डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<माझ्या एका मैत्रिणीच्या जावेला असेच मुल होण्यसाठी ट्रिटमेंट देऊन फसवलेले. तिच्या मते ती सातव्या महिन्यात असताना तिच्या कळले की ती गर्भवती नाहीय आणि तिला फसवले गेले. ती एवढी शॉकमध्ये गेली की आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. पण मैत्रिणिने खुप समजावुनही तिने आणि तिच्या नव-याने पोलिस केस केली नाही. आता या केसमध्ये ती फसवणारी बाई कधीतरी पकडली जाणारच. पण तोवर अशा कित्येक जणी उध्वस्त होणार त्याचे काय?>>>

बापरे
फारच भयंकर आहे हे

मलाही हा प्रश्न पडलेला जेव्हा ही हकिकत कानावर आली. जेव्हा जावेला आपण फसवले जात आहोत हा संशय आला तेव्हा ती दुस-या डोक्टरकडे गेली. सोबत माझी मैत्रिण होती. त्या डॉक्टरने तिला देण्यात येणारी औषधे वगैरे पाहुन सांङितले की या गोळ्यांमुळे पाळी तात्पुरती बंद झाली आणि वजन अवास्तव वाढले. ती जिथे ट्रिटमेंट्साठी जात होती त्या खोट्या डॉक्टरने सांङितलेले की सोनोग्राफी आमच्याकडेच करायची, औषधे आमचीच घ्याय्ची आणि कोणाला सांगायचे नाही काय ट्रिटमेंट चाललीय ते. जावेला १५ वर्षे मुल नव्हते हे झाले तेव्हा. आताही नाहीये, माझ्या मैत्रिणीलाही मुल नाहीये. अशा वेळी सारासार विचार सुचत नसतो माणसाला. कुठुन का होईना आपले काम होऊदे असे वाटत असते. आपण तटस्थपणे विचार करतो तेव्हा वाटते कशी फसतात ही माणसे. पण जे लोक अशा परिस्थितीत असतात त्यांना काहीही करुन रिझल्ट हवा असतो. काय मार्ग चोखाळतोय याचे भान राहात नाही.

साधना, अ‍ॅलोपथिक डॉक्टरांची त्या त्या राज्यातली संघटना आणि एम सी आय हे सगळे पहात असते.
त्यांच्याकडे तक्रार केल्यास कार्यवाही होते पण बहुतेक सामान्य लोक डाय्रेक्ट तक्रार नाही करू शकत , कोर्टातून वगैरे जावी लागते.
एक अ‍ॅलोपथिक प्रॅक्टीशनर दुसर्‍याची तक्रार करू शकतो.

बाकी फॅकक्टीजच्या बॉडीज अश्या लक्ष ठेवताना मी तरी पाहिलेल्या नाहीत.
उलट होमिओपथी आणि आयुर्वेदिकवाल्यांच्या संघटना आपल्याला अ‍ॅलोपथिक प्रॅक्टीस अधिकाधिक आणि लिगली कशी करता येईल याकरता प्रयत्नशील असतात.
Happy

आता आम्ही स्वतःवरच एकदा डिग्री मिळाल्यावरही दरवर्षी नॉलेज अपडेट करण्यासाठी गुणांकन पद्धती मागून घेतलेली आहे.
दरवर्षी आपापल्या विषयाशी संबंधित अमुक एक कॉन्फरंसेस अटेंड करून ते गुण आपल्या मेडीकल काउन्सिल करून अपडेट करवून घ्यायचे
बाकी फॅकल्टीत असे काही आल्याचे ऐकले नाही.

मला खरे म्हणजे पेशंटचे फारच वाईट वाटते की ते कुठल्या फॅकल्टीच्या डॉक्टरकडे अ‍ॅलिपथिक ट्रीटमेंट घ्यायला जातायत हे त्यांना शेवटपर्यंत कळणार नाही असा सगळा भुलभुलैया असतो.

साधना,

आपल्या म्हणण्यातही तथ्य आहे. आपण आई होत नाही आहोत ही भावना मतीच कुंठीत करते. अशा वेळी लॉजिकल विचार सुचत नाहीत. पण त्यांच्या नवर्‍याकडून असा विचार व्हायला हवा होता.

हे जे खोटे डोक्टर असतात किंवा ज्यांना अलोपथी करायची परवानगी नसते असे डोक्टर आपल्या पाटीवर पदव्यांची लांबलचक रेल्वेगाडी लावतात असे माझ्या एकंदर लक्षत आले आहे. मुंबईचे माहित नाही पण नव्या मु़ंबईत प्रत्येक भागात शहरी आणि गावठाण असे दोन ठळक भाग आहेत. गावठाणातल्या दवाखान्याच्या डोक्यावर भरभक्कम पाटी असते डिग्र्यांची. शहरात एमबिबिएस आणि जास्तीचे असेल तर एम्डी एवढ्यावरच गाडी थांबते. त्यावरुन ओळखाय्चे कोण खोटा आणि कोण खरा. Happy

नाही गं. खुप प्रेशर येते दोघांवर. पुरूषांच्या ग्रुप्समध्येही चर्चा होतात कोणाला मुल नसेल तर. त्याच्यावरही प्रेशर येतेच कितीही नाही म्ह्टले तरी. मी मैत्रिणीची हालत, तिचे नैराश्य आणि सोबत तिच्या नव-याचेही नैराश्य खुप जवळून पाहिलेय. तिच्या घरात दोघींनाही मुल नसल्याने खुप प्रॉब्लेम्स झाले. नशिबाने सगळ्यात धाकट्या जावेला मुले झाली म्हणुन सासुचे डोके थोडे ठिकाणावर राहिले. असो. हे विषयांतर झाले.

अवांतर :-
ज्यांना मूल होत नाही पण आई वडील होण्याची खूप इच्छा असते ते लोक मूल दत्तक का घेत नाहीत ?

एकदाच वाईट अनुभव आलाय डॉक्टरचा. त्याची पण गंमतच आहे.
लग्नानंतर पहिल्यांदा आजारी पडले होते. ऑफिसातून घरी आले तीच भरपूर तापात. १०३ च्या आसपास ताप. ग्लानी आलेली. नवरा घाबरला. आणि जवळच्या दवाखान्यात घेवून गेला. गायनॅकाचं नर्सिंग होम होतं ते. वेटींग मध्ये बसलेले असताना तिथल्या पंख्यामूळे मी कुडकुडायला लागले म्हणून नवर्‍याने पंखा बंद करायला सांगितलं. तर त्या लोकांनी मला सरळ आत अ‍ॅडमीटच केलं. भरपूर तापामूळे मी अर्धवट झोपेत ग्लानीत होते. डॉ. तपासलं आणि मला हाय डेन्सिटी ग्लुकोज लावायला सांगितलं. टाइफाइड किंवा मलेरिया असेल म्हणे. टेस्ट उद्या करु आणि तोपर्यंत दोन्हीची ट्रीटमेंट करू असं सांगितलं. मी तेवढं ऐकून अहो दोन्हीपैकी एकच औषध देता येईल ना इतकं म्हटलं होतं. मग एक इंट्राव्हेनस इंजेक्शन दिलं. आता हे लोक मलेरियाचं औषध देतिल आणि मग उलट्यांसाठी अजून काही देतिल या अंदाजाने मी आधीच मला पेरिनॉर्मची अ‍ॅलर्जी आली होती एकदा हे सांगितलं.

खरी गंमत नंतर झाली. सलाइन आणि इंजेक्शननी मी गुंगीत गेले होते. सलाइन लावताना नवर्‍याचा हात पकडून ठेवला होता. आणि बहूदा कण्हत होते. त्यात मी खूपच अंडरवेट होते त्यावेळी (५'४" उंची आणि ४४ किलो वजन). तर त्या डॉक्टरणीने नवर्‍याला तू हिला पळवून आणलंय, हीचं वय १८ पेक्षा कमी आहे (मी चांगली २८ वर्षांची होते त्यावेळी) , तुम्ही नवरा-बायको नाही आहात... तू हिला मारहाण करतोस :अ ओ:, आता काय करायचं, असलं काय काय बोलून तु;ला आता पोलिसात देते म्हणून धमकवायला सुरवात केली. बरं अहो मी हिचं लायसंस आणि आमचं मॅरेज सर्टिफिकेट आणून दाखवतो तुम्हाला असं नवर म्हणाला तर तू इथून पळून जाशिल म्हणे त्याला. मग आमचे ड्रायव्हर काका आले घरूम्न सर्टिफिकिटं घेवून. नवर्‍याने माझ्या आईशी आणि जावेशी डॉक्टरांचं फोनवर बोलणं करवलं.. त्यानंतरच डिस्चार्ज दिला. उद्या परत २ हाय डेन्सिटी ग्लुकोज लावावे लागतिल असंही सांगितलं. आम्ही मात्र दुसर्‍या दिवशी तिकडे फिरकलो नाही. माझा ताप पण उतरला होता. लगेचच औरंगाबादचं फ्लाइटचं तिकीट काढून मी घरी आले आणि घाटीत मुळे सरांना दाखवलं. ते म्हणे काही झालं नाहीये हिला फक्त व्हायरल आहे. :खो खो:

साती, पदव्यांच्या माहितीबद्दल धन्यवाद.

अशावेळी, फॅमिली डॉक्टर चांगले असणे फार उपयोगी पडते. ते स्वतः कोणत्याही उपचारपद्धतीचे उपासक असोत, पण आपल्याकडे सल्ला मागायला आलेल्या पेशंटसाठी त्याच्या दुखण्यावर कोणती उपचार पद्धती उपयोगाची असेल आणि त्यातले तज्ञ डॉक्टर कोण आहेत, यांची खात्रीशीर माहिती त्यांच्याकडून मिळू शकते.

आत्ममग्न,
मला माहीत नाही.
बहुदा डिप्लोमा इन मेडीसीन अँड सर्जरी अशी फेक डिग्री असावी.

मागे डी ई एम एस कॉलेजे फार निघाली होती. डिप्लोमा इन इलेक्ट्रोपथिक मेडीसीन अँड सर्जरी म्हणे.
सरकारने बॅन केलं तर मुलं बिचारी उपोषणाला बसली होती.
असो.

इथे सार्वजनिक फोरमवर संबंधितांची नावे उघड करणे योग्य की अयोग्य याबाबत मला खात्री नाही.

डी ई एम एस कॉलेजे फार निघाली होती. डिप्लोमा इन इलेक्ट्रोपथिक मेडीसीन अँड सर्जरी >>> येईच नाम मेरे दिमागमे १ घन्टा पैले आया था. लेकीन बाहर जानेके चक्कर मे लिखना रह गया.:स्मित:

माझ्या मुलाला लहानपणी वारंवार शौचाचा त्रास व्हायचा.एकदा असाच त्रास सुरु असताना फॅ.डाँचा गुण येईना म्हणून त्यांना न विचारता (खरंतर वैतागून) प्रथितयश चाईल्ड स्पेशॅलिस्टकडे गेले.त्यांनी बरीच औषधे लिहून दिली होती.२ वर्षांच्या मुलाला लोमोटिल लिहून दिले होते.मुलाला तपासताना घुरघुर आवाज येतो म्हणून बेट्नेसोल(जे अस्थमावर देतात) हे स्टिरॉईड दिले.आणि झोप येत नाही म्हणून अहून एक औषध दिले होते,जे १-२ वेळाच दिले गेले.
लोमोटिलच्या स्ट्रिपपाठी लहान मुलांना देऊ नये म्हणून छापलेलेही असते.ते वाचून माझ्या आईने, चाईल्ड स्पेशॅलिस्टला फोन केला की असं असं आहे तर हे द्यायचे की नाही. त्यावर ते म्हणाले की डॉक्टर मी आहे की तुम्ही?

५ दिवस बेटनेसोल दिल्यावर मुलाला राक्षसी भूक लागायची. अनैसर्गिकपणे तो खात असायचा.माझा एक होमियोपॅथी शिकणार्‍या कझीनने ते पाहिल्यावर त्याने सांगितले की ते औषध बंद करा.ते स्टिरॉईड आहे.त्यामुळे त्याला भूक लागतेय.
माझ्या मुलाला दम्याचा प्रॉब्लेम नव्हता.
बरं हे डॉक्टर अतिशय नावाजलेले होते.नक्की आठवत नाही,पण केईएमला मानद चा.स्पे. खूऊऊप वर्षांपूर्वी होते.
नंतरहे आमच्या फॅ.डाँना सांगितलं तर त्यांनी आमचे कान उपटलेच. तुम्हांला त्यांच्याकडे जायचं होत तजायच्,पण मला सांगून जायला हव होते.कारण एक पेशंट म्हणून त्याची हिस्ट्री मी त्यांना दिली असती.लोमोटिल द्यायची होती तर मी देऊ शकलो नसतो का? आणि म्हणाले ज्या काही डॉक्टरांबद्दल मला आदर होता त्यापैकी हे होते.पण आता आदर नाही वाटत.

आता त्यांची डिग्री पण पाहिली होती त्यांच्या औषधाबद्दल शंका आली तीही विचारली.बरेच वर्‍शे ते प्रिस्क्रिप्शन जपून ठेवले होते.कुठे दाद मागायची माहित नव्हते.या घटनेनंतर डॉनी दिलेले कुठलेही औषध देताना केमिस्टला विचारायची प्रथा ठेवली की बाबा,यात स्टिरॉईड नाही ना?

आँ .... पाय कसा मोडला ?

सहा आसनी रिक्षातुन जाताना समोरुन कुत्रं आल्याने ड्रायवरने बिरिक दाबला व गाडी पलटली.

मी व ड्रायवर दोघेही दारु प्यालेलो नव्हतो.

कुत्र्याबाबत म्हाईत नाही.

अन कुत्र्याबद्दल वैट बोलु नये.

कुत्रे दत्तगुरुंचे लाडके असते म्हणे.

Proud

साती,
धन्यवाद.. हा पॅथींचा घोळ खरेच सामान्य माणसाच्या माहितीबाहेरचा आहे. खरं तर समान दिसणार्‍या ( म्हणजे सारख्याच अक्षरांच्या ) पदव्या असू नयेत असे माझे मत आहे.

श्रेयस क्लिनिक Aundh पुणे येथील gynaecologist Dr. Shah यांचा अतिशय वाईट अनुभव. बाई सिनिअर आहेत म्हणुन विश्वासाने जात होतो. तिसर्या महिन्यापासुनच बाईंनी घाबरवले की बाळ खुप छोटे आहे. हवी तशी वाढ नाही. ईंजेक्शन्स देवु लागल्या. (नंतर कळले की ती steroids होती आणि त्याचे दुष्ह्परिणाम होवु शकतात. but it was not made known to us)महिन्यातुन दोनदा ईंजेक्शन्स घेतली. सहाव्या महिन्यात सांगितले की बाळ उलटे आहे, सिझेरिअन्ची तयारी ठेवा. अनेक अल्ट्रासाउंड्स, टेस्ट्स करवुन घेतल्या. नशीब की ईतरांचे सल्ले पाहुन doctor बदलला मी आठ्व्या महिन्यात. काही complications झाल्या नाहीत. बाळ छोटे, उलटे असे काही झाले नाही. त्याला एक्झिमा, food allergies, बालदमा मात्र झाला. These could be injections' side effects.

Dr. नीता उपासनी (gynaecologist) , डोंबिवली या तर अतिशय खोटारड्या आहेत. पैसे कमावण्यासाठी वाटेल ते सांगतात. माझी बहिण pregnancy कन्फर्म करायला गेली तर म्हणे, conceive झाले आहे पण ९९% miscarriage होईल असे वाटत आहे. बहिण चक्कर येवुन पडली. घाई घाईने ६०००/- चे ईंजेक्शन मागविले. दर आठवड्याला दोन अशी ईंजेक्शन्स दोन महिने दिली. खरे खोटे देव जाणे but later , many shared same experiences about her. पहिल्यांदाच गरोदर असताना आपण Dr. चे काहिही मानतो. कुठ्लीही ईण्जेक्शन्स, गोळ्या घेतो. आणि Dr. ह्याचा फायदा घेतो. चेकअप म्हणजे गरोदर महिलेला घाबरवणे नव्हे. आधीच hormones, emotions haywire असतात आणि त्यात हे अचाट Dr. चे अचाट तर्क.

<<अन कुत्र्याबद्दल वैट बोलु नये.

कुत्रे दत्तगुरुंचे लाडके असते म्हणे.>>
------- दत्तगुरुन्ना तुमच्या कडुन चान्गले काम करवुन घ्यायचे होते, तुमच्या जुन्या (बिछड्या) मित्रान्ना भेटवायचे होते आणि मुख्य महणजे मायबोलीवर ज्वलन्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी समाजोपयोगी काही धागे काढायचे होते.... कुत्रे मधे येणे हे केवळ निमीत्त होते. असो. आज आनन्दात आहात आणि इथे हजेरी लावुन आम्हाला ज्ञानामृत पाजत आहात हेच आमच्यासाठी महत्वाचे. Happy

अनेक DHMS, किव्वा BAMS हे नावापुढे डॉक्टर लिहीतात. DHMS 'डिप्लोमा' किव्वा बॅचलर अशी डिग्री आहे मग असे डॉ नियमात बसते का? तसे करणे योग्य आहे का?

मला (आणि नात्या मधे, मित्रान्मधे सर्वान्ना) अ‍ॅलोपॅथीचे सर्व चान्गलेच अनुभव आहेत. तक्रार करावी असे कडवट काहीच नाही. पण होमिओपॅथी, आयुर्वेद, दारावर येणार वैदू यान्नी भयानक त्रास दिलेला आहे. एका कुडमुड्या वैदूने तर पिडीताचा (माझा नाही !) मोठा विश्वास सम्पादन केला होता... काय गोळ्या द्यायचा हे माहित नाही, लेबल नाही, पिडीत व्यक्ती पिडाने बेजार होती म्हणुन खुप खोल विचार करण्याच्या परिस्थितीतही नव्हती.

अगदी असाच होमिओपॅथीचा पण अनुभव... औषधात काय आहे हे सान्गत नाही, कन्टेन्ट सान्गत नव्हता, लेबल नाही... मी लेबल नसलेले, कन्टेन्ट माहित नसलेले औषध देण्यास विरोध दर्शवला. आणि शेवटी अ‍ॅलोपॅथीचा खात्रीशिर मार्ग निवडला.... माझ्या अ‍ॅलोपॅथी प्रामाणिक सुपर डॉ. मित्राने छान पैकी मुद्दा समजावला, हतबलता वैद्यकीय मर्यादा सान्गितल्या... आणि जे आहे ते आनन्दाने स्विकारायचे मानवी आवाहन केले. त्या अ‍ॅलोपॅथी डॉ. ला पण निरुपयोगी औषधे देत, खोट्या आशेवर पैशाचा ओघ सुरु ठेवता आला असता... पण वैद्यकीय व्यावसायाशी नाते (professional integrity) नाते असते ते तो निभवत होता.

दुसरा माझा एक सर्जन मित्र पेशन्ट गरिब आहे म्हणुन पैशासाठी परत पाठवत नाही. जसे बजेट असेल तसे काम चालवतो.... पुढे श्रीमन्त बकरा आल्यावर हिशोब बरोबर होतो.

लिंबूटिंबू
वडाची साल पिंपळाला. विश्वास त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या,कायद्याने परवानगी असलेल्या, ज्याला मी पाहू शकतो. स्पर्श करू शकतो अशा माणसावर मी टाकतो. तुम्हाला हवे असेल तर न दिसणा-या , स्पर्श न करता येणा-या, गंधहीन, आकारहीन अशा सर्वशक्तिमान अस्तित्त्वावर विश्वास टाकून गंभीर आजारपणात तिथेच अ‍ॅडमीट व्हा, कांही म्हणणं नसेल माझं. यापुढे जाऊन मी म्हणेन की रस्त्यात गाडी खराब झाली तरी गॅरेजमधे न जाता त्याच शक्तीचं नामस्मरण करावं. गाडी चालू होईल...

अवांतराबद्दल क्षमस्व !

पुढे श्रीमन्त बकरा आल्यावर हिशोब बरोबर होतो. >> उद्य...इकडे सगळे ते श्रीमन्त बकरेच आले आहेत... Wink

सर्जनला मदतच करायची आहे तर स्वतःच्या खिसातून करावी किंवा दानशूर ट्र्स्टमध्ये जाऊन प्रॅक्टीश करावी..
इतर श्रीमन्त रुग्णाच्या पैसावर डोळा कशाला?

दत्तगुरुन्ना तुमच्या कडुन चान्गले काम करवुन घ्यायचे होते, तुमच्या जुन्या (बिछड्या) मित्रान्ना भेटवायचे होते आणि मुख्य महणजे मायबोलीवर ज्वलन्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी समाजोपयोगी काही धागे काढायचे होते.... कुत्रे मधे येणे हे केवळ निमीत्त होते. असो. आज आनन्दात आहात आणि इथे हजेरी लावुन आम्हाला ज्ञानामृत पाजत आहात हेच आमच्यासाठी महत्वाचे. >>>>>उदय Happy

@राया, साधारण असाच अनुभव माझ्या बहिणीचा. ती गुजरात मधे वापी ला असते. प्रेगनंसीच्या वेळेत ७व्या महिन्यात जरासं पोटात दुखत होतं तर सोनो. करून तिच्या गायनीने सांगीतलं अ‍ॅडमीट व्हा, प्रीमॅचुअर करावे लागेल.
माझ्या आईने ताबडतोब तिला मुंबईला बोलवून विलेपार्ले डॉ. वाघ कडे नेलं. त्या म्हणाल्या काही झालेलं नाही, गॅस झालाय, काय खाल्लं होतंस तर ती म्हंटली चणे Wink
माझी हे सर्व ऐकून प्रचंड चिडचीड झाली, मनस्ताप झाला. त्या वापीच्या डॉ बद्दल तक्रार करायची असे मी तिला म्हटले, पण कुठे करावी वगैरे काहिच माहित नसल्याने काहिच करता आले नाही Angry

आशू२९, बापरे, भयंकरच अनुभव. डॉ. अंजली वाघ खूप प्रसिद्ध आहेत पार्ल्यात आणि फक्त चांगलंच ऐकलंय त्यांच्याबद्दल.

या घटनेनंतर डॉनी दिलेले कुठलेही औषध देताना केमिस्टला विचारायची प्रथा ठेवली की बाबा,यात स्टिरॉईड नाही ना? >>> केमिस्टने स्टिरॉईड आहे असे सांगितले तर ते औषध देणार नाही का ? काही काही आजारांत स्टिरॉईड देणे अत्यावश्यक असते.
त्यापेक्षा डॉक्टरांनाच विचारुन घ्यावे की प्रत्येक औषध कशासाठी दिले आहे, स्टिरॉईड आहे का इत्यादी. डॉक्टर नीट उत्तरं देत नसतील किंवा भरमसाठ औषधे गरज नसताना देत आहेत असे वाटले तर डॉक्टर बदलावा पण केमिस्टला विचारण्याचे अजिबातच पटले नाही.

>>>> "विश्वास त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या,कायद्याने परवानगी असलेल्या, ज्याला मी पाहू शकतो. स्पर्श करू शकतो अशा माणसावर मी टाकतो.<<<<<
माफ करा कापोचे साहेब, पण तुम्ही कुणावर (सोम्यागोम्यावर की दगडावर) विश्वास टाकताय हा प्रश्नच नसुन, तुम्ही असा जो काही "विश्वास" नामक न बघितलेला वस्तु नसलेला प्रकार टाकताय, तसे ते टाकणे हीच अंधश्रद्धा आहे, मानसिक दुर्बलता आहे, निव्वळ भावनिकरित्या भ्रामक आधाराची वगैरे गरज आहे (इति अन्निस तत्वज्ञान) , अन अर्थातच जेव्हा असा अंधश्रद्ध विश्वास तुम्ही डॉक्टर/वकील वगैरे वर टाकता तेव्हा तो देखिल त्याच्या व्यवसायातील बुवाबाजीचे अनेकानेक फंडे वापरीत तुम्हाला टोप्या घालतोच.:) Wink लुबाडतोच......
पण अर्थातच, हे मुद्दे अन्निस/बुप्रा वाद्यांच्या गावीही नसतात... त्यांचे आपले एकच तुणतुणे असते....असो.

अवांतराबद्दल क्षमस्व ! तुम्ही आपले माबोवरचे "जवळचे" वाटता... (असे वाटणे ही देखिल अंधश्रद्धाच Proud ) म्हणून तुमच्या काळजीपोटीच सांगितले हो... Happy

काही काही आजारांत स्टिरॉईड देणे अत्यावश्यक असते.>>>>>> लूज मोशनमधे बेटनेसॉल देत नाहीत.ते अस्थम्यावर देतात.माझ्या मुलाला अस्थमा नव्हता/नाही.त्या डाँनी दिले होते.पहिल्यांदा मूल आपल्याकडे आल्यानंतर असे गरज नसताना स्टिरॉईड देण्याचे टाळले गेले पाहिजे.त्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन माझ्याजवळ असते तर त्यांच्या नावासकट मी इथे लिहिलं असते.
काही आजारात स्टिरॉईड देतात हेही मान्य.त्याचबरोबर डॉ.त्याची कल्पना देतात. कॅल्शियमही प्रिफर करतात.

त्यापेक्षा डॉक्टरांनाच विचारुन घ्यावे की प्रत्येक औषध कशासाठी दिले आहे, स्टिरॉईड आहे का इत्यादी.>>>>>> वरच्या घटनेनंतर ताक फुंकून प्यायल्यासारखी स्थिती झाली.कुठल्याही डॉ.ने सांगितलेल्या औषधावर विश्वास बसेनासा झाला.त्यांना तर विचारायची पण दुजोरा म्हणून केमिस्टला विचारायची इतकंच.

त्यापेक्षा डॉक्टरांनाच विचारुन घ्यावे की प्रत्येक औषध कशासाठी दिले आहे, स्टिरॉईड आहे का इत्यादी>>
अहो बरेचसे डॉक सेम उत्तर देतात,
'ते ह्या आजारावरचच औषध आहे',
'तुम्हाला बरं व्हायचय ना, मग ते घ्या'
'डॉक तुम्ही आहे की मी'..
एक चिंचवड चे खुप नावाजलेले कार्डियो, सगळ्या पेशंटला अरे तुरे करतात, आता त्यांच्या पेक्षा लहान असले तर ठिके पण चक्क म्हातार्‍या लोकांना देखिल असच बोलतात ते. 'ये बस इथे, चेक करतो वगैरे'. एव्हढा महत्वाचा मुद्दा नाही पण आपल्यासमोर आइ वडिलांना अरे तुरे एकवत नाही..

देव़की, समहाउ, तुमच्या अनुभवातील बेटानेसॉल (स्टेरॉईड/.?) बाबतच्या आक्षेपाबद्दल शंका निर्माण होत्ये कारण, अनुभवाप्रमाणे, जर एक/दोन वर्षाच्या बालकांच्य छातीत कफ भरुन घुरघुर आवाज येत असेल, तर नजिकच्या काळात आत्यंतिक अनवस्था प्रसंग ओढविण्ञाची शक्यता असते व वेळेस बाळास चक्क ऑक्सिजन लावणे वगैरेही करावे लागते (भले त्यास अस्थमा असो वा नसो). हल्लीचे प्रदुषण व अन्य अनेक कारणांमुळे हल्लीच अशी आजारपणे सार्वत्रिकरित्या उद्भवलेली दिसतात. तेव्हा त्या डॉक्टारांनी प्रिकॉशन म्हणून जर ते दिले असेल, तर त्यात नेमके गैर काय, ते मलाही तज्ञ डॉक्टर्सना विचारुन खात्री करुन घ्यावि लागेल, त्याशिवाय आक्षेप घेता येणार नाही, व "लहान मुलांना स्टेरॉइंड्स देत नाहीत" या मोघम ऐकिव माहितीवर मत बनविता येत नाहीये. कारण "स्टेरॉइड्स" मधेही एंड रिझल्ट नुसार अनेक प्रकार असू शकतात, ज्यातील काही उपद्रवी तर काही निरुपद्रवी/उपयुक्त असू शकतात. ते निश्चित माहिति असल्याखेरीज निव्वळ "स्टेरॉईड्स' या शब्दाने घाब्रण्यात अर्थ नाही.

(आम्ही अस्थम्याकरता जे इनहेलर वापरतो, ते "स्टॅरॉइड्सयुक्तच" असतात व मोठ्या व्यक्तिसही दीर्घ काल वापरल्याने अगदी मोठ्या माणसावरही दु:ष्परिणाम होऊ शकतात हे सत्य आहे , पण तसे सांगितले जात नाही.)

सहा आसनी रिक्षातुन जाताना समोरुन कुत्रं आल्याने ड्रायवरने बिरिक दाबला व गाडी पलटली.

मी व ड्रायवर दोघेही दारु प्यालेलो नव्हतो.>>>
अहो नासुर भाइ, त्या सहा आसनी रिक्षाने दारु प्यायली असेल, नाहितर १० किमी प्रती तास ह्या वेगाने धूर ओकत पळणारं ते धुड पल्टी होणं अवघड आहे.. Light 1
रच्याकने धनगराऐवजी 'हकिमी' औषध का नाही घेतलं? की त्यावेळी "दिक्षा" घेतली नव्हती

Pages