डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे डॉक्टर प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देतात, कंपनी च्या नावासहीत. त्यामुळे चुकीचे औषध द्यायचा प्रश्न च येत नाही.

मी डॉक्टरांनी चिठ्ठीत लिहून दिलेली औषधे विकत घेतल्यानंतर शक्यतो ती पुन्हा डॉ. नेऊन दाखवतो (की हीच आहेत का बघा).

सांताक्रूझची आमची डॉ. लिलीबाई औषधे लिहुन दिल्यावर आणुन दाखवा म्हणुन सग्ळ्याना सांगायची. ती हे का सांगतेय हे तेव्हा माहित नव्हते पण त्यामुळे औषधे विकत घेतल्यावर डोक्टरला दाखवल्याशिवाय खायची नाही हे पक्के अंगवळणी पडलेले. आताचे डॉक्टर हे सांगत नाहीत आणि सांगितले तरी कितीजण ऐकतील देव जाणे. ... Sad

आमचे डॉक्टर प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देतात, कंपनी च्या नावासहीत. त्यामुळे चुकीचे औषध द्यायचा प्रश्न च येत नाही.

फी किती घेतात?

पाच सहा महिन्या पुर्वी आमचे आताचे फॅ. डॉ. सांगत होते की सरकारने काहीतरी नियम केलाय की करणार आहे, त्यात प्रत्येक डॉक्टरचा दवाखाना अमुक्तमुक इतका मोठा असावा, दवाखान्यात एक नर्सही असावी वगैरे वगैरे बरेच काही आहे. मी हे सगळे करायला सुरवात केली तर माझी फी मला दुप्पट करावी लागेल.

या नियम आलाय की नाही हे माहित नाही. हेही डॉक्टारांनाच विचारावे लागेल. Happy

आमचे एक डॉक्टर सुद्धा प्रिन्टेड प्रिस्क्रिप्शन देतात. सगळ्या रिपोर्ट्सचा डाटा, वजन इत्यादि त्यांच्या एका साइटवर साठवतात. रोग्यांना ते पहायला पासवर्ड मिळतो आपला डाटा आपण केव्हाही पाहु शकतो.

फीस २०० रुपये आहे त्यांची. पहिल्यांदा बहुतेक १०० रुपये जास्त घेतात.

आमचे एस एन डी टी च्या मागचे पेडी आहेत त्यांच्याकडे नर्स किंवा रिसेप्शनिस्ट नाही.
पालक नीट नंबर लावत असल्यामुळे कमी भासत नाही. अर्थात क्लिनिक ला नियम नसतील, दवाखान्याला असतील.

फी किती घेतात?> १०० रुपये . काही वर्षांपुर्वी ५० होती.
क्लिनिक ही एकदम लहान आहे. बोरिवली ला. विरार, पनवेल पासून लोक येतात. माझ्या लग्नानंतर माझ्या सासरचे बहुतेक सगळे सायन , बेलापूर पासून त्यांच्याकडेच जातात, माझे सासू सासरे सुद्धा. डायग्नोसीस एकदम परफेक्ट. माझी एक नणंद नालासोपार्या वरून प्रायवेट गाडीने आईला घेवून त्यांच्याकडे येते. तिला गाडीचा खर्च दोन हजार च्या आसपास होतो. त्या मानाने फीझ एकदम च कमी आहे.

आमच्या दवाखान्यात हे सगळे रूल फॉलो करतो.
अमुक इतकी सिटींग एरिया, अमूक नर्स इत्यादी.
प्रिंटेड कॅपिटल प्रिस्क्रीप्शनच देतो.
त्यावर रोग्याच्या आजारासंबंधी आणि तपासणी संबंधी नोंदीही असतात.
परत कधी यायचं, कोणत्या टेस्टस करून यायचं हे ही असतं.

फीज बाकीचे हे सगळे फॉल न करणारे डॉक्टर घेतात तितकीच.

एक सँपल प्रिस्क्रीप्शन टाकेन एकदा.

साती मस्तच.
माझ्या डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन जेव्हा मी सायन मधील मेडिकल स्टोअर मधे दिले तेव्हा तेथील वयस्कर काकांना आच्छर्य वाटले आणि म्ह्णाले आयुष्यात पहिल्यांदा एवढे नेटनेटके प्रिस्क्रीप्शन पाहिले.

हे एक सँपल प्रिस्क्रीप्शन.
(औषधांची नावे खोटी आहेत , ट्राय करू नका.)

image_87.jpg

तर..
पेशंटला गोळ्या दिल्यावर केमिस्ट किती गोळ्या डिस्पेन्स केल्या ते ही लिहितात.
गोळ्या/औषधे विकत घेतल्यावर ते मला दाखवून जाणे हा नियम आहे.

प्रिस्क्रीप्शनच्या कोपर्‍यात हॉस्पिटलचा फोन नंबर आणि माझा फोन नंबरही आहे.
इमर्जन्सीला पेशंट डायरेक्ट मलाच फोन करतात.

(ही पोस्ट फक्त प्रिंटेड प्रिस्क्रिप्शनचं एक सँपल दाखवायला टाकलीय. बाकी जाहिरात नाही. Wink )

अय्यो सामी, कमाल आहे.
नीटनेटकी प्रिस्क्रीप्शन लिहायला मला सायनमध्येच (लोकमान्य टिळक हॉस्पिटल) शिकवलंय.
Happy

नाशिक ला आर के वर चाेपडे डॉ यांचा मुल तान्हे असताना भयानक अनुभव आला, संगमनेर च्या जाधव बाईंनी वाचवले. त्यांची opd फी 30 रू हाेती. संगमनेर ला हंगरगेकर नावाचा चक्रम डॉक्टर हाेता, तिरसट वागायचा लेकाचा

म्हणजे साती, ते नियम आहेत पण बंधनकारक नाहीयेत अजून? मला नक्की आठवत नाही पण बहुतेक आमच्या इथल्या डॉक्टर्सानी निषेध केलेला याचा, काहीतरी इश्यू झालेला आणि म्हणून डॉक्टरांनी मला हे सांगितलेले.

आमच्या इथे 400 sqft कमर्शिअल जागा विकत घ्यायला करोडभर रुपये तरी लागतील आणि भाडेतत्वावर अर्धा लाख सहज. हे सांगत डॉक्टर म्हणाले कि हे बंधनकारक केले तर फी वर परिणाम होणार.

अजुन सगळी चर्चा वाचली नाही. पण सुरवातीची चार पानं वाचून www.aisiakshare.com/node/66 हा धागा आठवला.

तिथला

रविवार, 21/12/2014 - 14:11
| ठीकय. नवीन सदस्य आहात,
(Score: 4 मार्मिक )
टाटाबायबाय
पुण्य: 2
ठीकय. नवीन सदस्य आहात, पहिल्यांदाच प्रतिसाद देताय म्हणून सांगते. पण या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद.
चकल्या करणे, केक/शिरा बनवणे याला सर्जन, डेंटीस्टशी कंपेअर करताय?
कशाला किती डोकं लागतं, किती शिकावं लागतं, त्यातून रिटर्नस किती मिळतात, बिघडल्यास काय नुकसान होतं, काही व्हेल्यु अनालिसीस हवं की नको?
ललित आहे म्हणून चालून जातं. पण ते गंभिरपणे घेऊन चानचान म्हणायला
लागलात अवघड आहे.

रविवार, 21/12/2014 - 23:52
| आत्ता कुठे स्पष्टपणे मनातला
(Score: 5 मार्मिक )
गवि
पुण्य: 2
आत्ता कुठे स्पष्टपणे मनातला आक्षेप बाहेर आला.
रास्त आणि रोचक आक्षेप आहे ताई..
पण..
कपड्यांच्या collar देखील घासून मळ काढून धुणे अन भांडी लख्ख घासणे..
साहेबाला वाहतुकीचे सर्व नियम पाळून सुरक्षित ड्राईव्हिंग करुन वेळेत खात्रीने मीटिंगला पोचवणे..
वेळेवर रेल्वेफाटक उघडणे अन बंद करणे.
mall मधे शिरणा-या राव ते रंकापर्यंत कोणाच्याही प्रेशरने विचलित न होता सर्वांचे नीट फ्रिस्किंग करणे..
या आणि अश्या प्रत्येक कामाला लागणारी तथाकथित "अक्कल" आणि ते काय ते व्हॅल्यू अनालिसीस वगैरे फार वेगवेगळे काढता येईल हो..
पण यापैकी प्रत्येकाला आणि doctor engineer ला अन इव्हन पंतप्रधानाला आपापली प्रोसेस तितकीच महत्वाची वाटणं आणि त्या भावनेनं चोख काम करणं याला एकसारखंच महत्व आहे आणि एकसारखीच प्रतिष्ठा असावी हे तत्वच मान्य नसणं हा आपल्या देशाचा फार बेसिक लोचा आहे. यू आर इन मेजोरिटी..
असोच..

हा संवाद फारच रंजक आहे. गविंच्या प्रतिसादाला १० श्रेणीदात्यांनी 'अतिशय मार्मिक' ठरवला आहे.

साधना,
महाराष्ट्रात सध्या काय नियम आहेत माहित नाही.
इथे तरी असे नियम फॉलो केल्याशिवाय (जागेविषयी हां, प्रिस्क्रीप्शन विषयी नव्हे) क्लिनीकला रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही.
आणि नंबर नसेल तर ऑफिशीयल प्रॅक्टीस करू शकत नाही.

अमि, किती मस्त लिंक दिलीत.
त्या पानावर १२३४ म्हणून एक आय डी आहे ती मी!
Happy

अमि, किती मस्त लिंक दिलीत. >> Lol अवांतर होइल म्हणून देऊ की नको विचार करत होते.

त्या पानावर १२३४ म्हणून एक आय डी आहे ती मी! >> ओह ओके.

औषधांची नावे खोटी आहेत , ट्राय करू नका. <<< साती... आता खोटी औषधे लिहून दिल्याचा आरोप तुमच्यावर.. Proud ... Light 1

Happy

पेशंटही खोटाच आहे की पण!
टेस्ट नाव पेशंट आडनावाचा.

डॉक्टर आडनाव पाहिलंय पण पेशंट आडनावाचे कोणी पाहिले नाही अजून मी तरी.

(स्वतः डॉक्टरांनी) संगणकावरून दिलेली प्रिस्क्रिप्शन्स येथे 'आम' झालेली आहेत. केमीस्टची बिलेसुद्धा! पुण्यासारख्या शहरात सगळे काही क्रॉस चेक करणे जवळपास अशक्यप्राय आहे. (मला चार वर्षात पहिल्यांदाच 'वॉर्फरिन' कोणाला हवी आहे विचारणारा केमिस्ट भेटला आणि 'रेस्टिल कोणी प्रिस्क्राईब केली आहे' विचारणारा केमिस्ट भेटला. - डिस्क्लेमर - मी रेस्टिल घेत नाही).

अय्यो,
रेस्टील दिल्यावर वेगळी नोंद वेगळ्या नोंदवहित पेशंट आणि डॉक्टरच्या नावासहित किती तारखेला किती गोळ्या दिल्या इत्यादी करून ठेवावी लागते.
ड्रग इन्स्पेक्टर आल्यावर ती दाखवावी लागते.
पुण्यात असलं काही करत नाहीत का?

लबाड फार्मसिस्ट कुठले!

इथे हैद्राबादला सुद्धा रेस्टिल / ट्रायका काही फार्मसिस्ट प्रिस्क्रिप्शन शिवाय देत नाहीत, तर काही देतात.

इथेच लिहीलं असतं तर ? कुचाळक्यांसाठी का चालवायची वाहती पानं ?

ते दीमा मला काय काय म्हणत होते तेव्हां यांचे स्क्रीनशॉटचे बटण बिघडले होते की डोळ्यांचे ? अजून असेल पाठीमागे. स्वतःची ओळख न देता इतरांना काहीही संबोधने लावणारा हा मनुष्य चिडला काय आणि आदळआपट करू लागला काय.. कि फर्क पैदा ? जसं काही कुणालाच ठाऊक नाहीये किले का रहस्य Lol

Pages