डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा उतारा ब्लॉगपोस्टमधून कॉपी मारला आहे. आजवर डॉक्टर म्हणून आलेला हा सर्वात वाईट अनुभव. पण ती बाई फ्रॉड होती हे नंतर उघडकीस आले. त्यामुळे हा अनुभव मला आलेले क्वॅक्सचे अनुभव या सदरात मोडतील!

चेन्नईमध्ये नळाला येणारं पाणी हे पिण्यालायक नसतं ही माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्यावर उपाय म्हणून तथाकथित बिसलेरीची कॅन विकत घ्यायचे हेही सांगितलं होतं. पंचवीस रूपयाला पाच लिटरचा कॅन. हा काही मिनरल वॉटरचा कॅन नव्हेच. खारं पाणी गोडं करून विकतात, पण हे पाणी जंतुविरहीत वगैरे अजिबात नसतं. आम्हाला त्याची सत्यता फारच मनापासून नंतर पटली. इथे येऊन पंधरा-वीस दिवस झाले होते. सतिशच्या नोकरीची घडी बसत चालली होती. सुनीधीसाठी मी नर्सरी अथवा प्रीकेजी टाईप एखादं स्कूल शोधत होते. भाषेचा लढा चालूच होता. तर इतक्या सर्व गडबडींमध्ये तापाचं दुखणं निघालं. पहिला एक दिवस क्रोसीनवर घालवला. दुसर्याइ दिवशी मात्र प्रचंड अंगदुखी आणि ताप. सकाळी झोपेतून जागेच होता येईना इतका थकवा. सेम अवस्था नवर्यावची सुद्धा. नवीन नोकरीमध्येच फार सुट्ट्या नकोत म्हणून तो कसाबसा कामावर गेला. मी मात्र अख्खा दिवस झोपूनच. जेमतेम घरातली काही कामं केली, स्वयंपाक म्हणायला काय खिचडीभात केला. सगळं अंग गळून गेलं होतं. संध्याकाळी तो घरी आला तोसुद्धा तापानं फणफणलेला. शेजारणीला हाक मारून सांगितलं की आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. कुणाकडे जाऊ? तिनं बाजारामध्ये असलेल्या एका डॉक्टरचा पत्ता सांगितला. मी आणि सतिश दोघंही तोपर्यंत अक्षरश: झोकांड्या जावेत इतके तापाने फणफणलेले होतो. चालत कसेबसे डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत गेलो, तिथं रीसेप्शन काऊंटवर एक अत्यंत अजागळ, घाणेरडी आणि उर्मट बाई बसली होती. वय साधारण पन्नाशीच्या पुढ्चं. आम्ही दोघं तिला सांगत होतो की खूप ताप आहे, बस्ण्याची सुद्धा ताकद नाहीये वगैरे. ती वस्सकन तमिळमध्ये आमच्यावर ओरडली. काय ओरडली ते शब्दश: समजलं नाही तरी टोकन घ्या आणी गप्प बसा, नंबर आला की आत सोडू हे असावं. अजून वीसेक नंबर शिल्लक होते. शेजारी उभा असलेला पेशंट म्हणाला “और एक घंटा लगेंगा”. मला पाच मिनीटं उभं रहावत नव्हतं. जमलं तर लवकर नंबर लाव नाहीतर आम्ही घरी जातो, तासाभरानं परत येऊ तेव्हा लगेच नंबर दे असं त्या रीसेप्शनिस्टला सांगायचा प्रयत्न केल्यावर ती परत एकदा डबल वस्सकन ओरडली. तेही इतक्या जोरात की अर्धा दवाखाना आमच्याकडे वळून बघायला लागला.
दवाखान्यात लोकं गंमत म्हणून येत नाहीत काहीतरी त्रास होत असतो म्हणून आलेले असतात, त्यातही जर उशीर होत असेल तर नंतरचा नंबर देणं अथवा उशीरा यायला सांगणं हे त्या रिसेप्शनिस्टच्या कामामध्ये येत नाही का? त्याक्षणी बाहेर बसलेल्या पेशंटवर नजर टाकली तर बहुतेक पेशंट हे गरीब, मजूर आणि अशिक्षित असे दिसले. जर ही बया आमच्यासारख्या सुशिक्षित दिसणार्याब लोकांसोबत बोलताना इतक्या घाणेरड्या टोनमध्ये बोलत असेल तर या बिचार्यात पेशंटशी कशी बोलत असेल... काही पेशंट्स जमीनीवर बसले होते, त्यांना मुद्दाम तिथं बसायला सांगितलं होतं.. का ते कारण सांगायची गरज आहे का? एकंदरीत वातावरण खूप वाईट होतं.
मी, नवरा दोघंही तापानं आजारी होतो... तेव्हा बोलवागायचं सौजन्य तरी किमान दाखवणं इतकी चूक असते का? अगदी चकचकीत मेकप केलेली रीसेप्शनिस्ट नको. पण किमान स्वच्छ साडी नेसलेली, केस विंचरलेली आणी तोंडात पानपरागचा तोबरा न भरलेली तरी असावी इतकी अपेक्षा जास्त आहे का? हे सर्व बघून नवरा मला म्हणाला, चल इथून. परत या दवाखान्यात यायला नको.
मघाशी ज्या शेजारणीला डॉक्टरणीचा पत्ता विचारला ती आमच्या पाठोपाठ दवाखान्यात आली, आम्ही व्यवस्थित पोचलो की नाही बघायला!!! आमची अवस्था बघून आणि इतकी गर्दी बघून ती म्हणाली की इथं एक नवीन दुसरी डॉक्टर आली आहे तिच्याकडे जाऊया का?
ही दुसरी डॉक्टरीण बाई अगदी नुकती महिन्याभरापूर्वी आली होती म्हणे. तिच्याकडे काहीही गर्दी नव्हती. तिनं तपासलं आणि एक दोन औषधं लिहून दिली. इंजेक्शन तर दिलंच. घरी आलो आणि जे काय होतं ते खाऊन झोपलो. रात्रीतून सुनिधीलादेखील ताप भरला. दुसर्यात दिवशी नवरा ऑफिसला जाण्याच्या स्थितीमध्येच नव्हता. परत डॉक्टरीण बाईकडे गेलो. म्हणाली बहुतेक कावीळ आहे, ब्लड टेस्ट करावी लागेल. एका अतिशय जुनाट लॅबचा पत्ता दिला. (लॅब इतकी जुनाट होती की तिथे त्या माणसानं ब्लड रीपोर्ट टाईपरायटवर टाईप केला. टाईपरायटर!! आठवला का? कीबोर्डसारखाच दिसतो पण जरा मॊठा असतो!! त्याच्यावर!!) कावीळ नव्हती. पण डॉक्टरीण बाई म्हणे, गडबड आहे आपण लगेच परत ब्लड टेस्ट करू. त्याच लॅबमध्ये. हे काय गौडबंगाल आहे कळेना. गेले तीन दिवस ताप जराही कमी झाला नव्हता. अंग दुखत होतं भरीसभर उलट्या चालू होत्याच. सुनिधीला ताप आला होता म्हणून बाईला म्हटलं पेडीयाट्रीशीअन रेकमेंड कर. तर म्हणे, मीच औषधं लिहून देते. कशाला हवा पेडीयाट्रीशीअन?
मला आता एकंदरीत डॉक्टरीण बाई बोगस वाटू लागली होती. त्याच दिवशी कामवालीने बॉम्ब टाकला, तुमच्याकडे काम करायला जमणार नाही. माझे पैसे द्या, मी उद्यापासून येणार नाही. हे राम!! ऊठाले रे बावा!! म्हणायची वेळ आली.
संध्याकाळी परत त्याच डॉक्टरकडे गेले तर म्हणे, तुला खूप अशक्तपणा आलाय, सलाईन लावते. म्हटलं आधी ताप तर उतरूदेत. त्यासाठी औषधं दे. तर म्हणे आता परत ब्लड टेस्ट करू. मगच औषधं देऊ.
आजारपणामुळे आमच्या दोघांचं विचार करण्याचं यंत्रच बंद झाल्यासरखं वाटत होतं. तरीही ओळखीच्या दोन डॉक्टरांना शेवटी फोन केला. ते म्हणाले असे बारा बारा तासांनी रक्त तपासायची गरज नाही. दुसरा डॉक्टर बघा. आम्हाला काहीही समजेना. बाईला एकूणातच निदान होत नाहीय हे लक्षात आलं होतं. दिवसाभरात या डॉक्टरकडे चार चकरा मारल्या होत्या. \

>>>> आता या बाईची डिग्री आम्ही तपासली नाही ही फार मोठी चूक आम्ही केलीच होती. बोर्डावर बाईंनी डिग्री बी एस सी, एम सी एच अशी लिहिलेली होती. नंतर कुणीतरी त्या बाईविरूद्ध तक्रार केल्यानंतर पळून गेली.

नंदिनी,
मग त्यानंतर तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे गेलात की नाही? पुढे काय झाले?

तसेच, तुमच्याकडे अत्तापर्यंत तिथल्या चांगल्या डॉकची यादी जमली असेल तर कृपया इथे http://www.maayboli.com/node/57683 देणार का?

एकंदर चर्चा वाचून असे वाटत आहे की डॉक्टरांचे वाईट अनुभव वाढत गेले तर आपल्या मताला मायबोलीवर काडीची किंमत राहणार नाही अश्या कोणत्यातरी काल्पनिक भयातून काही सदस्य डॉक्टरांची वकीली करत असावेत. तर तसे काही नाही, विद्या विनयेन शोभते. नीट बोललात तर पुन्हा किंमत मिळू लागेलच. पण निघाला धागा की बडवला कळफलक आणि काढली कोणाचीतरी अक्कल असे वागणे असेल तर वर मिळाले आहेत तसेच प्रतिसाद मिळणार ह्यात शंका नाही.

दुसरा मुद्दा:

वर एक वाक्य लिहिले आहे सातींनी, अर्थात डोळा मारण्याची स्मायली टाकून. की आम्ही सी एं चे वाईट अनुभव असा धागा काढत नाही.

१. हे सी एं नी स्वतःवर झालेले उपकार मानावेत का? Wink
२. काढावासा वाटला तर काढालच की?
३. डॉक्टरांचे वाईट अनुभव येण्याचे प्रमाण खूप अधिक असून मुळात डॉक्टरांकडे सर्व वयोगटातील, व्यवसायातील लोकांना जावेच लागते. असे सी एं चे नसते. वर आलेल्या कित्येक प्रतिसादांमधून डॉक्टरी पेशा हा बेदरकारी आणि पैश्यांची अतिरिक्त लालसा ह्यांनी पोखरला गेल्याचे आढळत आहे. निल्सनचा अनुभव तर अक्षरशः बेदरकारीची परीसीमाच! अश्या व्यवसायातील लोकांच्या वर्तनाचे सरसकट समर्थन जर कोणी करत असेल तर त्या मनुष्याला मोकिमी, साधना, कपोचे हे लोक देत आहेत तसे प्रतिसाद येणारच की? तुम्ही तसे समर्थन करत आहात असे मी म्हणालेलो नाही.

एक भाबडा प्रश्न. रुग्णाचे हाल हाल करून, आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ करणार्‍य डॉ. बद्दल आलेले वाईट अनुभव नावासकट आल्यावर, जे कोणी "ह्यात" नाहीयेत ते का अपसेट व्हावेत?

काहीही हं बेफिकिर.

मेधावि,
तुम्ही हास्यास्पद वाक्य लिहिले आहेत. Happy

नि स्पॉक नी. यू डोन्ट गेट एनी अन्सर्स फ्रॉम मी.
मी आता आयटीवाले लोकांना कसे फसवतात, ठरवून आर्थिक, शारिरीक, मानसिक खच्चीकरण करतात, यावर धागा काढणार आहे Wink

पण तिथे "इतर आयटी" वाल्यांनी काय केले यामुळे माझ्या भावना नै कै दुखावनार,
किंवा मी "असे झाले असेल तसे झाले असेल" वगैरे नै लिहिणार तिकडे!
उलट मीच मायक्रोसोफ्ट, ओरेकल, अ‍ॅपल विरुद्ध लिहित / सांगत असतो.

स्पॉक, माझे प्रतिसाद वाचलेत का या धाग्यावरचे?
त्यात कुठे चुकीच्या वागण्याचं समर्थन दिसलं का?
की खोटे आळ घेणार्‍या बेफि किंवा मेधावि सारख्या प्रतिक्रियांचा समाचार दिसला?

दिमा, हास्यास्पद काय आहे? खरंच मनापासून विचारतीये. तुम्च्या कोणा नातेवाईकांचे असे अनुभव असते तर तुम्हालाही वाईटच वाटले अस्ते ना? घरच्यांच्या अनेक हॉस्पिटलायझेशन्सनंतर घेतलेले कटू अनुभव आहेत. माणसाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न असतो अश्या ठिकाणी विनोद का सुचतील?

त्यात कुठे चुकीच्या वागण्याचं समर्थन दिसलं का?
>> याबद्दल काही बोलायचे नाही. इतरांनी योग्य शब्दत म्हटलेले आहेच.
पण तुम्हीही मग आम्ही आयटीवाल्यांवर धागा काढु असे म्हटले, त्याला ते उत्तर होते.

मायबोलीवरचे डॉ ज्या तळमळीने लिहीतात, वैद्यकीय सल्ले देतात त्यावरुन त्यांचे प्रोफेशन आयटी पेक्षा बरेच जास्त जबाबदारीचे आणि ताणाचे आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे त्यांनी कृपया हे सर्व स्वतःला लावून घेऊ नये.इथे आलेले काही किस्से मिसकम्युनिकेशन चे, काही इतर स्टाफ च्या गाढवपणामुळे जन्मलेलेही असू शकतात.(काही आयटीवाल्यांचे काल्पनीक जग,त्यांचे डबल स्टँडर्ड याबद्दल लिहीण्यासारखे बरेच आहे, पण त्यात 'माणूस म्हणून होपलेस' हा भाग 'आयटीवाले म्हणून होपलेस' पेक्षा जास्त आहे.)

माझ्या मैत्रिणीच्या मुलाला डी.एम.डी नावाचा स्नायूंचा आजार झालाय ज्यात हसता खेळता ५ वर्षांचा मुलगा हळू हळू लुळा पांगळा होणार आहे. ह्या संदर्भात दिनानाथ मधे टेस्ट साठी त्याची आईवडिल व तो गेले होते. तेव्हा त्याचे रिपोर्टस बघून त्या डॉ. ने त्याच्या मित्रमैत्रिणींना हाका मारून मारून बोलवले व अरे अमुक अमूक आजाराचा पेशंट आलाय लव्कर या बघायला. अरे त्याच्या पोटर्‍या बघा, अरे बाळा वळ बरं थोडा, चालून दाखव बरं, अरे, त्याचे पोट कसे दिसते ते नोट करा रे.... हे सगळे हास्य विनोद करत चालू होते. त्याच्या आईवडिलांनी ही नशिबाची चेष्टा कशी सहन केली असेल त्याची कल्पनाही करवत नाही.

जहांगीर हॉस्पिटलला इन्शुरन्सचा पेशंट असं सांगितलं तर चार्जेस मधे फरक करतात. इन्शुरन्स असेल तर सुरूवातीला क्लिअर करावे लागते. त्यांचे दर वगैरे लावणारे लोक वेगळे असतात. इन्शुरन्स कंपनीचा एक माणूस तिथे असतो. पंण प्रत्यक्षात तो जागेवर नसतो. हॉस्पिटलचा एक स्टाफ तिथे सगळं करत असतो. तो मनुष्य आल्यानंतर सगळे क्लेम्स धडाधड पास करतो.त्यांचं काय सेटींग आहे हे सांगता येणार नाही. हे हॉस्पिटल आता दुस-या एका मोठ्या ग्रुपच्या मॅनेजमेंटमधे असल्याने त्यांच्या दिल्लीतल्या हॉस्पिटलला जे चार्जेस मंजूर होतात ते आम्ही क्लेम करतो असं उत्तर मिळालं.

विजय सागर नावाचे मित्र आहेत. ते ग्राहक पंचायतचे काम करतात. सीजीएचएस नावाची केंद्र सरकारची एक स्कीम आहे. या स्कीममधे दिल्ली साठी जे चार्जेस मिळतात तेच पुण्यात रुबी हॉल क्लेम करत असे. जेव्हां स्पेशल रूम रुबी मधे आठशे रुपयांना होती (जुनी गोष्ट आहे) तेव्हां दिल्लीतल्या दराने ते २४०० रुपये क्लेम करत असत. इतरांना मात्र ८०० रु. या विरुद्ध विजय सागर यांनी लढा दिला. त्यांनी यांची दरपत्रके, इतरांची बिलं अशी कागदपत्रं सीजीएचएस ला पाठवली. सीजीएचएस चा पैसा हा पब्लीक मनी आहे. त्यामुळे दखल घेतली गेली. क्लेम कट होऊन मिळू लागले. पण मग कर्मचा-यांचं नुकसान होऊ लागलं. त्यामुळे हॉस्पिटल्सला असे दर आमच्या कर्मचा-यांकडून आकारले जाऊ नयेत असं कळवलं गेलं. त्यावर काही हॉस्पिटल्सनी स्कीम मधून बाहेर पडण्याची धमकी दिली. सध्या अशी तडजोड निघालेली आहे की कर्मचा-याने आगाऊ पैसे भरायचे. त्याला किती पैसे द्यायचे हे सीजीएचएस आणि तो कर्मचारी पाहून घेईल. त्यात अनावश्यक तपासण्या, चार्जेस, अनावश्यक औषधं यांचे पैसे डिडक्ट होतात.

इन्शुरन्सच्या बाबतीत पण पेशंट्सनी लक्ष घातलं नाही तर असंच होईल. आता असे ऐकले आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी याबाबतीत हॉस्पिटल्सना विचारणा केली होती. वाद न्यायालयात गेला पण इन्शुरन्स कंपन्यांच्या विरोधात निकाल गेला. मी हे चेक केलेलं नाही. पण जर हे खरं असेल तर यात ग्राहकाचं म्हणणं न ऐकताच तिसरेच पक्ष भांडले असं होतंय. हॉस्पिटलचे पैसे कसे द्यायचे याची तजवीज करण्यासाठी पेशंट इन्शुरन्स घेतो.

इथे हॉस्पिटलला त्यांच्या दरपत्रकाप्रमाणे पैसे मिळाल्याशी मतलब असायला हवा. इन्श्युरस कंपनी अमूक शहरात इतके पैसे देते मग आम्हाला का नको हा त्यांचा हक्क कसा ?

ग्राहक म्हणून इन्स्युरन्स कंपनी तोटा काही दिवसांनी आपल्याकडूनच भरून घेणार. सध्या तरी कंपन्या क्लेम्स पास करतात म्हणजे त्यांना परवडतंय किंवा तोटा सहन करण्याचे धोरण असावे त्यांचे.

स्पॉक विस्तारभयास्तव पूर्ण किस्सा लिहिला नाही. सुदैवाने त्याच वेळी आम्हाला एक चाम्गले डॉक्टर भेटले- जे सध्या फॅमिली फ्रेंड देखील आहेत.

ही ब्लॉगची लिंक : http://nandinidesai.blogspot.in/2015/10/mad.html

>> याबद्दल काही बोलायचे नाही. इतरांनी योग्य शब्दत म्हटलेले आहेच.
<<

मग, इथे फक्त मिसकन्सेप्शन्स मधून जन्माला आलेल्या पोस्टी व त्यातून काढलेले विचित्र निष्कर्ष दुर्लक्षित करू का?

उदा. "डॉ.ने त्याच्या मित्रमैत्रिणींना हाका मारून बोलावले"

What a flight of fancy and extreme malice towards the doctor profession!

टीचिंग हॉस्पिटलमधे अशा रेअर डिसीजचा पेशंट आला, अन तिथल्या इतर डॉक्टर्सनी तो तपासला नाही, तर लवकरच त्या रोगाबद्दलचे ज्ञान लुप्त होईल. दीनानाथ टीचिंग हॉस्पिटल आहे, जिथे पोस्टग्रॅज्युएट डॉक्टर्स शिकत असतात. इथे तुम्ही तपासून घ्यायला गेलात, की तुम्हाला इतर डॉक्टर्सही तपासतील, ही इम्प्लिसिट कन्सेन्ट असते, हे तुम्हाला समजते काय?

इतर डॉक्टरांनी तपासले, किंवा ज्युनिअर डॉक्टर्सना तुमच्या आजाराची माहिती दिली, तर त्यात तुमच्या नशीबाची चेष्टा कशी काय झाली?

त्या डॉक्टरांनी काय गल्लीतले बघे गोळा करून डोंबार्‍याचा खेळ मांडला होता का? मित्रमैत्रिणींना बोलावले म्हणे!

हास्यास्पदच्या पलिकडले विधान आहे हे तुमचे.

हा धागा मुळातून तुमच्या अशा गंडलेल्या मानसिकतेतून उत्पन्न झालेला आहे. असो. तुमच्या पर्सेक्युशन कॉम्प्लेक्सला मी काहीच करू शकत नाही. हॅव फन.

माझ्या मैत्रिणीच्या मुलाला डी.एम.डी नावाचा स्नायूंचा आजार झालाय ज्यात हसता खेळता ५ वर्षांचा मुलगा हळू हळू लुळा पांगळा होणार आहे. ह्या संदर्भात दिनानाथ मधे टेस्ट साठी त्याची आईवडिल व तो गेले होते. तेव्हा त्याचे रिपोर्टस बघून त्या डॉ. ने त्याच्या मित्रमैत्रिणींना हाका मारून मारून बोलवले व अरे अमुक अमूक आजाराचा पेशंट आलाय लव्कर या बघायला. अरे त्याच्या पोटर्‍या बघा, अरे बाळा वळ बरं थोडा, चालून दाखव बरं, अरे, त्याचे पोट कसे दिसते ते नोट करा रे.... त्याच्या आईवडिलांनी ही नशिबाची चेष्टा कशी सहन केली असेल त्याची कल्पनाही करवत नाही. <<<<

मेधाव्ही, हे वाचून अक्षरशः तिडीक आली डोक्यात. :रागः असंवेदनशीलतेची आणि पोरकटपणाची हद्द केली त्यांनी. हीच कृती त्यांना पुढच्या भेटीत आधी पालकांशी कन्सल्ट करून त्यांची परवानगी घेऊन करता आली असती. आपल्यावर जी परिस्थिती ओढवलीय तिचा असाही सकारात्मक उपयोग होऊ शकतोय म्हटल्यावर पालकांनीही हरकत घेतली नसती.

दिमा, हीच कृती जास्त मॅचुअर्डली हॅन्डल करता आली नसती का? जे दु:खात होरपळतायत त्यांच्यासमोर हास्यविनोदात हे डिस्कशन? आपल्या दु:खाची चेष्टा चाललीय असे पालकांना वाटले तर ते चूक? मी डॉ. असते व अशी केस आली असती तर मी नक्कीच अशी वागले नसते.

गजानन,
तुमचीही प्रतिक्रिया एकांगी आहे असे म्हणतो.
ज्याप्रकारे मेधावि यांनी किस्सा लिहिलाय तसं घडलेलं नसणार हे खात्रीने सांगतो. अशा वेळी प्रोटोकॉल असतो, अन तो फॉलो केलाच जातो.
फालतू बॅशिंग करू नका.

"तुम्हाला डॉ चा वाईट अनुभव आला तर तुम्हीच जबाबदार" हे अजिबात पटलं नाही. माझ्या घरी अनेक डॉक्टर्स आहेत. त्यात अगदी निस्वार्थ भावनेने काम करणारे, पेशंटशी जेवढ्यास तेवढे वागणारे, अतिशय कर्ट बोलणारे, अतिशय गोड बोलणारे असे सगळेच प्रकार आहेत. अन यांच्यापैकी कुणीही त्यांच्या प्रोफेशनमध्ये मालप्रॅक्टिसेस आहेत हे अमान्य करत नाहीत. उलट आम्हाला (नॉन मेडिको फिल्डमधले इतर नातेवाईक) सक्त ताकीद आहे की घरच्या डॉ ना न विचारता दुसर्‍या कुठल्याही डॉ कडे जायचं नाही.
तरी हा मागच्याच्या मागच्या वर्षी घेतलेला अनुभवः
माझ्या जावेला २ वर्ष प्रयत्न करुन मुल होत नाही, म्हणून आमच्या नातेवाईक डॉ नी ओव्युलेशन मॉनिटरिंग (अल्ट्रासाउंड) करायला सांगितलं. हे नातेवाईक म्हणजे माझी काकू. ओ.मॉ. पिरेड्च्या आठव्या दिवसापासून एक दिवसाआड करावं लागतं. जाऊ खराडीत रहाते आणि औंधला नोकरी. माझी काकू कोथरुडला. त्यामुळे ओ.मॉ. साठी कोथरुडला जाणं फार कठीण होतं. त्यावर माझ्या काकू नी सांगितलं की तु जवळच्या रेडिऑलॉजिस्टकडून करुन घे आणि मला रिपोर्ट पाठवत रहा. मग पुढची ट्रीटमेंट मी करीन.
तर जावेनी जवळच असलेलं खराडीतलं को.ए. हॉस्पीटल गाठलं. तिथे ओ. मॉ. सुरु केले. एक दिवसा आड असं चारदा मॉनिटरिंग केलं आणि डॉ म्हणाले, "ओव्ह्युलेशन होत नाहीये" , पुढच्या महिन्यात या. माझी काकू म्हणाली, "होतं असं कधी कधी. पिरिञेड्स येतात ना नियमित? मग ओके. पुढच्या महिन्यात पुन्हा कर". पुढच्या महिन्यात सेम प्रकार रिपीट झाला. ह्यावेळी ओ.मॉ. करणार्‍या रेडिओलॉजिस्टनी डयरेक्ट हॉस्पीटलच्या गायनॅक कडे रेफर केलं. जावेने विचार केला की आता आलोच आहे तर दाखवून घेऊ. आता या गायनॅक मॅडमनी सांगितलं की बहुतेक हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसतोय, तर पुढच्या महिन्यात हॉर्मोनल टेस्ट करुन घ्या. (ह्या पिरिएडच्या दुसर्‍या दिवशीच करायच्या असतात). माझी काकू म्हणाली, "ओके, करुन घे. त्यात काही हार्म नाही. पण शक्यतो गोळविलकर मधुन्च कर". इकडे या गायनॅ़ डॉ म्हणाल्या टेस्ट करायच्या दिवशी कुठलंतरी औषध(की इंजेक्शन) पण द्यायचंय तर तु माझ्या क्लिनिकमधेच ये. तिकडेच ब्लड सँपल पण घेईन. या डॉ पण खराडीलाच. डॉ चंगेडेया. त्यामुळे जावेला वाटलं एकाच वेळी दोन्ही काम होतील. म्हणून ती या मॅडमकडे गेली. मॅडमनी सँपल घेतलं आणि रेपोर्ट घ्यायला ४ दिवसांनी बोलवलं. सँपल "डॉ पिवळा" लॅबला पाठवलं. (हे नंतर रिपोर्ट पाहून कळलं).
रिपोर्ट घ्यायला ही गेली तर म्हणे "FSH LH च्या लेव्हल्स प्री मेनोपॉजल आहे. तुला नॅअचरली मुल होणार नाही" हे ऐकुन जाऊ शॉकच झाली. तीस वर्षाचीही नव्हती तेव्हा. त्या शॉकमध्ये या डॉ मॅडम म्हणाल्या मी हॉर्मोनल बॅलन्स साठी बर्थ कंट्रोल पिल्स देतेय, तीन महिने घे. मग पुन्हा हीच टेस्ट करु. ही घरी आली, रिपोर्टमधल्या लेवल्स गुगल केल्या. सगळीकडे हेच लिहिलेलं की या लेवल्स म्हणजे प्री-मेनोपॉज आणि नॅचरली मुल अशक्य. ती इतकी खचली की तिने घरात कुणालाही काही सांगितलं नाही आणि या मॅडमची ट्रीटमेंट सुरु केली.
तीन महिन्यानी पुन्हा ओ.मॉ. मध्ये तेच नाटक. ऑव्ह्युलेशन होत नाही. पुन्हा हॉर्मोनल टेस्ट. यावेळी FSH LH च्या लेव्हल्स अजुन वाईट. डॉ मॅडम म्हणाल्या आता तू इन्फर्टिलिटी क्लिनिक मध्ये जा. आयव्हीएफ करावं लागेल. असं म्हणून विमाननगरच्या नव्या उघडलेल्या इंदिरा आयव्हीएफ ला रेफरन्स लिहून देला. आता मात्र जावेला काही सुचेना. मला फोन केला. खुप वेळ रडली. मी म्हटलं तू माझ्या काकूशी बोललीस का? तर म्हणाली, "नाही. मला सुचलंच नाही त्यांच्याशी बोलायला." तसंही ती माझी काकू, जावेसाठी परकीच. मग मी तिला जबरदस्ती काकूकडे पाठवलं. काकूने पहिले तिला खुप झापलं की तू असं कसं मला न विचारता ही ट्रीटमेंट घेतलीस म्हणून. काकुचं म्हणणं हे की माझा ह्या "डॉ पिवळा पॅथोलॉजी लॅब" वगैरेवर विश्वास नाही. त्यांचे टेस्ट रिझ्ल्ट्स बरेचदा चुकीचे असतात. काहीतरी कॅलिब्रेशन प्रॉब्लेम मुळे. तर हिला पुन्हा गोलविलकर मेट्रोपोलिस मधुनच पुन्हा हॉर्मोनल टेस्ट करायला सांगितली. त्याशिवाय ही अजुन बर्‍याच सांगितल्या. तेही मेन ब्रांच मध्येच जा असं बजावून. इथे टेस्ट केली तर अगदी सगळ्या लेवल्स बरोबर रेंज मध्ये!!!! आशचर्याचा धक्काच!!
पुढे हीची सगळी व्यवस्थित ट्रीटमेंट केली काकूनी. आता सहा महिन्याची मुलगी आहे.

त्यावरुन हे धडे मिळाले:
१. कुठल्याही आलतु फालतु पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं नाही. अतिशय चुकीचे रिझल्ट मिळु शकतात. त्यावर बेस्ड ट्रीटमेंटची पुर्ण दिशाच चुकू शकते.
२. पेशंटला कसंही करुन आयव्हीएफ कडे वळवायला अनेक डॉ काय वाट्टेल ते करतात. माझी काकू म्हणाली रिपोर्ट चुकले आहेत हे डॉ ला कसं कळलं नाही? ही कुठली यडपट गायनॅक शोधली तुम्ही जिला एवढं कळत नाही की पेशंट प्री मेनोपॉजल कशी असेल जर ती जेमतेम तीस वर्षाची आहे आणि तिला व्यवस्थित दर महियाला पिरेड्स येतात आहेत? ह्याचा अर्थ ती मुद्दाम तिक्डे दुर्लक्ष करतेय.
३. रेडिऑलॉजिस्ट ही ह्या सगळ्यात मिलीभगत करुन आहेत. जर आठव्या दिवशी ओ. मॉ. सुरु केले आणि दर एक दिवसाआड असं चारदा मॉनिटर केले. म्हणजे शेवटचं मॉनिटरिंग चौदाव्या दिवसी. तोपर्यंत ओव्युलेशन झालं नाही तर डयरेक्ट ओव्युलेशन होतच नाही असा रिपोर्ट? ज्यांची सायकल ३०-३२ दिवसाची आहे, त्यांचं ओव्युलेशन अठराव्या-एकोणीसाव्या दिवशी होतं. मग हे त्या डॉ ला कळु नये?
४. गुगल करुन सामान्य माणसाला इन्फरन्सेस काढता येणं अशक्य आहे. उदा. या केसमध्ये जावेनी गुगल केलं होतं. त्यावरुन तिला तेच कळत होतं जे डॉ सांगत होते. पण मुळात रिपोर्टच चुक होते. मग गुगल करुन काय फायदा? पण हेच माझ्या माझ्या काकूला एक मिनिटात कळलं की " ही पेशंट प्री मेनोपॉजल नाहीच" कारण बाकीचे पॅरामीटर्स. हे समान्य माणसाला कसे कळणार? शरीरात शंभर गोष्टी एकमेकाशी रिलेटेड असतात, आणि चांगले डॉ निदान करताना ते सगळे एकत्र बघत असतात.

आता डॉक्टरच्या बाजुने काही:
माझी काकु म्हणाली, मी पेशंटला सांगते की तुम्ही आधी कितीही टेस्ट केल्या असल्या तरी पुन्हा गोलविलकर मधुन कराच. तरच पुढची ट्रीटमेंट देईन. कारण मला माहीत आहे की अनेक लॅब्स विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत. पन यावर काही पेशंटला वाटतं की मला कमिशन मिळणार असेल गोलविलकर मधून. मग ते गावभर बदनामी करत सुटतात Sad

दिमा, नाही, मी अजिबात उपस्थित नव्हते पण तुम्हीसुद्धा नसाल ना? जिथे तुम्ही नव्हता, तिथे प्रोटोकॉल पाळलाच गेला असेल असे म्हणणे धाडसाचे वाटत नाही का/?

मुलाच्या आईने अतिशय दु:खाने हे सर्व सांगितले होते व तिला झालेले दु:ख नक्कीच खरे होते. ही घटना सांगतानासुद्धा ३ ते चार वेळा अति - दु:खाने तिला बोलवतही नव्हते. त्यांनी झाल्या प्रकाराबाबत कुठेही तक्रार केली नाही का काही केले नाही. मान खाली घालून घरी आहे. पण हा प्रकार ऐकूनही अंगावर काटा आला होता. अश्या प्रकारच्या आजारात पेशंटची मनस्थिती पहायला नको का? असो. तुम्ही चांगल्या डॉक्टरचे चांगले अनुभव हा धागा वाचत नाहीये का?

दीमा साहेब
>> डॉक्टर हा कोणतीही 'वस्तू' विकत नसतो>>
पुन्हा काही बेसिक्स
व्यवसायाचे दोन प्रकार असतात...... उत्पाद निर्माते आणि सेवा देणारे (प्रॉडक्ट अ‍ॅम्ड सर्व्हिसेस)
दोघांनाही हा सिध्दांत लागू आहे

>>कस्टमर इज राईट अशी ट्रीटमेंट पद्धती विकसित करण्यात अजूनही कुणालाच यश आलेलं नाहिये. उदा. मला पोटात दुखतंय म्हणजे मला गॉलस्टोन्स आहेत, असे सांगणार्‍या पेशंटला, कस्टमर इज राईट म्हणून गॉलस्टोनची ट्रीटमेंट द्यायला हवी, असे तुमचे म्हणणे आहे काय?>>

इथे कस्टमर तांत्रिक दृष्ट्या ऑलवेज राईट हे अभिप्रेत नसून, त्याला उत्तम सहृदय, विनयशील सेवा द्यावी हे अभिप्रेत आहे.
सेवेत "लिसनिंग" म्हणजेच सहृदय श्रवण अभिप्रेत आहे, बहुतांशी , हे आढळते का? यात त्याची भिती दूर करणे ,संवाद साधणे, दुखण्याची माहिती देणे इ. समाविष्ट आहे. या शिवाय त्याला विनाकारण तुच्छ न लेखणे अपेक्षित आहे.

मी तिथे नव्हतो, पण मी अशा असंख्य केसेस माझ्या विद्यार्थ्यांना शिकवल्या आहेत, अन मला त्यावेळी कसे वागतात, ते नीट ठाऊक आहे, म्हणून मी सांगतो आहे, की तुमची उमज चुकली आहे.
पेशंट समोर खिदळायचे नाही, हा पहिला नियम शिकवतात मेडिकल कॉलेजात. खिदळलं तर पेशंटसमोरच प्रचण्ड अपमान केला जातो. तो अपमान होताना पाहिला, तर तुमच्या कन्सेप्ट्स बदलतील कदाचित.

नंदिनी, ब्लॉग वाचला. वेळेवर उत्तम सहकार्य मिळाले. बोनस म्हणुन घरकामाची मदतही! Happy

आता मी भीत तर शैतानालासुद्धा नाही. पण कुत्रं इज अ डिफ़रंट गेम अल्टूगेदर. Proud
+१

आणखी काय काय नियम शिकवतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक कुठलीतरी शपथ घ्यायला लावतात हे खरे आहे का ? काय आहे ती शपथ ?

रेव्यु काका,
मग जे अभिप्रेत आहे, ते नीट नै लिवायचं का? जौद्या. आता बोअर झालो मी या धाग्याला. येईन नंतर.

>> १. मी लय हुशार आहे, माझ्यामुळे जीव वाचतात, याचा एक दंभ निर्माण होतो, अन मग तसे वागले जाते.>>
हे स्प्ष्टीकरण आहे की डिफेन्स की जस्टिफिकेशन
हे झाले पाहिजे का? नाही ना? अन झाले तरीही साधारण किती दिवस प्रॅक्टीस केलेले असावेत?
काल परवा एम डी झालेले असे वागतांना मी पाहिलेत ( जनरलायझेशन नाही) !!

पन यावर काही पेशंटला वाटतं की मला कमिशन मिळणार असेल गोलविलकर मधून. मग ते गावभर बदनामी करत सुटतात अरेरे
>>

नताशाजी, तुमच्या काकूंना गोलविलकरमधून कमिशन मिळतच नाही याची खात्री आहे का?

Pages