डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉस्पिटलस आणी त्यातली स्वच्छता हा खरच कळीचा प्रश्न असतो. काही वेळेस डॉ, नर्स लक्ष देत नाहीत, तर काही वेळेस पेशन्ट आणी त्यान्चे नातेवाईक घोळ घालुन ठेवतात. मुळात आपल्या कडे खेड्या-पाड्यात, गावात कमोड टॉयलेट सिस्टीम नाहीये. मग कमोड वापरता न येणारे सगळे गावठाड ते टॉयलेट असले घाण करुन ठेवतात ना की बस्स! यक्क! आपल्या भारतातल्या लोकाना आधी स्वच्छतेचे धडेच दिले पाहीजेत म्हणजे असले ओन्गळवाणे प्रकार करणार नाहीत. माझ्या बाबान्ची जहान्गीर ( वाडिया) मध्ये अन्जिओग्राफी केली होती तेव्हा ते अ‍ॅडमीट असताना मी तिथे राहीले होते. तिथला कारभार बघुन पळुन जावेसे वाटले.

कृष्णा तुमचा अनूभव विदारक आहे. फार सहन केलत तुम्ही.:अरेरे: सस्मित काय बोलणार तुझ्या मैत्रिणी बद्दल!:अरेरे:

कृष्णा, सस्मित.. खरेच वाईट अनुभव.

पण वरती जो मेडीकल अ‍ॅडमिशन्स आणि पदवी मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्‍या पैश्याचा उल्लेख केलाय तो अगदी खरा आहे. अगदी डिप्लोमासाठी काही लाखात तर पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी काही कोटीत रक्कमा द्याव्या लागतात ( अगदी फर्स्ट हँड अनुभव आहे ) अगदी गरीब परिस्थितीतून वैद्यकिय शिक्षण घेणार्‍या हुशार मुलांनी कुठून आणायचे हे पैसे ? आणि हे पैसे भरल्याशिवाय या डीग्र्या मिळणे अशक्य !!! मग अर्थातच हि रक्कम लवकरात लवकर परत मिळवण्यासाठी प्रयत्न !!!

डॉक्टरांचे वाईट अनुभव मुळे सगळ्याच डॉक्टरांबद्दल नकारात्मक संदेश जातोय असं वाटतंय का ? तसं वाटत असल्यास धागाकर्तीला नम्र आवाहन आहे की हेडर मध्ये योग्य त्या सूचना टाकण्यात यासूचनाहे अनुभव वैयक्तिक असल्याने त्याचं सरकटीकरण केले जाऊ नये. लिहीतानाही ही खबरदारी घेतली जावी.

पण भारतातले एकंदर डॉक्टरच अज्जिबात कंपॅटिबल नाहीत असे तुमच्या मित्राचे म्हणणे अगदीच अ आणि अ आहे.>> +१

काही डॉक्टरांच्या वाईट अनुभवांवर भारतीय वैद्यकीय व्यवस्थेवर ताशेरे मारणे पूर्णपणे चूकीचे आहे.

भारतासारख्या भरमसाठ लोकसंख्या असलेल्या देशात हॉस्पीट्लच्या श्रींमत/ आरोग्य विमा लोकांसाठी खासगी सोया आणि आर्थिक रेषेखालील असलेल्या लोकांसाठी सवलती याचा सुरेख मेळ साधला आहे.

मोठ्या शहरात अशी हॉस्पीटल आहेत आणि छोट्या शहरात आणि गावात अशी हॉस्पीटल पुढील काही वर्षात होईल अशी आशा आहे.

साती +१.
कमाल आहे खरोखर. मेडिकल टुरिझम साठी भारत प्रसिद्ध आहे. तुमचे मित्र धन्य आहेत.
काही आशियायी देशात राहिल्यावर, तेथिल वैद्यकिय सेवांचा अनुभव घेतल्यावर, भारतातील डॉक्टरांच्या क्लिनिकल अनुभव आणि निदान करण्याच्या असामान्य कुवतीबाबत अतिशय आदर वाटतो मला.. !

ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.>>>

दिगोचि, तुमच्या ह्या मताशी पुर्णपणे असहमत!

जरी मला काही वाईट अनुभव स्वतःला आले असले तरीही आपल्या देशात खुप चांगले आणि आपल्या पेशाशी प्रामाणिक व रुग्णांची मनापासून काळजी घेणारे व योग्य सल्ला देणारे डॉक्टर्स देखिल जास्त प्रमाणात आहेत. एखाद्या दुसर्‍या हॉस्पीटल वा डॉक्टरच्या अनुभवावरुन असे मत ठरविणे मला तरी पटणार नाही!

अनेक परदेशस्थित भारतीय लोक स्वस्तात उपचाराकरीता भारतात येतात आणि उपचार करून निघून जातात. त्यामुळे इथे अगदीच अनागोंदी कारभार आहे असे निष्कर्ष काढणार्‍यांनी हा मुद्दा विचारात घ्यावा.

काही लोकांच्या वाईट अनुभवांवरून सबंध वैद्यकीय क्षेत्र बरबटलेले आहे म्हणणे अयोग्य वाटते.

इथे अनेकांना वाईट अनुभव आलेलेदेखील नाही आहेत आणि थिअरी ऑफ प्रोबॅबिलिटीनुसार चांगले अनुभव असणार्‍यांचे प्रमाणही तितकेच असणार.

साती +१

एकदम विपर्यास करुन चालणार नाही. चांगले अनुभव वाईट पेक्षा जास्त आहेत. मेडिकल च्या अ‍ॅडमिशन बद्दल मात्र सहमत. आमच्या शेजारी एक अतिषय हुशार मुलगी आहे. मार्क असुनही परिस्थीती नाही म्हणुन ती मेडिकल ला न जाता तिने पॅरामेडिकल घेतले. तरीही फी जास्त आहेच !!!!

कृष्णा , सस्मित किती वाईट अनुभव !!!

>>>>> डॉक्टरांचे वाईट अनुभव मुळे सगळ्याच डॉक्टरांबद्दल नकारात्मक संदेश जातोय असं वाटतंय का ? <<<<
नुस्ता तो संदेशच जावा असे नाहि, तर सध्याच्या वैद्यकी व्यवसायातील सगळ्यांपर्यंत तो संदेश लौकरात लौकर पोहोचला पाहिजे..... Proud
वैद्यकीच्या बाजारात सध्याच माणूसकी नावाचा प्रकार तोंडी लावण्यापुरताही शिल्लक राहिलेला नाही व पेशंटाला पैशाकडून बकर्‍याप्रमाणे कापणे हाच व्यवसाय बनलेला पावलोपावली अनुभवास येते आहे. काही अतिशय चाम्गले अनुभवही असतात, पण ते अपवादात्मकच ठरत चालले आहेत. तेव्हा, संदेश देणारे दोषी नसुन, दिलेला संदेश योग्य पद्धतिने आत्मसात करुन वेळीच सुधारणा घडवुन आणणे वैद्यकिय व्यवसयातील लोकांचे काम आहे.

Dr. Bhide, navee peth pune -> aaicha haat fracture zalela accident madhe - hyanchya treatment ne poorna ch vaat lagali. Natewaik Dr chya olakhitun gelo hoto. Mom's hand didn't recover for one full year. Finally, zadpalyachya aushadhane bara zala.

Mai Mangeshkar >> Dr Muley >> this lady is heart specialist and she keeps patients waiting even in her own clinic. Its like
ani ek gayanacologist ahet Arundhati Kanade.. doesn't know what patient privacy means.
Vaishali Deshmukh - doesn't keep her appointments. Had given a very wrong dose for diabetes to one of my relatives. There was a reaction and she didn't even care about it later when confronted. When you are giving meds, shouldn't you talk about side effects? When you charge so high?

Whoever says, patient chi chook ahe, u should ask questions -> I am very straightfwd person, I ask questions till they are answered - I do lot of research for my and related health problems. Drs. in INDIA do not like questions and your research. They look at you as if you are some time consuming nuisance. Not all, but you need 10 different types of Drs these days. Someone who doesn't understand/does not have liking/capacity for their own research - what should they do?
Dr. have such an attitude that people are scared to ask questions + traditional role of trust comes into picture with few patients.

One of my relatives, who is doctor was proudly saying "eka chotya gava madhale Dr.s reference chya madhyamatun kaay milavanar. we earn well in Pune". We were disgusted by him.
and believe me, even in a small place the numbers are not very small.

In Deenanath, they charged a very very huge bill for the dress worn by patient at the time of operation. When asked for the dress, they said "Jalun takala" .. can you believe it?

पण भारतातले एकंदर डॉक्टरच अज्जिबात कंपॅटिबल नाहीत असे तुमच्या मित्राचे म्हणणे अगदीच अ आणि अ आहे. >> +१. जनरली या देशातले/शहरातले डॉक खराब आणि त्या देशातले/शहरातले लै भारी असलं क्लिअरकट लॉजिक असू शकत नाही. काही निश क्षेत्रांमधे जसे की स्पोर्टस मेडिसीन, हे असू शकेल कारण त्या देशांमधे स्पोर्टस सिरीयसली घेतलं जातं आणि त्यावर बरच संशोधन तिकडं होतं. ३ देशातल्या (खरंतर खंडातल्या) डॉक्टरांचा अनुभव घेतला आहे पण २ क्षुल्लक वाइट अनुभव (१ अमेरिकेत आणि १ कोल्हापूरात ) सोडले तर नेहमी चांगलाच अनुभव आहे.

भारतातील डॉ. चे डायग्नोसीस कनिश्ठ असते, हा चुकीचा निश्कर्ष आहे.
उलट मी आणि कुटुंब भारतात येऊनच टेस्ट्स आणि करायच्या त्या ट्रीटमेंट करते, कारण काही डॉ. वरचा विश्वास!

साती +१ भारतातले डॉ उत्तम आहेतच. मी आधी लिहील्याप्रमाणे ते दोन अतीशहाणे डॉ सोडले, तर मला किन्वा कुटुम्बीयाना डॉ चा वाईट अनूभव नाही आला. एक दोन वरुन जनरलाईज करणे पण चूकीचे आहे.

एक्झॅक्टली आशु,
माझे कित्येक पेशंटस असे आहेत जे भारतात आल्यावर जनरल चेकप, छोट्या मोठ्या दुखण्यावर इलाज,छोटी मोठी ऑपरेशन्स करून जातात.
जाताना तीन महिन्याचं प्रिस्क्रीप्शनपण घेऊन जातात.
काही लाडाचे पेशंटस तर परदेशातूनही फोन्/व्हॉट्सॅप/ मेल यांनी संपर्कात रहातात.
त्यांना फोनवर औषधे सांगता आली नाही तरी इतर माहिती/ योग्य त्या डॉक्टरकडे जायचा सल्ला इ पुरवला जातो.

ते परदेशात असताना इथे त्यांच्या कुटूंबाचे आरोग्यही आमच्या भरवशावर सोडून जातात.

त्यामुळे भारतात आजारी पडल्यास ताबडतोब अमेरिकेत निघून या हे जरा अतिच वाटतंय!
Happy

<<ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.>>
----- या महाशयान्ना भारताबद्दल माहिती कमी आहे असे दिसते...

भारतात खास ट्रिटमेन्ट घेण्यासाठी अनेक परिचयाचे लोक गेले आहे, जातात. सेवा स्वस्त आहे, आणि पैशाच्या तुलनेत दर्जा चान्गला मिळतो.

आपल्याकडे लोकसंख्या जास्त, त्यामानाने डॉक्टर्स कमी. एका डॉक्टरकडे येणार्‍या रुग्णांची संख्या जास्त. (एक गुगल सर्च : भारत -साधारण १५०० लोकांत एक डॉक्टर; चीन - ६०० लोकांत एक डॉक्टर, अमेरीका ४०० लोकांत एक डॉक्टस)). यात परत विविध कारणांमुळे (अस्वच्छता / निष्काळजीपणा / जागरुकता नसणे) दर हजारात रुग्णांची संख्या जास्त असु शकते, त्यामुळे एका डॉक्टरांकडे येणार्‍या रुग्णांची संख्या तुलनेत अधिक जास्त असु शकते.
तेव्हा निदान करण्याचा अनुभव तुलनेने भारतीय डॉक्टरांना जास्त असावा असे अनुमान काढता येईल का?

नाही.
Happy

दररोज तीनशेची ओपिडी काढणारा डॉक्टर वरवर तपासून एक सिंप्टम रिलीव्ह करणारं इंजेक्शन, एक दोन अँटीबायोटिक्स आणि जर्रा म्हणून वेगळा आजार असला तर रूग्णाला दुसर्‍याकडे रिफर करणारा असू शकतो.
याऊलट ३०च पेशंट बघणारा प्रत्येकास योग्य वेळ देऊन , इतरांनी न शिधलेले कीचकट आजार शोधणाराही असू शकतो.

सो पेशंटच्या संख्येनुसार डॉक्टराचा अनुभव आणि निदान करण्याची क्षमता ठरतेच असे नाही.

अमितवजी
>>>>अवयव टनेल मध्ये गेल्यावर टेक्निशियन गप्पा मारायला तिकडे उभा रहात नाही. त्याने सेफ ठिकाणी जाऊन मगच टेस्ट एक्विप्मेंत कंट्रोल करणे अपेक्षित असते. स्कॅन करताना/ करून झाल्यावर काय झालं हे सांगायला लगेच डॉक्टर कधीही येत नाही. रिपोर्ट मध्ये काय ते येईल.>>
मी डॉक्टर ने लगेच यायचे हे म्हटले नाह्ही. जरा नीट वाचाना राव
मी तो टेक्निशियन गप्पा मारायला हवा असे म्हटले नाही. प्रोसेस संपल्यावर बर्‍याच वेळाने उगवला.
या शिवाय, सुरुवातीस डोक्टर काय सिम्प्टम्स आहेत हे जाणण्यासाठी भेट तो, मग नंतर गरज नाही हे मला ठाऊक आहे.

<<तेव्हा निदान करण्याचा अनुभव तुलनेने भारतीय डॉक्टरांना जास्त असावा असे अनुमान काढता येईल का?>>
----- होय... या बाजूला अनुभव कमी पडतो असे माझे मत बनले आहे.

त्याच प्रमाणे भारतातला डॉक्टर तुलनेने (१३० कोटी लोकान्ना सेवा पुरवायची आहे) जास्त काम करतात. त्यामुळे कामाचा थकवा, जास्त ताण यामुळे मानवी त्रुटीन्चे प्रमाण वाढते.

गल्फ आणि आफ्रिकन देशात, भारतातर्फे मेडीकल टूरिझमची जाहीरात केली जाते. युरप मधे भारतातील आयुर्वेदीक ट्रीटमेंट लोकप्रिय होतेय.

दिनेशदा, गल्फ आणि अफ्रिकेतच कशाला, भारतातल्या कुठल्याही नामवंत कार्पोरेट हॉस्पिटलात किती युरोपियन पेशंट्स असतात ते बघा.
ते बिचारे हौसेने चुकीचे डायग्नोसिस आणि कमी दर्जाची मेडीकल सेवा घ्यायला आलेले असतात.

Pages