डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_मनाली_ | 22 February, 2016 - 08:19
अवांतर :-
ज्यांना मूल होत नाही पण आई वडील होण्याची खूप इच्छा असते ते लोक मूल दत्तक का घेत नाहीत ?
<<<< आमच्याकडे एका दाम्पत्याला मुल नव्हत होत. सगळे डॉ. करून झाले. १५ वर्ष वाट पाहिली पण काही उपयोग नाही झाला. शेवटी गेल्या वर्षी एक मुलगी अगदी तान्ही दत्तक घेतली आणि परवाच तिचा १ला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. (अवांतर stop)

माझ्या एका मैत्रिणीच्या जावेला असेच मुल होण्यसाठी ट्रिटमेंट देऊन फसवलेले. तिच्या मते ती सातव्या महिन्यात असताना तिच्या कळले की ती गर्भवती नाहीय आणि तिला फसवले गेले. ती एवढी शॉकमध्ये गेली की आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. पण मैत्रिणिने खुप समजावुनही तिने आणि तिच्या नव-याने पोलिस केस केली नाही. आता या केसमध्ये ती फसवणारी बाई कधीतरी पकडली जाणारच. पण तोवर अशा कित्येक जणी उध्वस्त होणार त्याचे काय?>>>

यावर एक मराठी चित्रपट येऊन गेलाय. नाव माहित नाही. त्यात सुकन्या कुलकर्णी होती एव्हढच आठवतय.

सर्जरी --- धनगरी औषध ....... पाय थोडा ब रा झाला / सुगर वाढली... म्लेंच्छ दीक्षा .... सर्वरोगमुक्ती

असा सिक्वेन्स आहे.

बालकांच्य छातीत कफ भरुन घुरघुर आवाज येत असेल>>>>मुलाला कफ झाला नव्हता.याआधी फॅ.डॉ.कडे जाऊन आलो होतो.फक्त वारंवार शीचा त्रास होत होता.

मी अमी, अशी केस विरार एरियात कुठतरी झालेली. ती बाई हॉस्पिटलातुन नवजात मुले पळवुन आणायची आणि इथे अशा फसवलेल्या बायांची डिलिवरी झाली सांगुन ते मुल त्यांना द्यायची. जवळजवळ २५-३० वर्षांपुर्वींची केस आहे ही. या बाईला पकडल्यावर तिचे नाव लोकसत्तामध्ये आले. ते वाचुन एकजण पोलिस स्टेशनला गेला. तो म्हणाला डॉ. अमुक तमुक म्हनुन तुम्ही जे छापलेत ते माझ्या बहिणिचे नाव आहे. पकडलेल्या बाईचे डोक्टरकीचे पेपर्स वगैरे जेव्हा त्याला दाखवले तेव्हा तो म्हणाला हे सगळे माझ्या बहिणीचे आहे. याची बहिण लग्नानंतर दुबईला स्थाईक झाली होती. ती इथे असताना तिचा दवाखाना होता. ही बाई तिथे नर्स होती. तिने गुपचुप सर्टिइफिकेट्स वगैरेच्या कॉपीज काढल्या आणि त्या बळावर आपला दवाखाना स्थापुन लोकांना लुटायला सुरवात केली.

मी वर लिहिलेल्या केसमध्ये अचानक दवाखाना बंद करुन डॉक्टर नावाच्या पाटीसकट गुल झाली तेव्हा संशय आला.

वरच्या घटनेनंतर ताक फुंकून प्यायल्यासारखी स्थिती झाली.कुठल्याही डॉ.ने सांगितलेल्या औषधावर विश्वास बसेनासा झाला.त्यांना तर विचारायची पण दुजोरा म्हणून केमिस्टला विचारायची इतकंच. >>> ओके देवकी.

समजा एखाद्या सश्रद्ध रुग्णाला औषधं जान्हवी तोयं| प्रमाणे, एखादा प्लासिबो इफेक्ट मुळे सकारात्मक परिणाम झाला तर त्या संबधीत डॉक्टरने ती रुग्णाची फसवणूक केली आहे असे मानायचे का?

प्रकाश घाटपांडे,

प्लासिबो इफेक्टसाठी डॉक्टर कशाला हवा! 'तुला अमूक ग्रहाची पीडा आहे, तमुक शांती कर रत्न परिधान कर' म्हणणारा ज्योतिषीही चालेल की!

नाही सनव, ज्योतिषि नै चालाणार.... उलट प्लासिबो इफेक्टचा गैरफायदा घेत ज्योतिषी पैसे उकळतो असा तर आक्षेप अस्तो या अन्निस वाल्यांचा..
तर त्या ज्योतिषी व्यक्तिला जसे आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची मनिषा हे अन्निस वाले ज्या कारनाने करतात, तेच कारण डॉक्टारने वापरले तर काय हो? करणार का डॉक्टारला आरोपी? असा प्रश्न आहे तो.......

येस्स लिंटी. अन्निस तले कडवे अश्रद्ध त्या डॉक्टर लाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतात. राणी बंग आदिवासी स्त्रियांमधे आरोग्य जागृती साठी तुलनेने कमी अंधश्रद्ध गोष्टींचा पर्याय वापरतात त्याला ही आमचे मित्र आक्षेप घेतात. आपल्या इथे देखील तिथल्या बेअरफूट डॉक्टर या संकल्पनेला खोटारडेपणाच मानणारे आहेत.क्वॅक्स समजून त्यांच्यावर ही कारवाई करावी असे त्यांचे मत असते. 'तांत्रिक दृष्ट्या' ते बरोबर देखील आहे.

माझा अजुन एक दर्दभरा अनुभव जो दर्द मी आजही भोगतोय!

साधारण ६-७वर्षांपुर्वी थंडी तापाने आजारी १ दिवस वाट पाहून फॅमिली डॉ गाठले त्यांनी पॅरासिटामॉल आणि अण्टीबायोटिक गोळ्या दिल्या २ दिवसांत फरक नाही म्हणून कोथ्रुडातील एक बर्यापैकी नांव असलेल्या इस्पीतळातील एम डी फिजिशियनला दाखवले ताप १०२ च्य खाली उतरत नव्हता ते म्हणाले ३ दिवस झाले अॅडमिट व्हावे लागेल. झालो अॅडमिट. २ दिवस अॅण्टीबायोटीक आधी १ ग्राम दोन वेळा आय व्ही. सोबत पॅरासिटामॉल आय व्ही असे सुरु ताप उतरेना मग म्हणे मलेरिया असु शकतो जरी टेस्ट निगेटिव्ह आली तरी मलेरियाचे आय व्ही आणि सोबत २ ग्राम सिप्रोफ्लोक्झिन कि काय ते ३ वेळा.. तरीही ताप उतरेना तेंव्हा म्हणाले सध्या स्वाईन फ्लु आहे तर तेही असु शकते मग स्वाईन फ्लु टेस्ट त्याचे रेपोर्ट ची वाट न पहाता उपरोक्त औषधांच्या जोडीला टॅमी फ्लु सुरु.
दरम्यान तिसर्‍या दिवशी मला कानात ओल जाणवली वरती मी विचारले डॉ. राऊंडला असताना तर पाहुन म्हणे तुम्ही कान खाजविला असेल. ४थ्या दिवशी एक ओघळ कानात आत पर्यंत गेला
तेंव्हा हलकासा कानही दुखु लागला. मग ह्यांनी कान नाक घसा तज्ञांना पाचारण केले त्यांनी तपासुन कानाचे थेंब दिले काही एक उपयोग नाही.. अशी ८-९ दिवसांनी किमान ५० ग्राम अॅण्टीबायोटिक, स्वाईन फ्लु, हिवताप आदी औषधे खाऊन ताप व कान दुखी असतांनाच हॉस्पीटल मधुन वैतागुन सोडवणुक करविली.
नंतर दुसर्या दिवशी कान दुखी असह्य झाल्याने कोथृड मधीलच कान नाक घसा तज्ञांना दाखवयला गेलो त्यांनी पहता क्षणी अहो तुम्हाल ''रॅमसे हंट सिण्ड्रोम'' झालायं. म्हणजे कळेना. तेंव्हा त्यांनीच सांगितले हा क्वचित होणारा नागिणीचा प्रकार आहे कानातून होतो तुमच्या कानात उझिंग झालेले का? हो म्हटलो माझा चेहरा पाहुन वाकडे झालेले ओठ एकअजिबात न मिटणारा डोळा त्यांनी मला आरसा बघायला सांगितले मीच हादरलो ते भयंकर पाहून... फेशियल पाल्सी नावाचा प्रकार झालेला....

त्यांनतर तिथे पुन्हा ५ दिवस अॅमडमिट होऊन अॅसिव्हिर डोस.. पुढे चेहर्याचे व्यायाम... पुर्वपदावर चेहरा यायला २ महिने गेले.. पण कानात हवेच्या आवाजाचा दोष निर्माण झाला तो कायमचाच आणि ८-१० दिवस अॅण्टीबयोटिकच्या मार्‍यामुळे पचन संस्था आणि इतर प्रकृतीवर आयुष्य भराचा परिणाम....

योग्य उपायाला ८-१० दिवस विलंबाचा परिणाम भोगतोय जो शेवटापर्यन्त सोबत करणार!

अरेरे किस्ना, तरि "नशिब" चांगले तुझे, ते दुसरे डॉक्टार तरी वेळेत भेटले.
अशा केसेस मधे "नशिबाचा" भाग कितिक असतो हो प्रकाशराव? Wink
ही लोक चांगली पुण्यामुंबैसारख्या शहरात रहातात. ढुंगणापाशी गल्लोगल्लीत पैशानपासरी डॉक्टर्सचे दवाखाने/इस्पितळे अन् दिवसरात्र उघडी औषधांची दुकाने, हाताशी पुरेसा पैका, अन तरीही यांचे(च) बाबतीत असे का घडते?
आता ही लोक कुठे आडबाजूला गडचिरोली वगैरेत वा मावळात डोंगर दर्यात, मराठवाड्यात खेडेगावात असती अन असे झाले असते म्हणजे डॉक्टारच उपलब्ध नाही, आहे त्याला त्या विषयाची जाण्/अक्कल नाही, ते असले तरी औषधाचे दुकान नाही, ते असले तर खिशात पैका नाही..... इकडॅ तर असे काहीही नसताना असे अनुभव का यावेत?
या मागे देव दैव अन नशिबाचा हात किती?

अरेरे , खुप यातना होत आहे, नुसते वाचुन, प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवले त्यांची तर कल्पना करवत नाही.

खुप वाईट आहेत काही डॉ़क्टर Sad

आणि हॉस्पीटलात गेल्यावर मेडिक्लेम आहे कि नाही हे पाहुन पुढची बिलांची उपाय योजना मला वाटते ही मंडळी आधीच करीत असावीत! इतक्या टेस्ट करवितात कि बर्‍याचश्या टेस्ट ह्या तुमच्या पॉलिसीत ज्या प्रमाणे तुमची विमा कंपनी आणि आजार दोघेही ग्राह्य धरीत नाहीत! शेवटी तुमचा खिसा रिकामा करुन सोडणार!!

बाप रे.. कृष्णा Sad Sad

मला एक कळत नाही कि निदान होत नसेल तर दुसर्या डॉक्टर कडे का रेफर करत नाहित?

माझ्या मैत्रिणीला ताप येत होता ४-५ दिवस. तेव्हा डेंग्यु ची साथ जोरावर होती आणि भाईंदरला लोकल डॉ कडे औषध घेउनही फरक पडला नाही म्हणुन ती परेलला मोठ्या हॉस्पिटल मधे आली. मामा मामीला सोबत घेउन हॉस्पी त गेली. तेव्हा डेंग्यु ची साथ जोरावर होती. त्या लोकांनी तिचं ब्लड सॅम्पल घेतलं. थोड्या वेळाने रीपोर्ट मिळेल सांगितलं. तिने आणि मामा मामीने बाहेर जाउन खाउन घेतलं. आणि पुन्हा हॉ मधे आली. त्या मुशिडॉ ने रीपोर्ट येण्याची वाट न बघता तिला (मला वाटतं डेंग्युचं) इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्या दिल्या तिने एक झटका दिला आणि कुणाला काही कळायच्या आतच ती बेशुद्ध झाली. कोमात गेली. दीड दिवस वेंटी वर ठेवुन मग ती गेलीये असं सांगितलं.
तेव्हा त्या हॉस्पिटल मधे असे बरेच रुग्ण दगवले होते. मुशिडॉ च्या हलगर्जीपणा मुळे. आणी इंजेक्शन देण्यामुळे. न्युज मधे बातम्या होत्या. माझ्या मैत्रिणीची बातमी पण आली होती न्युजपेपरम्धे फोटोसकट.

कृष्णा,

खरच खुप वाईट वाटल तुमच वाचुन !
अ‍ॅलेपॅथी डॉक्टरमुळे झालेला चेहेर्याचा पॅरॅलेसीस व जिवन भराचा त्रास !

ईथेच मायबोलीवर एका मायबोलीकर डॉक्टरने रामदेव बाबाच्या कंट्रोल नसलेल्या डोळ्याबद्दल विनोद केला होता.

त्यावेळेला प्रतिवाद करायचा होता पण ईतका मोठा डॉक्टर ! काय बोलणार आम्ही पामर ?

चेहेर्याच्याच काय कोणत्याही पॅरॅलेसीसवर उपाय नसताना दुसर्या पॅथीवर काय म्हणून अ‍ॅलेपॅथीचे डॉक्टर हसतात हेच कळत नाही,

पादुकानन्द

मी वैदु नाही आणी डॉक्टर तर नाहीच !

नाकाच्या साध्या ऑपरेशनमुळे डोळ्याच्या पापण्याचा कंट्रोल जाऊ शकतो, जो पुन्हा रीपेअर होऊ शकत नाही, अस असताना, ज्या प्रोब्लेम बद्दल स्वतःच्या " पॅथी " मध्ये उपाय नसताना दुसर्याला खिजवण्याच कारण
काय ?

माझा आजचा अनुभव
गुडघे खूप दुखतात म्हणून एम आर आय ३ टी करायला सांगितले. नाशिकला एकच चिकित्सा केंद्र आहे. गेलो. बाहेर साईबाबाचा मोठ्ठा पुतळा. रिसेप्शन वर कळकट्ट कप अन बाई बसलेली. विचारले. रु १२००० दोन गुडघ्यांचे , कॅश , क्रेडित कार्ड चालत नाही. अत्यंत घाण पोशाखात वॉर्ड बॉय हिंडत होते. कोणीही क्वालीफाईड मव्हता. मी त्यांना विचारले, सर्व मॅट्रिक. ते तिथल्या सोफ्यांवर बसून जोरात लावलेला कोणता तरी दाक्षिणात्य डब्ड पिक्चर टी व्ही वर पाहत होते.
आण्खी एक बोर्ड... अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात एकच... इथे डोक्टर लोक आणि त्यांचे नातेवाईक येतात. आमचे दत १.५ टी पेक्षा जास्त म्हणजे (मॅग्नेटिक ??????? ) साठी आहेत. व्हॉटेव्हत दॅट मीन्स!!!!
मला १० मिनिटात आत घेतो म्हणून २ तासांनी आत घेतेले. जाण्यापूर्वी मी टॉयलेट ला गेलो. गलिच्छ, वाहते ......, वास मूत्राचा, हॉस्पिटलभर.
आतला टेक्निशियन नीट होता. मशीन अद्ययावत होते. सीमेन्सचे. त्याने माझे गुडघे टनेल मध्ये घातले अन गायब झाला. प्रोसेस संपल्यावर आत यायला २० मिनिटे घेतली कारण तो दुसर्^या चेंबर मध्ये होता. या संपूर्ण
प्रकारात तिथला डोक्टर आला नाही. तो रात्री येवून सर्व ..... फोटो.... पाहून रिपोर्ट उद्या देणार.
माझ्या ऑर्थो शी बोललो.... ते म्हणाले आपल्याला स्कॅनशी ... एम आर आय शी कर्तव्य आहे.
एवढे पैसे देवून असा गलिच्छ पणा अपेक्षित आहे का?
मी उद्या रिपोर्ट घेताना तिथल्या डॉक्टरला फैलावर ग्यायचे म्हणतोय ;(

अवयव टनेल मध्ये गेल्यावर टेक्निशियन गप्पा मारायला तिकडे उभा रहात नाही. त्याने सेफ ठिकाणी जाऊन मगच टेस्ट एक्विप्मेंत कंट्रोल करणे अपेक्षित असते. स्कॅन करताना/ करून झाल्यावर काय झालं हे सांगायला लगेच डॉक्टर कधीही येत नाही. रिपोर्ट मध्ये काय ते येईल.
बाकी स्वच्छता आणि बकालपणा म्हणजे खरंच कठीण आहे. Sad

मेडिकल कॉलेजमधे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात तेम्व्हा फक्त श्रीमन्त आइबापान्च्या मुलाना प्रवेश घेणे शक्य होते मग त्यन्ची लायकी असो वा नसो बहुधा नसतेच. असे अनेकजण इस्पितळात काम करत असत्तात. त्याना निदान करणे जमतच नाही. माझे एक मित्र आहेत ते म्हणतात की आजकालच्या डॉक्टरान्ची diagnostic ability कनिश्ठ दर्जाची आहे. म्हणुन अशा प्रकारची पैसे काढु परिस्थिती आहे. माझे मित्र स्वतः उत्तम cardiologist आहेत आणि येथिल युनिव्हर्सिटिमधे गेली अनेक वर्शे शिकवत आहेत. ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.

मेडिकल कॉलेजमधे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात तेम्व्हा फक्त श्रीमन्त आइबापान्च्या मुलाना प्रवेश घेणे शक्य होते मग त्यन्ची लायकी असो वा नसो बहुधा नसतेच. असे अनेकजण इस्पितळात काम करत असत्तात. त्याना निदान करणे जमतच नाही. माझे एक मित्र आहेत ते म्हणतात की आजकालच्या डॉक्टरान्ची diagnostic ability कनिश्ठ दर्जाची आहे. म्हणुन अशा प्रकारची पैसे काढु परिस्थिती आहे. माझे मित्र स्वतः उत्तम cardiologist आहेत आणि येथिल युनिव्हर्सिटिमधे गेली अनेक वर्शे शिकवत आहेत. ते म्हणतात की सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.

सुट्टीला भारतात गेलात आणि आजारी पडलात तर तिथे उपचारासठी राहु नका लगेच परत या.>>

पण परिस्थिती अशी नाही. उलट इतर कुठेही आजारी पडून उपचाराला भारतात या<
असा बहुसंख्यांचा विश्वास आहे.
आशियातल्या मेडीकल टूरिजमसाठी प्रसिद्ध देशात भारत पहिल्या तीनात येतो.

अर्थात ज्या लोकांना (पेशंटस) भारतात राहून पैसे कमवायला जमले नाही आणि ज्या डॉक्टरांना भारतातले पैसे पुरेसे वाटले नाहीत त्यांचे असे मत नक्कीच असू शकते.

अहो इतकी कमी पॉलिटीकल विल असताना, इतका अस्वच्छ्/बकालपणा असताना जर इथले डॉक्टर्स कंपॅटीबल नसते तर साथीचे रोग, इतर काही रोग यांनी भारताची लोकसंख्या पटापट कमी होताना दिसली असती.
तर उलट वेगवेगळे मृत्यूदर कमी होऊन आमची लोकसंख्या बर्थ रेट कमी होत असतानाही वाढतच आहे.
काय गौड्बंगाल आहे हे.
उलट तुमच्य त्या कर्डीओच्या मताप्रमाणे साधं आजारी पडल्यावरपण इलाज करायला अमेरिकेत परत यायचं अशी परिस्थितू इथे असेल तर इथे सतत महामारीसदृश्य वातावरण असले पाहिजे.

दिगोचिसाहेब, इथे या धाग्यावर प्रत्येकाने बैयक्तिकरीत्या आलेले वाईट अनुभव लिहलेत आणि ते रसे असू शकतात हे मी मान्यही करते(उडदामाजी काळे गोरे) .
पण भारतातले एकंदर डॉक्टरच अज्जिबात कंपॅटिबल नाहीत असे तुमच्या मित्राचे म्हणणे अगदीच अ आणि अ आहे.

Pages