डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा !

मला अजिबातच वाईट अनुभव आले नाहीत डॉक्टरांचे ( डॉक्टर म्हणून !!! )

जबरदस्त ! हा खुप कडक होता !

डाव्या पाया ऐवजी उजवा पाय कापला,

किडनीच गायब केली !

चुकुन पोटात कात्री, बँडेज विसरले !!

असे अनुभववाले ईथे आलेले नाहीत अजुन ?

साती, तुम्हि सान्गेतल्या पैकी फक्त १-२ प्रश्न विचारले असतिल. नवर्याच्या टेस्ट तर २-३ IUI नन्तर केल्या. पहिल्या consultation ला मागची मेडकल हिस्ट्र्र्री व रिपोर्ट्स चक्क टेबलवर बाजुला थेवुन दिल्या. PPT presentation , video clips यातुन त्याच्या क्लिनीकचा success ratio कसा जास्त आहे हेच पटवुन देत होता. मीच वेड्या आशेपायी जात होते.

आजुन एक अनुभव, माझ्या सा.बा मुम्बैला आल्या होत्या,तब्येत एकदुम उत्त्म, बी पी, डायबेटीस काहीही नाही. अचानक एका सन्ध्याकाळी तिरळ्या पाहु लागल्या. मी office मधुन आल्यावर मला ते गम्भीर वाट्ले.नवरा टुर वर होता. मुम्बैत कुणीही ओळखीचे नाही,डॉक्टरांची माहीती नाही,या परिस्थित मी घराजवळच्या डॉक्टर ट्न्ड्न कडे नेले. ते आय स्पेशलिश्ट आहेत. त्यानी सान्गितले कि साबाना डाव्या डो़ळ्याला पारालिसिस झाला आहे. त्याना फिजिओथेरेपिची गरज आहे. तसेच एक इन्ज्क्श्न चा कोर्स करावा लागेल.मग साबाना बाहेर बसवुन मी आत फिजिओथेरेपिश्ट्चा नन्बर घ्यायला गेले. त्यावर ते म्हणाले कि डॉ सुरेश (फिजिओथेरेपिश्ट्) बरेच दिवस म्हणत होता कि पेशट पाथवले नाहित म्हणुन तुम्हाला पाथवत आहे.
मग आमची वरात फिजिओथेरेपिश्ट् कडे , तर तो म्हणाला कि २१ सिटिग्ज कराव्या लगतिल + इन्ज्क्श्न चा कोर्स , एका सिटिगची फि २१०० रुपये + इन्ज्क्श्न चा कोर्स ५००रुपये प्रमाणे.
मला हे आवाक्याबाहेरचे वाट्ले, तरिहि दुसर्यादिवशी साबाना इन्ज्क्श्न द्यायला घेउन गेले फेमिली डॉ कडे , कारण इन्ज्क्श्न कुठेहि घेतले तरि चालेल असे होते. फेमिली डॉ कडे एक ट्रेनी होमीयोपथ होता , तो आला इन्ज्क्श्न द्यायला, त्याने हे इन्ज्क्श्न पाहिले आणी सन्गितले कि ते साधे मल्टिव्हीटामीन आहे, त्याचा आणी साबाच्या दुखण्याचा सम्भध नाहि.तुम्हि दुसरीकडे सल्ला घ्या. मग मी नवर्याला बोलावुन घेतले,आणी सरळ साबाना नाशिकला नेले. तिथे नवर्याचा मित्र आय स्पेशलिश्ट आहे, त्याने सन्गितले कि हा डोळ्याचा आजार नाही. तुम्हि न्युरोलोजिस्ट कडे जा. न्युरोलोजिस्ट ने सन्गितले कि ब्रेनला काही आजार आहे. महिन्याभराच्या treatement ने साबा बर्या झाल्या. आजुनहि काहिहि त्रास नाही.

अश्विनी, iui २-३ वेळा केल्यव्वर मग नवर्‍याच्या टेस्ट करणे हे अतिशय चुकीचे आहे.

मुम्बैत कुणीही ओळखीचे नाही,डॉक्टरांची माहीती नाही,या परिस्थित मी घराजवळच्या डॉक्टर ट्न्ड्न कडे नेले. ते आय स्पेशलिश्ट आहेत

दुसर्यादिवशी साबाना इन्ज्क्श्न द्यायला घेउन गेले फेमिली डॉ कडे ,

माफ करा तै, पण एका वाक्यात तुम्ही म्हणता की तिथे तुमच्या ओळखीचे कोणी नवते नि पुढे म्हणता की फॅ. डॉ. होते,
हे काही पटले नाही.

फॅ.डॉ होते तर त्यांनाच भेटायला हवे ना?

मुम्बैत कुणीही ओळखीचे नाही,डॉक्टरांची माहीती नाही,या परिस्थित मी घराजवळच्या डॉक्टर ट्न्ड्न कडे नेले. ते आय स्पेशलिश्ट आहेत

दुसर्यादिवशी साबाना इन्ज्क्श्न द्यायला घेउन गेले फेमिली डॉ कडे ,

माफ करा तै, पण एका वाक्यात तुम्ही म्हणता की तिथे तुमच्या ओळखीचे कोणी नवते नि पुढे म्हणता की फॅ. डॉ. होते,
हे काही पटले नाही.

फॅ.डॉ होते तर त्यांनाच भेटायला हवे ना?

बापरे.. किती लक्ष पुर्वक वाचल्या जातात पोस्टी.

मुंबईत कुणीही ओळखिचे नाही आणि एकदम फॅमिली डॉ.असे-कसे?

मलेरिया असा तपासणीत सापडतो? माझ्या मुलीला गेली तिन वर्षे मलेरिया होतोय, डॉक्टर म्हणतात की ताप असतानाच मलेरियाची टेस्ट केली तर तो तपासणीत सापडतो. ताप नसताना केली असता सापडत नाही. आणि मलेरियाचा ताप पुर्ण दिवस नसतो. तिनही वर्षी तिला खुप माईल्ड मलेरिया झालेला जो तपासणीत सापडला नाही. पण डॉक्टर तिला तपासुन औषध देत होते.

आणि हे मलेरिया ताप नसताना न सापडण्याचे मी याआधी दोन डॉक्टरांकडुन ऐकलेय.

वरची पोस्ट वाचुन मलाही असेच वाटले पण तिला ओळखीत डोळ्याचे डोक्टर नव्हते म्हणायचे असेल. रोजचे डोक्टर जिथे सर्दी तापासाठी जातो त्यांना फॅमिली डॉक्टर संबोधुन ती इन्जेक्शनसाठी गेली असेल त्यांछ्याकडे.

मला महामाया डाक्टर बाई ने अपेन्डिक्स आहे म्हणुन गभ्र्पात करायला सान्गितल दुसर्या महिन्यात पोट दुखत होत म्हनुन. सोनग्राफि मधे दिसत नव्हत अपेन्डिक्स तरिहि आहेच म्हणे. Thank God दुसर्या डाक्टर ला दखिवल अन त्या मडम ने तस काहिच सान्गितल नाहि. त्या महामाया डाक्टर बाईच चिन्चवड स्टेशन ला क्लिनिक होत. म्हातरि होति. डाक्टर लोक जेव्हा भ्रमिश्ट व्ह्यायला लागतात तेव्हा रिटायरमेन्ट का घेत नाहित, देव जाने. मरे पर्यन्त कमवायच असत.

मला डॉक्टरांचे छान अनुभव आहेत.

पाय मोडला तेंव्हा जयसिंगपुरच्या हिरेमठ डॉक्टरनी छान सर्जरी केली.

भूल द्यायला डॉ. पाटिल.

दोघेही माझे क्लासमेट !

Happy

देव त्यांचं भलं करो.

सकुरा, डॉक्टरांचा दवाखाना सोसयटी मध्येच होता, ४-५ वेळा किरकोळ ताप, सर्दि, या करता जाणे झाले होते. ज्या वेळी हे सर्व झाले , तेव्हा हे डॉक्टर बाहेर् गावी गेलेले होते. नाहीतर आधी त्याच्या कडे गेलो असतो.

दीमा, साती,

यावर प्लीजच प्रकाश टाका.

सर्व पॅथी मधे एम. एस. करता येते का ? ( मी उल्लेख, खरं तर अनुल्लेख केलाय त्या व्यक्तीच्या गाईड एक वैद्य होत्या ) मग त्या डीग्रीसमोर त्या पॅथीचा उल्लेख करणे बंधनकारक नाही का ? अलोपथीमधली पदवी घेऊन नंतर पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इतर पॅथीनंतर ते घेतले तर सिलॅबस तोच असतो का ?

मला आयूर्वेदाबद्दल नितांत आदर आहे पण सर्जरी मधे अजूनही चरक / सुश्रुत यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच शल्यकर्म करतात का ते माहीत नाही, तेही सांगाच प्लीज.

दिनेश, माझ्या माहितितल्या एका आयुर्वेद डॉक्टराला मी विचारलेले शल्यकर्माबद्दल. त्यांनी आता आयुर्वेदात शल्यकर्म करत नाहीत, कारण ते ज्ञान आता उप्लब्ध नाही म्हणुन सांगितले. खखो तेच जाणे.

शल्यकर्माबद्दल मी वाचलेय ते रक्तमोक्षण वगैरे पण गायनिक मधल्या मोठ्या सर्जरीज बाबत त्या तंत्राने ते करणे कसे शक्य आहे ?

वर उल्लेख केलेल्या चेंबूरच्या डायमंड क्लीनीकमधला माझा किडनी स्टोनचा अनुभव अगदी वाईट असा म्हणता येणार नाही, पण अलोपथीची ट्रीटमेट चालू होती ३ दिवस. सलाईन लावून, जास्त लघवी होण्याची औषधे घेऊन काहीच फरक पडत नव्हता. दुखणेही कमी होत नव्हते. पडला असे खोटेच सांगून मी डिसचार्ज घेतला मग पथरीना, गोक्षुरादी गुग्गुळ अशी आयूर्वेदीक औषधे घेतली आणि दोन दिवसातच खडा पडला. नंतरही मी हिच औषधे नियमीत घेत आलोय ( हा किस्सा १९९४ सालचा ) नंतर कधीही त्रास झाला नाही. पथ्य मी अजूनही पाळतोच.

दिनेशदा,
एम बी बी एस ही अ‍ॅलोपथी(मॉडर्न मेडीसीन) आणि बी ए एम एस ही आयुर्वेदातील अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे.
यानंतर दोन्ही शाखांत विविध विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्ध आहे.
आयुर्वेदिक आणि मॉडर्न मेडीसीन वाल्यांचा सिलॅबस अर्थातच वेगळा असतो.
आयुर्वेदातून एम डी गायनॅक /एम एस सर्जरी केलेल्याना अनुक्रमे सीझेरियन किंवा बाकी मोठ्या शस्रक्रीया करायला परवानगी नसते.
(तरीही आयुर्वेदिक गायनॅकवाल्या बिन्धास्त ते करतात ते सोडा.)

होमिओपथी वाल्यांनी पण आता विविध पी जी कोर्सेस काढले आहेत आणि त्याला पण एम डी पीड्स , मेडिसीन असेच लिहून लोकांची फसवणूक करतात.

मात्र अ‍ॅलोपथिक मध्येच त्या त्या विषयाचे जे सरकारमान्य डिप्लोमा कोर्सेस आहेत ते कोणत्याही अर्थाने इन्फेरिअर नाहीत.
म्हणजे डिप्लोमा इन गाय्नॅक त्याच कॉलेजात दोन वर्षाचा अभ्यासक्रम असतो जिथे डिग्री तीन वर्षाची असते.
डिप्लोमा वाले अलमोस्ट सगळ्या शस्त्र्क्रीया करू शकतात.
फक्त टीचिंगमध्ये जाऊ शकत नाहीत.

एक एम डी मेडीसीन स्वतःला डायबेटॉलॉजिस्ट, कार्डीओलॉजिस्ट इ म्हणू शकतो. कारण त्याने ते शिकलेले असते.
मात्र एम डी मेडीसीन (भारतात) अँजिओग्राफी/प्लास्टी करत नाही.
आता डी एन बी नावाचा डिप्लोमा घेऊन मात्र हे सगळे डि एन बी - कार्डीओ, नेफ्रो अश्या सुपरस्पेश्यालिटी करू शकतात.

हे सगळे खूप कन्फ्यूजिंग आहे आणि सामान्य माणसाचा यात फारच गोंधळ उडतो.

बापरे हे सगळं वाचून डिग्री वाचली तरी डोक्यात काहीही शिरणार नाही.तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न राहील.
धन्यवाद इतक्या डिटेल मध्ये सांगितल्याबद्दल.

१४/१५ पाने भरतील इतके अनुभव ? नक्कीच काहीतरि गफलत होत्ये का वैद्यकी व्यवसायामधे?
माबोवरील डॉक्टारांची काय मते यावर? का हे असले अनुभव म्हणजे पेशण्ट व नातेवाईकांचे भ्रम्/अज्ञान असते? Wink

ते बीएचएमएस काय असते? माझ्या माहितीतल्या एक गायनॅक डॉक (त्या एमबीबीएस आणि बहुतेक डिजिओ का काहीतरी आहेत) त्या नसतात तेव्हा गायनॅकच्या केसेस त्यांची बीएचएमएस असिस्टंट हँडल करते.

BHMS = बहुतेक बॅचलर ऑफ होमीओपॅथी आणी BAMS= बॅचलर ऑफ आयुर्वेद आहे. घरा जवळच्या एक आयुर्वेदीक डॉक्टर बी ए एम एस ही पदवी लावतात.

सगळे वाचले नाही, पण एके ठिकाणी कापोचे यांची ही प्रतिक्रिया वाचुन रहावले नाही....

>>>>> अशाने घरटी एखादा डॉक्टर असावा लागेल. कोर्टात वकीलाने फसवू नये म्हणून प्रत्येकाला लॉ बुक्स चा अभ्यास करून बसावा लागेल. कुठेतरी विश्वास नावाची वस्तू वापरावी लागते कि नाही व्यवहारात ? <<<<<

तर मला त्यांना याच जागी लगेचच इतकेच सांगायचे आहे की
अन्निस-बुप्रा मोड ऑनः
"विश्वास" अशी काहि वस्तु वा बाब अस्तित्वातच नाही, जसे "देव" वगैरे काही असत नाही.....
विश्वास काय की देव काय, ते दिसत नाहीत, प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाहीत, पंचेद्रियांना जाणवत नाहीत, तर्कावरही उतरत नाहीत .... Wink
किंबहुना कुणी कुणावर "विश्वास " ठेवणे हीच एक अंधश्रद्धा आहे. Proud
व कुणाकडून विश्वास ठेऊन घेणे ही शुद्ध बुवाबाजी आहे... Lol
विश्वास ठेवणे, विश्वास देणे वगैरे बाबी समोरच्याला फसविण्याची साधने आहेत. बुवाबाजी आहे ती....
हे जग विश्वासावर चालत नाही. निव्वळ कॉन्ट्रॅक्ट वर चालते ज्याचा नियम असा की, कोणीही कुणाकरताहि फुकट काही करीत नाही, मोबदल्याशिवाय करीत नाही.
सबब, विश्वास वगैरे अंधश्रद्धांच्या नादी लागू नये.
अन्निस-बुप्रा मोड ऑफ.

वरील पोस्ट ही याच धाग्यावरील मजकुरातील विशिष्ट उल्लेखासंदर्भात असल्याने "विषयाला धरुन नाही" अशी अंधविश्वासी बोंबही कुणी मारू नये प्लिजच.

बी ए एम एस / बी एच एम एस वाल्यांना इमर्जन्सीपुरतं अ‍ॅलोपथी (सगळ्यांना समजावं म्हणून हा शब्द वापरत्येय, पण तो तितकासा योग्य नाही.) शिकवलेलं असतं.
बर्‍याच छोट्या हॉस्पिटलात ही मुलं नंतर अधिक सरावासाठी शिकायला रहातात.
यांनी हे काम करूच नये म्हणजे योग्य अ‍ॅलोपथी शिकलेल्या डॉक्टराच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅलोपथी स्ट्रीमला आलेले पेशंटस तपासू नयेच असे नाही.
हल्ली महाराष्ट्रात तर आपल्या थोर राजकारण्यांच्या कृपेने बी एच एम एस वाले अ‍ॅलोपथीची मेडीसीन्स फुल फ्लेज्ड देऊ शकतात.

आयुर्वेदातून एम डी गायनॅक /एम एस सर्जरी केलेल्याना अनुक्रमे सीझेरियन किंवा बाकी मोठ्या शस्रक्रीया करायला परवानगी नसते. >>>>> साती :अओ:.. माझी चुलत बहीण आयुर्वेदातून एम डी आहे आणी operations, deliveries करते. तिचा सुसज्ज दवखाना पाहिलेला आहे.

आमच्या परम मित्राचा अनुभव !

पाय मोडला, चालता येत नव्हत ६ महीने, कोणत्याही औषधाने, कोणत्याही डॉक्टराने पाय बरा झाला नाही,
मग तो मित्र गेला शरण धनगराला ! धनगराने औषध दिल,
मग काय ४ आठवड्यात पळायला लागला !

http://www.maayboli.com/node/30337?page=2

पाय कसा मोडला हे विचारायच नाय !

कारण पिल्यावर माणसाचा तोल रहात नसतोय ! मग गटारात पडत पाउल !
जुगारात हरल्यावर , त्या गम मध्ये माणुस पिल्याशिवाय घरी कस जाणार ?

जुगाराच एक बर असतया ! एकाच दिवसात एका महीन्याची तीन तीन पगाराची मिळकत एकाच वेळी !
मग तीन तीन नौकर्या कश्याला करायच्या !

ही क्लोरोक्वीनची नक्की काय भानगड आहे?
मलेरिया झाला नसताना घेतल्यास, अंधपणा वगैरे!
प्रेव्हेन्टीव्ह डोससुद्धा द्यायचे ना याचा. आतापण देतात का?
की डोसेज नुसार काही कमी जास्त साईड इफेक्ट्स आहेत?

आयुर्वेदातून एम डी गायनॅक /एम एस सर्जरी केलेल्याना अनुक्रमे सीझेरियन किंवा बाकी मोठ्या शस्रक्रीया करायला परवानगी नसते

नक्की कोण काय करते हे यावर कोणाचा कंट्रोल आहे का? तशी काही सोय सरकारने किंवा मेडिकल कोन्सिलने केली आहे का?

अगदीच कंपाऊण्डरपासुन डोक्टर बनलेल्या लोकांवर कारवाई झाल्याचे पेपरात वाचायला मिळते. पण ही कारवाई होते केव्हा? तर अशा डोक्टरच्या हातुन कोणीतरी गचकते आणि पोलिस कंप्लेटं होते तेव्हा. म्हणजे खरेतर तो डोक्टर खोटा आहे हे पोलिस शोधुन काढतात. मग असे घडेतो सामान्य माणसांनी वाट पाहावी का?

माझ्या एका मैत्रिणीच्या जावेला असेच मुल होण्यसाठी ट्रिटमेंट देऊन फसवलेले. तिच्या मते ती सातव्या महिन्यात असताना तिच्या कळले की ती गर्भवती नाहीय आणि तिला फसवले गेले. ती एवढी शॉकमध्ये गेली की आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. पण मैत्रिणिने खुप समजावुनही तिने आणि तिच्या नव-याने पोलिस केस केली नाही. आता या केसमध्ये ती फसवणारी बाई कधीतरी पकडली जाणारच. पण तोवर अशा कित्येक जणी उध्वस्त होणार त्याचे काय?

तिच्या मते ती सातव्या महिन्यात असताना तिच्या कळले की ती गर्भवती नाहीय आणि तिला फसवले गेले>>> सातव्या महिन्यापर्यंत कसे काय कोणी फसू शकते??? गरोदरपणाच्या काळातील प्रतिमाह होत जाणार्‍या शारीरीक बदलांचे काय?

मानव, काय नाही.
सोडा ते.
क्लोरोक्विन खूप जास्त महिने घेतल्यावर काही जणांना ते अंधपणा वगैरे. (ते देण्याचे इंडीकेशन्स वेगळे आहेत, मलेरिया नव्हे.)
मलेरियात तीनच दिवस देतात.

Happy

Pages