"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणवीर अगदी बाजीराव शोभून दिसतोय. अंगशैलीपण योद्ध्यासारखी आहे.

बाजीरावचे कॉश्चुमदेखील मस्त आहेत. दिपीकाचे कपडे इतके उठून दिसत नाहीत. प्रियांका खुप गोड दिसलीय, विशेषतः बारश्याच्या सीन संपताना पाळणा हलवत उभी असते तेव्हा.

प्रियांकाचे मराठी अगदी सहज वाटतेय. रणवीर आणि प्रियांका दोघेही "बल्लाळ" हा शब्द उच्चारताना "ळ" च्या ऐवजी "ड" म्हणतात. उत्तर भारतीयांना तसेही ळ उच्चारणे अवघडच आहे.

काही ठिकाणी थोड्या चुका झाल्या आहेत.

एका सीन मध्ये "चला, मी चालले" असे म्हटले आहे, त्या ऐवजी "चला, मी येते" असे असायला हवे होते.

पिंगा गाण्याच्या आधी काशीबाई मस्तानीला हळदीकुंकू लावायला जाते, त्या सीन मध्ये त्या दोघी एकमेकींना फक्त हळदच लावतात, कुंकू लावतच नाहीत.

दोघी एकमेकींना फक्त हळदच लावतात, कुंकू लावतच नाहीत >>> येस. हे खटकलं होतं. मग विचार केला की त्यांना सिंदूर म्हणून शेंदूर अपेक्षित होता की काय? आणि रॉयल सिंदूर म्हणून केशर-चंदनाचा टिका वगैरे लावताहेत दोघी Proud

वरती गारदीसंबंधी पोस्ट्स वाचल्या. मला वाटते गार्देझ हा अफ्घानिस्तानमधला एक प्रांत आहे. गझ्नि, घोर हेही अफ्घानिस्तानमधलेच प्रांत आहेत.>>>

गारदी हा guardies (म्हणजे guardsmen) चा अपभ्रंश आहे. हे बहुदा ब्रिटिशांकडचे प्रशिक्षित एतद्देशिय सैनिक होते. ते कुठल्याही एका विशिष्ट धर्माचे वा प्रांताचे नव्हते.

हिरो मे हिरा कोहिनूर
झबाका नाम लेतेही आता है ऋन्मेऽऽष के चेहरे पे नूर

आता रात्री स्वप्नात तुपकट चेहर्‍याचा स्वजो अ‍ॅज बाजीराव, इंटलेक्चुअल अ‍ॅक्सेन्ट मारणार्‍या सोनालीताई कुलकर्णी (थोरल्या) अ‍ॅज काशीबाई आणि उंदीर पकडायला टपलेल्या मांजरीचे भाव चेहर्‍यावर घेऊन सता अ‍ॅज मस्तानी दिसणार आहेत.

बाजीराव वयाच्या विसाव्या वर्षी पेशवे झाले, म्हणजे काशीबाई त्यावेळी १४-१५ वर्षांच्या तरी असाव्यात (कदाचित त्याहून लहानही). त्या वयाला साजेसा त्यांच्या स्वभावात अल्लडपणा दाखवलेला आहे. रांगोळीवरुन नकळत चालत जाणे, सासुच्या मांडीवर उडी मारुन बसणे असे प्रसंग त्याला अनुसरुन आहेत.
( त्याकाळात मुलींची लग्ने लहानपणीच होत, आजही सुनमुख बघायच्या प्रथेत सासु सुनेला मांडीवर बसवून मग आरश्यात तिचा चेहरा बघते.)

अल्लड, बालिश काशी हळूहळू समंजस पेशवीण बनत जाते. मध्येच एक सासु-सुनेचा सीन आहे, ज्यात राधाबाई तिला पेशवीण म्हणजे आमराई, जिला सर्वात जास्त दगडांचा मारा सोसावा लागतो असे समजवताना दाखवले आहे. पण सिनेमाचा वेग जबरदस्त आहे, त्यात काशीचे पेशवीण काशीबाई असा प्रवास नीट दाखवता नाही आला. शिवाय तो मुख्य विषयही नाही.

काशीबाईंनी हळदीकुंकू देऊन मस्तानीला स्विकारले, (त्यासाठीच पिंगाचे प्रयोजन होते का?) पण बाजीरावांनी मस्तानीविषयी आपल्याला अंधारात ठेवले हा राग मात्र होता, जो त्यांनी त्या दिवे फुंकण्याच्या सीन मध्ये व्यक्त केला.

रंजना आणि उषा नाईक चा हळदीकुंकू नावाचा चित्रपट आला होता. त्यात लग्नाची बायको म्हणजे कुंकू आणि नंतर आलेली बाई, म्हणजे हळद असा संवाद / प्रसंग आहे... त्याला ऐतिहासिक आधार म्हणायचा तर !!

दिनेशदा बहुतेक उषा नाईक आधीची प्रेयसी म्हणून हळद आणि रंजना लग्नाची बायको म्हणून कुंकू असं आहे काहीतरी (रंजना तिला नंतर घेऊन येते पण ती लग्नाआधीची प्रेयसी असते).

हो आठवलं अन्जू आता..
या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकांत कुणी मराठी नव्हते का ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले दिसतेय.

आज एका गुल्टी कलीगशी बाजीराव मस्तानी बद्दल बोलताना बाजीरावला नाचवणे, दोन्ही बायकांना एकत्र नाचवणे, लो वेस्ट पैठण्या वगैरे वगैरे वरची चर्चा किती फोल आहे ह्याचा साक्षात्कार झाला.
मी विचारलं विकेंडला बाजीराव मस्तानी बघीतलास का, तर म्हणे नाही, पण ऐकलंय चांगलाय, सो बहुदा बघेन. वर असं विचारलं की बायदवे बाजीराव मस्तानी कोण होता? त्याला म्हटलं तुला काय माहितेय, तर म्हणे 'बाजीराव मस्तानी' नावाचा एक फ्रीडम फायटर होता आणि त्याच्यावर बहुतेक मुव्ही आहे... Uhoh
म्हटलं उठाले रे बाबा.... (आणि हाहापुवा पण झालं)

उठा ले रे बाबा, मासे, गप्पी मासे, हिवतापाचे डास, मैच्या ह्यांच्या विदर्भातले डास, तापी नर्मदेचे पाणी (दिमांच रहातं गाव समजल Wink ), वांछित-अवांछित = आजची सकाळ कारणी लागणे Lol

अमेय, तुम्हारा चुक्याच बर का!

Amey should be proud Wink
आणखी दहा वर्षानी लोक ध चा मा साठी
हा बाफ शोधून शोधून वाचतील आम्ही आईने अकबरी वाचला तसा!

अमेय दिवा घ्या! तुम्हाला इथल्या टवाळाना हाकलायचं असेल तर स्टे अवे म्हणा Biggrin

पेशवे जर ध ला मा लिहीत होते तर मस्तानी चं मूळ नाव धास्तानी कशावरून नसेल ? यावरून ती सिंधी असावी असा नवाच निष्कर्ष निघतो. म्हणजेच बाजीराव बुंदेलखंडात नाही तर सध्याच्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात गेला असावा किंवा बुंदेल्यांनी सिंध्यांना गुलाम केले होते असे नवे निष्कर्ष निघतात.

अमेय, धाग्याचे नांव बदल पाहू!

"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार>>>>

ऐवजी

"बाजीराव मस्तानी" : चित्रपट फेरविचार!!

Wink

आपल्याला काय मिसो कसाही दिसला/ एक्टिंग केली न केली तरी आवडतोच >>> करेक्टे वत्सला.

बाजीराव काशीबाईंच्या भुमिकेत कुणालाही कास्ट करा मराठीतुन मस्तानी म्हणुन शर्वरी जमेनीस घेतली तर पर्फेक्ट कास्टींग होईल. तिच्याकडे आहे ती ग्रेस..

मराठी मधे कुणाकडे १५० करोड आहे का चित्रपटनिर्मितीवर ओतायला ? आधी त्याचे नाव सुचवा. मग स्वप्नरंजन करा Proud

आम्हाला भव्य सेट्स नसले तरी चालतील, काळाप्रमाणे आवश्यक तशी घरं, महाल, वेशभुषा, केशभुषा, भाषा इ. इ. साठी १५० करोड लागतील अस नाही वाटत...

जुन्या उपग्रह वाहिनीवर राउ आणि कलर्स (तेव्हाच इ मराठी) यावर बाजीराव-मस्तानी यापेक्षा कमी खर्चात केली आहे असा भाबडा अंदाज बापडीचा.

विना सहकार, नाही उद्धार
वर्गणी काढू की.आता कथा लिहायला घ्या बरे.

Pages