कार करतो.
पण ज्य ज्या वेळेस नमस्कार करता करताच मनात "कदाचित हा शेवटचाच नमस्कार तर नव्हे" असा विचार जेव्हा जेव्हा ज्या ज्य व्यक्तिंबाबत उमटला, पुढील काहि काळातच त्या त्या व्यक्तिंचे देहावसन झालेले अनुभवास आले Sad
आताशी मी कुणालाहि नमस्कार करायलाच घाबरतो. न जाणो कसले कसले अभद्र विचार मनात येतिल, अन खरेहि होतील... Uhoh

आपण नेहमी सेकंड ओपिनीयन बाबत वाचतो, म्हणजे ते पेशंटनी घ्यावे असे. एखाद्या घरात दोन पिढ्यातील किंवा नवराबायको असे डॉक्टर्स असतील तर एकमेकांचे सल्ले घेतही असतील पण तसे नसेल तर...

माझ्याच मधुमेहाच्या ट्रीटमेंट मधे एका तज्ञ डॉक्टरांची औषधपद्धती फारशी परीणामकारक ठरत नव्हती. त्यांच्याच सांगण्यावरुन दुसर्‍या डॉक्टरांकडे गेलो. त्या डॉक्टरांचा अटीट्यूडच ( डॉ. संदीप माळगी ) खुप पॉझिटीव्ह आहे. त्यांच्या ट्रींटमेंटनुसार गेल्या सहा महिन्यात खुपच फरक पडला आहे. त्यांनी दिलेल्या टार्गेटपेक्षाही माझा कंट्रोल चांगला आहे, असे त्यांनीच सांगितले.

आधीच तणावाखाली असलेल्या पेशंटला असे सकारात्मक विचार करणारे डॉक्टर भेटले तर नक्कीच खुप फरक पडतो.

वर विषबाधेचं लिहीलेलं आहे त्यात डॉक्टरांची चूक नव्हती. बायकोने फोन घेतला होता. धाकट्या वहिनीला ( काय म्हणतात) त्रास झाला होता. पण निवासी (?) डॉक्टर्स, नर्स यांनी सगळी काळजी घेतली. डॉक्टरांनी फोनवरून सूचना दिल्या होत्या. थोड्या वेळाने डॉ. आले. तपासे दुपारप्र्यंत धोका टळला. आभार आहोत.

आमीर खानच्या धाग्यावर चाणक्य आणि इब्लीस या एकाच माणसाने दोन आयडी काढून गोंधळ घातला होता. ती सहा सात पाने नंतर अ‍ॅडमिन ला डिलीट करावी लागली. त् गणू या नावाने ते आयडी मायबोलीवर माझ्या आधीपासून कार्यरत आहे. एक आयडी वाहत्या पानावर खोटे पसरवत असल्याने खुलासा केला. अ‍ॅडमिन पाहून घेतीलच .

बाकी काही म्हणा हं.......
पण देशातील देशी लोकांचे देशातील देशी डॉक्टरांबद्दलचे देशी वाईट अनुभवाचा धागा असताना तिथेच नेमके "परदेशातील देशी/विदेशी डॉक्टर्स, देशी डॉक्टरांबद्दल काय बोलतात" या ऐकिव माहितीवरुन पोस्टून व नंतर त्यावर प्रतिक्रिया म्हनून देशी डॉक्टारांचे समर्थन करणे, सरसकटीकरण करु नका म्हनुन गळे काढने वगैरे पद्धतीने छान प्रयत्न केला गेला बर्का धागा भरकटावायचा ..... Proud
पन आता मूळ मुद्यावर या.......

पण सरसकट भारतातले डॉक्टर वाईट असला निष्कर्ष काढणारे महानच म्हणायला हवेत.
>>
+१

माझे सगळेच्या सगळे डॉक्टर मस्त आहेत. टचवूड

डॉ परांजपे (गायनॅक, चेंबुर) - तारिख नक्की आठवत नाही पण शुक्रवार होता. माझी प्रेग्नंसी ब्लड टेस्टवरून कन्फर्म झाली. मला ज्या दादरच्या गायनॅककडे जायचे होते त्या शनिवारी नसतात म्हणून त्यंच्याकडे सोमवारी जायचे ठरले. शनिवारी दुपारी ब्राऊन ब्लिडींग सुरु झाले. मग शेजार्‍यांनी सुचवले म्हणून या गायनॅक कडे गेलो. त्यांना मी सांगितले की मला एका बाजुला कमरेजवळ असह्य कळा येत आहेत. त्यांनी जुजबी तपासले. वर ही ब्लड टेस्ट का केली असेही विचारले. मी सांगितले की, मला माहित होते की ह्या टेस्टमुळे प्रेग्नंसी नक्की आहे की नाही हे कळते आणि ती नॉर्मल होम किटपेक्षा रिलायबल आहे. मग डॉ ने मला progesterone च्या गोळ्या दिल्या आणि सांगितले की या गोळ्या घ्या आणि सोमवारी सोनो करा.

माझं ब्लिडींग थांबलं नाही उलट वाढलं. म्हणून मी त्यांना रविवारी फोन केला. त्यांचा फक्त मॅटर्निटी होमचा नंबर माझ्याकडे होता. मी सिस्टरला सांगितले की मला डॉ चा नंबर दे. तर ती म्हणाली की, मी डॉ ला विचारते. मग मी थोड्या वेळाने फोन केला तर म्हणाली, डॉ ने तुम्हाला त्या गोळ्या घेत रहा असंच सांगितलय. सोमवारी सोनो करुन त्याचा रिपोर्ट घेऊन या. त्यानंटर मी रिपोर्त घेऊन दादरच्या गायनॅ़ककडेच गेले.

तिथे हे निष्पन्न झाले की ती ectopic pregnancy होती आणी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर अबोर्ट करणे गरजेचे होते नाहितर fallopian tube फुटली असती आणि इंटर्नल हॅमरेज झाले असते.

हे सर्व पार पडल्यावर मी जेव्हा ectopic pregnancy बद्दल माहिती चाळली तेव्हा कळले की ब्राऊन ब्लिडींग आणि एका बाजुला कळा ही ectopic pregnancy लक्षणे आहेत. हे वाचल्यावर मला त्या डॉ परांजपेला जाऊन बदडून काढावेसे वाटले .

Pages