"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाम पहायचा आहे. पण पुढच्या आठवड्यात जर त्यामध्ये °अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते° हे गाणं अॅड केलं तर काय घ्या, म्हणून नंतरच पाहीन.

रुनम्या Happy
तू झोपेतून उठता उठता पाहिला असशील शिनिमा. राकुंच्या सेन्चुरीकडे पाहत शिनिमा पाहिला कि असंच होणार.

सूनटून्या, इथे अजून दिलवाले नाही पाहिलाय तर बाजीराव कुठून बघू.. पण मी त्या महेश मांजरेकरला पक्का ओळखतो म्हणून कॉन्फिडन्सने बोललो.

अय्या! कधी उठले होते? >> Lol

इथे अजून दिलवाले नाही पाहिलाय तर बाजीराव कुठून बघू. >> ऋन्मेऽऽष , असला कसला रे तु शाखा फॅन Wink .. पहिला शो बघायला हवा होतास तु तर..

चनस, जेव्हा त्याचे ईतर चाहते पिक्चर बघत होते तेव्हा मी घरात बसलेल्यांना या पिक्चरला पिटाळत होतो, फेसबूक व्होट्सप मायबोली सारख्या संकेतस्थळांवर त्याच्या पिक्चरची मार्केटींग करत होतो, त्याच्यावर धागे काढून दिलवालेला चर्चेत ठेवत होतो, आता बोला कोण त्याचा खरा चाहता ..

असो, धागा बाजीरावांचा आहे म्हणून लिहितो, गर्लफ्रेंडला बाजीराव-मस्तानी बघायचाय. मलाही त्याचे काही वावडे नाही, पण दिलवालेच्या आधी बघायचे पाप करू शकत नाही म्हणून ती माझ्याबरोबर न जाता आता मैत्रीणींबरोबर जातेय Sad

हुशार दिसतेय गफ्रे. Wink
काल दिलवालेला जाऊन पस्तावलेले एक जण मला माहित आहेत. मायबोलीवर येऊन ट्रॅश करायच्याही लायकीचा नाही म्हणाले.

मार्केटिंग! बाब्बौ! Proud
अरे पण आताच रेदिओ मिर्चीवर ऐकलं की दिल्वालेने रिलीज झालेल्या विकांताला ६५ करोड्चा बिझनेस केला पण नंतर तो एकदम प्रतिदिन ८ करोडवर आला.. अजुन डीप डाऊन होतोय.. त्यापेक्षा बाजीराव बरा असं आरजे म्हणाला

ऋन्मेष, तिच्या सिनेमा निवडीवरून हुशार म्हटलं. Wink
चनस, पिक्चर पाहून फसलेली लोकं निगेटिव मार्केटिंग करत असणारच की.

हो.. असचं झालंय..
इथल्या पोस्टी वाचुन आता मला बाजीराव बघावा वाटतोय.. लाँग विकांताला बघेन

नंतर तो एकदम प्रतिदिन ८ करोडवर आला..
>>>>>
वीकडेजला लोकं कामधंदे सोडून का जातील..
आता नाताळला बघा.. शुक्र शनि रवि.. देश विदेशात कसा छापेल..

पिक्चर पाहून फसलेली लोकं निगेटिव मार्केटिंग करत असणारच की.
>>
कोणावर हल्ली कोणी विश्वास ठेवत नाही.. कारण दिलवालेला मुदामहून वाईट बोलणार्यांची संख्या अफाट आहे हे सर्वांना ठाऊक आहे.. आणि म्हणून तो खरेच वाईट असला तरी एखाद्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही..

धागा बाजीराव वर आहे

त्याच्यावर बोलण्यासारखे काही उरले नाही वाटते Happy

बाजीराव पाहिला..
रणवीर इतका फास्ट बोलतो कि कुठ कुठ मी त्याचे सगळे शब्द कॅचच नै करू शकली अरेरे
लोकांना तो आवडला..हि हॅज गट्स पण तो नेहमी असा जोरात धाडकन का बसताना दाखवलाय हमेशा कळेना मला
Sad
दिपिका आणि प्रियंका कधी नव्हे त्या आवडल्यात..
वाट लावली गाणं मला पन जीवावर आलं दिनेशदा.. खर तर ते अख्ख गाणचं..शब्द, नाच कैच नै आवडलं.. असो..
शेवटी जिवाला हुरहुर लागते सिनेमा संपल्यावर..

सबसे बडा रोग..क्या कहेंगे लोग हे शब्दशः खरय मात्र.. त्या दोघांचाही अंत असा व्हायला नको होता अस हमेशा वाटतं.. Sad

दिलवाले बघणार नै..शाहरुख्चा कुठलाच नै या जन्मी म्हणुन..
यातला एकही अभिनेता, अभिनेत्री विशेष आवडती नाही आणि भन्साळी तर अज्जिब्बात्तच नै तरी बघायला गेली फक्त इतिहासाबद्दल असलेल्या आकर्षणापायी.. बरा होता.. बराच बरा होता..

आत्ता सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या..
हसले,,वेगळे अँगल कळले..
हा पन मलासुद्धा रणवीर प्रियंकाची मराठी खुप आवडली.. दोघांचाही हेल हेका त्या त्या प्रसंगाला बोलण्यात मस्त आलाय ..

कल्पु, सिनेमा पाहिल्यावर तुमच्या मित्रासारखीच ( निखील कुलकर्णी) माझी मतं आणि विचार आहेत. इतके समान विचार असल्याच बघून थोडी मजा वाटली.

मग तुझ्या प्रमोशनवर आणि मार्केटींगवर ठेवला असणार का?
>>>
माझी स्टाईल वेगळी आहे. मी चित्रपटाचे आणि शाहरूखचे कोरड्या शब्दात खूप सारे कौतुक करतो आणि नंतर लोकांना आवाहन करतो तरीही तो देशापेक्षा मोठा आहे का? शाहरूख आपल्या देशाला असहिष्णू म्हणाला हे विसरून आपण बघायला जायचे का..
Happy

माझी स्टाईल वेगळी आहे. मी चित्रपटाचे आणि शाहरूखचे कोरड्या शब्दात खूप सारे कौतुक करतो आणि नंतर लोकांना आवाहन करतो तरीही तो देशापेक्षा मोठा आहे का? शाहरूख आपल्या देशाला असहिष्णू म्हणाला हे विसरून आपण बघायला जायचे का.>>>>मला कायच कळ्ळे नाय.:अओ:

मला कायच कळ्ळे नाय.अ ओ, आता काय करायचं >>> त्याला कळाले की तो सांगेल हो समजावुन. एवढे काय त्यात? Proud

काल पाहिला आवडला रणवीर बाजीराव म्हणून एक नंबर जमलाय. चित्रपटाच्या सुरूवातीला इरफान खान च नरेशन आहे ऐकताना अंग शहारून येत
" ऐ काहाणी गव्हा है उस वक्त की जब मराठा साम्राज्य का ध्वज छत्रपती शाहू महाराज के हातो मै लहरा रहा था और जिनके पेशवा थे बाजीराव बल्लाळ.
तलवार मै बीजलीसी हरकत, इरादोमे हिमालय की आडत्ता, चेहरे पे चित्तपावन कुल के ब्राह्मणो का तेज और आँखो मै एक ही सपना दिल्ली के तक्ख पर लहरा था हुआ मराठावो का ध्वज. कुशल नेतृत्व, बेजोड राजणिती और अकल प्रिय युद्ध कौशल से दस सालो मै बाजीरावांने आधे हिंदूस्तान पे आपना कब्जा जमा लिया. दक्षिण मै निजाम से लेकर दिल्ली के मुघल दरबार तक उनके बाहद्दुरी के चर्चे होने लगे. "
ह्या शुर योध्दयास मानाचा मुजरा......

मी 'बघु की नको' ह्यात अडकुन काल मोबाईलवर पाहीला. थिएटरला जाऊन पुन्हा बघावाच असा प्लान आहे दोन तीन दिवसात. खरंच काही ठिकाणी बारीक पण लक्षात येण्यासारख्या चुका जाणवल्या. पाडव्याला लढाईला जाताना तुफान पाऊस दाखवलाय. 'मार्चच्या पाडव्यात इतका पाऊस कसा काय' असं वाटतंच ..नंदिनी म्हणाल्याप्रमाणे नेमक्या त्या सिच्युएशनला वेगळी गाणी आठवतातच. प्रियांकाचं काम काशीबाई म्हणुन बघितलं नाही तर आवडते ती बर्‍याच ठिकाणी. दिपीकाला हळद कुंकु लावताना सगळं बोलुन झाल्यावर म्ह्णते, 'घ्या लावा' तेव्हा पुरेपुर सारकॅझम दिसलाय.

Pages