महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.
सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.
'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.
दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.
अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.
त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.
डिजे आणि मैत्रेयीला अनुमोदन.
डिजे आणि मैत्रेयीला अनुमोदन. पुन्हा तेच मुद्दे लिहीत नाही.
पण ते सारखं गुडघाभर पाण्यातून एकमेकांकडे चालत जायचं काय म्हणे ते?
ऊप्स, मला रणवीर सिंग म्हणायचे
ऊप्स, मला रणवीर सिंग म्हणायचे होते कपूर नाही, कपूर पण चांगलाय तसा.पाणी आणि बाकी गोष्टी लक्षात घेतल्यास बाजी राव मसतानी ==गोलीयोकी रासलीला रामलीला+देवदास असे म्हणता येईल का?
>>मात्र गृहकलहामुळे आणि
>>मात्र गृहकलहामुळे आणि व्यक्तीगत आयुष्यातील संघर्षामुळे पराक्रमी बाजीरावांचाही तेजोभंग झाला हे फार परिणामकारकरीत्या दाखवलंय.<<
उण्यापुर्या २० वर्षांच्या मर्यादित कारकिर्दित ४१ ल्ढाया जिंकणारा, "मुळावर घाव घातला कि झाडाच्या फांद्या आपसुक गळुन पडतात" हे विजन बाळगणार्या योद्धा बाजीरावाचा तेजोभंग गृहकलहामुळे झाला हे विधान अत्यंत धाडसी आणि साफ चुकिचं आहे. घरचा (राधाबाई, चिमाजी), बाहेरच्यांचा (पुण्यात्ले ब्रह्मवृंद) विरोध न जुमानता त्याने मस्तानीला पत्नीचा दर्जा दिला, मुंजीला विरोध म्हणुन खचुन न जाता मुलाला वेगळ्या संस्कारात वाढवण्याची हिंम्मत दाखवली. हतबल झाला असता तर सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चुन त्याने शनिवारवाड्यातच मस्तानी महाल बांधला नसता.
मस्तानी प्रकरण त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या १० वर्षांत घडत असताना त्याने किती मोहिमा यशस्वी केल्या, याचा अभ्यास केला तर "तेजोभंग" असले मुद्दे उद्भवणार नाहित, गळुन पडतील...
चुक भंसाळीची नाहि, सिनेमा ज्या कादंबरीवर आधारीत आहे, त्या कादंबरीची आहे. वर कुठेतरी उल्लेख आलेला आहे कि, पेशव्यांचं दफ्तर अजुनहि शाबुत आहे; पण इथे वेळ आणि इच्छा आहे कोणाला अभ्यास करायला?..
मिसोसाठी हां सिनेमा बघावाच
मिसोसाठी हां सिनेमा बघावाच लागणार
वत्सला, त्याच्यासाठी
वत्सला,
त्याच्यासाठी पहाण्याइतका स्कोप नाहीये मिसोला पण जे आहे ते काम चांगलं आहे :).
मिसो कोणत्या रोलमध्ये आहे यात
मिसो कोणत्या रोलमध्ये आहे यात ? बघावा लागेल चित्रपट आता >>>> हो ना ग जाई.
ओक्के! मी आता हा चित्रपट मिसो
ओक्के!
मी आता हा चित्रपट मिसो आणि वैभव तत्त्ववादीसाठी पाहणार
ही ऐतिहासिक कहाणी नाही, तर प्रेमाचा त्रिकोण आहे हे ध्यानात ठेवून.
वय वर्ष १० असलेल्या मुलांना दाखवावा का हा सिनेमा?
पिच्चर पाहून इथे वादघालू
पिच्चर पाहून इथे वादघालू पोस्टी पाडणार्या मुलांचं वय १० पेक्षा जास्त आहे असं तुम्हाला म्हणायचंय का मंजूडी?
वय वर्ष १० असलेल्या मुलांना
वय वर्ष १० असलेल्या मुलांना दाखवावा का हा सिनेमा? >> अगदी! क्रूर हिंसाचार किंवा नको ते ज्ञान वाढेल असे काहीही नाही सिनेमात. "उपवस्त्र म्हणजे काय?" असले फालतूचे २ मार्काचे प्रश्न विचारले नंतर तर काहीतरी उत्तरे तयार ठेवावी लागतील मात्र.
मला काय म्हणायचं आहे ते मी
मला काय म्हणायचं आहे ते मी स्पष्ट लिहिलंय दीमा
ओके सीमंतिनी! लेकीला पिंगा गाण्यासाठीच सिनेमा बघायचा आहे

आणि सिनेमा दाखवल्याच्या कृतज्ञतेपोटी सिनेमा दाखवणार्याला कुठले प्रश्न विचारायचे हे समजण्याएवढी समंजस आहे ती
अकबराच्या काळातले बारीकसारीक
अकबराच्या काळातले बारीकसारीक तपशील उपलब्ध आहेत. अगदी अकबराच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत. त्यामानाने सतराव्या शतकानंतरच्या महाराष्ट्रीय इतिहासाची पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत. पुण्याच्या आर्काइव्हात पेशवाईतली हजारो कागदपत्रं पडून आहेत. पण शिवाजी-संभाजी यांच्या नावानं तलवार काढणे आणि किल्ल्यांवर चढणे हेच इतिहासप्रेम अशी समजूत असल्यामुळे ती कागदपत्रं अजून कित्येक वर्षं तशीच पडून राहतील.>>
ही कागदपत्रे वेळीच नीट स्कॅन्ड करुन नाही ठेवली तर ती अजून नष्ट होतील. मला ही कागदपत्रे बघायची फार इच्छा आहे. समजणार तर नाहीच ती मोडी लिपितील आणि त्याकाळाची मर्हाटी भाषा पण एक उत्सुक्ता लागली आहे ही कागदपत्रे बघायची. चिन्मय तुझी ओळख खूप दुरवर आहे. तुच हे काम हाती घे कागदपत्रांचे. तुला त्यात नक्की यश येईल.
(No subject)
पाहिला सिनेमा. मिसो स्टिल
पाहिला सिनेमा. मिसो स्टिल लुक्स स्टनिंग ( खास मिसोप्रेमीसाठी
)
हाच सिनेमा काही वर्षांपूर्वी आला असता तर मिसो बाजीरावच्या भूमिकेत जास्त शोभून दिसला असता
सविस्तर पोस्ट नंतर लिहिते
मिसोसाठी हां सिनेमा बघावाच
मिसोसाठी हां सिनेमा बघावाच लागणार >> +१ आणि रणवीर साठी पण
जाई .. तु डोळ्यात बदाम आणुन लिहणार वाट्टं
(No subject)
हा मिसो कोण आहे हो?
हा मिसो कोण आहे हो?
ये पी एस पी ओ नही जानती ?
ये पी एस पी ओ नही जानती ?
मिलींद सोमण
ह्या मिलिंद सोमणला जेंव्हा तो
ह्या मिलिंद सोमणला जेंव्हा तो तरुण होता तेंव्हा भाव नव्हता फार. सिनेमात तेंव्हा तो फार आला नाही निदान मी तरी त्याचे तरुणपणीचे सिनेमे पाहिले नाहीत फक्त अॅड बद्दलचा वाद ऐकला. पण आता तो अनेक सिनेमांमधून दिसतो आणि संथ भुमिका करतो. त्या त्याला शोभतात. आता मुली त्याच्या फॅन्स आहेत आणि मुले त्याच्या धावण्या पोहण्या सायकल चाववण्यावर फिदा आहेत. तो आयर्न मॅन बनला आहे. मिलिंद सोमणसारखे हे वयाच्या ४० नंतरचे यश क्वचित एखाद्याला मिळत असेल. कारण इथे बॉलीवुड मधे चाळीशीच्या जवळपास कलाकार बाद होतात.
मिलिंद सोमण नागपुरचा आहे का? मी कुठेतरी वाचले होते की तो आणि मधु सप्रे हे दोघे नागपुरचे विदर्भातले आहेत.
आधी पण भाव मिळाला असता पण तो
आधी पण भाव मिळाला असता पण तो बहुतेक त्याच्या आधीच यु के ला गेला असावा.
मधु सप्रे चा पण काही पत्ता नाही.
मी अनु, मी आत्ता विकी वाचले
मी अनु, मी आत्ता विकी वाचले तर कळते की त्यानी अनेक सिनेमात काम केले आहे पण तो असा झळकलाच नाही. त्याच मराठी बर्यापैकी छान आहे.
ही यादी बघ..
Filmography[edit]
Year Film Role Language Notes
2015 Bajirao Mastani Hindi
2015 Nagrik Vikas Patil Marathi
2013 Samhita The King Marathi
2013 Alex Pandian Alvin Martin Tamil
2013 David Hindi
2012 Jodi Breakers Marc Hindi
2012 Agent Hamilton: But not if it concerns your daughter Abdul Rahman English
2011 Vithagan Tamil
2010 Nakshatra Hindi
2010 Paiyaa Baali Tamil
2009 Do Paise Ki Dhoop, Chaar Aane Ki Baarish Hindi
2009 Gandha Sarang Marathi
2009 Satyameva Jeyathe Telugu
2009 Arn - Riket vid vägens slut Saladin Swedish
2008 Bhram Devendra Hindi
2007 Arn - Tempelriddaren Saladin Swedish
2007 Bheja Fry Anant Ghoshal Hindi
2007 Say Salaam India Harry Oberoi Hindi
2007 Pachaikili Muthucharam Lawrence Tamil
2006 Valley of Flowers Jalan Hindi/Japanese
2005 Bhagmati Prince Quli Qutb Shah
2005 Jurm Rohit Hindi
2004 Surya Surya Hindi
2003 Rules: Pyaar Ka Superhit Formula Vikram Varma Hindi Also co-producer
2002 Agni Varsha Arvasu Hindi
2002 16 December Vikram Hindi
2002 Pyaar Ki Dhun Rohit Hindi
2000 Tarkieb Captain Ajit Verma Hindi
1998 Captain Vyom Captain Vyom Hindi TV Serial
1995 A Mouthful of Sky Akash Bhandarkar Hindi TV Serial
Sea Hawks Hindi TV Serial
मिसो बाजीराव पेशवा कदाचित
मिसो बाजीराव पेशवा कदाचित 'दिसला' असता फक्त. त्याला अभिनय करता येतो हे तोदेखील मान्य करणार नाही

रणवीरला रिप्लेसमेन्ट कोण शोधतंय पण?
१६ डिसेंबर मध्ये केला होता ना
१६ डिसेंबर मध्ये केला होता ना अभिनय? अर्थात मला तो सिनेमा आठवत नाही फक्त त्यातला बाँब निकामी करायचा पासवर्ड 'दुल्हन की बिदाइ का वक्त बदलना है' होता इतकंच आठवतं
मि अनु, हो त्याच्या भुमिका
मि अनु, हो त्याच्या भुमिका फार लांबलचक नसतात. क्वचित वेळी तो पडद्यावर दिसतो. काहींना आपली स्ट्रेंथ कशात आहे हे उमगत नसते किंवा उमगून त्यात जायचे नसते असे असेल बहुतेक मिलिंद सोमण ह्यांचे.
ला अभिनय करता येतो हे तोदेखील
ला अभिनय करता येतो हे तोदेखील मान्य करणार नाही फिदीफिदी>> आणि डायलॉग्सचं काय? बोबड्या नुसता!
त्याने फक्त मॉडेलिंगच करावं. किंवा पुर्वीसारखं शिवाजी पार्कवर पाव पँटवर धावायला यावं. अजूनही गर्दी होईल.
रणवीर सारखा बाजीराव अख्या
रणवीर सारखा बाजीराव अख्या इंडस्ट्रीत कोणीही करु शकत नाही / शकलं नसतं कधी भूतलाळातले कलाकार सुध्दा नाही !

त्यामुळे त्याला व्यर्थ रिप्लेसमेन्ट शोधु नका
मिसो छोट्याशा भूमिकेत ठिक आहे, अॅक्टींग चे कष्टं कशाला देताय बिचार्याला
@ बी, अवांतरः मिलिंद सोमण आणि
@ बी,
अवांतरः मिलिंद सोमण आणि सप्रे कन्यका मधु हे नागपुरातील नाही, म्हणजे असे कधी वाचनात तरी आले नाही.
मधु सप्रे, कित्येक वर्षे अंधेरी पू. येथील कल्पिता सहनिवास इथे रहात होती, if I am not mistaken then in "B" wing. आम्ही मुंबई सोडुन नागपूर ला जाण्याआधी एक वर्ष "H" बिल्डींग मधे रहात होतो, सप्रे बाई आणि मि.सो. ची अजगर फेम जाहिरात तेव्हाचीच, कित्येकदा तिला आणि मिसो. ला कल्पिताच्या मोट्टयाप्रिमायसेस मधे बागडताना बघितले आहेत
प्रसन्न, इथे विकिवर जाऊन वाच
प्रसन्न, इथे विकिवर जाऊन वाच मधु सप्रे ह्या नागपुरच्याच आहेत. मिलिंद सोमण ह्यांचे माहिती नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Madhu_Sapre
मिसो छोट्याशा भूमिकेत ठिक
मिसो छोट्याशा भूमिकेत ठिक आहे, अॅक्टींग चे कष्टं कशाला देताय बिचार्याला>> कळले आता मिलिंद सोमण मराठी मुलींचे किती ऐकतो ते ..त्याला एक टॅट्टू काढून दे दिपांजली
खास करुन त्याच्या धावत्या पायंवर दे तुझी अॅड होऊन जाईन मस्त 
मिलिंद सोमण मूळ जुन्नरचा आहे
मिलिंद सोमण मूळ जुन्नरचा आहे पण त्याचे वडील आणि आई दोघंही सायंटीस्ट म्हणून परदेशात कार्यरत होते आणि त्याचा जन्म बाहेरच्या देशात झाला आणि तो लहान असताना ते परत भारतात आले. आई गोव्याची आहे त्याची. मी मिसो fan असल्याने ही माहिती माझ्या लक्षात राहिली जी त्याने अनेक वर्षापूर्वी झी मराठीवर मंछिंद्रनाथ कांबळी कलाकारांच्या मुलाखती घ्यायचे त्यात दिली होती.
आयला खरेच की बी... धन्यवाद
आयला खरेच की बी...
धन्यवाद माहिती बद्दल.
Pages