डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जग मेडिकल असिस्टेड डाइंग, त्याचे नियम, काय हवं काय नको, मायनरना द्यावं का, इन्शुरन्स कंपन्या क्लेम कसा प्रोसेस करतील, डेथ सर्टीफिकेटवर नक्की काय उल्लेख करायचा, त्याचे मागे राहणाऱ्याला काय परिणाम दुष्परिणाम होऊ शकतील, डाइंग टुरिझम झालं तर काय इतका बारकाईने अभ्यास/ चर्चा करतंय. हे आपल्याकडे आलं तर कसा गोंधळ होईल ही भीती घालून भारतीय लोकांना कधी मिळेल कोण जाणे Sad

वाईट असा नाही पण एक मजेशीर अनुभव...

दीनानाथला डोळ्यांचे नेहमीचे चेकअप केले. डोळ्याच्या कांही स्नायुंवर ताण येतो आहे म्हणून डॉक्टरांनी आय ड्रॉप दिले. ते नेमके तिथल्या मेडीकलमध्ये मिळाले नाहीत आणि बाहेरच्या मेडीकलवाल्याला ते 'सुवाच्च-सुद्धलेखन' वाचता येईना

"ऑप्टी - - " असे नांव असलेली तीन चार औषधे त्या बाबाने समोर ठेवली आणि हवी ती घ्या असे सांगीतले. कंटेंट बहुतांश सारखा होता. पण मला डॉक्टरांनीच दिलेले औषध हवे होते.

मग दुसर्‍या दिवशी दीनानाथला फोनवून "प्रिस्क्रिप्शन वाचा" असे तिथल्या सेक्रेटरी मुलीला सांगीतले व औषधाचे नांव कन्फर्म झाले.

...तर डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहिताना कॅपीटलमध्ये लिहा असा आग्रह करू शकतो का? का उगाच त्यांचे इगो हर्ट होतील?

>>>>> साती वगळता, इतर सर्व डॉक्टरी पेशाशी निगडीत असलेले लोक, सर्व आरोप स्वतःवर केले जातायत अश्या प्रकारे का प्रतिक्रिया देतायत? <<<<< अगदी अगदी...... आता ते अन्निसबुप्राकम्युनिस्ट ज्योतिषांवर/हिंदुधर्मशास्त्रावर निरर्गल आचरट अडाणी टीका करीत असतात, काही ज्योतिषी "दुकान थाटून" बसलेले असतातही.... पण त्यांच्यावरची टीका आम्ही नै बोवा वैयक्तिकरित्या अंगावर घेत.....

>>>>> पण परत, माणसाला जास्त किंमत न देणे, ही आपल्याकडची बर्‍यापैकी कॉमन गोष्ट आहे. <<<<<
मो, हेच सत्य आहे... बाकी सर्व माया... अहो इकडे माणसाच्या खिशात पैका किती आहे, व त्यातिल आपल्याला किति उकळता येणार आहे, यावरुन त्या त्या माणसाला दिल्या जाणार्‍या सर्व्हिसमधे फरक पडत जातो. पण कधीही "माणूस" म्हणून समोरचे सामोरे येतिल याची सूतराम शक्यता नाही. अन याकरता डॉक्टार्सकडे कशाला जायला पाहिजे? भारतातल्या पुण्यामुंबैतल्या खेडेगावातल्या कोणत्याही रस्त्यांवर तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो की तुम्ही जर सायकल/टू व्हिलर वगैरे वर असाल तर तुमच्यावर गाडी घालुन्/कट मारुन तुम्हाला बाजुला चेपले जाते, भले ते होताना जरा चूक झाली तर तुमचाअ जीव जाईल... पण तु म्हाला माणुस म्हणुन किंमत नसतेच ना....... मी तर चारचाकी चालवितानाही हा अनुभव घेतला आहे माजोरड्या एस्स्युव्ही/टुरिस्ट बस /लोकल ट्रक वाल्यांकडून. अगदी माणसाला माणुस म्हणून काडीचीही किंमत नसलेल्या "कम्युनिस्ट " राजवटीतच जगल्यासारखे वाटते. असो.
विषयांतर नको.

Vel, ur post is terrible and extremely insensitive. Probably some1 closer to u is doctor. That's why u r defending in wrong way.
Kamwalya Bai che anubhav vaait ale tarihi kalavalanare apan. Dr nee chuka kelya tar matra defend karanar.
Introspect.

वेल एकदम एकांगी पोस्ट....

नंदिनी +१

इकडे डॉ ना माणुस म्हणुन अनेक चुका माफ करुन झाल्या आहेत. पण हे प्रोफेशनच असे आहे की त्यात काही प्रोटोकॉल बाळगणे गरजेचे आहे. डॉ माणुस आहे, त्याला घरदार आहे, पर्सनल लाईफ आहे. पण तरीही त्याचं प्रोफेशन असं आहे की त्याने जाणुन बुजुन ते निवडलं आहे.

आमचे एक नातेवाईक डॉ आहेत. ते खुप चांगले पिडियाट्रीशीयन आहेत. त्यांच्या बायकोला कायम त्यांना येणार्‍या अर्जंट कॉल्स चा राग यायचा. अनेकदा त्यांना समारंभ, कार्येक्रम, नाटक सोडुन जायला लागायचे. एकदा नाटक बघायला गेलो असताना अचानक नाट्यग्रुहा चा स्टाफ त्यांना निरोप द्यायला आला. ( त्या वेळेस मोबाईल नव्हते). ते कुठे जात आहेत हे कायम हॉस्पिटल ला माहित असायचे. बायको मात्र उत्तरोत्तर नाराज होत गेली. शेवटी शेवटी ते अगदी एकटे पडले. कारण मुलं परदेशात. बायको आपल्या व्यापात. हे व्रुद्ध झाल्याने प्रॅक्टीस ही कमी. त्यामुळे बिचारे एकटेच बसलेले दिसायचे. डॉ असण्याची मोठ्ठी किंमत देवुन बसले. आर्थात ते डॉ म्हणुन अतिषय लोकप्रिय होते. पण घरातले त्यांच्या कमिटमेंट ला समजुन नाही घेवु शकले.

मी एकदा एका मोठ्ठ्या डॉ च्या दवाखान्यात त्यांच्याशी माझ्या सीरीयस आजारा बद्दल बोलत असताना, डॉ ना फोन आला. कुठ्ल्या तरी मेडिकल काउंसील च्या इलेक्शन बद्दल होता. डॉ बहुतेक उमेदवार असावेत. जवळ जवळ आर्धा तास बोलुन मग त्यांनी माझ्या कडे पाहिले. नीदान उत्क्रुष्ट. पण अहंभाव. सॉरी सुध्धा म्हणाले नाहीत.

त्या पेक्षा मला आमचे कार्डिओलॉजिस्ट चा अनुभव आला. आम्हाला तपासताना त्यांना चंद्राबाबु नायडुच्या सेक्रेटरीचा फोन आला. ( ते हैद्राबाद चे आहेत. चंबा त्यांच्याच कडुन ट्रीट्मेंट घेतात)माझ्या परवानगीने त्यांनी तो घेवुन. परत कॉल करतो १० मिनीटानी असे सांगितले. आम्हाला पुरेसा वेळ देवुन मग मात्र पुढचा पेशंट घेतला नाही. आधी चंबा च्या सेक्रेटरीशी बोलले. मग पुढचा पेशंट घेतला. मला आवडलं ते. मला रीस्पेक्ट दिला, दुसर्‍यालाही दिला. केंव्हाही मेसेज किंवा व्हॉट्सप केलं तर उत्तर येतच येत..... ऑपरेशन मधे असतिल तर उशीरा... पण उत्तर येतच. ऑपरेशन करताना खोल आवाजातले म्युझिक लावलेले असते. एकदम मंद. बहुदा इंस्त्रुमेंटल क्लासिकल. पण कोणाला डिस्टर्ब होणार नाही असे.

माझ्या सिझेरीअन च्या वेळेसही डॉ ललिता देवधरांनी आधी माझ्याशी छान गप्पा मारुन मला कंफर्टेबल केलं. तेंव्हाही मंद सुरावट ऐकु येत होती. अनस्थेशिया असल्याने नंतर कळले नाही. पण जाग आली तेंव्हा "मोगरा फुलला" हे गाणं मंद पणे ऐकु येत होते. त्यामुळे मुलीच्या जन्माशी त्या गाण्याची सांगड मन नेहेमी घालतं.

डॉ ना सुध्धा रीलॅक्स व्हायचा अधिकार आहे, पण ते होताना इतरांवर अन्याय तर करत नाही ना.. ह्याचे भान ठेवणे गरजेचे. साबुंचे ब्रेन स्पेशालिस्ट, १५ पेशंट तपासले की त्यांच्या स्टडी मधे जाऊन १५ मिनीटे रीलॅक्स होतात. गीणी, टी.व्ही. ह्या पैकी काहीतरी पहातात. मग परत येतात. ओ.पीडी चालु करताना जे नंबर देतात तेच मुळी ५ व्या नंबर पासुन सुरु करतात. म्हणजे पहिले ४ नंबर इमर्जन्सी वाल्यांचे..... अधे मधे इमर्जन्सी आली तर धावत येतात. पण ठरावीक वेळाने ब्रेक घेतातच!!! हे ही मला आवडले. त्यामुळे ते ही फ्रेश होतात. पेशंटही खुश कारण क्वालीटी टाईम त्याला मिळतो.

सारखी वचवच करुन सगळ्यावर बोळा फिरवण्या पेक्षा हे बरे. परत ज्यांना झेपत नाही त्यांनी नॉन इमर्जन्सी लाइन्स घ्याव्यात. आमच्या डॉ मित्राच्या मुलाला त्याचा स्वभाव बघता त्याने ऑप्थॉल्मोलॉजी सुचवली. तो म्हणाला की त्यातल्यात्यात कमी इमर्जन्सी ची लाईन. इथली ऑपरेशन्स प्लॅन्ड असतात. अगदीच कुठली अ‍ॅक्सीडेंट ची केस आली तरच.... नाहीतर फारशी लगबग नाही.

उडदा माजी काळे गोरे असे म्हंटले तरीही इकडे दुसर्‍याच्या जीवाशी पंगा आहे.

काय प्रॉब्लेम आहे? इगो? की आणखी काही? मधल्यामधे पेशंट आणि नातेवाईक ह्यांची होलपट चाललेली.>>> आम्ही अनुभवली आहे ही होलपट.
दादर माहिम परीसरातील अत्यंत अनुभवी, नावाजलेले, माहीर, अत्यंत यशस्वी, दूर दक्षिणेत समाजसेवा करणारे असे डायबेटॉलॉजिस्ट आणि कुशल सर्जन डॉ. बाळ अत्यंत इगोइस्टीक आणि भावनाशून्य माणूस आहेत.

ओके आता वेळ मिळाला. फोनवरून लिहित आहे त्यामुळे मध्ये मध्ये ईंग्रजी असेल... (सॉरी)

इतके प्रतिसाद वाचून दोन प्रश्ण विचारावेसे वाटले,
हा काय फालतुपणा आहे, की सर्टिफिकेट चेक करा वगैरे, गूगल करा आणि माहिती मिळवा मगच जा त्या डॉक कडे? इथे पेशंट जगणार का मरणार माहित नाही. कुठे इतका वेळ असतो? आणि डॉ स्वतः प्रामाणिक नाहिय म्हणूनच हा धागा आहे ना?
ह्या धाग्यचं नावच जर 'आपले डॉकमुळे आलेले वाईट अनुभव असताना' तेच का लिहितात म्हणून का विचारताहेत काही आयडी?

दुसरे म्हणजे,

If Dr can have nasty patients and has to face nasty relatives(in Dr's opinion) of the patient, then why cant a patient or their relative can also have nasty experience/s of the Dr?

why is it so hard to "accept" that there are malpractices in this field as well.
why some doctors are in constant defensive mode?

and why should be the patient and his relative made responsible when the patient is admitted in the hospital?
Being alert is a different thing but making sure if nurses or doctors are doing their job properly or not is not patient's responsibility.
Relatives can take additional effort of understanding the mode of treatment or medicines, so once (the patient) discharged, it is good for the patient and his relative. patient and his relative's responsibility starts at home and at the time of doctor's visit where he needs to provide all required info for diagnosis.

google is not reliable source in my opinion. every time one can not go search medical terms, medicine information and validate what doctor is doing.
We faced bad experience/s where in we lost our relative/s. So whatever is said (in my post) is/are true experience/s.

(back home... will write more. Happy

इंजीनियरिंग किंवा मॅनेजमेंटच्या हजारो जागा रिक्त अशी बातमी असते पण MBBS च्या जागा रिक्त अशी बातमी वाचली नाहीये. म्हणजे डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी परिस्थिती आहे का? In short, do we have enough doctors?
आता ageing population नुसार डॉक्टरांची गरज वाढत जाणार आहे.
यात मग government - private sector tie up करता येईल का? Foreign universities ना यात रस असेल का? काही क्रिटिकल बाबतीत सरकारचे नियंत्रण असावे जसे की मेरिट बेस्ड प्रवेश प्रक्रिया, justified fees, transparent assessment, quality teaching.
मला अशी अनेक मुलं मुली माहीत आहेत ज्याना डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती. सिन्सियर, मेहनती, 90 टक्के किंवा अधिक गुण मिळवलेली ही मुलं सीट्स कमी असल्यामुळे डॉक्टर होऊ शकली नाहीत. मग कोणी नाईलाजाने होमिओपथी आयुर्वेद डेंटिस्ट कोणी pharmacy कोणी बीएससी कोणी सॉफ्टवेअर कोर्सेस केलं. All of them could have been good MBBS-MS-MD doctors.
जर डॉक्टर्सची संख्या वाढ़वता आली तर दोन फायदे होतील. मदत करायची इच्छा असूनही वर्कलोडमुळे मदत करू न शकणारया डॉक्टर्सचा भार हलका होईल. आणि 'आपल्याला पर्याय नाही' म्हणून गुर्मीत वावरणाऱ्या डॉक्टर्सना समर्थ पर्याय उभा राहील.

तुम्हाला अप्रामाणिक डॉ भेटला असेल तर तुमच्यात एवढा स्मार्टनेस आणि डोळसपणा हवा की तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि योग्य वेळी तुम्ही डॉ बदलला पाहिजे. जगात चोर कोणत्या ना कोणत्या वेशात भेटतातच, ते समजायची जबाबदारी स्वतःची असते. तुम्ही असे म्हणूच शकत नाही की तू डॉ आहेस ना मग चोर्‍या का करतोस आमच्या खिशातून, किंवा तुझी चोराची विचारसरणी आहे ना मग तुला डॉ होण्याचा अधिकार कोणी दिला? (तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीत अगदी शंभर टक्के प्रामाणिक आहात का?)

हात जोडले वेल तुला.....

माननीय सुप्रीम कोर्टा ची खालील टिप्पणी वाचा.. M/S. SPRING MEADOWS HOSPITAL & ANR Vs.
HARJOL AHLUWALIA THROUGH, K.S. AHLUWALIA & ANR केसमधली

In the case in hand we are dealing with a problem which centres round the medical ethics and as such it may be appropriate to notice the broad responsibilities of such organisations who in the garb of doing service to the humanity have continued commercial activities and have been mercilessly extracting money from helpless patients and their family members and yet do not provide the necessary services. The influence exhorted by a doctor is unique. The relationship between the doctor and the patient is not always equally balanced. The attitude of a patient is poised between trust in the learning of another and the general distress of one who is in a state of uncertainty and such ambivalence naturally leads t a sense of inferiority and it is, therefore, the function medical ethics to ensure that the superiority of the doctor is not abused in any manner. It is a great mistake to think that doctors and hospitals are easy targets for the dissatisfied patient. it is indeed very difficult to raise an action of negligence. Not only there are practical difficulties in linking the injury sustained with the medical treatment but also it is still more difficult to establish the standard of care in medical negligence of which a complaint can be made. All these factors together with the sheer expense of bringing a legal action and the denial of legal aid to all but the poorest operate to limit medical litigation in this country. With the emergence of the Consumer Protection Act no doubt in some cases patients have been able to establish the negligence of the doctors rendering service and in taking compensation thereof but the same is very few in number. In recent days there has been increasing pressure on hospital facilities, falling standard of professional competence and in addition to all, the ever increasing complexity of therapeutic and diagnostic methods and all this together are responsible for the medical negligence. That apart there has been a growing awareness in the public mind to bring the negligence of such professional doctors to light. Very often in a claim for compensation arising out of medical negligence a plea is taken that it is a case of bona fide mistake which under certain circumstances may be excusable, but a mistake which would tantamount to negligence cannot be pardoned. In the former case a court can accept that ordinary human fallibility precludes the liability while in the latter the conduct of the defendant is considered to have gone beyond the bounds of what is expected of the reasonably skill of a competent doctor.

(Emphasis supplied)

मला भारतापेक्षा सिंगापुरमधे जास्त वाईट अनुभव आले आहेत. उलट भारतात मला पुणे फार काही माहिती नाही. तरीसुद्धा मला दिनानाथ मंगेशकर हॉ सगळ्या सुखसोयी आढळल्यात. जी गोष्ट करायला सिंगापुरमधे मला महिना दोन महिने लागले असते ती गोष्ट पुण्यात जाऊन एका दिवसात करता आली. आपल्या भारतात अनेक चांगले डॉक्टर आहेत. स्वस्त दरात चांगल्या सेवा उपलब्द्ध आहेत. फक्त एकच की खूप स्वच्छता नसते दवाखान्यात पण अगदीच घाण असतात दवाखाने असेही नाही.

सिंगापुरमधे तर तुम्हाला काय झाले असे सांगितले तर संगणकावर अमुक लक्षणासाठी कुठली गोळी हे शोधून काढतात आणि मग ती गोळी तुम्हाला देतात. भारतात डॉ लोक त्यांच्या अनुभवानुसार आपले निदान करतात. काही काही डॉक्टर तर फक्त दोन शब्द बोलून लगेच तुमचे योग्य ते निदान करतात.

फक्त एकच की अटीतटीची वेळ आली की जर चुकीचा दवाखाना जर आपण पकडला असेल तर आपले त्यात नुकसान होते. मात्र जर वेळ हाताशी असेल तर थोडे संशोधन करुन चांगला डॉ निवडता येतो.

मी ईंडोनेशियामधे आजारी पडलो तेंव्हा तिथल्या स्थानिक मेडीकलच्या दुकानात गेलो. तिथे इतकी छान पद्धत आहे ना की जर तुमच्याकडे प्रीस्क्रिप्शन नसेल तर प्रत्येक मेडीकलमधे एक डॉक्टर नेमलेला असतो. तो तुम्हाला गाईड करतो.

<<संपादित>>
पोस्ट लिहिल्यानंतर वाटले, की खूपच खाजगी आहे. तसेही काही निसटून गेल्यावर , त्यावर चर्चा करणे म्हणजे त्रासदायक आहे तो दु:खाचा एक कोपरा खणायचा कशाला.

कपोचे - डॉक्टर सोमणांबद्दल चा तुमचा अनुभव चुकीचा आहे. माझ्या बहीणीवर ३० वर्षापूर्वी त्यांनी हार्मोन ट्रीटमेंट केली होती. आणि ती यशस्वी पण झाली होती.

एखादा डॉक्टर कमीतकमी ३० वर्ष क्वालिफिकेशन नसताना लक्ष्मीरोड वर मोठे क्लिनिक चालवत असेल हे पटत नाही.

तुम्हाला फायदा झाला नाही हे दुर्दैव. रिसेप्षनिस्ट चा पगार थकला असेल म्हणुन ती सूड उगवत असेल.

माझ्या बहीणीवर ३० वर्षापूर्वी त्यांनी हार्मोन ट्रीटमेंट केली होती. आणि ती यशस्वी पण झाली होती. >>> त्याबद्दल काही कल्पना नाही. झालीही असेल यशस्वी.

एखादा डॉक्टर कमीतकमी ३० वर्ष क्वालिफिकेशन नसताना >>> क्वालिफिकेशन नसताना म्हणजे काय ? असं कुठे म्हटलेलं आहे. तुम्ही नीट वाचून प्रतिसाद देत का ? पहिल्या प्रतिसादानंतर पण क्लिअर केलेलं आहे. उगीचच काहीही काय ?

लक्ष्मीरोड वर मोठे क्लिनिक चालवत असेल हे पटत नाही. >> इथे पटण्या न पटण्याचा संबंध नाही. डॉ. सोमण पीजी डीजीओ होते कि आणखी काय होते याबद्दल माहीती द्या म्हणजे झालं.

तुम्हाला फायदा झाला नाही हे दुर्दैव. >>> फायद झाला कि न झाला याबद्दल तक्रार केलीये का ? ब-याच भोंदी डॉक्टर्सकडे पण रुग्णांना फायदा होत असतो.

रिसेप्षनिस्ट चा पगार थकला असेल म्हणुन ती सूड उगवत असेल. >>> त्या रिसेप्शनिस्टचं नाव शक्य झाल्यास मला मेल करून कळवावे. तुम्हाला हे कसे कळाले हे ही कळवावे.

नंदिनी यांची पोस्ट प्रचंड आवडली असे म्हणण्यापेक्षा अगदी मला जे सांगायचे आहे ते अतिशय योग्य शब्दात मांडले आहे.

दीनानाथच्या स्पेशालिटीच्या रिसेप्श्निस्ट बर्‍याच शा उद्धट आहेत. एखाद्या सरकारी हॉस्पिटलसारख्या.काऊंटरकडे दुर्लक्ष करून आपापसात गप्पा मारणे, विनोद करून फिदीफिदी हसणे. टेक्निशियन जेवायला उशीर झाला की चिडचिड करतात. त्यांचे म्हणे जेवायचे ग्रुप असतात. तो राग ते पेशंटवर काढतात म्हणजे चिकटपट्ट्या खसकन ओढून काढणे. इकडे सरका तिकडे सरका असे वसकन ओरडणे. डॉक्टरचा अनुभव यायचाय. ब्राम्हण डॉक्टर चांगले असतात अशी माहीती मिळाल्येय. हे हॉस्पिटल आय एस ओ आहे म्हणतात . असेल कदाचित.म्हणजे सूचना पट्ट्या इतक्या लहान आहेत की चष्मा नसेल अथवा जवळ गेला नाहीत तर दिसत नाहीत. मुख्य म्हणजेओ पी डी पेशंट/ व्हिजिटरांसाठी टॉयलेट दिसत नाहीत . जी दिसतात त्याना कुलपे लावलेली आहेत. तिथल्या विवेकानंदांच्या पुतळ्याचा फोटो काढायला बंदी आहे ( म्हणजे लिहिलेले नाही तिथे. तुम्ही फोटो काढू लागलात की सिक्युरिटीवाले धावत येतात आणि फोटो काढू नका असा आदेश देतात. याचे काय कारण असावे बरे? )

भारतीय रुग्ण डॉक्टरांवर गरज सरो अन् वैद्य मरो या वृत्तीनुसार इतकी प्रचंड टीका करु लागले तर मग इथले डॉक्टर परदेशात जातील.

ही बातमी वाचा.

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=010...

दिनानाथ चा अनुभव तसा चांगला होता.
दिनानाथ पेशंटाना आवडते की नाही माहित नाही, व्हिजीटरांना खूप आवडते. व्हिजीटर संख्या आणि वेळांबद्दल कटकट करत नाहीत. कँटिन चांगली आहेत.

भारतीय रुग्ण डॉक्टरांवर गरज सरो अन् वैद्य मरो या वृत्तीनुसार इतकी प्रचंड टीका करु लागले तर मग इथले डॉक्टर परदेशात जातील.>>>दिड मा, बाकीच्या व्यवसायिकांचं काय? डॉक्टर्स काम झाल्यावर टीका करत नाहीत का?

मनोज, प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटर्स मधेच लिहावे असा नियम असल्याने मागे सातींनी लिहिले होते इथे.
मी भारतात असताना डॉ. माळगींकडे गेलो तर त्यांनी हातानी लिहिलेले प्रिस्क्रिप्शन थेट एका संस्थेच्या वेबसाईटवर गेले आणि त्यांनी लगेच मला फोन केला व मी सांगितलेल्या दिवशी सर्व औषधे घरपोच आणून दिली.

मनोज, प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटर्स मधेच लिहावे असा नियम असल्याने मागे सातींनी लिहिले होते इथे

मग आता डॉक्टर हा नियम कधी पासुन पाळायला लागतील. मी तरी अजुन पाहिले नाही. माझ्या फॅ,डॉ. ना विचारेन.

प्रिस्क्रिप्शन चुकीचे वाचल्याने (अक्षर फार वाईट नव्हते, मेडिकल वाला मूर्ख होता) 'ग्लोवब' (स्पेलिंग मध्ये डब्ल्यू आहे)या फॉलिक अ‍ॅसिड गोळ्यांऐवजी 'ग्लेव्हो' या अँटिबायोटिक 'वही है' म्हणून देण्यात आल्या होत्या. ग्लेव्हो चे ग्राफिक,घटक इ.इ. बघून या फॉलिक अ‍ॅसिड नाहीत अशी शंका आली आणि डॉ ना विचारुन त्या नाहीत ही खात्री करुन घेतली होती.

मी डॉक्टरांनी चिठ्ठीत लिहून दिलेली औषधे विकत घेतल्यानंतर शक्यतो ती पुन्हा डॉ. नेऊन दाखवतो (की हीच आहेत का बघा).

दिनानाथचं विझिटर टॉयलेट चांगलं आहे म्हणणारे साधारण किती वर्षांपुर्वी तिकडे गेलेले? कारण मागच्या वर्षी तिथलं टॉयलेट भयंकर बेक्क्क्क्क्क्काआअर होतं वर्षभरात सुधारलं असेल तर माहीत नाही. आम्ही फक्त काही टेस्ट करायला गेलेलो आणि वैतागून गेलो अगदीच Sad

Pages